Skip to main content

ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 31/08/2022 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली! १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला. अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली. ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले. अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे. त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.

वाचने 29662
प्रतिक्रिया 238

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

जैतापूर आणि एन्रॉन विसरलात का? नाणार प्रकल्पाचा सामंजस्याचा करार, करारपत्र इ. स्वाक्षरी होऊनही ५+ वर्षांनंतर तो प्रकल्प कणभरही पुढे सरकला नाही कारण तत्कालीन सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे विरोधी पक्षांनी केलेला विरोध आणि त्यांच्यापुढे फडणवीसांनी तुकवलेली मान. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आलेलाच नव्हता. तो प्रकल्प बोलणी स्तरावरच होता आणि गुजरातने महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण या तीन प्रतिस्पर्धी राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त सवलती दिल्याने ते competitive bidding गुजरातने जिंकले. महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातने पळविला असला मूढ आरोप करण्याऐवजी फॉक्सकॉनशी वाटाघाटी करण्यात महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण या राज्यांना यश मिळाले नाही असे म्हणणे योग्य ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

जनतेला मोफत दिलं तर " रेवडी " म्हणून हिनावयाचे आणि स्वतः उद्योगपतींना फुकट जमिनी वाटायच्या.

In reply to by श्रीगुरुजी

ह्यात एक गुजराती माणुस पंतप्रधानपदी असणेही महत्वाचे आहे त्यात गुजरातची निवडणूक अगदी जवळ आली असताना पंतप्रधानांना प्रचार करायला मुद्दा मिळाला. मोदींनी पडद्याआडून प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्यासाठी मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

ह्यात एक गुजराती माणुस पंतप्रधानपदी असणेही महत्वाचे आहे त्यात गुजरातची निवडणूक अगदी जवळ आली असताना पंतप्रधानांना प्रचार करायला मुद्दा मिळाला. मोदींनी पडद्याआडून प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्यासाठी मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही
. +१

In reply to by कपिलमुनी

भाजपचे एक समर्थक (पण बहुधा त्यांच्या आयटी सेलचे सभासद नव्हेत) वेद कुमार ह्यांनी त्यांच्या फेबु वॉलवर ही पोस्ट ह्यासंदर्भांत केली आहे. त्यांतील टाईमलाईन मला पटली, केवळ म्हणून, दुसरी बाजू ( अर्थात, 'तुमच्या विधानांची निसरडी बाजू' - ह्याचे कॉपीराईट अन्य कुणाकडे आहे) येथे दिसावी, म्हणून ती शब्दशः येथे डकवत आहे. आता ह्यांतील, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयप्रक्रियेतील दिरंगाई पदोपदी नेमकी कशामुळे होत होती, ह्याविषयीच्च्या त्यांच्या मतांविषयी माझे काहीही बरेवाईट मत नाही).
जयंत पाटील खोटं बोलत आहेत. मी फॅक्ट-चेक मांडत आहे. त्यातील एकही गोष्ट खोटी असेल तर कोणीही खोडून काढावी - ओपन चॅलेंज! जयंत पाटील म्हणत आहेत की महाविकास आघाडीने वेदांत-फॉक्सकाँन गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर 'पाठपुरावा' केला होता पण 'गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला' आहे. हे सगळं खोटं आहे, आय रिपीट : खोटं!!! हे खोटं कसं आहे, हे समजून घ्यायला या प्रकल्पाची टाइमलाईन समजून घ्यावी लागणार आहे. ★ 25.12.2021 : वेदांत ने सेमीकंडक्टर उद्योगात $15 बिलियन गुंतवणूक करायचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी चे उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेत होते. हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा स्पर्धेत असूनही महाराष्ट्राला त्यांनी पसंती दिली होती कारण महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते ज्यांच्याकडे अशा प्रकल्पांसाठी लागणारी 'महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी 2016' अस्तित्वात होती, ज्यात आवश्यक जमीन व इंसेंटिव्ह संबंधी धोरण तयार होते. ही पॉलिसी देवेंद्र फडणवीस सरकारने आणली होती!! पण, तीन पक्षांनी एवढी मोठी गुंतवणूक येणार म्हटल्यावर ज्या आपापसात व कंपनीसोबत 'वाटाघाटी' केल्या, त्यानंतर डील फायनल होऊ शकली नाही.. लिंक - https://www.carandbike.com/.../vedanta-plans-to-invest-up... ★ तरीही, वेदांतने फेब्रुवारी-2022 मध्ये पुण्याजवळ जमिनीचा सर्व्हे व फिजीबीलीटी साठी आपल्या टीम ला पाठवले. डिसेंम्बर-2021 पासून फेब्रुवारी-2022 पर्यंत कंपनी आणि सरकार यांच्यात 'वाटाघाटी' काही केल्या संपत नव्हत्या. जयंत पाटील म्हणतात त्याप्रमाणे तिन्ही पक्ष आपला 'पाठपुरावा' करत राहिले आणि कंपनीला काही तो त्यांचा पाठपुरावा 'परवडेबल' वाटत नव्हता. लिंक - https://www.thehindubusinessline.com/.../article65685653.ece ★ 14.02.2022 : अजून एक बातमी आली. प्रकल्पाची किंमत अजून वाढली कारण वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी हातमिळवणी केली आणि अजून मोठा प्रोजेक्ट उभा करायची घोषणा केली. अजून मोठी रक्कम, अजून मोठा 'पाठपुरवठा' सुरू झाला.. लिंक - https://asia.nikkei.com/.../Foxconn-to-build-chip-plant... ★ 19.05.2022 रोजी वेदांत-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर चिपची फॅक्टरीच्या स्पर्धेतून कर्नाटक बाहेर पडले. फॅक्ट ही आहे की या कंपनीला लागणारी जमीन व इतर इंसेंटीव्ह देण्यास त्यांनी नकार दिला. महाराष्ट्रात कंपनीला सगळं द्यायला तयार होते, पण मविआ चा 'पाठपुरावा' परवडत नव्हता.. लिंक - https://www.deccanherald.com/.../vedanta-foxconns... ★ 28.06.2022 पर्यंत रेसमध्ये तेलंगणा व तामिळनाडूही होते! तारीख नीट बघा. त्यानंतर दोन दिवसांनी महाराष्ट्रात सरकार पडले. अर्थात, 30.06.2022 रोजी मविआ सरकार पडले, तोपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता! त्यात, इकडे सरकार पडले आणि तिकडे तेलंगणा व तामिळनाडूही लगेच स्पर्धेतून बाहेर पडले. हा प्रकल्प मविआ च्या शेवटच्या दिवसापर्यंत महाराष्ट्रात आलाच नाही, कोणताही करार झाला नाही त्याला एकच कारण होते : कंपनीला 'उद्योग' लावायचा होता, सत्ताधाऱ्यांचा वेगळाच 'धंदा' सुरू होता, ज्याला जयंतराव आज 'पाठपुरावा' असं म्हणत आहेत!! https://www.businesstoday.in/.../exclusive-maharashtra... ★ 26.07.2022 : पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर व सात महिने 'पाठपुरावा' करताना उपलब्ध असलेल्या सर्व संधी गमावल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हा प्रकल्प महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न केला. सरकार बनताच प्रायोरिटीवर बैठका घेऊन तोडगा काढण्यात आला. कंपनीकडेही आता फक्त दोनच ऑप्शन बाकी राहिले होते, बाकी तीन राज्ये - कर्नाटक, तामिळनाडू व तेलंगणा रेसमधून बाहेर झाले होते. जवळजवळ 90% MoU वर सह्या झाल्या व पुन्हा महाराष्ट्रात हा प्रकल्प आणण्याची तयारी करण्यात आली. तशी घोषणा सरकार-कंपनी दोन्हीकडून झाली. प्रत्येककडे मीडियात महाराष्ट्राला प्रकल्प मिळाला अशी हेडलाईन लावण्यात आली, पण आतील मजकूर वेगळाच होता - की कंपनी अनुकूल आहे व चर्चा अजून सुरू आहे.. (याला म्हणतात मीडिया हिट-जॉब!) (The company is in active discussion with the Maharashtra government for their proposed manufacturing facility for semiconductors and display fabs.) याच बातमीची हेडलाईन वेगळं सांगते.. https://www.livemint.com/.../vedanta-group-foxconn-to... ★ शेवटी, गुजरातने भांडवली गुंतवणुकीवर आर्थिक आणि इतर सबसिडी, अहमदाबादच्या जवळ 99 वर्षांसाठी 1000 एकर मोफत जमीन (405 हेकटर), 20 वर्षांसाठी स्वस्त पाणी, स्वस्त वीज व कर-सवलत देऊन केवळ 3-4 बैठकांमध्ये विषय संपवला. आठवड्याभरात करार होणार आहेत. गेल्या अडीच वर्षातील राज्यातील पॉलिसी-पॅरलिसीस व मविआने 7 महिने केलेला 'पाठपुरावा' यामुळे कंटाळलेले गुंतवणूकदार महाराष्ट्राला पाठ दाखवून गेले. त्यात, हे गुजरातने केलेली ऑफर (पॅकेज) महाराष्ट्राला परवडणार नाही अशी वाईट अवस्था मविआने करून आर्थिक दिवाळखोरी आणली हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. बरं हे एक उदाहरण नाही, ओलाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या तोंडचा घास तामिळनाडूने तर टेस्ला च्या बाबतीत महाराष्ट्राच्या युवकांचा रोजगार कर्नाटकाने नेला अशी डजनभर उदाहरणे आहेत! MIDC मधील किती उद्योग या अडीच वर्षात बंद झाले हा संशोधनाचा विषय आहे. 'मविआ काळात राज्याने गमावलेले उद्योग' यावर एक वेगळी सविस्तर पोस्ट मी येत्या काळात करत आहे. जयंतरावांना त्यांच्या अडीच वर्षांत लावलेल्या दिव्यांचे रिपोर्ट-कार्डच देतो.. गुजरातच्या नावाने खडे फोडण्याऐवजी महाविकास आघाडी ने आज महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे! तीही, बिनशर्त आणि जाहीरपणे.. - वेद कुमार.
शेवटी, एखद्या देशांत / स्थानिक प्रांतांत, उद्योजकांना, सरकारकडून व नोकरशाहीकडून तांतडीने निर्णय हवे असतात, व ते साहजिक आहे. भारतांत बाहेरून उद्योगधंदे स्थापन करावयास उद्योजक येतात, ह्याचेच मला अजून आश्चर्य वाटत आले आहे. असो.

In reply to by प्रदीप

ह्यात सर्व दोष मविआला द्यायचा आणि भाजपला मात्र निर्दोष हे काही योग्य नाही. जैतापूर प्रकल्प भाजपच्या काळातलाच होता. आंतराष्ट्रीय वित्त केंद्र हे पण भाजपच्या कळताच गुजरातला हलविले गेले.

मुस्लीम मुलीशी लग्नानंतर महिनाभराने अपहरण झालेल्या भोकरमधील तरुणाचा खून, आरोपींची कबुली. https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahmednagar-crime-news-murde… पोलिासांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली. आता या आरोपींनी दीपक बर्डेचा खून केल्याची कबुली दिली आहे

“…तरच मुस्लिमांनी गरबा कार्यक्रमाला यावं” लव्ह जिहादचा उल्लेख करत भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान https://www.loksatta.com/desh-videsh/bjp-mp-usha-thakur-statement-ident… सध्या देशात लव्ह जिहादचं षडयंत्र सुरू आहे. गरबा हे लव्ह जिहादचे केंद्र बनत आहेत. केवळ मनोरंजनासाठी गरबा कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार नाही. ज्या मुस्लिमांना मूर्तीपूजक व्हायचे आहे, त्यांनी आपल्या कुटुंबासह गरबा कार्यक्रमाला यावं, असं उषा ठाकूर म्हणाल्या.

In reply to by कपिलमुनी

पालघरच्या पोलिसांपेक्षा सांगली जिल्ह्यातले पोलीस धाडसी दिसताहेत. किंवा पोलीसांचे मनोबल उंचावलेले दिसतंय. जमावाला घाबरून, त्या साधूंना जमावाच्या ताब्यात न देता त्यांना चक्क मारहाण करणा-यांपासून वाचवलंय. पोलीसांचे अभिनंदन. बस्स. इथेच थांबतो.

In reply to by शाम भागवत

इथे पोलिस नव्हते हो, व्हिडिओ तरी बघायचा.. जमावाने मरेपर्यंत मारहाण केलि नाही. अशा प्रकारच्या घटना अफवेतून , भीतीतून घडत असतात. भाजप्ये लोक याला हिंदूविरोधी कट वगैरे नाव देउन वातावरण खराब करतात. प्रत्यक्षात जमान हिंसक झाल्याने घडलेल्या दुर्दैवी घटना आहेत ( ज्या घडायला नकोत पण त्यांचे राजकीय भांडवल करणे चुकीचे आहे.) माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण झाली म्हणून प्रत्येक धाग्यावर रडणारे आयडी राणेंनी केलेल्या अधिकार्‍या बद्दल गूपचूप बसतात तेव्हा हे सगळे पोलिटिकल अजेंडा राबवायला चालले आहे हे लक्षात येते

In reply to by कपिलमुनी

गुजरातमध्ये केजरीवाल भाजपला घाम फोडत आहे. जय शहाला इंग्रजी बोलताना घाम फुटत आहे ( समोर टेलेप्रॉमप्टर असताना बरं का ).

In reply to by आग्या१९९०

न्यूनगंड ज्यांच्यात आहे तेच असले फालतू मुद्दे काढत असतात. लालू, मुलायम, भुजबळ अश्या पुरोगाम्यांच्या लाडक्या नेत्यांना अजिबात इंग्लिश येत नव्हते. त्यांच्या बाबतीत हा मुद्दा कधी आला नव्हता. शहांविरूद्ध बोलण्यास मुद्देच नसल्याने असले निरर्थक मुद्दे आणले जातात.

In reply to by श्रीगुरुजी

धड इंग्रजी बोलता येत नाही आणि कहर म्हणजे वाचता येत नाही मग जी भाषा येते त्यात बोलायला लाज वाटते का? न्यूनगंड कुरवाळत बसवून हसे करून घ्यायची आवड असेल तर आवडते अशा लोकांच्या इच्छा पूर्ण करायला. काही प्रोब्लेम?

In reply to by आग्या१९९०

महाराष्ट्रात नाही का धड हिंदी बोलता येत नसताना अनेक जण हिंदी बोलण्यासाठी कासावीस असतात आणि आपलं हसू करून घेतात? बडे बडे शहरोमे ऐसे छोटे छोटे हादसे . . . आठवतंय का? मुळात इंग्लिश येतंय का नाही हा मुद्दाच नाही. परंतु शहांविरूद्ध बोलायला मुद्देच नसल्याने असल्या फालतू गोष्टी पुढे आणल्या जातात. शहांविरूद्ध आपल्याकडे काहीही नाही या न्यूनगंडातून असं होत असतं.

In reply to by श्रीगुरुजी

शहांविरूद्ध बोलायला मुद्देच नसल्याने असल्या फालतू गोष्टी पुढे आणल्या जातात
.. हे बकि खर.. .. शाह यान्च्या विरुद्ध कहिहि बोलयला नसल्यामुळे हे असल सुचत.. आपल्या ईथले घराणेवादी त्यान्ना कोर्टाने सोडून देखील 'तडीपार' म्हणतात

In reply to by कपिलमुनी

मी व्हिडीओ नाही बघितला. तसलं काही बघवत नाही. मग मार खाणारे कुणीपण असोत. त्यामुळे मी फक्त बातमी वाचली. त्यात लिहिलं होतं की, "अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका (Rescued) केली." हुश्श केलं नी प्रतिसाद दिला व लागलीच थांबलो.

दलित बहिणींची बलात्कार करून हत्या ; उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील घटना; सहा आरोपींना अटक https://www.loksatta.com/desh-videsh/dalit-sisters-raped-and-murder-in-… याप्रकरणी पोलिसांनी छोटू, जुनेद, सोहेल, हफिजुल रहेमान, करीमुद्दीन आणि आरीफ या सहा जणांना अटक केली. ------

‘पिकाला हमी भाव नाही, देणेकरी मागे लागले आहेत, तुमच्या नाकर्तेपणामुळे मी आत्महत्या करत आहे,’ असे शुभेच्छापत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला लिहून जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली दशरथ लक्ष्मण केदारी (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (बातमी : दुवा १ , दुवा २ )

भारतात लंपी रोगाने केवळ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. असल्या क्षुद्र देशी जनावराकडे लक्ष देण्याची मागणी नतद्रष्ट लोक करत आहेत. इतक्या वर्षांनी चित्ता परत आणला, त्याचे कोड कौतुक केले, चार पैसे खर्च केले तर यांच्या पोटात दुखते.. ६०,००० -७०,००० हजार हा आकडा किरकोळ आहे. चित्तागीरीचा विजय असो.

In reply to by कपिलमुनी

इथे लंपी वाढत आहे आणि राहुल गांधीं मात्र पक्ष वाढवण्या करता भारत जोडो यात्रेत मशगुल आहेत. गरीब शेतकर्‍यांचा वाली कोणी नाही हेच खरे. यात्रेकरुंचे स्वागत असो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राहुल गांधीकडे एवढी सरकारी यंत्रणा आहे , जनतेने दिलेला टॅक्सरुपी पैसा आहे.. आरोग्य खाते आहे . ज्या राज्यातील बहुतांश मृत्यू आहेत तेथील सरकारे राहुल गांधीच्या अंडर आहेत... एवढे असून रा गां निव्वळ शो बाजी करण्यात धन्यता मानत आहेत.. एकही शब्द काढत नाहीत. अर्थात ६०-७०,००० हजार आकडा तसा किरकोळ आहे ना

In reply to by कपिलमुनी

अगदी योग्य बोललात, राहुल गांधी संसदेतल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आहेत, सरकार जर कुठे चुकत असेल तर त्यांचे कान पकडणे हे त्यांचे काम आहे आणि तरी सुध्दा ते लंपी सारख्या राष्ट्रीय महत्वाच्या विषया कडे डोळेझाक करुन शो बाजी करण्यात गुंतले आहेत. आणि हे ही काय कमी होते म्हणून कॉन्ग्रेसचे माजी पर्यावरण मंत्री प्रोजेक्ट चित्ता कॉग्रेसचेच श्रेय आहे असा दावा करत आहेत. कदाचित त्यांना ६० ते ७० हजार हा आकडा छोटा वाटत असल्याने असे होत असावे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कॉन्ग्रेसचे माजी पर्यावरण मंत्री प्रोजेक्ट चित्ता कॉग्रेसचेच श्रेय आहे असा दावा करत आहेत. दावा खोटा नाही.. सुरुवात तेव्हा झाली होति ,, आता पूर्ण झाला.. आपाल्या शेठ ला आयत्या पीठावर बसून फोटो काढायची सवय आहेच.

In reply to by कपिलमुनी

चित्ते हा देशाचा विषय होऊ शकतो ? सालं दोन दिवसापासुन गोदी मिडियाने जो हाहाकार माजवला आहे, त्याने एक भारतीय म्हणून मान शरमेने खाली जातेय. सालं देशाचे प्रश्न कोणते आणि हे काय करीत आहे. आता यांच्याबद्दल काही बोलावं वाटत नाही, आणि लिहावे वाटत नाही. इतका निर्लज्जपणा या देशात चालु आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काहीही,कोणीही हाहाःकार माजविलेला नाही. १७ सप्टेंबरला इतर बातम्यांबरोबर चित्त्यांची बातमी दाखवित होते इतकंच. १८ तारखेपासून ती बातमी सुद्धा बहुतांशी गायब झाली. चित्त्यांना नावे दिली ही बातमी तर मी अजूनपर्यंत कोठेही वाचली नाही. मराठी माध्यमात तर शिल्लकसेना, शिंदे, दसऱ्याची सभा हेच विषय सातत्याने चघळले जात आहेत.. माध्यमे बातमीला तेवढ्यापुरते स्थान देऊन नंतर इतर बातम्यांकडे वळली, परंतु मोदीद्वेष्ट्यांच्या मनात ती बातमी खोलवर रूजल्याने मोदीद्वेषाची मळमळ बाहेर येत आहे. मोदीद्वेष्ट्यांच्या निर्लज्जपणामुळे खऱ्या भारतीयांची मान शरमेने खाली जात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

>>>मोदीद्वेष्ट्यांच्या निर्लज्जपणामुळे खऱ्या भारतीयांची मान शरमेने खाली जात आहे. खरंय, एकीकडे हे मंदभक्त आणि दुसरीकडे ते मोदीद्वेष्टे यांच्यामुळे भारतीयांची मान शरमेने खाली जात आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. सहमती आहेच. -दिलीप बिरुटे (खरा भारतीय)

संजय राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ. ३ ऑक्टोबरपर्यंत तुरूंगात मुक्काम. नबाब मलिक समीर वानखेडेंची नोकरी घालवून त्यांना तुरूंगात धाडणार होत, पण त्यांचेच मंत्रीपद गेले आणि जवळपास ७ महिने स्वतः तुरूंगात पडलेत. संजय राऊत भाजपतील साडेतीन नेते (म्हणजे किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील सोमय्या आणि अजून कोणीतरी दोन नेते) तुरूंगात पाठविणार होते. पण स्वतःच ३१ जुलैपासून तुरूंगात पडलेत. फडणवीस अजित पवारांना तुरूंगात पाठवून चक्की पिसायला लावणार होते. पण स्वत:च त्यांच्या मांडीला मांडी लावून युती केली आणि क्लीन चिटही दिली. कालाय तस्मै नम: ।

सर्व भारतीयांना आज आनंदी आनंद झाला आहे कारण चित्यांचे बारसे झाले आहे. त्यातील ‘आशा’ हे मादी चित्त्याचे नाव पंतप्रधान मोदी यांनी ठेवले आहे. ओबान, फ्रेडी, सावन्नाह, आशा, सिबली, सैसा आणि साशा असे नामकरण करण्यात आले आहे. Ladoo लाडू खाऊन तोंड गोड करा

In reply to by कपिलमुनी

सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशीच मोदीद्वेष्ट्यांची केविलवाणी अवस्था झाली असल्याचे दृग्गोचर होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

७० वर्षे कॉंग्रेस द्वेष्ट्यांनी सोसले आता ७-८ वर्षेच भाजप द्वेष्टांना त्रास आहे.. मग ७० वर्षाचे मूळ्व्याध किती किती मोठे असेल ना ??

In reply to by कपिलमुनी

तेव्हाही भाजपद्वेष्टेच सोसत होते आणि आताही! म्हणून तर त्यांना सांगता येत नाही आणि सहनही होत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

शेठ विनोदच इतके केविलवाणे करताहेत की ते सांगितले तर अंधभक्त हसण्याऐवजी टाळ्या पीटतात आणि देशभक्तांना सहन होत नाहीत. आता त्यात दृग्गोचर काय होते ते बघा ब्वा.

In reply to by सुरिया

पूर्वी जाहीर सभेत किंवा संसदेत केविलवाणे विनोद करणारे शेठ आता केरळपासून चालत चालत दिल्लीपर्यंत विनोदांचा कार्यक्रम करताहेत. त्यातून जनतेचं निखळ मनोरंजन होणार हेच दृग्गोचर होतंय ब्वा. पण मल्याळींना १८ दिवस करमणूक आणि महाराष्ट्राला फक्त २ दिवस, हा मराठी माणसांचा अपमान आहे ब्वा.

In reply to by कपिलमुनी

चित्त्यांसाठी नावे सुचविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन या बातमीत लिहिलंय की चित्त्यांना नावे सुचवा असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय. मग ही नावे कोठून आली? का नेहमीसारखी मोदींच्या नावाने पुडी सोडली?

In reply to by श्रीगुरुजी

The translocated cheetahs are currently named - Elton, Freddie, Oban, Siyaya, Aasha, Tbilisi, Sasha and Savannah. Aasha was a name given by Modi himself.. नुसते तरुण भारत वाचून नसेल कळले तर टाइम्स वाचा. नाव सुचवायचे आवाहन आहेच पण एक नामकरण आधी झाले आहे मोदी काका कडून आणि उरलेले रीनेम करायचे आहेत. https://timesofindia.indiatimes.com/india/mann-ki-baat-pm-modi-seeks-su…

In reply to by सुरिया

नामकरण आधीच झाले असेल तर आता काय नामांतर करणार का नामविस्तार करणार? तरूण भारत सोडा, काल मन की बात मध्ये मोदींनी आवाहन केलंय ती बातमी सकाळसहीत अनेक वृत्तपत्रात आलीये.

एखाद्या चीत्याचे नाव काला धन ठेवायचे ना..म्हणजे सांगता आले असते, विदेश से काला धन लाया है !

In reply to by कपिलमुनी

ते भारतात ५०+ वर्षांपूर्वीच आलंय.

झुलता पंजाब पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान झुलत झुलत विमानात बसायला आल्यामुळे लुफ्तान्सा या जर्मन हवाई वाहतूक कंपनीने त्यांना विमानातून खाली उतरवले. Punjab CM Bhagwant Mann deplaned from Lufthansa plane for being ‘drunk’, delays flight by 4 hours: Report https://zeenews.india.com/aviation/punjab-cm-bhagwant-mann-deplaned-fro… श्री भगवंत मान हे निवडणुकीच्या अगोदर सुद्धा सभांमध्ये झुलत झुलत आल्याचे लोकांनी पाहिलेले आहेच. एकंदर दारू आणि आपचे जवळचे नाते आहेच https://indianexpress.com/article/cities/delhi/ed-summons-aap-durgesh-p…

ताज्या बातमीनुसार, आम आदमीच्या पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जरा जास्तच चढलेली असल्याने प्रवासासाठी अयोग्य अश्या कारणास्तव लुफ्तांसाच्या विमानातुन उतरवुन विमानाला पुढे जाऊ दिलेल आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांना व त्यांच्या सामानाला विमानातुन उतरवण्यासाठी विमानाचा ४ तासाचा खोळंबा झाला. जर्मनीतील एका विमानतळावर अशी घटना घडलेली आहे. आम आदमी पार्टीने देशात घुडगुस घातलेला आहेच आता परदेशातही सुरु केलेला आहे.

In reply to by मुक्त विहारि

योगायोगाने ते सुद्धा जर्मनीत फ्रॅंकफुर्टलाच गेले होते आणि विमानात Chivas Regal चा आख्खा खंंबा रिचवला होता व त्यामुळे विमानात सहप्रवासी व हवाईसुंदरींबरोबर अयोग्य वर्तन केले होते. तेव्हा सुद्धा त्यांचे समर्थक होते जसे आता भगवंत मानचे आहेत. तेव्हा तर त्यांचे जावई जांबुवंतराव धोटे शश्वुरांच्या स्वागताला विमानतळावर वाद्यवृंद घेऊन गेले होते. परंतु लुफ्तांसाने तेव्हापासून नियम केला असावा की प्यायलेल्या व्यक्तीला विमानात ठेवायचे नाही. म्हणून तर यावेळी . . . !

In reply to by श्रीगुरुजी

अधिकृत गोष्टींवर विश्वास न ठेवता सांगोवांगीच्या गोष्टीं लिहित राहणे हा तुमचा जुना प्रॉब्लेम आहे..

In reply to by कपिलमुनी

सोयिस्करपणे अधिकृत वृत्तावर विश्वास ठेवणे आणि सोयिस्करपणे अधिकृत वृत्त नाकारणे हा तुमचा जन्मजात दोष आहे. म्हणून तर आता अडचणीत आल्यानंतर सारवासारव करणाऱ्या बनावट वृत्तावर सोयिस्करपणे विश्वास ठेवावा लागणारच.

In reply to by श्रीगुरुजी

मी तुम्हाला लुफ्तांसा च्या अधिकृत ट्विटर ची लिंक दिली आहे. तुम्ही झी न्यूज वगैरे टाईप चेणेल वर विश्वास ठेवता ज्यांनी बातमी चा सोर्स सांगितला नाहीये... काही वर्षांपूर्वी हे चेनेलं २००० च्या नोटेत चीप आहे सांगत फिरत होते.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दा तुमच्या बातमीचा अधिकृत सोर्स काय ? मी लुफ्तान्सा चा अधिकृत सोर्स दिला ज्यात उशीर होण्याचे कारण दिले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हातात काही ठोस नसला की असा काहीतरी माझा प्रतिसाद शेवटचा टाईप खरडावा लागतं. उगी उगी... अधिकृत बातमी आणा मग टंकायचे कष्ट घ्या..

In reply to by श्रीगुरुजी

Der Mann आता जर्मन भाषा शिकणे आले. भाषा शिकण्यापेक्षा मनाला आवडेल असे अर्थ काढणे सोपे आहे.

In reply to by कपिलमुनी

सर्वप्रथम, मान ह्यांच्यामुळे लुफ्तान्साची फ्लाईट अनेक तास उशीरा निघाली, वगैरे माहिती चुकीची आहे, हे खरेच. समजा, ते तिथे अशा परिस्थितीत गेले होते की ज्यामुळे त्यांना फ्लाईट्वर येण्यास त्या विमान कंपनीने मज्जाव केला, तर तिथे ते, सर्वसाधारणपणे, भारतांत राजकारणी/ समाजकारणी/ बाबू इत्यादी ज्याप्रकारे 'दंगा' करू शकतात, तसे कुठल्याही भारतीय नागरीकाला करता येणार नाही, ज्यायोगे फ्लाईट अनेक तासांनी उशीरा निघावी. पण ही हिंदूची बातमी काही प्रत्य़क्षदर्शींचा हवाला देऊन असे म्हणते की
Lufthansa’s LH 760 was scheduled to depart at 1.40 p.m. local time from Frankfurt airport. It was already delayed by “three hours” because of a late inbound flight and an aircraft change, but was further delayed because of a heated exchange between some passengers and the cabin crew, according to an eyewitness. “A person donning a white kurta-pyjama and resembling Punjab Chief Minister Bhagwant Mann entered the aircraft along with other passengers... after some time four or five of them left the aircraft,” said the eyewitness who did not want to be identified. The pilot later announced that some passengers had to leave and that there would be a slight delay as their baggage was being removed from the plane. The flight scheduled to depart at 1.40 p.m. local time took off at 4.30 p.m. and landed in Delhi at 4.40 a.m. IST.
बातमी पुढे म्हणते:
Mr. Mann arrived at airport but decided to reschedule return Punjab Chief Minister Bhagwant Mann rescheduled his return journey from Frankfurt in a last-minute change for taking another flight to Delhi on Sunday.
“The Punjab Chief Minister has delayed his departure as he was reportedly unwell,” said an official.
अर्थात, हे प्रकृति बिघडणे इतर काहीही असू शकते- पोट बिघडणे इत्यादी. पण अशा अर्थाचे काहीही निवेदन, इतका गदारोळ झाल्यावरसुद्ध आप पक्षाकडून अथवा पंजाब सरकारकडून आलेले नाही. किंबहुना, त्यांनी ह्याबद्दल मौन बाळगले आहे, असे दिसते? अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेत, परदेशांतील कंपन्या व सरकारे कुणाचेही नाव घेऊन काही विशीष्ट माहिती देत नाहीत. तेव्हा नक्की काय झाले होते, ह्याबद्दल लुफ्तान्सा व तेथील सरकार ह्यांजकडून कुठलीही ठाम माहिती मिळणार नाही, हे उघडच आहे. तसेच सरकारी औचित्याला धरून, भारत सरकारचे परराष्ट्र खातेही ह्याविषयी काहीही टिपण्णी करणार नाही, हे उघड आहे.

In reply to by प्रदीप

अश्या परिस्थितीत स्पष्टपणे वस्तुस्थिती न सांगता सारवासारव करणारे संदिग्ध निवैदन प्रसिद्ध केले जाते. तेच या प्रकरणातही झालेले दिसते. अर्थात मान यांचा पूर्वोतिहास पाहता प्रत्यक्षदर्शी सांगतात तसेच झाले असणार. ३-४ वर्षांपूर्वी मान यांनी कारमधून संसदेत जाताना संसदेच्या प्रांगणाचे आतून चित्रीकरण करून ती चित्रफीत समाजमाध्यमात प्रसिद्ध केली होती.