✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उपकार (कथा)

श
श्वेता व्यास यांनी
Wed, 03/01/2017 - 16:44  ·  लेख
लेख
"काय गं श्वेता, काय झालं? अशी रडतेस काय?, काय म्हणाले सर? काही वेडंवाकडं बोलले का?" प्रीतीने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. आणि मी दाटलेल्या कंठाने काहीही बोलूच शकत नव्हते. शिकवणी ते बसस्टॊप पूर्ण दहा मिनिटांच्या रस्त्यात अखंड डोळे वाहत होते. आणि गोंधळलेली, घाबरलेली प्रीती, माझी जिवलग मैत्रीण मला सावरायचा प्रयत्न करत होती, तेही मी का रडतेय याची काहीच कल्पना नसताना! "बाबा, या विषयाला कॉलेजमध्ये शिकवायला चांगले शिक्षक नाहीत, तसे ते कोणत्याच विषयाला नाहीत. पण या विषयाचं जरा अवघड आहे. आणि पुढे करिअरसाठीही हाच विषय पक्का होणं आवश्यक आहे." - मी. "किती असेल फी?" बाबा जरा चिंतेतच म्हणाले. "पहिले तीन दिवस शिकवणीला जाऊन बसायचं आणि शिकवलेलं आवडलं तर पुढे सगळी फी दोन टप्प्यात भरून शिकवणी चालू ठेवायची. आठ हजार रुपयांची व्यवस्था दहा दिवसांत होईल का? तीन आणि पाच असे करून?" मी जरा चाचरतंच विचारलं. आपल्याला ही फी परवडणारी नाही हे आधीच ठाऊक होतं तरीही धीर करून बाबांना विचारलं. "बघतो जमतंय का". बाबाही विचारात पडले. "नसेल जमत तर काहीच हरकत नाही बाबा, मी प्रीतीकडून समजून घेईन सगळं, आणि तीही मला नाही म्हणणार नाही. आतापर्यंत बऱ्याच वेळा अशी मदत केलीये तिने मला". बाबांना ओझं देऊन माझ्याच काळजावर धोंडा ठेवल्यासारखं वाटत होतं मला! "जा बंड्या तू क्लासला, मी बघतो फीचं." बाबांनी माझं दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला. मी त्याच दिवशी प्रीतीबरोबर पहिल्या दिवसाचा वर्ग पूर्ण केला. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होते. त्या विषयासाठी शिकवणी लावणं अगदी आवश्यकच होतं. आणि जडेजा सर तिथले सर्वात उत्तम शिक्षक होते. ते अतिशय कमर्शियल म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या शिकवणीला सगळी श्रीमंतांचीच मुलं दिसायची नेहमी. त्यांची फी देखील तशीच जास्त होती. सुरुवातीचे तीन हजार तीन दिवसांनी भरले. ४५ दिवसांचा कोर्स होता. पुढची रक्कम सात दिवसात भरणं आवश्यक होतं. "श्वेता, आज तुझा फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे ना?" बाबांनी मी आठवण न करताच विचारलं. मी हो म्हणाले. "मी तुमच्या सरांना आज दुपारी येऊन भेटून जाईन." - बाबा "म्हणजे तुम्ही दुपारी माझी फी भरणार का?" - मी "हो, दुपारपर्यंत होईल काहीतरी." खरंच पैशांची व्यवस्था झालीये, की बाबा मला उगीच धीर देत आहेत? माझं मलाच कळेना. संध्याकाळी शिकवणीला जायला निघालो आणि प्रीतीने माझी अस्वस्थता ओळखली. तिच्यापासून काहीच लपून नव्हतं. "श्वेता काळजी नको करूस, उद्यापासून तुला नाही जमलं तरी कॉलेजमध्ये अर्धा तास जास्त थांबून सरांनी शिकवलेलं मला समजेल तसं तुला सांगत जाईन मी, सरांसारखं नक्कीच जमणार नाही. पण तुझं तरी कमीत कमी नुकसान होईल गं." मी खरंच इतकी भाग्यवान होते, प्रीतीसारखी मला समजून घेणारी, माझ्यासाठी तळमळ असणारी मैत्रीण मला मिळाली होती. नाहीतर स्वत:च्या घरचं सगळं छान असेल तर इतरांच्या गरिबीची खिल्लीच उडवताना सगळे दिसतात हल्ली! शिकवणी सुरु झाली, सरांनी फी शिल्लक असलेल्या मुलांची फी भरण्यासाठी नावं वाचायला घेतली. प्रत्येक नावागणिक पुढचं नाव माझंच असेल असं वाटत होतं, आणि कानांवर दुसरं नाव पडलं की यापुढचं तर नक्कीच असेल अशी खात्री वाटत होती. पण पूर्ण यादीत माझं नाव नव्हतं. प्रीती आणि मला दोघींनाही खूप आनंद झाला. त्या दिवशी वर्गात मी सगळ्यात जास्त उत्तरं दिली. वर्ग संपला आणि सगळे निघताना सरांचा आवाज आला, "श्वेता, आप मुझे ऑफिस में मिलना". आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. प्रीती म्हणाली, "तू ये बोलून, मी वाट बघते बाहेर, नंतर एकत्रच जाऊया". ऑफिसमध्ये जाऊन पोहोचले, मनात खूप धागधुग होती की सरांना काय बोलायचं असेल. थोडा वेळ वाट पाहीली. तेवढ्यात सर आले आणि म्हणाले, "तुझे बाबा भेटले मला, तुझ्या फीच्या अडचणीबद्दल सांगितलं. तू आजिबात काळजी करू नकोस, शिकवणीच्या शेवटच्या दिवशी तुला फी भरायला जमली तरी चालेल. आणि समजा तेव्हाही नाही जमलं, तर जेव्हा तुला नोकरी लागेल तेव्हा तुझ्या पगारातून नंतर तू मला पैसे आणून दे." (ते हिंदीतच बोलत होते) हे ऐकलं आणि त्यांचा चांगुलपणा पाहून मला दाटून आलं, त्याच दाटलेल्या आवाजात त्यांना फक्त धन्यवाद दिले, अजून जास्तीचं काही बोलताच आलं नाही मला. आणि ऑफिसमधून बाहेर पडल्याक्षणी डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं. -श्वेता व्यास (मिपावर लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे, सर्वांच्या सूचनांचे मनापासून स्वागत)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7910 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

कथा आवडली. अजून थोडी फुलवता

एस
Wed, 03/01/2017 - 16:49 नवीन
कथा आवडली. अजून थोडी फुलवता आली असती. धागधुग हा शब्द धाकधूक असा आहे. या किरकोळ गोष्टी वगळता छान लिहिलंय. मिपावर स्वागत आणि पुलेशु (पुढील लेखनाला शुभेच्छा.)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्वेता व्यास
Wed, 03/01/2017 - 17:07 नवीन
धन्यवाद एस, आपल्या सूचनांचा पुढच्या वेळी लिहिताना उपयोग होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मला वाटतं ही कथा नसून मनोगत

मराठी कथालेखक
Wed, 03/01/2017 - 17:06 नवीन
मला वाटतं ही कथा नसून मनोगत असावं... चांगलं लिहिलंय.
  • Log in or register to post comments

मनोगत

श्वेता व्यास
Wed, 03/01/2017 - 17:11 नवीन
मनोगत/कथा आवडल्याबद्दल धन्यवाद मराठी कथालेखक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

आवडली..

संजय पाटिल
Wed, 03/01/2017 - 17:08 नवीन
सत्यकथा आहे काय?
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्वेता व्यास
Wed, 03/01/2017 - 17:13 नवीन
धन्यवाद संजय पाटीलजी, मिश्रण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

छान आहे कथा

बापू नारू
Wed, 03/01/2017 - 17:39 नवीन
छान आहे कथा
  • Log in or register to post comments

छान जमली आहे कथा. अजून थोडी

ज्योति अळवणी
Wed, 03/01/2017 - 23:13 नवीन
छान जमली आहे कथा. अजून थोडी फुलवली असती तर अजून छान झाली असती. लिहीत जा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहिलय....

स्वप्नीलदमाळवे
गुरुवार, 03/02/2017 - 00:11 नवीन
पहिलाच प्रयत्नात छान लिहिलय
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्वेता व्यास
गुरुवार, 03/02/2017 - 09:33 नवीन
तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल खूप धन्यवाद @बापू नारू, ज्योति अलवनि आणि स्वप्नीलदमाळवे.. :)
  • Log in or register to post comments

छान मनोगत .

सिरुसेरि
गुरुवार, 03/02/2017 - 14:25 नवीन
छान मनोगत . आपण एखाद्या व्यक्तीबद्दल लांबुनच नकारात्मक मत बनवतो ( अतिशय कमर्शियल ) . पण प्रत्यक्षात ती व्यक्ती सकारात्मक असु शकते (त्यांचा चांगुलपणा ). असा या कथेचा मतितार्थ जाणवला .
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्वेता व्यास
Fri, 03/03/2017 - 09:44 नवीन
अनेक आभार सिरुसेरि..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

चांगलं लिहीताय पण कथा अजुन

पिलीयन रायडर
Sat, 03/04/2017 - 08:36 नवीन
चांगलं लिहीताय पण कथा अजुन फुलवायला हवी होती. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे

राधी
Sat, 03/04/2017 - 19:59 नवीन
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे हो त्यांचा, अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला काय व्यावसायिक लेखकासारखी कथा व्हायला हवीये का त्यांची? छान लिहीलंय हो ताई, तुम्ही लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

धन्यवाद

श्वेता व्यास
Mon, 03/06/2017 - 09:30 नवीन
धन्यवाद पिलीयन रायडर आणि राधी :)
  • Log in or register to post comments

छान कथा...

सुजित जाधव
Fri, 06/24/2022 - 22:11 नवीन
छान कथा...
जा बंड्या तू क्लासला, मी बघतो फीचं.
इथे थोडा घोळ झालाय का हो? कारण मुलींनापण बंड्या बोलतात हे कधी ऐकण्यात नाही आलं...
  • Log in or register to post comments

पहिल्या प्रयत्नात खूपच छान

सुचिता१
Sat, 06/25/2022 - 00:13 नवीन
पहिल्या प्रयत्नात खूपच छान लिहिली आहे कथा/ मनोगत.. तुमचे आणखी लेखन वाचायला आवडेल . पुलेशु!!
  • Log in or register to post comments

वा,

हेमंतकुमार
Sat, 06/25/2022 - 05:56 नवीन
चांगलं लिहिलंय.
  • Log in or register to post comments

खुप छान लिहिलंय !

चौथा कोनाडा
Sat, 06/25/2022 - 18:12 नवीन
खुप छान लिहिलंय ! समाजात असे मदत करणारे शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांचे संपुर्ण आयुष्य घडेल. असे चांगुलपणाचे अनुभव मला शालेय जीवनात आलेत, मी त्या शिक्षकांचा आयुष्यभर ऋणी आहे !
  • Log in or register to post comments

सर्वांना खूप धन्यवाद :)

श्वेता व्यास
Sun, 06/26/2022 - 12:24 नवीन
सर्वांना खूप धन्यवाद :) @सुजित जाधव, एका मैत्रिणीचे बाबा तिला बंड्या म्हणायचे ते आवडायचं म्हणून कथेमध्ये वापरलं. @सुचिता१, प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे, नवीन काही लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. @कुमार१ सर, आभारी आहे! @चौथा कोनाड@, खरंच मलाही ऋणी राहावं असेच शिक्षक मिळाले.
  • Log in or register to post comments

कमी शब्दांत सकारात्मक संदेश

विवेकपटाईत
Wed, 07/06/2022 - 16:41 नवीन
कमी शब्दांत सकारात्मक संदेश देणारी कथा. आवडली.
  • Log in or register to post comments

छान !

आलो आलो
Tue, 07/12/2022 - 16:36 नवीन
  • Log in or register to post comments

छान !

आलो आलो
Tue, 07/12/2022 - 16:36 नवीन
  • Log in or register to post comments

छान !

आलो आलो
Tue, 07/12/2022 - 16:37 नवीन
  • Log in or register to post comments

छान !

आलो आलो
Tue, 07/12/2022 - 16:39 नवीन
  • Log in or register to post comments

छान !

आलो आलो
Tue, 07/12/2022 - 16:39 नवीन
  • Log in or register to post comments

श्वेता छान लिहिलय

कर्नलतपस्वी
Tue, 07/12/2022 - 17:21 नवीन
आजकाल आसे शिक्षक जवळपास नाहीतच. आमच्या लहानपणी दोन रूपये शिकवणी होती पण फक्त नावालाच, बहुतेक विद्यार्थ्यांकडून दिली जायची निही आणी शिक्षकांनी सुद्धा कधी विचारले नाही. लिहित रहा नक्कीच वाचणार.
  • Log in or register to post comments

आभारी आहे @विवेकपटाईत @आलो

श्वेता व्यास
Tue, 07/12/2022 - 17:56 नवीन
आभारी आहे @विवेकपटाईत @आलो आलो आणि @कर्नलतपस्वी सर
  • Log in or register to post comments

कथा आवडली, एक छोटिशी ...

चित्रगुप्त
Wed, 10/19/2022 - 00:28 नवीन
कथा आवडली. कथेतील प्रवाह छान आहे, फक्त अगदी पहिल्या परिच्छेदातील प्रसंग हा कालाक्रमानुसार अगदी शेवटला, असावा असे वाटले, परंतु त्यासाठी कथेत काही सूचक वाक्य आढळले नाही, जसे: .......माझी जिवलग मैत्रीण मला सावरायचा प्रयत्न करत होती, तेही मी का रडतेय याची काहीच कल्पना नसताना! .... माझ्या डोळ्यासमोर ++++ दिवसांपूर्वीचा बाबांशी बोलण्याचा प्रसंग तरळून गेला... .... "बाबा, या विषयाला कॉलेजमध्ये शिकवायला चांगले शिक्षक नाहीत, तसे ते कोणत्याच विषयाला नाहीत. पण या विषयाचं जरा अवघड आहे. आणि पुढे करिअरसाठीही हाच विषय पक्का होणं आवश्यक आहे." - मी.
  • Log in or register to post comments

कथा आवडली, एक छोटिशी ...

चित्रगुप्त
Wed, 10/19/2022 - 00:28 नवीन
कथा आवडली. कथेतील प्रवाह छान आहे, फक्त अगदी पहिल्या परिच्छेदातील प्रसंग हा कालाक्रमानुसार अगदी शेवटला, असावा असे वाटले, परंतु त्यासाठी कथेत काही सूचक वाक्य आढळले नाही, जसे: .......माझी जिवलग मैत्रीण मला सावरायचा प्रयत्न करत होती, तेही मी का रडतेय याची काहीच कल्पना नसताना! .... माझ्या डोळ्यासमोर ++++ दिवसांपूर्वीचा बाबांशी बोलण्याचा प्रसंग तरळून गेला... .... "बाबा, या विषयाला कॉलेजमध्ये शिकवायला चांगले शिक्षक नाहीत, तसे ते कोणत्याच विषयाला नाहीत. पण या विषयाचं जरा अवघड आहे. आणि पुढे करिअरसाठीही हाच विषय पक्का होणं आवश्यक आहे." - मी.
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

श्वेता व्यास
Wed, 10/19/2022 - 10:00 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद चित्रगुप्त साहेब. इथून पुढे कथा लिहिताना तुमच्या सूचना लक्षात ठेवून लिहीन, त्यासाठी सुद्धा धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

छान कथाविषय

चष्मेबद्दूर
Wed, 10/19/2022 - 15:47 नवीन
छान जमली आहे कथा. पण अजून फुलवता आली असती. पुढील लेखनाला शूभेच्छा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा