आत
आत मी, बाहेर कोण?
जगण्याच्या अवस्था किमान दोन.
कधी पाखरू, कधी मुंगी,
तरी उतरत नाही जगण्याची धुंदी.
वाटेने तुडवले, लाटांनी बुडवले,
पावसाने झोडपले, थंडीने थिजवले.
संकटांचा उन्हाळा दरवर्षी आला
निजलेलं माणूसपण जागवून गेला.
ध्यानाच्या समाधीतही चाचपडतो,
अंगावरून हात फिरवत स्वतःला शोधतो.
भर दुपारी सूर्य डोक्यावर घेतला
आतला अंधःकार तरी नाही मिटला.
माणसाचं अंतःकरण म्हणजे सिंहाची गुहा
स्वतःला जिंकलं तरच बाहेर यायची मुभा.
अंतरंगातला देव जसा चंदनाचा गाभा
ज्याला गवसला तो विटेवरी उभा.
वाचताना थोडा गोंधळ उडाला
सुचनांबद्दल धन्यवाद
स्वतःचा शोध घेण्याची कल्पना
धन्यवाद प्रमोदजी.