Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग १)

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 03/07/2022 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav… आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.

वाचने 20170
प्रतिक्रिया 179

प्रतिक्रिया

In reply to by आग्या१९९०

ते आमदार फोडणे, सरकार पाडणे, गुहाटीला नेणे ह्याचा अभ्यास करतात फक्त. हे काम पवारांनाच जमू शकते. काकाद्वेष्टांना हे कधी दिसनार नाही.

हे सरकार पडणार. "ठराव जिंकला पण मने जिंकली नाहीत."- दीदी. याची आकडेवारी कशी मिळते? "चाळीस आमदारवाला मुमं कसा होतो? काळंबेरं आहे."- अजितदादा. जनतेने हे कसं शोधायचं?

ज्या पद्धतीने नवीन सरकार स्थापन होऊन नवीन सभापतींची निवड झाली, हे अत्यंत पक्षपाती पद्धतीने झाले आहे. यातून भाजपच्या हातात शेवटी खुळखुळाच आला. हे सर्व करण्याऐवजी अजून सव्वादोन वर्षे थांबून स्वबळावर २८८ जागा लढायला हव्या होत्या। या सर्व प्रकाराचा उबग आलाय. महाराष्ट्रात पुढील ५ वर्षे राष्ट्रपती राजवट हवी.

In reply to by श्रीगुरुजी

आपला प्रतिसाद वैफल्यग्रस्त आहे हे समजते. १०६ आमदार ज्यानी युती साठी भरपूर कष्ट घेतले आणि निवडून आले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना सर्वात मोठा पक्ष असून सत्तेपासून लांब ठेवले गेले होते त्यांना किती वैफल्य आले असेल. अजून अडीच वर्षे थांबायला लावून त्यांच्या सहनशक्तीचा अंत करण्यात काय हशील आहे? शेवटी हे आमदार वैफल्यग्रस्त होऊन दुसऱ्या पक्षात गेले तर त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? अडीच वर्षे विरोधी बाकावर बसलेले असताना सुद्धा १०६ आमदारापैकी एकही आमदार फुटला नाही हे भाजपचे आणि श्री फडणवीस यांचे संघटना कौशलय वादातीत आहे पण याबद्दल त्यांना कोणी शाबासकी द्यायला आलेले नाही. म वि आ ची अभद्र युती कोणत्याही अनैतिक मार्गाने फोडली तरी सामान्य माणसाला त्याबद्दल कोणतेही सोयरसुतक असणार नाही हेही श्री फडणवीस जाणतात. ज्या तऱ्हेने त्यांनी विधानपरिषद राज्यसभा निवडणूक लढल्या आणि आता टोकाच्या वैफल्यग्रस्त शिवसेना आमदारांना आपल्याकडे वळवून हि अभद्र युती तोडली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. स्वतःच्या तीर्थरुपाना वचन दिले म्हणून हिंदुत्वाच्या आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे या नावाखाली( श्री मनोहर जशी आणि श्री नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाहि ) स्वतःच्या सत्तालालसे साठी उद्धव ठाकरे यांनी अमंगल युती करून सामान्य शिवसैनिकाला हिंदुत्वाचे नाव घेण्याची लाज वाटेल अशा कृती केल्या त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. त्यासाठी अजून अडीच वर्षे थांबणे हा सामान्य शिवसैनिकाशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी राजद्रोह ठरेल.

In reply to by सुबोध खरे

म वि आ ची अभद्र युती कोणत्याही अनैतिक मार्गाने फोडली तरी सामान्य माणसाला त्याबद्दल कोणतेही सोयरसुतक असणार नाही हेही श्री फडणवीस जाणतात. फडणवीस नेहमी फेल जातात. आता हे सुध्दा त्यांनी चुकीचेच जाणले. ईडी, सीबीआय, राज्यपाल ह्यांचा गैरवापर महाराष्ट्राच्या सामान्य जनतेने टीवीवर पाहीलाय. त्यामुळे येत्या निवडणूकीत भाजपला हाचे परिणाम दिसतीलच. स्वतःच्या सत्तालालसे साठी उद्धव ठाकरे यांनी अमंगल युती आजीबात नाही. भाजपने २.५ वर्षांचा दिलेलला शब्द मोडला म्हणून त्यांनी युती तोडली. भाजपने शब्द पाळून सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रा बनले असते. मविआत देखील शिंदेच मामु बननार होते तसे पत्रही राज्यपालांना पाठवलं होतं. सत्तालालसे साठई पहाटे शपथ घेनारेही महाराष्ट्राने पाहीलंय. सामान्य शिवसैनिकाला हिंदुत्वाचे नाव घेण्याची लाज वाटेल अशी लाज कुठल्याही सैनीकाला वाटत नाही. १०६ घरी बसवल्याच्या खदखदीतून सदर वाक्ये येतात. त्यासाठी अजून अडीच वर्षे थांबणे हा सामान्य शिवसैनिकाशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी राजद्रोह ठरेल. हास्यास्पद. सत्ता नसेल तर काॅंग्रेस राष्ट्रवादीचे मूळ लोकं पुन्हा पळतील ह्या भितीने येनकेन प्रकारे हे सरकार आणण्यात आलंय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

याबद्दल आजच्या पेप्रांत वाचलं की "असा काही शब्द भाजपने दिला नव्हता" असा खुलासा फडणवीस करत आहेत. खरं खोटं माहिती नाही.

In reply to by कंजूस

फडणवीस नेहमी खरं बोलतात. वेगळा विदर्भ झाल्याशीवाय लग्न करनार नाही. अशी घोषणा त्यांनी केली होती. राष्ट्रवादी बरोबर आपद धर्म, शाश्वत धर्म सांगून युती करनार नाही हे देखील ते बोलले होते.

In reply to by कंजूस

अडीच वर्षे मुख्यमंत्री पद आणि सत्तेत समान वाटा असे जाहीर केलेले व्हिडिओ वगैरे सर्व मिपावर दिले होते. अर्थात भक्तानां ते पचले नाहीत.. मग कोलांट्या उड्या मारून झाल्या.. अजूनही कोणाला हवे असल्यास व्य नी करा.. सेना + राष्ट्रवादी = अनैसर्गिक युती भाजप + राष्ट्रवादी ही युती विकासा साठी ? भाजप + नॅशनल कॉन्फरन्स - मास्टर स्ट्रोक भाजप ने केले की भारी म्हणायचे ही मजबुरी आहे.. ४० पैसे का इमान !

In reply to by कपिलमुनी

+१ कुणी खरं पुराव्यासह दाखवत असेल तर त्याच्यावर वयक्तिक चिखलफेक करायची. मागील तीन दिवसात श्रिगुरूजी, सुबोध खरे आणी नितीव पालकर ह्या तीन लोकांनी माझ्यावर वयक्तिक घाणेरड्या भाषेत चिखलफेक केलीय. डाॅ. खरे बोलले का महाविरास आघाडीच्या काळात पैसे देऊनही व्यापार्यांची कामे व्हायची नाहीत. असं कुठला व्यापारी बोलला? किंवा तुन्ही काही व्यापार करता का? नसाल तर कोणत्या आधारावर हे सांगताहात हे विचारल्यावर त्यांना पुन्हा त्या विषयात हात घातला नाही. मिपाचा वापर खोटं पसरवण्यीससाठी होतोय नी जो कुणी हे खोटं ऊघडं पाडेल त्याच्यावर खालच्या थराला जाऊन वयक्तीक निंदानालस्ती केली जातेय हे दर्शवून मी खाली बसतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हायला तुम्ही डोक्यावर पडला आहात काय ? कोण व्यापारी असं उघडपणे बोलून आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पडून घेईल? केतकी चितळे चं उदाहरण डोळ्यासमोर असताना? सरकारदरबारी पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत हे जगजाहीर आहे आणि इथे आपण हरिश्चंद्राचा अवतार धारण केलाय चालू द्या

In reply to by सुबोध खरे

हायला तुम्ही डोक्यावर पडला आहात काय ? ही प्रश्न स्वतला विचारा. @संपादक- ही व्यक्ती दरवेळेस खालच्या भाषेत टिपण्णी करतेय. कोण व्यापारी असं उघडपणे बोलून आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पडून घेईल? मग आघाडीच्या काळात पैसे देऊन काम व्हायचं नाही हे अगाध द्न्यान कुठे प्रापित झालं? की खोटं बोलून बदनामी करायचीय आघाडीची? सरकारदरबारी पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत हे जगजाहीर आहे लाचलुचपत भागात तक्रार करा. पण थापा मारणे बंदं करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

८ नोव्हेबर २०१६ ला एका हरिश्चंद्राने नोटाबंदिमुळे सरकारी भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट होईल असे स्वप्न दाखवले होते. जे जागे झालेत त्यांना हे दाखवलेले स्वप्न खरे नव्हते ह्याचा साक्षात्कार झाला. सत्य लपत नाही.

In reply to by आग्या१९९०

सरकारी भ्रष्टाचार

पूर्णपणे नष्ट

होईल असे स्वप्न दाखवले होते. असे श्री मोदी एकदा तरी बोलले आहेत का हे दाखवता येईल का? केवळ द्वेषापोटी वाटेल ते लिहू नका

राष्ट्रपती राजवट लावणं हा महाराष्टाच्या जनतेवर अन्याय होईल कारण एकट्या राज्यपालांना हे झेपणार नाही. सर्व अधिकार नोकरशाही कडे जातील आणि मग तर सामान्य माणसांचे गार्हाणे ऐकायला कोणीच राहणार नाही. कारण नोकरशाही मूक, बधिर, उद्धट आणि अत्यंत स्वार्थी असते. कोणताही निर्णय कितीही चुकीचा असला तरी त्यांचे काहीही वाकडे होत नाही किंवा दर पाच वर्षांनी त्यांना जनतेकडे जावे हि लागत नाही. कितीही अकार्यक्षम असला तरी आय ए एस अधिकारी संयुक्त सचिव ( जॉईंट सेक्रेटरी) पदापर्यंत जातोच आणि डोंगराएवढी चूक केली तरी जास्तीत जास्त त्याची बदली होते. त्यामुळे राष्ट्रपती राजवट हा उपाय कितीही चांगला वाटलं तरी अत्यंत मर्यादित काळासाठीच वापरला गेला पाहिजे. हीच स्थिती लष्करी राजवटीची असते. माणसे वैफल्यग्रस्त आणि निराश होऊन लष्कराकडे सत्ता द्या म्हणतात पण लष्कराकडे सत्ता देणे हा रोगापेक्षा इलाज भयंकर असतो.

In reply to by सुबोध खरे

कारण नोकरशाही मूक, बधिर, उद्धट आणि अत्यंत स्वार्थी असते. कोणताही निर्णय कितीही चुकीचा असला तरी त्यांचे काहीही वाकडे होत नाही किंवा दर पाच वर्षांनी त्यांना जनतेकडे जावे हि लागत नाही. कितीही अकार्यक्षम असला तरी आय ए एस अधिकारी संयुक्त सचिव ( जॉईंट सेक्रेटरी) पदापर्यंत जातोच आणि डोंगराएवढी चूक केली तरी जास्तीत जास्त त्याची बदली होते.
अगदी सहमत आहे. ही पद्धती आधी बदलली पाहिजे.

राष्ट्रपती राजवट लावणं हा महाराष्टाच्या जनतेवर अन्याय होईल कारण एकट्या राज्यपालांना हे झेपणार नाही. राज्यपालांचा निपक्षपातीपणा पाहीला तर रोगापेक्षा ईलाज भयंकर हे तुमचे वाक्य पटते.

खरे साहेब तुमचे म्हणणे बरोबर आहे पण अशाच प्रकारचे तुणतुणे काही दिवसांपूर्वी मुक्तविहारी नावाचे गृहस्थ वाजवत असत, तेव्हा तुमच्यापैकी कोणीच एक अवाक्षर पण काढले नाही

In reply to by Vichar Manus

अशाच प्रकारचे तुणतुणे चूक आहे मुक्तविहारी दुसऱ्यांच्या चर्चांमध्ये वितुष्ट आणत नसत. स्वतः भाजपचे समर्थन करणारे असंख्य दुवे टाकत असत. त्याला उत्तर देणं कि न देणे/ दुर्लक्ष करणे हे तुमच्या हातात असते. इथे मी श्री गुरुजींना प्रतिसाद दिला होता त्यात यांनी आवश्यक नसताना लगेच तोंड घातलं. बरं नाक खुपसायचं असलं तरी त्यामागे काही अभ्यास असावा, काही नवीन माहिती असावी, लोकांना काही कायद्याच्या प्रक्रियेची, नोकरशाही च्या कामकाजाच्या पद्धतीची माहिती मिळावी, घटनेच्या मूलभूत तत्वांची तोंडओळख असावी. यातलं काहीही नाही नुसता पोकळ शब्दांचा बुडबुडा. संयत दोन लोक चर्चा करत असतील तर त्यांच्या मध्येच तुम्ही तोंड खुपसून चर्चेचाच विचका करू नये इतकी साधी समज असू नये?

साधारण दीड-दोन आठवड्यांपूर्वी मी डेन्मार्क विषयी व्हिडियो पाहिला होता... आज डेन्मार्क मधल्या एका मॉल मध्ये गोळीबार झाल्याची बातमी वाचली ! अधिक माहिती घेतल्यावर लक्षात आले की हा तोच Field’s मॉल आहे जिथे जाऊन मी कधी काळी माझा पहिला कॅमेरा विकत घेतला होता. या मॉल मध्ये येण्यासाठी मी मेट्रो धरली होती जी ड्रायव्हरलेस होती. मी पाहिलेले २ व्हिडियो इथे देत आहे :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Abhir Gulal Udhalit Rang with lyrics | अभिर गुलाल उधळीत रंग | PT. Jitendra Abhisheki

आसाम येथील सिलचरमध्ये बराक नदीच्या तटबंदीचे नुकसान करणाऱ्या मिठू हुसेन लस्कर आणि काबुल खान यांना अटक झाली आहे. काबुल खानने उघडपणे ही तटबंदी फोडली त्यामुळे पाणी शहरात घुसले. या फुटीचा व्हिडिओही त्याने शूट केला होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यापूर्वी म्हटले होते की, पूर ही मानवनिर्मित आपत्ती होती.

लाज उधोजींची गेली पण चमचे मात्र इथे फडणवीस ह्यांना कसे उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले इत्यादी विषयावरून भाजप मंडळींना शिव्या देत आहेत. शिवसेना हा पक्ष आता शिंदे ह्यांचा आहे. त्यांनी अजून उधोजींना कारवाई करून पक्षातून हाकलून कसे लावले नाही ह्याचेच आश्चर्य वाटते. उधोजी आणि बाळ पेंग्विन ह्यांना सतरंज्या उचलण्याचे काम सुद्धा आता मिळणार नाही. > निकलना ख़ुल्द से आदम का सुनते आए हैं लेकिन > बहुत बे-आबरू हो कर तिरे कूचे से हम निकले

ताज्या घडामोडी धाग्यावरून संन्यास घेतला तेच उत्तम केले आम्ही असे वाटू लागले आहे मला तरी :) किती ते वैयक्तिक होणे अन किती ते कोट परकोट लढवणे. बाप रे ! मिसिंग चंद्रसूर्यकुमार ह्यांचे अभ्यासू प्रतिसाद....

भाजपाने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले असे दिसत आहे. १. नुपुर शर्मा प्रकरण २. पसामंदा मुस्लीमः मोदींनी हिंदु सोडुन इतरांना पक्षात आणण्यासाठी आवाहन केले आहे. आता भाजपा आता काँग्रेस होण्याच्या मार्गावर आहे. https://indianexpress.com/article/political-pulse/bjp-pasmanda-muslims-…

बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही, मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही, विधानसभेत पाऊल ठेवू देणार नाही, ४० रेड्यांचा महाराष्ट्रात बळी देऊ वगैरे वल्गना केव्हाच हवेत विरल्या. परतलेल्या बंडखोर आमदारांचं त्यांच्या मतदारसंघात जोरदार स्वागत झालंय. त्यांचा कोणी केसही वाकडा करू शकला नाही. उद्धव ठाकरेंच्या बाजूने महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट उसळलीये वगैरे भ्रमाचे फुगे केव्हाच फुटले. उद्धव ठाकरेंच्या अधिपत्याखालील सेना आता शेकाप, मनसे, लाल निशाण गट, कम्युनिस्ट, जनता दल अशा पक्षांप्रमाणे अस्तित्वहीन झाली आहे. अर्थात महाराष्ट्राच्या हितासाठी हे फार पूर्वीच व्हायला हवे होते. निदान आता तरी होतंय हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणायचं.

In reply to by श्रीगुरुजी

अर्थात महाराष्ट्राच्या हितासाठी हे फार पूर्वीच व्हायला हवे होते. निदान आता तरी होतंय हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणायचं.
ह्याबद्दल साशंक आहे. मागे एकदा भुजबळ (छगनराव)साहेबांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना असणे महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे. हे विधान त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर व त्यावेळच्या शिवसेनाप्रमुखांवर टी.बाळु अश्या शेलक्या शब्दात टिका केल्यानंतर म्हटले होते. शिवसेनेचे विधायक कार्यात महत्व कमी असेल पण राक्षसी महत्वकांक्षा असलेल्या राष्ट्रीय पक्षांसाठी उपद्रव्यमूल्य फार आहे. दक्षिणेत आपापल्या राज्यांच्या ह्क्कासाठी भांडणारे पक्ष असताना महाराष्ट्रात ही तसा पक्ष असणे गरजेचे आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

मागे एकदा भुजबळ (छगनराव)साहेबांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना असणे महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे. मुळात भुजबळांचा इतिहास पाहिला तर ते जै म्हणतात त्याच्या विरूद्ध असणारेच महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे. ज्या पक्षाकडे कोणतेही आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, विकाससंबंधित धोरण नाही त्या पक्षाची महाराष्ट्राला अजिबात गरज नाही. शिवसेनेचे विधायक कार्यात महत्व कमी असेल पण राक्षसी महत्वकांक्षा असलेल्या राष्ट्रीय पक्षांसाठी उपद्रव्यमूल्य फार आहे. विधायक कार्यात, महाराष्ट्रासाठी हितकारक कार्यात सेनेचा सहभाग शून्य आहे आणि सेना ही राष्ट्रीय पक्षांऐवजी मराठी जनतेसाठीच उपद्रवकारक आहे. दक्षिणेत आपापल्या राज्यांच्या ह्क्कासाठी भांडणारे पक्ष असताना महाराष्ट्रात ही तसा पक्ष असणे गरजेचे आहे. असेल. पण सेना हा पक्ष त्या कसोटीवर उतरत नाही कारण या पक्षाने आजतागायत महाराष्ट्रासाठी काहीही केले नाही व तो महाराष्ट्रासाठी अहितकारक आहे. मनसेच्या स्थापनेनंतर काही काळ आशा वाटत होती. परंतु राज ठाकरेंनी इतक्या उलटसुलट कोलांट्या मारल्या की हा पक्ष मराठी जनतेच्या मनातून पूर्ण उतरला.

In reply to by श्रीगुरुजी

धाग्याची शंभरी भरली.:) अगदी शिवसेनाच नाही पण कुठलाही एखादा पक्ष जो फक्त राज्यपातळीवर आहे व वेळप्रसंगी स्वार्थासाठी का होईना मराठी माणसाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा आहे असा पक्ष असायला हवा. राष्ट्रीय पक्षातले राज्यपातळीवरचे नेते जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा आपला कणा विसरतात हा इतिहास आहे. आणि जोपर्यंत राष्ट्र पातळीवर महाराष्ट्राचे प्रभावी व्यक्तिमत्व नाही तो पर्यंत तरी असा पक्ष असायला हवाच हवा. मोदी शहा कितीही राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत असे म्हटले तरी त्यांचे बरेचसे निर्णय हे गुजरात धार्जिणेच राहिले आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

अगदी शिवसेनाच नाही पण कुठलाही एखादा पक्ष जो फक्त राज्यपातळीवर आहे व वेळप्रसंगी स्वार्थासाठी का होईना मराठी माणसाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा आहे असा पक्ष असायला हवा. + १ अजूनपर्यंत तरी असा पक्ष महाराष्ट्रात जन्मलेला नाही. लवकरात लवकर असा पक्ष जन्मावा ही इच्छा आहे.

केरळ कम्युनिस्ट पक्षाचे मत्स्यव्यवसाय मंत्री असलेले चेरियन म्हणतात की, 'देशाची राज्यघटना जास्तीत जास्त लोकांना लुटण्यासाठी लिहिली गेली आहे' चेरियन हे पिनरई विजयन यांच्या मंत्रिमंडळात संस्कृतीचे खाते ही सांभाळतात. चेंगन्नूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झाले आहेत. सोमवारी पतनमतिट्टा येथे एका पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना चेरियान म्हणाले, “देशात एक सुंदर राज्यघटना लिहिली गेली आहे. जास्तीत जास्त लोकांची लूट व्हावी यासाठी राज्यघटना लिहिली गेली आहे असे मी म्हणेन. ब्रिटिशांनी जे तयार केले, ते भारतीयांनी लिहून ठेवले. गेल्या ७५ वर्षात त्याची अंमलबजावणी झाली आहे, मी म्हणेन की ही एक अशी घटना आहे जी देशातील जास्तीत जास्त लोकांचे शोषण सुनिश्चित करते. राज्यपालांनी याची माहिती मागवल्यावर कम्युनिस्ट पक्षाची सीपीआय(एम) पॉलिटब्युरो लगेच मैदानात उतरली. सहसा पॉलिटब्युरो मैदानात येत नाहीत. पण कम्युनिस्ट पक्षाकडून विश्वरत्न भीमराव आंबेडकर लिखित राज्य घटनेला जाहिर विरोध हा मुद्दा महागात पडू शकतो लक्षात आल्यावर मोठ्या प्रमाणात आता त्यावर सारवासारवसासुरू केली गेली आहे. केरळात असे काही घडलेच नाही हे डिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन आता नक्कीच राबवले जाणार आहे.

उत्तर वझिरीस्तानमध्ये एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला करत आपली दुचाकी लष्करी ताफ्यावर घातली आणि त्यात किमान दहा पाकिस्तानी सैनिक जखमी झाले.

अजमेर पोलिसांनी अजमेर दर्गाह खादिम सलमान चिश्ती यांच्या विरोधात हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चिश्ती यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तो यात म्हणाला , “मी माझ्या वडिलांची शपथ घेतो, मी माझ्या आईची शपथ घेतो, मी तिला उघडपणे गोळ्या घालीन. मी माझ्या मुलांची शपथ घेतो, जो कोणी नुपूर शर्माचे शीर आणेल, मी हे घर त्याला देईन." (मुझे कसम है मेरी मां की मैं उसे सरेआम गोली मार देता, मेरे बच्चों की कसम मैं उसे गोली मार देता, और आज भी सीना ठोक कर कहता हूं जो भी नुपुर शर्मा की गर्दन लाएगा मैं उसे यह अपना घर दे जाऊंगा ओर रास्ते पर निकल जाऊंगा। यह वादा करता है सलमान। ) खादिम सलमान चिश्तीवर या आधी ही खून आणि खुनाचा प्रयत्न यासह १३ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या आधी हिंदू कन्हैया लाल आणि उमेश कोल्हे यांची केवळ नुपूर शर्माला केवळ सोशल मीडियावर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे गळे कापले गेले आहेत.

In reply to by निनाद

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अजमेर पोलीस सलमान चिश्तीला त्याच्या घरातून ताब्यात घेताना दिसत आहेत. चिश्ती यांना घरातून बाहेर काढत असताना, पोलिसातील कोणीतरी म्हणाले, "व्हिडिओ रेकॉर्ड करताना तू नेमका कशावर होतास?" व्हिडीओ पुढे सलमान चिश्ती मी मद्यपान करत नाही असे म्हणताना ऐकू येत आहे. या क्षणी त्याच्या जवळचा एक पोलीस अधिकारी म्हणाला, 'म्हण तू नशेत होतास म्हणजे तुला वाचवणे सोपे जाईल.' भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. अशोक गेहलोत यांच्या हिंदू विरोधी चेहऱ्याचा पुरावा आहे असे ते म्हणाले. याचा अजून एक भाग आहे. त्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये आरोपी चिश्तीचे लोक आणि पोलिस कर्मचार्‍यांचा समूह स्वागत करताना दिसत आहे. पार्श्वभूमीत कोणीतरी म्हणते, “बेफिकर रहे, सब बात हो गई है” (निवांत रहा, सर्व व्यवस्था केली आहे).

In reply to by निनाद

एवढा उघड उघड हिंदुद्वेष अपेक्षित नव्हता. किती निर्लज्जपणा. आता काँग्रेसबद्दलची उरली सुरली आपुलकी गळून पडली. - चित्रफीत दिल्याबद्दल तुमचे आभार, आणि ती काढणार्‍या माणसाचे आभार.

In reply to by Trump

राज्य पोलिस नेहमीच राज्य सरकारला अनुकूल असतात. महाराष्ट्रात सुद्धा कुरमुसेंना बेदम मारहाण करणारा आव्हाड, नौदल अधिकारी मदन शर्मा, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज अशांना मारहाण करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी काहीच केले नाही. अत्यंत अर्वाच्य, प्रक्षोभक धमक्या देणारे राऊत, दीपाली सय्यद यांच्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले. परंतु राणे पितापुत्र, अर्णब गोस्वामी, कंगना, केतकी चितळे, निखिल भामरे, सदावर्ते अशांविरूद्ध अनेक पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करून घेऊन त्यांचा मनसोक्त छळ केला.

In reply to by श्रीगुरुजी

एका कुप्रसिध्द गायीकेची तिकीटेही विकीयला लावली होती म्हणे महाराष्ट्र पोलिसांना.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

म्हणून खालील गोष्टी क्षम्य का?
कुरमुसेंना बेदम मारहाण करणारा आव्हाड, नौदल अधिकारी मदन शर्मा, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज अशांना मारहाण करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी काहीच केले नाही. अत्यंत अर्वाच्य, प्रक्षोभक धमक्या देणारे राऊत, दीपाली सय्यद यांच्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले. परंतु राणे पितापुत्र, अर्णब गोस्वामी, कंगना, केतकी चितळे, निखिल भामरे, सदावर्ते
चुकीच्या गोष्टींना चूक म्हणा की, त्यात कसला कमीपणा. सर्वच पक्ष चुका करतात, जिथे चुकतात तिथे मान्य करा की. तुम्ही म्हणजे पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे वागता. राजकारणी आहात का? असेल तर तस सांगा म्हणजे आम्ही आमच्या अपेक्षा बदलून टाकू.

In reply to by टीपीके

आम्ही अश्या अपेक्षा ठेवतच नाही. यांच्या भाषेतील तथाकथित गद्दारांना, यांच्या आवडत्या नेत्यांवर काढलेली व्यंगचित्रे किंवा उपहासात्मक काव्य प्रसिद्ध करणाऱ्यांच्या बाबतीत असेच केले पाहिजे, हे यांनी अनेकदा सांगितले आहे.

उदयपूरमध्ये कन्हैय्याने नुपूर शर्मांना समर्थन देणारी पोस्ट शेअर केली म्हणून त्याची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली ही घटना काही दिवसांपूर्वी घडली. मागच्या आठवड्यात अकोल्यातही तशीच घटना घडली. उदयपूरच्या घटनेविषयी टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी नुपूर शर्मांच्या 'बेलगाम बडबडीमुळे' पूर्ण देशात आगडोंब उसळला आहे म्हणून त्यांनी देशाची माफी मागावी असे म्हटले होते. एका अर्थी उदयपूरच्या घटनेला त्या न्यायाधीशांनी नुपूर शर्मांना जबाबदार ठरविले होते. त्याबद्दल माजी नोकरशहा, माजी न्यायाधीश वगैरे ११७ मान्यवर व्यक्तींनी खुले पत्र लिहून न्यायाधीशांच्या त्या टिप्पणीचा निषेध केला आहे. याविषयी दोन गोष्टी लिहावाश्या वाटतात. पहिली म्हणजे कोणा मान्यवरांनी अशी सेन्सिबल भूमिका घेतली असे फार काळाने घडले असावे. अगदी पहिल्यांदाच अशा मान्यवरांनी अशी भूमिका घेतली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. नाहीतर मान्यवर म्हणजे रात्री दोन वाजता याकूब मेमनच्या फाशीविरोधात कोर्टात जाणारे, कसाबची फाशी रद्द करा, अफजल गुरू कसा स्वातंत्र्यसैनिक, जनेयुचा कन्हैय्याकुमार कसा तरूणाईचे आशास्थान वगैरे बकवास करणारे लोक असेच चित्र होते. ते सोडून जर मान्यवरांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचे स्वागत आहे. दुसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या त्या दोन न्यायाधीशांची टिप्पणी पूर्णपणे अमर्थनीय आहे. स्त्रियांवरील बलात्काराला 'लहान कपडे घालणे' हे कारण आहे अशाप्रकारचे ते विधान आहे. खरं तर याबद्दल त्या दोन न्यायाधीशांविरोधात संसदेत ताबडतोब महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे.

In reply to by क्लिंटन

खरं तर याबद्दल त्या दोन न्यायाधीशांविरोधात संसदेत ताबडतोब महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे.
+१ पण तसे काही होणार नाही.

In reply to by क्लिंटन

अशी पत्रे मोदी विरोधी लिहिली की लिब्रांडू वगैरे... मग टिंगल टवाळी.. काय पलटी मारता राव.. मानला

In reply to by कपिलमुनी

हाहाहा. तुम्ही अशी टिका कराल तर लगेच नितीन पालकर काका कुठल्यातरी नाटकातील प्रसंग सांगून तुमची बुध्दीमत्ता वगैरे काढतील.

In reply to by सुबोध खरे

कपीलमुनींची टिपण्णी पुन्हा वाचा. तरी समजलं नसेल तर त्याला मी जबाबदार नाही.

In reply to by क्लिंटन

मेवातमधील एका इस्लामी व्यक्तीने नूपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला २ कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. देशातील जातीय तेढ आणि कन्हैया लालचा उदयपूरमध्ये इस्लामवाद्यांनी केलेला शिरच्छेद यासाठी नुपूर शर्माची 'मोकळी' जीभ जबाबदार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हंटल्यानंतर ही घटना घडली आहे. याआधी जूनमध्ये भीमसेना प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांनी नूपूर शर्माची जीभ आणणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या वक्तव्याबद्दल तिला शिक्षा देण्यापूर्वी तो तिला त्याच्यासमोर 'मुजरा' करायला लावेल, असेही तो म्हणाला होता आणि ती फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. त्यानंतर धमक्यांमुळे तन्वरला अटक करण्यात आली.

In reply to by क्लिंटन

मागच्या आठवड्यात अकोल्यातही तशीच घटना घडली
इथं तपशील चुकला आहे, ती घटना अकोल्यात नाही तर अमरावतीत घडली आहे, दोन्ही पूर्णपणे वेगळी शहरं आहेत. अमरावतीत डॉ. उमेश कोल्हे ह्या पशुवैद्य असणाऱ्या व्यक्तीची हत्या झालेली आहे, सध्या हा तपास एन आय ए कडे वर्ग आहे

In reply to by क्लिंटन

मागच्या आठवड्यात अकोल्यातही तशीच घटना घडली
इथं तपशील चुकला आहे, ती घटना अकोल्यात नाही तर अमरावतीत घडली आहे, दोन्ही पूर्णपणे वेगळी शहरं आहेत. अमरावतीत डॉ. उमेश कोल्हे ह्या पशुवैद्य असणाऱ्या व्यक्तीची हत्या झालेली आहे, सध्या हा तपास एन आय ए कडे वर्ग आहे

*मोठी बातमी । घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ* *https://solapurviralnews2.com/?p=4866* विकास सूसाट सूटलाय. आणी लोक विचारत होते आमदारांचा खर्च कोण करतंय.

पुण्यात सीएन्जी 85₹ झाला.. हॅपी राईड

In reply to by कपिलमुनी

पेट्रोल चे दर कमी करनार होते नवे मुख्यमंत्री. पण दिल्लीश्वरानी सीएनजी वाढवायला लावला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मागील सरकारच्या विरुद्ध निर्णय घेणार हेच आता बघायला मिळणार. कांजूरमार्ग नको आरेच पाहिजे. त्यांनी CNG दर कमी केले,आम्ही वाढवणार. त्यांनी डिझेल पेट्रोलवरील टॅक्स कमी केले नाही आम्ही करणार. ते अडीच वर्ष एकत्र राहिले आम्ही ......???

In reply to by आग्या१९९०

कांजूर मध्ये राज्य सरकार कडे जागाच नाही.अडीच वर्ष काम थांबवून हजारों कोटींचे नुकसान मात्र झाले. पर्यावरणाची अपरमित हानी झाली. केंद्राने कमी केलेले दर कमी न करणे म्हणजे ग्राहकांशी दगा.

४ जुलैला घरगुती गॅस ऑनलाइन पैसे भरून बुक केलेल्या गॅसची आज डिलिव्हरी घेताना ५० रुपये बिलात लावले व ते रोख मागितले. Invoice आज केले म्हणून आजचा दर लावला असे सांगितले. आता ५० रुपये वसूल करण्यासाठी रक्त आटवणे आले. पूर्वी महिन्याच्या १ आणि १५ तारखेला गॅसचे दर ठरवले जायचे आता सोरट काढून तारीख ठरवतात वाटतं. गॅस एजन्सीला नक्कीच दरवाढीची कल्पना असणार म्हणून त्यांनी आज invoice बनवले असणार. लुटारू सरकार जिंदाबाद.

In reply to by आग्या१९९०

गॅस एजन्सीला नक्कीच दरवाढीची कल्पना असणार म्हणून त्यांनी आज invoice बनवले असणार. लुटारू सरकार जिंदाबाद.
मागे एकदा एका CNG वर चालणार्‍या रिक्षाच्या चालकाने जास्त पैसे लागण्याचे कारण "वो मोदीने पेट्रोल का रेट बढाया ना साब!" असे सांगीतले होते, ते आठवले! वड्याचं तेल वांग्यावर काढणे म्हणतात ते हेच बहुतेक! ;-)

In reply to by राघव

रिक्षाचालकाने तुम्हाला receipts दिली होती का? मला गॅस एजन्सीने GST लावून invoice दिला आहे , बुकिंग आणि invoice तारखेसकट. काहीही उदाहरणे देऊ नका

In reply to by आग्या१९९०

तुम्ही सोंग घेतले झोपण्याचे म्हणून माझे उदाहरण चुकीचे ठरत नाही. त्यामुळे तुम्हाला समजावून सांगणे हा उद्देश नव्हताच. :-) तुम्ही तुमचे चालू ठेवा, आम्ही आमचे चालू ठेवतो. हाय काय अन् नाय काय!

Gas agency ओर्डर बुक केल्यावर एक मेसेज पाठवते "पे ओनलाईन" अमुक Amazon/paytm ची लिंक. त्यावर मीही पैसे भरतो. पण सध्या त्यांनी बंद केलंय. ओफिसमधून सिलिंडर dispatch केल्यावर एक मेसेज येतो -pay ***. ही invoice असते. दिलेल्या मालाचे बिल.

चाटूगिरीची महत्तम मर्यादा. काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेची खिल्ली उडवताना धवल क्रांती, हरीत क्रांती, तेल बियांचं उत्पन्न वाढविणे या गोष्टी आणि त्यांचं यश लक्षात नाही घ्यायचं. सरसकट गरीब माणूस दिसताच कामा नये असा पोरकट हट्ट धरायचा. आणि ना खाऊंगा न खाने दूंगा याचं यश काय असं विचारलं तर सरकारी भ्रष्टाचार कमी करण्याबद्दल मोदी कधी बोलले होते असा प्रश्न विचारायचा. वा रे वा!