मागच्या महिन्यात अमेरिकेत झालेल्या पुरुष लिंगाच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर सामान्यजनांची एकंदरीत या विषयाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. (संबंधित धागा : http://www.misalpav.com/node/42508 ).
यानिमित्ताने असे वाटले की ‘मानवी अवयवांचे प्रत्यारोपण’ या विषयाचा आढावा वाचकांना उपयुक्त वाटेल. जिवंतपणी अथवा मृत्यूनंतर आपल्या शरीरातील काय काय दान करता येते आणि त्यापैकी कशांचे प्रत्यारोपण यशस्वी होते, हे आपण आता जाणून घेऊ यात.
शरीरातील जे भाग दान करता येतात त्यांची ढोबळ मानाने ५ गटांत विभागणी करता येईल :
१. अवयव (organs) :
यांची दोन गटांत वर्गवारी करतो:
अ) मृत्यूनंतरचे दान : २ मूत्रपिंडे, यकृत, २ फुफ्फुसे, हृदय, स्वादुपिंड, जठर, आतडे, हात, चेहरा आणि गर्भाशय. आता यात पुरुष लिंगाची भर नुकतीच पडली आहे पण ते अजून अधिकृत यादीत यायचे आहे.
आ) जिवंतपणीचे दान: १ मूत्रपिंड, १ फुफ्फुस आणि यकृत, स्वादुपिंड आणि आतडे या तिघांचा काही अंश, गर्भाशय.
२. डोळ्याचे भाग : यात बाहुलीचा पडदा (cornea) आणि श्वेतमंडल (sclera) यांचा समावेश आहे. corneaच्या प्रत्यारोपणाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारात दाता आणि प्राप्तकर्ता यांचे कुठल्याही प्रकारे ‘matching’ करावे लागत नाही.
३. शरीरातील इतर tissues : यात कानाचा मधला भाग, त्वचा, हृदयाच्या झडपा (valves), रक्तवाहिन्या (veins), हाड, कुर्चा (cartilage), स्नायुबंध (tendon) आणि अस्थिबंध (ligament) यांचा समावेश आहे. हे सर्व साठवण्यासाठी ‘tissue banks’ ची सोय असते.
४. रक्तातील मूळ पेशी (stem cells) : १८ – ६० वयोगटातील व्यक्ती हे दान जिवंतपणी करू शकतात. या पेशी ३ प्रकारच्या असतात:
अ) Bone marrow तील पेशी
आ) नवजात बालकाच्या नाळेतील मूळ पेशी , आणि
इ) रक्तप्रवाहातील मूळ पेशी (विशिष्ट प्रक्रीयेनंतर)
५. रक्त व रक्ताचे घटक : “संपूर्ण” रक्तदान हे सर्वपरिचित आहे. विशिष्ट परिस्थितीत रक्ताचे ३ घटक स्वतंत्रपणे दान करता येतात. ते असे: लालपेशी, बिम्बिका(platelets) आणि रक्तद्रव (plasma).
अवयवदान हे सर्व प्रकारच्या दानांमध्ये श्रेष्ठतम दान म्हणता येईल. साधारण असे म्हणता येईल, की यातील एक दाता सुमारे ५० प्रकारचे दान करून त्या प्राप्तकर्त्यांच्या आयुष्यात मोलाची भर घालतो.
काही टिपणे :
१. एखाद्याच्या शरीरातील विशिष्ट भागाचे प्रत्यारोपण त्याच्याच शरीरात अन्यत्र करता येते (autografts).
२. Cornea वगळता अन्य अवयवदानांमध्ये दाता व प्राप्तकर्ता यांचे matching आवश्यक असते. Cornea च्या दात्यांना ‘सार्वत्रिक दाते’ (universal) असे म्हणता येईल.
३. प्राप्तकर्त्याच्या शरीरात एखादे प्रत्यारोपण झाल्यावर त्याचे शरीर तो नवा अवयव “स्वीकारते” का नाही हा यक्षप्रश्न असतो. त्यासाठी विशिष्ट औषधे द्यावी लागतात.
४. प्रत्यारोपणाची यशस्वीता अवयव आणि देशानुसार वेगवेगळी आहे. cornea व मूत्रपिंड–प्रत्यारोपण हे सर्वात यशस्वी म्हणता येतील.
५. गर्भाशय प्रत्यारोपणावर तज्ञांमध्ये मतांतरे आहेत. ते “जीवनावश्यक” नसल्याने तो खटाटोप कशासाठी असे काहींना वाटते.
६. पुरुष लिंगाचे प्रत्यारोपण ही नुकतीच घडलेली घटना आहे. त्याची लैंगिक सफलता अद्याप सिद्ध व्हायची आहे.
७. काही प्रत्यारोपणाच्या बाबतीत विज्ञान आणि नैतिकता यांतील द्वंद्व नेहमी चर्चेत येते.
८. विशिष्ट अवयवदानांसाठी दात्यामध्ये विशिष्ट रोग नसल्याची खात्री करावी लागते.
९. मृत दात्यांच्या बाबतीत “मृत” च्या वेगवेगळ्या व्याख्या असतात. उदा. ‘ब्रेन डेड’ वगैरे. ते ठरवण्याचे कायदेकानू देशानुसार वेगळे असू शकतात.
१०. काही जन्मजात जनुकीय आजारांसाठी ‘जनुकोपचार’ उपलब्ध आहेत. यांत निरोगी व्यक्तीतील एखादे जनुक रोग्यात ‘प्रत्यारोपित’ केले जाते. याला अतिसूक्ष्म प्रकारचे प्रत्यारोपण म्हणता येईल.
तर वाचकहो, हा आहे या महत्वाच्या विषयाचा थोडक्यात आढावा. प्रत्यारोपण ही आधुनिक वैद्यकाची अति-अतिविशिष्ट शाखा आहे. मी अर्थातच त्यातील तज्ञ नाही. माझ्या वैद्यकीय सामान्यज्ञानानुसार हे लिहीले आहे. त्यामध्ये काही त्रुटी असू शकतील. येथील अन्य डॉ. यात पूरक माहितीची भर घालू शकतील. अशा सर्वांचे स्वागत.
***********************************************
वाचने
26996
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
देहदान हा ही एक पर्याय आहे ना
अगदी हाच प्रश्न मला विचारायचा
In reply to देहदान हा ही एक पर्याय आहे ना by पिलीयन रायडर
नातेवाईक विरोध करु शकतात का?
In reply to अगदी हाच प्रश्न मला विचारायचा by शाली
देहदान
उत्तम माहिती युक्त लेख.
माहितीपूर्ण लेख. प्रत्यारोपित
मायबोलीवर या विषयवार असलेले
पहिला धागा बघता येत नाही
In reply to मायबोलीवर या विषयवार असलेले by प्रकाश घाटपांडे
प्रत्यारोपित अवयव : शन्कानिरसन
अवयवदान व देहदान : काही विचार
अवयवदान श्रेष्ठ ह्याच्याशी
In reply to अवयवदान व देहदान : काही विचार by हेमंतकुमार
भारतात बेवारस मृतदेह हा प्रकार बऱ्यापैकी मिळतो....
In reply to अवयवदान व देहदान : काही विचार by हेमंतकुमार
चांगला विषय!
शब्दबंबाळ,
१०० टक्के भाऊ ..
बरोबर. Marrow च्या बाबतीत
पहिल्या हृदय प्रत्यारोपणाची पन्नाशी !
महारोहिणी पासून श्वासनलिका : प्रत्यारोपण
आज जागतिक नेत्रदान दिन.
नवजात बालकातले एक अभूतपूर्व प्रत्यारोपण !
मानवी विष्ठेचे दान !
नवे संशोधन
मूत्रपिंडदान : एक छान योगायोग
हो... आजच ही बातमी वाचली...
In reply to मूत्रपिंडदान : एक छान योगायोग by हेमंतकुमार
चांगली माहिती
कृत्रिम हृदय
डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण
+१
In reply to डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण by हेमंतकुमार
..
In reply to +१ by Bhakti
अपयश
In reply to डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण by हेमंतकुमार
कृत्रिम रेटिना : वरदान
क्रोमोसोम ६ नावाची एक ....
देहदान आणि अवयवदान
निपा,
In reply to देहदान आणि अवयवदान by Nitin Palkar
कृत्रिम कॉर्निया
...
In reply to कृत्रिम कॉर्निया by हेमंतकुमार
जीवदान
साकेत दंडवते : अवयवदान
सुधारणा ..
In reply to साकेत दंडवते : अवयवदान by हेमंतकुमार
अनुकरणीय
In reply to साकेत दंडवते : अवयवदान by हेमंतकुमार
तान्ह्या बाळाचे अवयवदान
अतिशय माहितीपूर्ण लेख
धन्यवाद !
In reply to अतिशय माहितीपूर्ण लेख by Nitin Palkar
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मोठ्या भावाने देहदान केले