वेडा वेडा पाऊस..
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस?
काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस..
छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला,
होतं असं चुकून, कळावं ना पावसाला?
वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला.
म्हणून भिजले,
नको ना रे भलता अर्थ लावूस!
भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना?
बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना?
घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना?
म्हणून थांबले,
नको की रे भलता अर्थ लावूस!
बरं, पडायचं तर गुपचूप पडावं नं पावसानं?
कशाला त्या विजा बिजा आणि वर गडगडणं?
घाबरेल कुणीही, असलं वेडं याचं वागणं!
म्हणून बिलगले,
नको हो भलता अर्थ लावूस!
तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस..
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा.... अरे पाऊस!.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5922
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा, अतीव सुंदर शब्दयोजना.
शब्दयोजना अतिशय सुंदर
In reply to अहाहा, अतीव सुंदर शब्दयोजना. by प्रचेतस
हो हो, अगदी असेच
In reply to शब्दयोजना अतिशय सुंदर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:))))
In reply to हो हो, अगदी असेच by प्रचेतस
वाह !
मस्त
अजून विडंबन कसं नाही आलं??
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
"एक तरी ओवी अनुभवावी".
खरंय. असा एकतरी पाऊस अनुभवावा
In reply to "एक तरी ओवी अनुभवावी". by कर्नलतपस्वी
धन्यवाद सर्वांना. तुमच्या
मस्त !
सुंदर
तुमच्या सगळ्या कविता छान
:)_/\_
In reply to तुमच्या सगळ्या कविता छान by विंजिनेर
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती
चिंब भिजण्याचा
मा.ऑ, चांदणे संदीप, विंजिनेर,