Skip to main content

जीवू

लेखक भागो यांनी सोमवार, 05/09/2022 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
“जीवू, आज माझी काही अपॉइंटमेंट आहे?” जीवू हा त्याचा जीवश्चकंठश्च असा मित्र कम पर्सनल असिस्टंट रोबो. “यस्स सर. आज तुम्हाला डॉक्टर बगाराम, हार्ट स्पेशिअलिस्ट M.D. FRCP. ह्यांची भेट घ्यायची आहे. संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी. रात्री नऊ वाजता “ला थाळी” मध्ये क्लाएंट बरोबर डिनर.” “दोनी अपॉइंटमेंटसाठी ड्रेस कोड प्रमाणे कपडे तयार आहेत?” “माझी सूचना अशी आहे कि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी कॅज्युअल आणि डिनरसाठी कॅज्युअल एलेगंट असा ड्रेस ठीक राहील.” “जीवू, तू नसतास तर माझे काय झाले असते. अजून एक मे महिन्यात आराम करण्यासाठी गोव्याला जाईन म्हणतो. त्याची बुकिंग करुन टाक.” “त्याची गरज नाही.” “का?” “का ते डॉक्टर तुम्हाला आज समजाउन सांगतील.”
लेखनविषय:

वाचने 3879
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

शेवटचे वाक्य मास्टर स्ट्रोक.

“का ते डॉक्टर तुम्हाला आज समजाउन सांगतील.”
ट्विस्ट लै भारी!

जबराट

ट्विस्ट लैच आवडला पैजारबुवा,

छान लिहीलं आहे.

भन्नाट! :D शेवटच्या वाक्याला फुटले एकदम :)

मस्त 👍