अतिरंजित Sarcasm उर्फ Asterix: The Mansions of the Gods
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
माझ्या लहानपणी, म्हणजे तसा मी लहानच आहे अजून आणि तस ही मी २५ वर्षांनंतर वय मोजणं सोडून दिल, कारण देव साहेब म्हणून गेले आहेत कि “ Age is just a number.” तर माझ्या लहानपणी जेव्हा आपल्याकडे उपग्रह वाहिन्याचं नुकताच आगमन झाल होत तेव्हा स्टार वाहिनीच स्टार मुव्हीज चानल नवीनच बाजारात आल तेव्हाची ही गोष्ट. स्टार मुव्हीज त्या काळातली माझ्या माहिती प्रमाणे भारतातील पहिली स-शुल्क वाहिनी होती. त्या वेळी तिथल्या सिनेमांना हिंदी सबटायटल्स असायची. तसेच त्या काळातले रात्री उशिरा लागणारे १८+ हा एक रम्य विषय आहे.
याच स्टार मुव्हीज वर मला पहिल्यांदा ते दोघ भेटले. Asterix & Obelix, रोमन – गौल्स (ब्रिटनी) आणि त्यांची युद्धे यांचा इतिहास मला खरं तर माहित नाही, पण या सिनेमातला अतिरंजित उपहास (Sarcasm) मला त्या वेळी आवडून गेला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनी हे दोघ Amazon Prime वर पुन्हा एकदा Asterix: The Mansions of the Gods मध्ये पुन्हा भेटले. त्या भेटीचा हा वृत्तांत.
हा चित्रपट २०१४ सालाचा आहे, पण जर तुम्ही कार्टून आहे, अस म्हणून सोडला असेल तर माझे ऐका आणि एकदा तरी वेळ काढून बघाच. या कथेतील पात्रांची नावे निवडताना कथाकाराने दाखवलेली कल्पकता भन्नाट आहे. उदाहरणार्थ गुलामांच्या म्होरक्याचे नाव “Give us a bonus”, टाऊनशिप लॉटरी जिंकलेल्या सर्वसामान्य माणसाचे नाव “Anonymous” वगैरे..........
तर या वेळेस रोमन सीझर गौल्सच्या ब्रिटनी जवळच्या जंगलात आपली Mansions of the Gods ही नवीन टाऊनशिप उभारायचे ठरवतो. सुरुवातीला गौल्स, रोमनांचा बऱ्यापैकी अटकाव करतात, पण जेव्हा त्यांना समजत कि वैतागलेले रोमन त्यांनी आणलेल्या गुलामांना ठार करणार आहेत तेव्हा ते त्या गुलामांची मदत करायचे ठरवतात. मदत काय तर, गौल्स आपले ताकद वाढवणारे सरबत या गुलामांना द्यायचे ठरवतात. पण होत भलतच, ते गुलाम गौल्सनी दिलेले सरबत वापरून एका दिवसात Mansions of the Gods टाऊनशिप पूर्ण करतात. अर्थात हे करण्याआधी रोमन लोकांबरोबर आपल्या नवीन शर्ती त्यांनी मान्य करून घेतलेल्या असतात. Mansions of the Gods मध्ये प्रत्येक गुलामच एक घर आणि आयुष्यभरासाठी गुलामीतून मुक्तता ही त्यापैकी एक अट असते. त्या प्रमाणे टाऊनशिप पूर्ण केल्यावर जेव्हा गुलाम आपली घर आणि गुलामीतून मुक्तता मागण्यासाठी रोमन लोकांकडे जातात, तेव्हा रोमन त्यांची ती मागणी कशा प्रकारे पूर्ण करतात हे चित्रपटात पाहणेच योग्य.
टाऊनशिप पूर्ण झाल्यावर तिथे सगळ्यात आधी घर मिळालेला सर्वसामान्य रोमन Anonymous पोहचतो, पण त्याला लॉटरीमध्ये मिळालेले स्वतःचे घर मिळायला जे पापड भाजावे लागतात ते पाहिल्यावर लॉटरीत लागणारी घरे सगळीकडे सारखीच असे जाणवते.
हा चित्रपट पाहताना फ्फार पूर्वी मुंबईपासून बरेच लांब (आता काही तासांवर?) असणाऱ्या कल्याण, बदलापूर आठवले तर आश्चर्य नाही. वाढत जाणारे शहरीकरणावर देखील यात एक भाष्य आहेच.
सगळी कथा सांगून येथे रसभंग करत नाही, पण एकदा नक्कीच पहावा असा हा उपहास आहे.
प्राईमवर येथे पाहायला मिळेल:
https://www.primevideo.com/detail/0O730MEG2VI389M5BTG93C9HTW/ref=atv_hm_cjm7wb_1_15
प्रतिक्रिया
ऍस्टिरिक्स ऑब्लिक्सच्या निमित्ताने
सॉरी
मूळ भाषा
पण जर तुम्ही कार्टून आहे, अस