Skip to main content

ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 31/08/2022 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली! १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला. अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली. ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले. अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे. त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.

वाचने 29662
प्रतिक्रिया 238

प्रतिक्रिया

प्रदर्शनाच्या आधीच ‘ब्रम्हास्त्र’ने कमावले ‘इतके’ कोटी, नवा विक्रम रचण्यासाठी चित्रपट सज्ज चड्ढा च्या कमाई पेक्षा जास्त कमवेल का ? बादवे... हल्ली पेड प्रमोशनचा जमाना आहे म्हणे ! जाता जाता :- ब्रम्हास्त्र कि फुसकीअस्त्र ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “The happiness of your life depends upon the quality of your thoughts.” :- Marcus Aurelius

ब्रिटनचा ट्रस्ट लिज ट्रस यांच्यावरच! पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पराभूत एक ना एक दिवस ज्यांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले त्यांच्यावर एक (नावापुरता का होईना) भारतीय राज्य करेल अशी बर्‍याच जणांना अपेक्षा होती तीही गर्दीस मिळविली म्हणायची.

घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्याने मुस्लीम भाजपा नेत्याला मौलवींकडून धमकी; म्हणाल्या “त्यांना माझी हत्या…” https://www.loksatta.com/desh-videsh/bjp-leader-ruby-khan-alleged-recei… घरात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याने मौलवींकडून आपल्याला धमकी दिली जात असल्याचा दावा भाजपा नेत्या रुबी खान यांनी केला आहे. रुबी खान यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आपल्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

फैजल अहमदने हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी आधी खोटे हिंदु नाव घेतले. नंतर तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. आरोपी हा जिम ट्रेनर आहे आणि त्याने सुरुवातीला पीडितेला नोकरीची ऑफर दिली. काही दिवसांनी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले आणि तिला त्याच्या आईला भेटायला लावले यावेळी त्याने आणि त्याच्या आईनेही स्वतःला हिंदू म्हणून दर्शवले. लग्न झाल्यावर तिला समजले अथर्व हा फैजल नावाचा मुस्लिम आहे. चौकशी केली असता आरोपीने आपण मुस्लिम असल्याची कबुली दिली. त्यानंतर फैजलने मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिने नकार दिल्यावर त्याने तिचे आधीच घेऊन ठेवलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या हिंदु तरुणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जिवंत जाळण्याची धमकी दिली. मुस्लिम पुरुषांनी खोट्या हिंदु ओळखीने हिंदू मुलींना फसवून मुलींचा छळ केल्याच्या, आणि नंतर त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनांमागे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र असावे असा संशय आहे. मुस्लिम लोकसंख्या वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे. इस्लाम मध्ये अल तकिय्या नावाचा प्रकार आहे ज्या मध्ये इस्लामच्या प्रचारासाठी इस्लामिक नसल्याचे भासवणे हा धर्मप्रचाराचा भाग आहे.

भारतातील हिंदूंवर अत्याचार होत आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. तुम्ही दोघेही अशा बातम्या शोधून इथे लिहिण्याचे कष्ट घेता त्याबद्दल आभार. पण ताज्या घडामोडीत त्या हरवून जातात. त्याऐवजी तुम्ही एक वेगळा धागा काढून त्यावर हे सगळे संदर्भ दिलेत तर एक त्याची एक बखर बनू शकते. शिवाय ज्याला त्या विषयात रस आहे त्यांच्यासाठी संदर्भसुची म्हणून त्या धाग्याचा उपयोग होऊ शकतो. बघा जमले तर. अवांतर : कोणाला हिंदूकडून मुस्लीमांवर होणारे अत्याचार , हिंदूंकडून दलितांवर होणारे अत्याचार, ख्रिश्चनांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार याबाबत देखील अशाच प्रकारे डॉक्युमेंटेशन करायचे असेल तर त्यांनीही विचार करायला हरकत नाही. असे धागे किमान वर्षभर नित्यनियमाने चालवावेत त्यायोगे कोणावर जास्त अत्याचार होत आहेत याचा देखील अंदाज येईल. काय म्हणतात मिपाकर ?

In reply to by धर्मराजमुटके

काहीच बोलायचं नव्हतं पण १०,०००% सहमत, नाव शोभते आपणांस "धर्मराज" नीरक्षीर बोललात. तसेही ताज्या घडामोडींचा धागा अन् क्रींज कंटेंट सांगत बसत नाही.

In reply to by जेम्स वांड

+१

In reply to by प्रचेतस

वेगळा असे करणार नव्हतो. कारण मग तो धागा वाचलाच जाणार नाही असे वाटले. पण आता प्रचेतस यांचा पण +१ आल्याने असा विचार करतो.

In reply to by निनाद

तुमच्या सूचनेप्रमाणे हिंदूंचा छळ हा नवीन धागा काढला होता पण धागा उडाला आहे! तेव्हा जी काय घडामोड असेल ती इथेच असेल याची नोंद घ्यावी ही विनंती!

तिरुपती तिरुमला संस्थानाला ग्राहक न्यायलायचा दणका मूळ केस ही आहे की, के. आर. हरी भास्कर नावाच्या बालाजी भक्तांनी १४ वर्षे अगोदर वस्त्रालंकार सेवा करण्यासाठी बुकिंग केले होते (₹ १२,५०० फक्त भरून) , ह्या पूजेला म्हणे इतके वेटींग असते, त्याशिवाय खूप हाय लेव्हल रेकमेंडेशन लेटर्स वगैरे पण लागतात. तर, हरी भास्कर ह्यांचा नंबर आला (१४ वर्षांनी) तेव्हा नेमके कोव्हिड - १९ साथीमुळे मंदिर अन् सेवार्थ पूजा सगळे बंद होते. मंदिर भास्कर हांना म्हणले की वस्त्रालंकार पूजन ऐवजी तुम्ही व्हीआयपी दर्शन (कोविड लॉकडाऊन ब्रेक मध्ये) घ्या, किंवा तुमचे १२,५०० रिफंड घेऊन टाका. कारण वस्त्रालंकार पूजनाला तारीख बदलून देत नाही संस्थान. भास्कर ह्यांचे म्हणणे होते की त्यांनी भक्तिभावे देवाचे वस्त्रालंकार पूजन करण्यासाठी बुकिंग केले असल्यामुळे त्याच्या ऐवजी एखाद व्हीआयपी दर्शन घेणे त्यांना मंजूर नाही किंवा पैसे परत घेणे तर अजिबातच नाही. ह्यामुळे त्यांनी तिरुपती तिरुमला देवस्थान (टी टी डी) विरुद्ध तामिनाडूमधील एका ग्राहक कोर्टात केस टाकली, ज्यावर कोर्ट म्हणते आहे की तिरुपती तिरुमला देवस्थान ने भक्ताला त्याच्या श्रद्धेप्रमाणे पूजा करायला नवी तारीख द्यावी किंवा ५०, ००,००० (पन्नास लाख) दंड (२४% व्याजानुसार) द्यावे. भक्त अजूनही म्हणतोय का मला माझ्या देवाची वस्त्रालंकार पूजा करायची आहेच, मला तारीख हवीच पुढची, कोविड मध्ये आला तो माझा दोष नाही.

महेश भट्ट यांचं खरं नाव अस्लम, धर्म बदलला ते लपवता कशाला? कंगना रणौतची पोस्ट चर्चेत https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood… हीच गोष्ट, धर्मेंद्र आणि किशोर कुमार बाबतीत पण घडलेली आहे, असे ऐकीवात आहे ...

अजून हत्ती चर्चेत कसे आले नाहीत ??

आता जनतेनेच कायदा हातात घेणं गरजेचं. तो तर कधीच घेतला आहे. महात्मा गांधी, नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश ह्यांना शिक्षा जनतेनेच केली आहे. बाबरी मशीद पाडण्यासाठी सरकारची फुटी कवडीची मदत न घेता जनतेने आपले कर्तव्य पार पाडले आहे.

In reply to by आग्या१९९०

+ १ कुरमुसे, मदन शर्मा, राणा दांपत्य, केतकी चितळे अश्यांच्या गैरकृत्यांची शिक्षा जनतेनेच न्यायाधीश होऊन अंमलात आणली आहे.

आपल्या देशात रस्त्यावर होणारे अपघात रास्ते फक्त 10 टक्के जवाबदार असतील. खरे कारण वाहन चालकाची लापरवाही. माझ्या जवळ महागडी कार आहे. मी वेगात गाडी चालविणार. कुणी गाडी खाली आले तरी दोन तासांत जमानत मिळणार. मी नियमान्चे पालन करणार नाही. रोजचा रस्ता आहे. पूल आल्यावर रस्ता छोटा होणार हे ही माहित आहे. रस्ता रिकामा दिसतो. 150 च्या वर गाडी चालविणार. एवढ्या वेगात 50 मीटर दूरच्या रस्त्याचा अंदाज येणे शक्य नाही आणि आला तरी गाडी थांबविणे शक्य नाही. मी तर कार रेसर सारखा किंवा हॉलीवूड नायक सारखा कार चालवू शकतो. स्पीड की मजा और मौत का आनंद.

गोर्बाचेव निमित्ताने डॉ. संदिप वासलेकर यांची मुलाखत झाली मागच्या आठवड्यात. माझा कट्टा १. ते उच्चदस्थ अधिकारी आहेत आणि काही माहिती सागितली. या माझा कट्टा १ मुलाखती ( वीडिओ) नंतर सापडत नाहीत .

मिखाईल गोर्बाचेव्ह यांना विनम्र आदरांजली. अनेकांच्या निधनानंतर एका महान पर्वाचा अस्त वगैरे नुसतेच म्हटले जाते पण गोर्बाचेव्ह यांच्या निधनानंतर खरोखरच मानवजातीच्या इतिहासातील एक महान पर्व संपले. पु.ल म्हणतात की ज्यांच्या जगण्याला जीवन म्हणावे असे लोक हजार वर्षातून एकदा जन्माला येतात. मिखाईल गोर्बाचेव्ह नक्कीच त्यापैकी एक होते. १९८९ मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि नंतर रोमानियात सिअ‍ॅसिस्कूला तर लोकांनी ठारच मारले. चेकोस्लाव्हाकिया, पोलंड, हंगेरी या देशांमध्येही कम्युनिस्ट राजवटी पडल्या. त्यावेळेस वर्तमानपत्रातून या सगळ्या गोष्टी कळत होत्या पण त्या घटना नक्की का होत आहेत आणि त्यांचे महत्व काय याचा उलगडा काही होत नव्हता. कम्युनिझम वगैरे गोष्टी नुसत्या वर्तमानपत्रात वाचत होतो पण त्याचा अर्थ कळण्याइतकी जाण त्यावेळेस नव्हती त्यामुळे मानवी इतिहासातील एका खरोखरच ऐतिहासिक पर्वाविषयी समकालीन वर्तमानपत्रांमध्ये वाचत असूनही त्याचा आस्वाद घेता आला नव्हता. कम्युनिझम आणि रशियन पध्दतीत त्यांच्याच लोकांची गळचेपी कशी चालली होती, गुलाग वगैरे गोष्टी मला बर्‍याच नंतर कळल्या त्यामुळे रशियातून कम्युनिस्ट राजवटीचा अंत होणे ही केवढी ऐतिहासिक आणि महत्वाची घटना होती हे हळूहळू समजायला लागले. मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनामुळे तीन गोष्टी लिहावाश्या वाटतात. स्वतः गोर्बाचेव्ह कम्युनिस्ट पक्षातूनच उच्चपदाला पोचले. ते कम्युनिझमविरोधी होते असे वाटत नाही. पाच आंधळे आणि एक हत्ती या गोष्टीप्रमाणे कम्युनिझम म्हणजे नक्की काय हे १००% कोणालाच समजले नसावे तरीही स्वतः गोर्बाचेव्ह त्याच पक्षातून वर आले असल्याने ते कम्युनिझमविरोधी नसावेत. फक्त त्यांना अभिप्रेत असलेल्या कम्युनिझमची छटा ही फिकी लाल असावी. म्हणजे त्यांना लेनिन-स्टालिनसारखा हिंसाचार नको होता पण ज्या तथाकथित उद्देशांसाठी लेनिन आणि स्टालिन यांनी हिंसाचार केला होता त्या उद्देशांना गोर्बाचेव्ह यांचा विरोध नसावा असे म्हणायला जागा आहे. अमेरिकेत बर्नी सँडर्स वगैरे डेमॉक्रॅटिक सोशालिस्ट पण म्हणतात- आम्हाला गरीब-श्रीमंतांमधील दरी कमी करायची आहे आणि इतर उद्दिष्टे साध्य करायची आहेत पण चे गव्हेरासारखा हिंसाचार न करता तशी गोर्बाचेव्ह यांची भूमिका होती असे दिसते. १९८५-८६ मध्ये त्यांनी पेरेस्त्रोईका म्हणजे सोव्हिएट राजकारणात आणि अर्थकारणात बदल घडवायच्या दृष्टीने पावले उचलली त्यामागेही कम्युनिस्ट अर्थकारण किंवा कम्युनिस्ट राजवट संपविणे हे ध्येय नव्हते तर त्यापूर्वीच्या काळात, विशेषतः ब्रेझनेव्ह आणि त्यानंतर अल्पावधीसाठी सत्तेवर आलेल्या आंद्रेपोव्ह आणि चेरनेन्को यांच्या काळात रशियन अर्थव्यवस्थेत आलेला साचलेपणा (स्टॅगनेशन) संपवून त्या पध्दतीचा लोकांना अधिक फायदा करून द्यावा असा काहीसा उद्देश होता. आता ब्रेझनेव्ह, आंदेपोव्ह आणि चेरनेन्को यांच्या काळात आलेला साचलेपणा संपविण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते आणि गोर्बाचेव्ह यांच्याऐवजी दुसरा कोणीही सत्ताधारी झाला असता तर त्याने तेच केले असते का असे म्हणायचे का? कदाचित तसे नसावे. सोव्हिएट काळात रशियातील सगळे मोठे उद्योग सरकारच्या ताब्यात होते आणि मार्केटमध्ये मागणी किती आहे त्यानुसार उत्पादन करण्याऐवजी मॉस्कोमधून कोणी अधिकारी आदेश देईल तितकेच आणि त्याच गोष्टींचे उत्पादन या उद्योगांमधून केले जायचे. ही 'कमांड इकॉनॉमी' म्हणजे समाजवादी आणि त्यापुढील पायरी म्हणजे कम्युनिस्ट पध्दतीचा कणा होती. गोर्बाचेव्ह यांच्या पेरेस्त्रोईकाचा एक भाग म्हणून या सरकारी उद्योगांना असा मॉस्कोतून आदेश न पाठवता मार्केटमध्ये किती मागणी आहे त्याप्रमाणे उत्पादन करायची परवानगी दिली गेली. म्हणजे गोर्बाचेव्ह यांनी पूर्ण बंद असलेले दार थोडे उघडून मार्केट इकॉनॉमीचे वारे काही प्रमाणात रशियात येऊ दिले. उद्देश काय- तर आपल्याच पध्दतीचा लोकांच्या फायद्यासाठी वापर करावा. पण हे कम्युनिझमच्या मूळ तत्वांविरोधात असल्याने असे करणे हे गोर्बाचेव्ह यांचे धाडस होते. म्हणजे गोर्बाचेव्ह यांच्याजागी दुसरा कोणी असता तर त्यानेही तेच केले असते असे कदाचित नसावे. दुसरी गोष्ट म्हणजे सुरवातीला पेरेस्त्रोईका म्हणजे राजकीय आणि आर्थिक सुधारणा राबवायला त्यांनी सुरवात केली आणि त्या सुधारणा राबवायला लठ्ठ सोव्हिएट नोकरशाहीकडून अडचणी यायला लागल्यावर ग्लासनोस्त म्हणजे प्रशासकीय सुधारणा- यात मुख्य म्हणजे सगळ्या गोष्टी गुप्ततेच्या वातावरणात पूर्वी व्हायच्या त्यात खुलेपणा आणणे ही मुख्य पावले गोर्बाचेव्हांनी उचलली. याचा अर्थ गोर्बाचेव्हांनी म्हणावे तर एका प्रकारे कम्युनिस्ट पध्दतीच्या मूळ तत्वांवरच आघात केला किंवा दुसर्‍या अर्थाने म्हणावे तर विशेष काहीच केले नाही- पण घट्ट बंद असलेले दार थोडे किलकिले केले इतकेच. मग या किलकिल्या केलेल्या दारातून इतके मोठे वादळ येऊन ३-४ वर्षात सगळी सोव्हिएट कम्युनिस्ट पध्दतच भुईसपाट कशी झाली? मागे मिपावर 'तुम्ही डावीकडून उजवीकडे का आलात' म्हणून एक चर्चा झाली होती त्यात लिहिले होते की लेफ्ट लिबर्टेरिअन ही टिकणारी स्थिती नाही- म्हणजे सत्तेत येण्यापूर्वी हे सगळे लोक लेफ्ट लिबर्टेरिअनच असतात (अगदी लेनिन किंवा चे गव्हेरानेही आपण सत्तेत आल्यावर लोकांना ठार मारायचे या उद्देशाने सत्ता बळकावली नव्हती- नसावी) पण सत्तेत आल्यावर मात्र त्यांची वाटचाल लेफ्ट ऑथोरिटॅरिअन या दिशेनेच होते. त्याचे कारण त्याच प्रतिसादात लिहिले होते. आता उलट्या अर्थाने बघितले की गोर्बाचेव्ह यांनी पूर्वीच्या गुलाग असलेल्या लालभडक कम्युनिस्ट राजवटीकडून त्यांच्या काळात काहीशा फिकट लाल पण कम्युनिस्ट राजवटीकडेच वाटचाल करण्यासाठी म्हणून थोडे दार किलकिले केले आणि त्यातून मोठे वादळ आले आणि सगळी व्यवस्थाच भुईसपाट झाली. मिपावरील अनेक चर्चांमध्ये मी म्हटले आहे की दडपशाहीशिवाय कम्युनिस्ट राजवट टिकणे अशक्य आहे त्याला ही पार्श्वभूमी आहे. त्यातही गोर्बाचेव्ह हे लेनिन किंवा स्टालिनपेक्षा कोट्यावधी पटींनी सहृदय असल्याने पूर्व युरोपातील लोकांवर त्यांच्या इच्छेविरोधात दडपशाही करणे अयोग्य आहे हे त्यांना वाटले असायची शक्यता आहेच. तरीही आपल्या देशाच्या साम्राज्याचे नुकसान व्हावे यासाठी त्यांनी पूर्व युरोपातून सैन्य मागे घेतले नसावे. अफगाणिस्तानात हकनाक पाण्यासारखा पैसा आणि रशियन जीव खर्ची पडल्याने पूर्व युरोपातील पांढरे हत्ती पोसणे दिवसेंदिवस कठीण झाल्यामुळे त्यांनी तिथून सैन्य माघारी बोलवायचा निर्णय घेतला असे दिसते. तसेच रशियन सैन्य माघारी आल्याबरोबर तिथे उठाव होईल आणि कम्युनिस्ट राजवट गाडली जाईल याची त्यांना तरी कल्पना होती की नाही कोणास ठाऊक. काहीही असले तरी सैन्याची पोलादी पकड ढिली पडल्यावर पूर्व युरोपातील आणि नंतर खुद्द रशियातील कम्युनिस्ट राजवटी पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या ही पण वस्तुस्थिती आहे. दडपशाहीशिवाय कम्युनिस्ट राजवट टिकत नाही हेच ते दर्शविते का? तिसरे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे बर्लिनची भिंत पडली वगैरे काळात मी बराच लहान होतो. आता माहित आहेत त्याच्या ०.१% गोष्टीही त्यावेळी माहित नव्हत्या. त्यामुळे त्या काळात मी अगदी अज्ञानातील सुखी होतो. त्यापूर्वी तर माझा जन्मही झाला नव्हता. त्या शीतयुध्दाच्या काळात माझ्यासारख्यांची अगदी विलक्षण ओढाताण झाली असती. म्हणजे 'आता पुढे काय करू रे' हे विचारायला अमेरिकेचे किंवा रशियाचे अध्यक्ष येणार नव्हते हे वेगळे सांगायलाच नको पण एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशावर प्रेम आणि त्यावेळी असलेल्या परिस्थितीत अमेरिका आपल्याविरोधात तर रशिया जवळचा असल्याने रशियाविषयी आपलेपणा वाटणे पण त्याचवेळेस त्यांच्या कम्युनिस्ट पध्दतीला कमालीचा विरोध ही ओढाताण एका बाजूला. तसेच अमेरिकन पध्दतीविषयी आपलेपणा वाटत असला तरी अमेरिका पाकिस्तानला जवळ असल्याने त्या देशाचा विरोध ही ओढाताण दुसर्‍या बाजूला अशी स्थिती त्यावेळेस माझ्यासारख्यांची त्यावेळी झाली असेल. माझीही झाली असेल कदाचित पूर्वजन्मी पण माझ्या आता तरी ते लक्षात नाही :) असो. मिखाईल गोर्बाचेव्ह यांना विनम्र आदरांजली.

रोमानियात सिअ‍ॅसिस्कूला तर लोकांनी ठारच मारले. उच्चार ' चाऊसेस्कू ' ( निकोलाई चाऊसेस्कू ). त्यांना नरसंहार आरोपाखाली देहदंडाची शिक्षा झाली आणि लोकांनी नव्हे , तर लष्करातील एका तुकडीने त्यांना गोळ्या घालून ठार मारले. खूप आलिशान प्रासाद होता त्यांचा. सीएनएन वर दाखवले होते. त्यावेळी भारतातील कम्युनिस्टांची वाचा गेली होती. गोर्बाचेव्ह यांच्याविषयी फार चांगले बोलत नव्हते येथील कम्युनिस्ट.

In reply to by आग्या१९९०

उच्चार ' चाऊसेस्कू ' ( निकोलाई चाऊसेस्कू ).
धन्यवाद. हो पूर्व युरोपातील उच्चार करायची पध्दत पाहता असा काहीतरी वेगळाच उच्चार असणे सहज शक्य आहे. पण त्यावेळेस मी वाचलेल्या मराठी पेपरांमध्ये सिअ‍ॅसेस्कू असेच यायचे त्यामुळे माझ्या डोक्यात तोच उच्चार बसला.
नरसंहार आरोपाखाली देहदंडाची शिक्षा झाली आणि लोकांनी नव्हे , तर लष्करातील एका तुकडीने त्यांना गोळ्या घालून ठार मारले.
हो तांत्रिकदृष्ट्या लष्करातील तुकडीने त्याला ठार मारले पण देहदंडाची शिक्षा लोकांच्या उठावातून तयार केलेल्या तथाकथित न्यायालयाने दिली होती. अगदी १-२ दिवसात सगळी न्यायदानाची प्रक्रीया पूर्ण झाली आणि त्याला यमसदनी पाठवले पण.

In reply to by क्लिंटन

चाउसेस्कूच्या बायकोलाही मारले होते बहुतेक. इतर सर्व साम्यवादी देशात शांततेने सत्ता हस्तांतरण झाले होते. रूमेनियात रक्तरंजित क्रांती झाली होती. याचा प्रारंभ गोर्बाचेव्ह यांनी केला नसून १९८१-८२ मध्ये पोलंडमधील कामगार नेता लेच वालेसा यांनी केलेल्या राष्ट्रवापी कामगार संपातून झाली होती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou

देशातील मदरशांवर मी इथे चिंता व्यक्त केल्याचे आणि त्यावर नियंत्रण आणण्याच्या संदर्भात लिहले होते. [ बहुतेक त्या प्रतिसादाला देखील पंख लागले असावेत. ] आता आसाम मध्ये अशी कारवाई होताना दिसत आहे. या विषयावर अधिक :- फक्त लव्ह?जिहाद नाही सर्व प्रकारचा जिहाद ठेचुन काढला पाहिजे, हे असे मोकाट सुटले आहेत :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou

सध्या देशात आणि जालावर ज्या मुलाखतीची विशेष चर्चा होत आहे, ती मुलाखत इथे देऊन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einstein

ब्रिटनची राणी बहुधा ख्रिस्तवासी होणार असे दिसते ! Royal Family gathers at Balmoral amid concerns for Queen's health

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einstein

In reply to by मदनबाण

ब्रिटनची राणी बहुधा ख्रिस्तवासी होणार असे दिसते ! Queen Elizabeth II has died, Buckingham Palace announces मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einstein

In reply to by मदनबाण

झाल्या ख्रिस्तवासी. त्यांची आई १०० वर्षे, पतीदेव ९६ वर्षे व ह्या सुद्धा ९६ वर्षे जगल्या.

In reply to by मदनबाण

ख्रिस्तवासी असा शब्द वापरतात खरा पण तो तितकासा योग्य नाही असे वाटते. हिंदूंमध्ये कैलासवासी असे म्हणतात पण कैलास पर्वत हे ठिकाण आहे त्यामुळे आत्मा त्या ठिकाणी गेला या अर्थी कैलासवासी म्हटले तर समजू शकतो. पण ख्रिस्त ही व्यक्ती होती ठिकाण नव्हते. समजा काही म्हणायचेच असेल तर बेथलेहेमवासी* वगैरे म्हटले तर समजू शकतो पण ख्रिस्तवासी हा तसा निरर्थक शब्द वाटतो. आपल्याकडे कैलासवासीऐवजी कृष्णवासी किंवा रामवासी म्हटल्याप्रमाणे ते होईल. *: बेथलेहेम हे शहर अजूनही आहे आणि तिथे लोक राहत असल्याने बेथलेहेमवासी हा शब्दप्रयोगही तसा चुकीचाच ठरेल पण निदान बेथलेहेम हे ठिकाणाचे नाव तरी आहे व्यक्तीचे नाही.

In reply to by क्लिंटन

ख्रिस्तवासी हा शब्द मी माझे आवडते अभिनेता दिलीप प्रभावळकर यांच्याकडुन घेतला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confucius

In reply to by क्लिंटन

ख्रिस्तवासी असा शब्द वापरतात खरा पण तो तितकासा योग्य नाही असे वाटते
सहमत. तसेही मुस्लिम आणि ख्रिश्चन कयामत के दिन तक थडग्यात पापपुण्याचा निवाडा होईपर्यंत चिरनिद्रा घेतात. सगळ्यांच्या पापपुण्याचा हिशेब त्यांच्या धर्मातील जो कोणी अकाऊंटंट असेल तो एकदाच करतो त्यानंतर ते स्वर्गात किंवा नरकात जातात . हिंदूंचा न्यायनिवाडा मृत्युनंतर चित्रगुप्त महाराज लगोलग करतात आणि जीव त्याच्या बँक बॅलन्स प्रमाणे स्वर्ग- नरकात स्टॉप घेऊन पुढील जॉब जॉईन करतात. काहिंनी आयुष्यात खुपच चांगले काम केले असेल तर ते ते मोक्ष मिळवितात अर्थात परमानंट रिटायर होतात.

In reply to by क्लिंटन

"ख्रिस्तवासी" हा शब्द जसा योग्य नाही, तसाच RPI . हल्ली कोणीही मृत पावला की लोक RPI म्हणतात, हिंदु मध्ये पार्थिव देहाचे दहन करुन पंचप्राण अनंतात विलीन करण्याची परंपरा आहे. जाळल्याने ना शरीर मागे रहाते ना आत्मा त्यामुळे RPI अस म्हणण निरर्थक आहे.

In reply to by डँबिस००७

RPI नव्हे RIP - Rest in peace मी आत्मा वगैरे मानत नाही म्हणून काहीच म्हणत नाही. नातेवाईकांचे सांत्वन करणे शक्य असल्यास तितकेच करावे असे माझे मत.

मुस्लिम मुलीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, तरुणाचा घातपात झाल्याचा संशय; श्रीरामपूरमधील प्रकार. https://marathi.abplive.com/crime/crime-marathi-news-hindu-youth-who-ma… मुस्लिम तरूणीशी महिनाभरापूर्वी विवाह करणारा तरुण बेपत्ता झाला असून त्याचा घातपात केल्याचा संशय कुटुंबियांना आहे.

हिंदू मुलीचा पाठलाग, फुलं उधळली, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना, म्हणाला “इस्लाम स्वीकार, लग्न कर, अन्यथा…” https://www.loksatta.com/desh-videsh/muslim-man-arrested-for-threatenin… मोनू मन्सूरी असं या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मोनू मन्सारीला अटक करण्यात आली आहे. फसवणुक करत धर्मांतर केल्यास आणि खासकरुन लग्नासाठी असल्यास मध्य प्रदेशात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे”. ------ महाराष्ट्र राज्यात देखील, असा कायदा हवाच ...

Love Jihad चे सावट! नवरात्र उत्सवातील गरब्यात आता ओळखपत्राशिवाय ‘नो एंट्री’ https://www.esakal.com/amp/desh/madhya-pradesh-minister-love-jihad-rema… उत्तम निर्णय....

https://www.lokmat.com/sindhudurga/devendra-fadanvis-order-to-take-acti… अतिशय उत्तम निर्णय .... जबरदस्तीने धर्म परिवर्तन होत असेल तर, कठोर कायदे आणण्याची गरज आहे आणि तातडीने अंमलबजावणी करण्याची पण गरज आहे ...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confucius

अमरावती : येथील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा शोध लागल्यानंतर कथित ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ही तरुणी रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आल्याने खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वास्तव समोर आल्यावर ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा बागुलबुवा उभा करण्यात आला, शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी चर्चा आता सुरू झाली. बातमी नॉन लोकसत्ता स्त्रोत

In reply to by मुक्त विहारि

अशी जनता, जगभर आढळतेच.... खरतर दगडफेक करणारी जनता सरकार कोणाच आहे त्यावरुन ठरवते की दगडफेक करायची कींवा नाही. योगीजीं, शिवराज, हिमंता शर्मांच्या राज्यात घरावर बुलडोझर चालतो त्या मुळे अश्या ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडताना दिसत नाहीत. हिंदुंच्या मिरवणुकीवर दगडफेक सहन करुन वर पोलिसांकडुन शांतीदुत समाजाला पाठीशी घालत, हिंदु समाजालाच जवाबदार धरल जाणार्या राज्यात हिंदुंची अवस्था वाईटच रहाणार आहे. अश्या राज्यात हिंदु जनतेने भाजपा सरकार निवडून आणुन , भाजपा पक्ष श्रेष्ठी करवी कडक मुख्यमंत्री देण्याची मागणी जनतेने केली पाहीजे.

लखनऊ में लव जिहाद? अथर्व बनकर फैजल ने हिंदू युवती से की शादी, ऐसे खुला राज https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/lucknow-love-jihad-case-in-… पीड़िता की शिकायत पर पुलिस ने मुकदमा दर्ज करते हुए आरोपी फैसल अहमद को गिरफ्तार किया है. फैसल ने खुद को हिंदू धर्म का बताकर युवती से शादी की.

Jharkhand: गढ़वा में पेट्रोल डालकर युवक को जिंदा जलाया, लड़ाई-झगड़े में बीच-बचाव कराने गया था पीड़ित झुलसे युवक की पहचान दीपक सोनी के रूप में हुई है। कहा जा रहा है कि पीड़ित सोनी विवाद के दौरान बीच बचाव करने गया था। इसी बीच, आरोपी कसमुद्दीन अंसारी ने उस पर पेट्रोल डालकर आग लगा दी।

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

इकरा बनली इशिका; प्रियकरासाठी मुस्लीम तरुणीनं स्वीकारला हिंदू धर्म, लग्नानंतर केली ही मागणी https://lokmat.news18.com/national/muslim-girl-converting-into-hinduism… आता धर्म बदलल्यानंतर मुलीचे कुटुंब आणि काही लोक त्यांना धमक्या देत आहेत.

चार मुस्लिम तरुण दलित समाजाच्या मुलीला शिवीगाळ करण्याव्यतिरिक्त जातीय टिप्पणीही करत होते. इतकेच नाही तर ते मुलीकडे पाहून अश्लील हावभावही करत होते. त्या संध्याकाळी मुलीने वडिलांना याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी किशोरवयीन मुलांना दटावले. त्या मुस्लिम मुलांनी त्यांना सायकलच्या साखळीने मारहाण करण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील अनेक हिंदू कुटुंबांना जिहादी घटकांच्या छळाच्या भीतीने घरे सोडावी लागली आहेत. या भागातील अनेक निवासस्थानांसमोर 'घर बिकाऊ है' (हे घर विक्रीसाठी आहे) पोस्टर्स लागली आहेत.

एक जुनी नोंद. उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये धर्मांतराचे प्रकरण - लग्नाच्या दोन वर्षानंतर महिलेला पतीचे वास्तव कळले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूजा सोनी ही २३ वर्षीय तरुणी छत्तीसगडची रहिवासी आहे. तिने अशोक राजपूत नावाच्या व्यक्तीशी दिल्लीत लग्न केले होते. हा अशोक प्रत्यक्षात अफजल होता. आणि त्याने तीची फसवणूक केली. अलिगढच्या रीत गावात त्याच्या घरी घेऊन गेला तेव्हा ते तिच्या लक्षात आले. तिथे त्याचे नाव अफजलखान असल्याचे कळले. यावेळी तिला 'नमाज' अदा करण्यास भाग पाडले गेले. तिचे नावही बदलण्याचा प्रयत्न झाला.

In reply to by निनाद

लग्न करताना मुलगा, मुलाचे घर, आजूबाजूची वस्ती, नातेवाईक, मुलगा काय कामधंदा करतो अशा गोष्टी मुलगी किंवा मुलीकडचे अजिबात न पाहता आंधळेपणाने लग्न लावून देतात का?

In reply to by श्रीगुरुजी

लग्न करताना मुलगा, मुलाचे घर, आजूबाजूची वस्ती, नातेवाईक, मुलगा काय कामधंदा करतो अशा गोष्टी मुलगी किंवा मुलीकडचे अजिबात न पाहता आंधळेपणाने लग्न लावून देतात का? बरेच फॅक्टर असतात अश्या प्रकरणात, मुलीचे लग्न म्हणजे पालकाच्या पुढचा यक्ष प्रश्न, लग्नाचा खर्च, हुंडा, लोकांच मानपान अश्या अनेक भानगडी. लग्न झालेल्या मुलीला पुढे लग्नानंतर काही प्रश्न निर्माण झाले तर लग्नात मानपान मागणारे नातेवाईकच काय तर खुद्द आई वडील सुद्धा सरळ पाठ फिरवतात. त्यामुळे अश्या मुलींना कोणीही वाली असत नाही. ज्यांच्या लग्नासाठी घरात आई वडील नसतील तर त्यांची परिस्थिती काय असेल ही कल्पना सुद्दा करवत नाही. त्यामुळे घरात आई वडील नसलेल्या मुली अश्या प्रकरणात सहज टारगेट ठरत आहेत असे दिसुन आलेले आहे. हिंदु समाजाने आपली मंदिरे संस्थाने सरकारच्या कंट्रोल मधुन सोडवुन त्या मंदिराच्या उत्पनांतुन अश्या सामाजीक उपक्रमांना अर्थ सहाय्य केले पाहीजे. हिंदु मंदिराच्या उत्पनांतुन सरकार मंदिराच्या पुजार्यांना नाही तर मस्जिदच्या मौलवींना पगार देते. त्या पेक्षा हे बरे !

बळजबरीने हैदराबादेत विवाह अन् धर्मांतर; अमरावतीमधील पीडितेचा आरोप https://www.loksatta.com/maharashtra/forced-marriage-apostasy-hyderabad… मेळघाटातील धारणी येथील २३ वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून हैदराबाद येथे नेले व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला. त्यानंतर पीडित तरुणीला बळजबरीने मुस्लीम धर्मपरिवर्तनसाठी प्रवृत्त केले. तसेच गोमांस खाण्यासाठी बळजबरी केली जात होती, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

मुस्लीम तरुण बंदुक घेऊन शाळेत घुसले आणि हिंदू मुलींना "आमच्याशी मैत्री करा, नाहीतर उचलून नेऊ" अशी धमकी दिली. रांची येथील घटना.

In reply to by mayu4u

मुस्लीम तरुण बंदुक घेऊन शाळेत घुसले आणि हिंदू मुलींना "आमच्याशी मैत्री करा, नाहीतर उचलून नेऊ" अशी धमकी दिली. रांची येथील घटना. या देशावर सुमारे वीस वर्षे हिंदुत्ववादी मतांवर निवडून आलेल्या भाजपने राज्य केले आहे. आत्ताही मागच्या साडेआठ वर्षांपासून प्रचंड बहुमतातील भाजपचे सरकार आहे. अनेक राज्यांत भाजपची सरकारे आहेत. झारखंडातही दहाएक वर्षे भाजपने राज्य केले आहे. --- "देशाच्या साधनसंपत्तीवर* पहिला हक्क मुसलमानांचा आहे" असे काँग्रेसचे पंप्र म्हणाले होते. भाजपचे पंप्र ते सिद्ध करत आहेत का? --- * इस्लाम मतानुसार काफिर स्त्रिया ह्या मुसलमानांची साधनसंपत्ती आहेत.

In reply to by वामन देशमुख

आत्ताही मागच्या साडेआठ वर्षांपासून प्रचंड बहुमतातील भाजपचे सरकार आहे.
सहमत आहे हो. पण त्यांची हिंदूंसाठी धडकपणे काही करण्याची कामगिरी निराशाजनक आहे. काही प्रसिद्ध मुद्दे निकाली निघाले हे खरे असले तरी इतर धर्मियांची दंडेली अजूनही चाललीच आहे. भारतात सर्वत्र प्रचंड प्रमाणावर अब्राहमिक धर्मांतरे चालली आहेत आणि सरकार त्याविरुद्ध काहीही करत नाहीये हे पाहणे विद्विग्नता आणते. सरकार घरवापसीसाठी कायदा आणू शकते. कायद्याने धर्मांतर रोखू शकते. कायद्याने धर्मांतरास बंदी घालू शकते. पण प्रचंड बहुमतातील भाजपचे सरकार असून त्यांनी यातले काहीही केलेले नाही. अर्थात मी चुकीचा असेन तर जरूर माझे मत दुरुस्त करावे!

In reply to by निनाद

पण प्रचंड बहुमतातील भाजपचे सरकार असून त्यांनी यातले काहीही केलेले नाही.
अगदी बरोबर. मागच्या काही काळापासून मिपावर मी हेच लिहीतोय. केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.

Foxconn वेदांता चा एक लाख सहासष्ट हजार कोटींचा प्रोजेक्ट महाराष्ट्रामधून गुजरातला नेल्याबद्दल फडणवीस आणि शिंदे यांचे अभिनंदन !