भुताचा जन्म

सागरसाथी's picture
सागरसाथी in जनातलं, मनातलं
19 Sep 2022 - 6:59 am

भुताचा जन्म....

शहरातल्या गजबजलेल्या भागातील मी जूनी चाळ अनेकांच्या सुखदुःखाची साक्षीदार होत गेली अनेक वर्ष उभी आहे. मी अनेकांचे उभे राहणे आणि मोडून पडणे अलिप्तपणे माझ्या मनावर कोरुन ठेवले आहे.
कधीतरी स्वप्नांनी गजबजलेली आता भितीच्या धुसर छायेत एकाकी वाट बघते आहे माझा हा काळा इतिहास पुसून नव्याने नव्या रुपात पहाटेला सामोरी जाण्याची.
पहाट नेहमीच रम्य असते पण पुढे दिवसावर निसर्गाच्या लहरीपणाची पुटे चढत जातात आणि दिवस कधी संपतो असे होवून जाते, आपल्या हातात उरते फक्त वाट पाहणे, दिवस संपण्याची.
मला आठवतयं, माझ्या अंगणात अनेक कुटुंबे आनंदाने हासत खेळत होती, स्वप्न पाहात सुखाने झोपत होती.तात्याही त्यातलेच एक, एका खोलीत एकटे राहणारे.कुटूंब लांब कोकणात आईवडलांच्या सोबतीला.
गणपतीच्या आधीचे दिवस, धुंवाधार पाऊस, तात्यांनाही गणपतीचे वेध लागलेले पण मालकाचा नेहमीचाच आठमूठेपणा. डबलड्यूटी करुन दिवस भर तरच सुट्टी देईन अशी अट घातलेली.
तात्या उशीरा धो धो पावसातून घरी आला, अंगात पांढराशुभ्र पायघोळ रेनकोट, मालकांचाच जूना वापरलेला. पहाटे लवकर परत कामावर जायचे म्हणून बाहेरच अडकवून ठेवला.
तात्यासारखाच आणखीनही एक एकाकी जीव कोपऱ्यातल्या इवल्याश्या खोलीत उद्याची स्वप्न रंगवणारा कृष्णा. गावाहून शिकयला आलेला, एका शेठ कडे उशीरापर्यंत हमाली करुन शिकू पाहणारा.
कृष्णा कामावरुन घरी आला, थकलेला जीव, तो पांढराशुभ्र रेनकोट त्याला कठड्यावरुन आत डोकावणाऱ्या माणसासारखा दिसला,त्याच्याकडे दुर्लक्ष करुन तो खोलीत शिरला आणी स्वत:ला अस्ताव्यस्त पसरलेल्या अंथरुणात लोटून दिले, दोन दिवस असेच गेले. चाळीतल्या काकूंजवळ त्याने हा विषय काढलासुद्धा पण निव्वळ चेष्टेवारी सगळ्यांनी तो उडवून लावला.
त्या दिवशीसुद्धा कृष्णा असाच उशीरा घरी, त्याला तो कठड्यावरुन डोकावणारा माणूसही परत दिसला, तो खोलीत शिरला. आज झोप येत नव्हती तो पुस्तक समोर घेवून बसला. त्याला त्या माणसाचे कुतुहल वाटत होते, कोण असेल तो, रात्रीच्यावेळी डोकावून बघणारा ?.
मनात हाच विचार, डोळे पुस्तकातील अक्षरांवरुन नुसतेच फिरत होते. एकदम त्याला आठवले आपण तर दुसऱ्या मजल्यावर राहतो, खाली तळमजल्यावरुन उभं राहून कसं कोणी डोकावून पाहू शकेल,दुसऱ्यामजल्यावर ?.
बिचारा गावाकडचे जीव,अननुभवी. अंधाऱ्या रात्रींनी, भुतांच्या गोष्टींनी मनाचा एक कोपरा भरुन आणी भारुन गेलेला.
नुसत्या कल्पनेनी ही त्याला घाम फुटला, घशाला कोरड पडली. त्याने डोक्यावरुन पांघरुण ओढले आणि तो झोपेची आराधना करु लागला.
कुतुहल आणि भिती माणसाला शांत राहू देत नाही हेच खरे. तो आवाज न करता अंथरुणातून बाहेर आला, खोलीचे दार किलकिले करुन बाहेर पाहिले, लांबवरच्या अंधुक प्रकाशातही त्याला तो स्पष्ट दिसला, भितीवर मात करत तो कठड्यापाशी आला,भुताचे उलटे पाय बघायला म्हणून तो कठड्यावरुन वाकून बघायला गेला.
सकाळी लोकांना माझ्या चौकात पडलेला कृष्णा दिसला, तोच तो दिवस जेव्हापासून माझ्या सुखावर काळी सावली पडली.
तेव्हापासून कृष्णा रात्री अपरात्री रेनकोट घालून डोकावताना दिसू लागला, माझ्या अंगणातील किलबिलाट कमी होत भयाण शांततचे सावट भरुन आले.
आजही माझ्याइथे लोक राहतात, पण पांथस्थ म्हणून, दुसरीकडे सोय होईपर्यंत तात्पुरती सोय. कृष्णाची सोबत मात्र शेवटपर्यंत टिकेल.
मी नवीन रुपात उभी राही पर्यंत किंवा नंतरही.
जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
--- अभय बापट

कथा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Sep 2022 - 9:54 am | मुक्त विहारि

छान आहे...

सागरसाथी's picture

19 Sep 2022 - 8:30 pm | सागरसाथी

धन्यवाद

कंजूस's picture

19 Sep 2022 - 9:59 am | कंजूस

भूत.

सागरसाथी's picture

19 Sep 2022 - 8:31 pm | सागरसाथी

भागो भूत आया

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2022 - 10:30 am | कर्नलतपस्वी

छोटीशीच पण सर्वांगसुंदर कथा,नाव ठेवायला जागा नाही अर्थात आवडली.

सागरसाथी's picture

19 Sep 2022 - 8:30 pm | सागरसाथी

धन्यवाद

Bhakti's picture

19 Sep 2022 - 1:07 pm | Bhakti

खुपच कल्पक!

सागरसाथी's picture

19 Sep 2022 - 8:31 pm | सागरसाथी

धन्यवाद

सुचिता१'s picture

19 Sep 2022 - 11:27 pm | सुचिता१

खुप च छान...
पुढील लेखनास शुभेच्छा!!

सागरसाथी's picture

21 Sep 2022 - 1:30 pm | सागरसाथी

धन्यवाद

टर्मीनेटर's picture

20 Sep 2022 - 10:23 am | टर्मीनेटर

मस्त आहे कथा!
आवडली 👍

सागरसाथी's picture

21 Sep 2022 - 1:30 pm | सागरसाथी

धन्यवाद

श्वेता व्यास's picture

21 Sep 2022 - 1:40 pm | श्वेता व्यास

कथा आवडली.

रंगीला रतन's picture

21 Sep 2022 - 4:13 pm | रंगीला रतन

घोस्ट आवल्डली \m/

श्वेता२४'s picture

21 Sep 2022 - 4:28 pm | श्वेता२४

भूतकथा