Skip to main content

(एक होता टारा)

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 01/05/2009 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
टारझण यांणी केलेले विडंबण की कविता हीच प्रेरणा यमक जुळवण्यासाठी "टारा " शब्द वापरला आहे. कृ. ह. घ्या. एक होता टारा एक होता टारा, कायम चढलेला याचा पारा उभा-आडवा असा की वाटे डोंगर खरा एकदा काय झालं आफ्रिकेतल्या ऑरेंजला पूर मोठा आला पोहायला गेला त्यात अर्धाही नाही बुडाला रडला ,हिरमुसला, खट्टू असा झाला चेंज यूवर थिंकिंग -चेंज यूवर लाईफ घेऊनी आला टोनीबा म्हणाला उगी उगी दात ओठ नको खाऊस येतो मी नदी काठीं (एकदा ऑन्साईट मिळू दे) पॅसिफिक मधे जाईन घेऊन तेंव्हा पासून टारा (ऑरेंज)नदीकाठीच राहिला ( त्या आदिवासी ) समुदायाचा सरदार झाला टोनीबा टोनीबा लवकर ये टाराला पॅसिफिकला लवकर ने. तळटिप : टारझण आणी टोनीबा (काल्पनिक) हे आम्हाला अणूक्रमे मोठ्या आणि छोट्या मिपाकरासारखे आहेत (तिघांना घेउन "मी मायसेल्फ आणी आयरीन" चा रिमेक निघेल .. असो) तरीपण त्यांना हलकेच घ्या असं औपचारीक सांगावसं वाटलं श्री. टारझण यांच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी हार्दिक आभार - मराठमोळा पुणेकर.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2625
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

एक होता टारा एक होता टारा, नेहमी विचित्र ह्याचा टोरा शब्द ह्यांचे असे की कोणाला ही वाटे ह्यांने धरुन मारा एकदा काय झालं मिपावर मारोतोडो धूर मोठा आला वाचायला गेला टारा अर्धा लेख देखील नाही समजला टारा रडला ,हिरमुसला, खट्टू असा झाला चेंज यूवर थिंकिंग -चेंज यूवर लाईफ घेऊनी आला सोलोबा म्हणाला उगी उगी दात ओठ नको खाऊस येतो मी मदतीला (एकदा ५०+ मिळू दे) २५+ तुलापण देऊन जाईन तेंव्हा पासून टारा ५०+ राहिला सोलोबा -१० समुदायाचा सरदार झाला सोलोबा सोलोबा लवकर ये टाराला -१० मध्ये लवकर ने. बा़किच्यांना पण लिहू दे काहीच नाही तर +१ तरी राहू दे ;)

वेगळा हास्यक्लब लावून कृत्रिम हसायचं कामच नाही इथं! पोट्भर हसायचं असेल तर मिपा उघडा! विडंबन, त्याचं विडंबन, त्या विडंबनाचं विडंबन सगळंच भारी! मिपावरील समस्त विडंबकांना दंडवत! =)) =)) =)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

In reply to by क्रान्ति

क्रांतीताईशी १००% सहमत. :) मराठमोळा एकदम झक्कास विडंबन.लगे रहो. =D> राजेपण फॉर्मात.राजे,तुम्हीपण लगे रहो. =D> =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

वि. सू. लघु कथा, अतिलघुकथा , छंदशात्र काव्यस्पर्धे सारखी विडंबन काव्यस्पर्धा घ्यावी अशी मिपासंपादकांना विनंती

३/३ वेळा कशाला विनंती ? ;) बाकी विडंबन भारी जमले आहे. पण काहि ठिकाणी उगीच शब्द जुळवुन आणल्यासारखे वाटतात. परा मारा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

माझ्या छान छान परीला इतके भाऊ असतील हे मला माहिती नव्हतं एनी वे. पराभाऊ बरोबरच टारू भाऊचा बंगला लवकर बांधून होवो ही सदिच्छा.