स्मगलिंग नाय ना केली भौ ? कारण विकत घेतली असतील तर विकणाराने तरी नाव सांगितलं असतं ह्याचं ...
बाकी वेगवेगळ्या अँगल मधून काढलेले फोटू "के व ळ अ प्र ति म "
मन के साथ बातां : "दोनाचे चार होणे" ह्यालाच म्हणतात का रे टारू ? ;)
नाय टारूदादा स्मगलिंग नाय केली, पन त्ये लोक त्याला 'ताड गेदली' किंवा 'ताडा गेदली' असे म्हणत होते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
हे ताडगोळेच आहेत.
एक दुरुस्ती.
हे मुळात शहाळ्यासारखे दिसणारे फळ असते. तुम्ही न सोललेले फळ म्हणून जे दाखवले आहे- ब्राउन रंगाचे ते शहाळे सोलल्यानंतरचे आहे. तुम्हाला याचे शहाळे पहायला मिळाले नाही. मुंबईत तशी शहाळी असतात व समोर सोलून देतात.
ते सोलून घेताना अगदी हिरवे असलेले सोलून घेतले तर त्यात पाणी ही निघते. आणि ते पांढरे खोबरे पण जास्त छान असते. ते शहाळे वरून चॉकलेटी झालेले असते त्यात पाणी नसते आणि खोबरे कडक आणि बेचव असते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
अहाहा.. काय आठवण काढलीत हो ..ठाण्यात असताना उन्हाळ्यात ताडगोळे खाणे अगदी मस्ट !! बाजारात तर मिळतातच ,पण
आमच्या ठाण्यात बाळकूमच्या आगरी बाया सिजनप्रमाणे ताडगोळे, पटणीचे तांदूळ (खास भाकरीसाठी), करटोली, शेवळं,काकडं,हिरवीगार लांब खास कापाचीच वांगी, वाळकं(म्हणजे लांब हिरव्या काकड्या ,खिरे नव्हेत ते वेगळे.)कोकमं, आंब्याच्या पाट्या..(पेट्या नाहीत पाट्या- हारे.. ७० चा शेकडा!)ऋषींची भाजी आणि असेच काय काय आणतात..माझ्या आजीपासूनच्या ठरलेल्या दोघीजणी आजही येतातच आणि वरील गोष्टी आणतात.वयोमानाप्रमाणे आता वेणूबाई, देवकीबाईला होत नाही तर आतादेवकीची मुलगी शांती येते. ह्म्म ..ताडगोळ्याची चित्रं पाहून आत्ताच्या आत्ता ठाण्याला जावसं वाटतय.
स्वाती
ताडगोळे, पटणीचे तांदूळ (खास भाकरीसाठी), करटोली, शेवळं,काकडं,हिरवीगार लांब खास कापाचीच वांगी, वाळकं(म्हणजे लांब हिरव्या काकड्या ,खिरे नव्हेत ते वेगळे.)कोकमं, आंब्याच्या पाट्या..(पेट्या नाहीत पाट्या- हारे.. ७० चा शेकडा!)ऋषींची भाजी
वा स्वातीताई!!! काय भरगच्च आठवण करून दिलीस. त्यातही अख्खे वाल घालून केलेली शेवळाची भाजी माझी खास आवडती.
याशिवाय, जांब (एक सफेद थंडगार फळ), कवठाची चटणी, रायआवळे, वाळवलेले चिंचोके, फणसाचे गरे, वसईची वेलची केळी (वेलची केळी सगळीकडे असतील हो मात्र वसईच्या ओळखिच्या भाजीवालीकडून खास वेगळ्या काढून ठेवलेल्या केळ्यांची मजाच और आहे), सागर मेथी वगैरे अनेक गोष्टी डोळ्यासमोर तरळून गेल्या (बरी आठवण झाली! आता एव्हाना यातील काहि गोष्टी बाजारात आल्या असतील)
बाकी ताडगोळ्यांचे फोटू पाहून थंड वाटले. धन्यु
ऋषिकेश
असं पण काही असतं का? आपल्याला बॉ माहितच नव्हतं खाऊन बघायला पाहिजे..
हे खाऊन नशा तर होत नाही ना? ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
नाही. ताडगोळ्यापासून नाही पण त्याच झाडाच्या खोडापासून काढतात. पश्चिम ठाणे जिल्ह्यात (वसई, पालघर, डहाणू) जागोजागी दिसतात. ही नीरा आंबल्यावर याची ताडी बनते. फळ खाऊन नशा वगैरे येत नाही.
बाकी माहिती मिपावरचे ताडी-माडी एक्सपर्ट देतील.:)
खराटा
(रंग माझा वेगळा)
निरा हे पेय शि॑दीच्या झाडापासुन काढतात. हे पेय काढल्याबरोबर लगेच प्यायल्यास त्याला निरा म्हणतात व थोड्या वेळाने त्याला शि॑दी म्हणतात .
हल्ली मु॑बईतून बाहेर पडल्यावर महामार्गावर भरपुर सरकारमान्य निरा विक्री के॑द्र दिसतात
ताडगोळेच हे. आणि ह्याच्या फळापासुन ताडी बनते, निरा शिंदीच्या फळापासुन बनते.
माझ्य माहेरी वाडी आहे. लहानपणी एकीकडे ताडगोळे काढणारा ताडगोळे तासुन टोपलीत टाकायचा आणि मी एकीकडे टोपलीची लेवल कमी करत बाजुला बसायचे. लहानपणी खुप खाल्ले आहेत. आताही माहेरहून भेट येते. पण सासरी असल्याने कंट्रोल ठेवावा लागतो हादडण्यावर.
खराटा रावांनी सांगितल्याप्रमाणेच......एक विस्तारीत माहीती....त्या एका शहाळ्यासारख्या दिसणार्या फळात ३ ताडगोळे असतात... न फूटता पाणी न सांडता वेगळे करणे यासाठी लहान आकाराचा कोयता.(पातळ अर्ध्वर्तूळाकार पाते असलेला)
असतो...ठाण्यात अर्थात महागच...पण मिळतात.... कोवळे असले की पाणी असते....जून होत गेले की पाषाणभेदांनी सांगितले तस पूर्ण्पणे गर झालेला असतो.....मस्त लागतात...योगायोग म्हनजे आत्ता घरात आहेत.मगाशी घरी आल्यावर( पोटापाण्याच्या व्यवसायामधुन)२ चापले.
वा वा....सर्वांनी अवश्य खाणे...विकत घेऊन...:)
एच.बी.
प्रतिक्रिया
आमी लोक
हे नक्की
नाय
ताड गोळे
संशय
ताड गोळे
होय, ताडगोळेच.
हेच
सलग गर
मस्त माहीती
मधुर ताडगोळे..
वा वा वा
ताडगोळे,
वाह, काय
ताडगोळेच आहेत ते.
ताडगोळे.. ख
फोटू छान.
गोड
माहितीबद्
ताडगोळे!!
मिळतात
खरेदी संकुलात
सोललेले नाही मिळत
खूप लांब
असं
पुर्वी
नाही
हो बरोबर
निरा
ताडगोळे
इथे न्यूयाँर्कला मात्र मिळतात
ताड गोळा
शिर्षक बदलले
ताडगोळेच
खराटा