Skip to main content

अलक १५ ऑगस्ट

लेखक मालविका यांनी सोमवार, 15/08/2022 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
अलक १ नेहमी सिग्नल वर सिझनप्रमाणे काही ना काही विकणारा १०/१२ वर्षाचा तो मुलगा. कधी पुस्तक, कधी फुगे तर कधी फुलं. १५ ऑगस्ट जवळ आला तशी १० तारखेपासून झेंडे विकायला लागला. कधी नव्हे ते यावेळी जास्तच झेंडे विकले जात होते.इतके की त्याला दोनदा नवीन गठ्ठा विकत घ्यावा लागला. बरेच जण त्याच्याकडून घेवून गाड्यांवर झेंडे लावत होते. यावेळी लोकं एवढे का खरेदी करत आहे समजत नव्हतं. न राहवून त्याने सिग्नल वरच्या टपरी वाल्याला विचारलं तेव्हा ' हर घर तिरंगा ' बद्दल समजलं. २ दिवस झाले आपण झेंडे विकतोय पण आपल्या घरावर आपण झेंडाच नाही लावला ही जाणीव झाली आणि तडक तो पुलाखालच्या आपल्या पत्र्याच्या घरात आला. वर चढून एका काठीच्या साहाय्याने त्याच्याकडे असलेला झेंडा त्याने दिमाखात फडकवला. त्याच्या नजरेत समाधान तरळल. आजूबाजूच्या पोरांनी ते बघून टाळ्या वाजवल्या. खुश झालेला तो प्रसन्न मनाने परत आपल्या कामाला चालू पडला. अलक २ ' हर घर तिरंगा ' अभियान सुरू झालं तश्या घरात चर्चा सुरू झाल्या. झेंडा कुठून आणायचा, कुठे लावायचा, किती मोठा आणायचा आणि बरंच काही. आजोबा कान देऊन सगळं ऐकत होते. सगळ्यांचं ऐकून घेवून शेवटी ते उठले. त्यांनी जपून ठेवलेली जुनी ट्रंक उघडली. त्यात असलेला खादीचा जरा पिवळट पडलेला राष्ट्रध्वज त्यांनी मुलांच्या हातात दिला. नातवंडांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न त्यांना दिसले. त्यांनी सांगितलं, " माझ्या वडिलांच्या वेळचा झेंडा आहे हा. अजून पर्यंत जपून ठेवला कदाचित याच दिवसासाठी." स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या पणजोबांच्या वेळचा ध्वज हाती आल्यावर अभिमानाने सर्वांचेच डोळे पाणावले. - धनश्रीनिवास
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3544
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मस्त लिहीलं आहे.

छान आहेत दोन्ही गोष्टी पैजारबुवा,

दोन्ही मस्त. गल्लीत पतंग ( दिल्लीत १५ ऑगस्ट रक्षाबंधन लोक पतंग उडवितात)विकणारा झेंडे ही विकत होता. मला म्हणाला, मोदीजी आमच्या सारख्यांचीही चिंता करतात. दोन ते तीन हजार रुपये त्याने तीन दिवसात कमविले असतील.

अलक २ फार आवडली. लिहीत राहा.

दोनिहि अलक आवडल्या.