✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ज्वाईनिंग लेटर....

क
कर्नलतपस्वी यांनी
Sat, 06/11/2022 - 21:13  ·  लेख
लेख
स्टेशनात धडधडत गाडी आली,घाईघाईत तो गाडीत चढला आणी गाडीने वेग पकडला. सराईत नजरने सावज हेरले,"उचला रे याला" म्हणत काळ्या कोटातला यमदूत पुढे सरकला. गाडी थांबली,स्टेशन मास्टरच्या कार्यालयात फुकट्यांची वरात दाखल झाली. करंगळी दाखवत विचारलं, जाऊ का? होकारार्थी मान डुलली. रुमाल काढत बाहेर जाताना आणखीन एक काळा कोटधारी दानव येत होता. वाटले बाहेरच्या बाहेर पळून जावे. त्याला परत आलेला पाहून पोलीस म्हणाला, "साहेब हा पण". नाव काय तुझे? काको दानवाने विचारले. हवालदार बाकीच्यांना टाका आतमधे,याला इथेच सोडा. . . . . . . . . कागद देत म्हणाला,"यार्डात जा, मालगाडी पुण्याकडे चाललीय". . . . . . Joining letter होते ते, केंव्हा खिशातून पडले टेन्शनमधे लक्षातच आले नाही. दानव का देव &#128533 हुश्श.......
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
व्यक्तिचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
5220 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

समजले नाही.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 06/11/2022 - 22:02 नवीन
समजले नाही.
  • Log in or register to post comments

नाही समजली.

हेमंतकुमार
Sun, 06/12/2022 - 08:54 नवीन
नाही समजली.
  • Log in or register to post comments

शब्दांकन कमी पडले वाटते.

कर्नलतपस्वी
Sun, 06/12/2022 - 09:51 नवीन
ही लघुकथा एका आठवणीवर लिहीली आहे. काही कामा निमित्त सहाय्यक स्टेशन मास्तरच्या कार्यालयात बसलो होतो. रेल्वेची विनातिकीट प्रवासी पकडण्याची मोहिम चालू होती. दोन पोलीस सात आठ फुकटे प्रवासी त्याच्या समोर घेऊन आले. त्याने चौकशीनंतर एक सतरा आठरा वर्षाच्या मुलाला सोडून दिले व बाकीच्यांवर दंडात्मक कारवाई करायला सांगीतली. कुतूहल म्हणून त्या मुलाला सोडून देण्याचे कारण विचारले,त्यावर तो म्हणाला हा मुलगा जिल्ह्य़ातील भरती दप्तरात परीक्षा देऊन आलाय. जर उद्या भरती झाला तर या कारवाई चा विपरीत परिणाम होऊ शकतो. घरचा गरीब,पैसेच संपले नाईलाजास्तव विनातिकीट प्रवास करत होता. त्याचे वय व प्रामाणिक प्रयत्न बघून त्याला एक संधी दिली तर चांगला परीणाम होईल. हा उद्देश. मला त्या स्टेशन मास्तरची संवेदनशीलता व आधिकाराचा केलेला वापर खुपच आवडला. बाकी खिशातला कागद रुमाल काढताना खाली पडतो,तो काळ्या कोटातल्या रेल्वे स्टाफला मीळतो,पुढे त्या मुलाला मदत करण्यासाठी मालगाडीतून त्याच्या गावाकडे पाठवणे . ही सारी वातावरण निर्मीती. भावना वाचकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडलो. आसो निखळ,स्पष्ट प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

कळली पण

अनन्त्_यात्री
Sun, 06/12/2022 - 12:49 नवीन
ज्वा??
  • Log in or register to post comments

बोली मराठीत जॉ-इनिंग ला ज्वा

चौथा कोनाडा
Sun, 06/12/2022 - 13:50 नवीन
बोली मराठीत जॉ-इनिंग ला ज्वा-इनिंग असे म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

छान कथा, आवडली.

चौथा कोनाडा
Sun, 06/12/2022 - 13:48 नवीन
छान कथा, आवडली.
  • Log in or register to post comments

कंजूसपणा

कपिलमुनी
Sun, 06/12/2022 - 13:58 नवीन
विषय चांगला होता पण फुळवताना शब्दांचा कंजूसपणा का??
  • Log in or register to post comments

मुनीवर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कर्नलतपस्वी
Sun, 06/12/2022 - 15:46 नवीन
सहमत आहे. लघुकथा शशक करता लिहीली होती. शब्दांची मर्यादा पण आता शब्द मर्यादा नसल्यामुळे अधिक चांगले लिहीता आले असते. "शशक का चषक ",स्पर्धेच्या निकाला नंतर प्रथम शिर्षक सुचले मग कथा फुलवण्याचा प्रयत्न केला. वाचून प्रतिसाद द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धन्यवाद

कर्नलतपस्वी
Sun, 06/12/2022 - 15:48 नवीन
चौको,अनंत यात्री प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान आहे. संदर्भ दिल्यावर परत

नचिकेत जवखेडकर
Mon, 06/13/2022 - 07:26 नवीन
छान आहे. संदर्भ दिल्यावर परत वाचली आणि कळाली.
  • Log in or register to post comments

छान आहे

सस्नेह
Tue, 06/14/2022 - 21:14 नवीन
संवेदनक्षम...
  • Log in or register to post comments

कथा छानच लिहिली आहे. शशकच्या

सौन्दर्य
Tue, 06/14/2022 - 22:36 नवीन
कथा छानच लिहिली आहे. शशकच्या धर्तीवर लिहिली गेल्याने पूर्ण समजण्यासाठी दोनदा वाचावी लागली. जीवनात कधीकधी देव माणसे भेटतात.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा