मिपा वरील वाचनीय धागे कोणते?

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in काथ्याकूट
4 Jun 2022 - 8:48 pm
गाभा: 

आपण सतत नवीन चित्रपट, दाक्षीणात्य चित्रपट, नवीन पुस्तके त्यावरील समिक्षा, तसेच का पहावे?वाचावे? ह्यावर चर्चा करत असतो. पण मिपावरही असंख्य वाचण्यासारखे लेख, लेखमालिका आहेत. ह्या धाग्यात त्यावर चर्चा व्हावी.
कोणता मिपा धागा/लेख/लेखमाला आपल्याला आवडली? का आवडली? (नसेल आवडली तर तसंही सांगा) त्यात वाचण्यासारखं काय? त्यातून काय माहीती मिळते? हे सर्व धाग्याच्या लिकंसह लिहावे. मिपा/माबो/ऐसी किंवा ईतर कुठल्याही साईटवरचे लेख दिले तरी चालेल.
(जून्या धाग्यावर सदर चर्चा झाली असल्यास त्याची लिंक आणून ईथे आदळू नये. तसेच राजकिय चर्चा वाचा असा पांचट विनोद करण्यासाठीही ईथे फिरकू नये.)
माझे आवडते मिपा धागे, ते का वाचावे? का आवडले हे खाली लिहीतो.
१) मक्केतील ऊठाव. लेखक - हुप्प्या.
- सौदातील मक्केत १९७९ साली ऊठाव होऊन मक्का मशीद ताब्यात घेण्यात आली होती. त्याचे सौदी नी जगाच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला. बुरखा सक्ति ईथूनच आली तसेच लादेनचा जन्मही ईथूनच. मक्का मशिदीच्या आत शस्त्रे कशी पोहोचली? नंतर मशीद पुन्हा ताब्यात कशी घेतली ह्यासाठी हा धागा नक्कीच वाचावा.
http://misalpav.com/node/37463

२)बौद्धधर्मप्रसारक...
लेखक- मिपास्टार जयंत कुलकर्णी.
बौध्द धर्म बिहार पासून जपानपर्यंत अर्ध्या जगावर कसा पसरला? कोणी पसरवला? चिनी भाषा शिकायची मारामारी तिथे धर्मप्रसार कसा झाला? असे प्रश्न तुम्हाला पडले असल्यास ही लेखमाला तुमचं सर्व कुतूहल शमवेल.
http://misalpav.com/node/36758

३) हिटलरने खरंच आत्महत्या केली का? लेखक - ऋत्विका.
हिचलरची म्हणून सांभाळून ठेवण्यात आलेली कवटी कार्बन डेटींगच्या शोधानंतर स्त्रिची निघाली. हिचलर खरंच मेला की पळाला? काय आहे ह्या मागची काॅ. थेअरी?? ह्यासाठी हा धागा नक्की वाचा.
http://misalpav.com/node/34589

४)द स्कोअरक्रो, लेखक- स्वर्गीय बोकाशेठ.
ही थरारक लेखमाला सुरूवातीला खुप जोर पकडते. पण मला शेवट आवडला नाही. पण ईतरांना आवडलीय.
http://misalpav.com/node/31642

५)क्रांतिकारी जगपालट घडवून आणणार्‍या व्यापारी कंपन्या. लेखक - सुहास म्हात्रे.
काही कंपन्या ह्या ईतक्या मोठ्या झाल्या की त्या देशाला ही डोईजड झाल्या. त्यांच्या ईतिहासाबद्दल.
http://misalpav.com/node/28773

६)अंधारक्षण. लेखक- स्वर्गीय बोकाशेठ.
दुसरं महायुध्दात ग्राऊंड लेवल ला काय परिस्थीती होती, ह्याचं चित्रण. प्रत्यक्ष युध्दीभूमीवरील लोकांची मूलाखत.

७)भूताळी जहाज - लेखक-स्पार्टाकस
भूत माणसंच नाहीतर जहाजंही असू शकतात. हाॅरर/थ्रिलर एक ऊत्तम लेखमालिकाhttp://misalpav.com/node/28560

८)९० डिग्री साऊथ - १ लेखक- स्पार्टाकस.
दक्षीण ध्रूवावर पहीले पोहोचण्यासाठी नाॅर्वे नी ईंग्लंड ह्या दोन देशांतील खलाश्यांतील जगप्रसिध्द शर्यत. एक पोहोचून परत येतो. पण दुसरा अंटार्टीका वरच मरतो. नक्की वाचावी अशी.
http://misalpav.com/node/27751

९)भीतीच्या भिंती लेखक- अतिवास.
अफगाणातील अनूभव.
http://misalpav.com/node/29674

लेखनटंकाळ्या मुळे ईतर मालिकांची फक्त नावे टाकतो. पण आवर्जून वाचाव्यात अश्या.

१०)युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
जपानचा पर्ल हार्बरवरील हल्ला.
http://misalpav.com/node/24655

११)माझं खोबार... भाग १
http://misalpav.com/node/3867

१२)त्यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर
http://misalpav.com/node/21602

१३) १९९६ माऊंट एव्हरेस्ट - १
http://misalpav.com/node/27279

१४)एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १
http://misalpav.com/node/27564

१५)ट्रोजन युद्ध भाग १- पूर्वपीठिका.
http://misalpav.com/node/21717

१६)सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?
http://misalpav.com/node/40310

हे माझ्या वाचनखूनांत सापडलेले, बाकी अणेक धागे मा वाखू साठवलेले नाहीत. पण त्यांची लिंक शोधून खाली कमेंट मध्ये टाकतो.
ऊदा. श्रिगुरूजींची वाॅटरगेट वरील लेखमाला.
टर्मिनेटर ह्यांची ईजिप्तवारी.

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

5 Jun 2022 - 7:11 am | प्रमोद देर्देकर

कमाल आहे लेखन प्रसिद्ध करण्याची इतकी घाई कशाला?
पहिल्यावेळी जो हिटलर शब्द वापरला तो पुढील वेळी हिचलर का झाला?
वाचणखूना शब्द वाचून वाचनाचा अणेक वेळा खून झालाय.
आणि एकदा धागा प्रसिद्ध झाला की कोणी काय लिहावं यात काय नाही यावर कोणत्याच संस्थाळावर कोणतं नियंत्रण नसतं अस इथंच कुठेतरी वाचलं होतं.
शिवाय किकेटच्या धग्यांची माहिती देऊन तों का आवडला असं लिहलं तर धाग्याचं नक्की कास्मीर होणार तेही तुमच्याकडूनच.

असो वरील सर्वाना वाचन नवोदित मिपा लोकांना उपयोगी आहेत जे जुने धागे शोधून वाचायला कंटाळा करतात.

काड्यासारू आगलावे's picture

5 Jun 2022 - 11:05 am | काड्यासारू आगलावे

शिवाय किकेटच्या धग्यांची माहिती देऊन तों का आवडला असं लिहलं तर धाग्याचं नक्की कास्मीर होणार तेही तुमच्याकडूनच. आजिबात होनार नाही.

अर्रर्र... गंगाधर ही शक्तिमान हैं...

कॉमी's picture

12 Jun 2022 - 8:17 pm | कॉमी

शक्तीमानचा आयडी उडाला. आता फक्त गंगाधर.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Jun 2022 - 1:14 am | अमरेंद्र बाहुबली

आयला! काड्यासारूंशी वयक्तिक बोलून मी त्यांना मिपावर अनेकऊत्तमोत्तम लेख आहेत. तुमचा कथा पहीली आली तुम्ही देखील लिहा हे कळवले. तर त्यानी मला कुठले लेख मिहणून विचारले. यादी तयार केल्यावर त्याना यादी देण्यापेक्षा धागा काढतो असं त्यांना कळवलं. त्यांनाही कल्पना आवडली. म्हणून त्यांनी ईथे कमेंट केली असावी. असो. सगा सरांना हे सांगणंय ईतराना मी एकस्प्लेनेशन देत बसत नाही.

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2022 - 7:08 am | श्रीगुरुजी

स्वगत किंवा स्वयंसंवाद.

प्रमोद देर्देकर's picture

13 Jun 2022 - 2:03 pm | प्रमोद देर्देकर

पण सगा सरांना तरी का स्पष्टीकरण देताय. त्यांनी तसं तुम्हांला सांगितलं का कुठं. निरोप किंवा फोन वगैरे.

सगा तुझी जुनी सवय काही जात नाही बरं.

( पळा आता सगा काठी घेऊन मागे लागतोय.)

सतिश गावडे's picture

13 Jun 2022 - 7:36 pm | सतिश गावडे

पटण्यासारखी गोष्ट आहे :)

असो, धागा वाचत राहीन. अशा धाग्यांमुळे काही राहून गेलेले चांगले लेखन सापडते.

प्रमोद देर्देकर's picture

5 Jun 2022 - 7:13 am | प्रमोद देर्देकर

धग्यांची= धाग्याची

कास्मीर = काश्मीर

तिता's picture

5 Jun 2022 - 10:47 am | तिता

धन्यवाद अमरेन्द्र. बौद्धधर्मप्रसारक miss झाला होता. आता वाचतो आहे.

@ प्रमोद - Typographical errors ignore कराव्यात. काहीवेला चुका दुरुस्त करायला जमत नाही. जसे - 'काहीवेला' मला दुरुस्त करता येत नाही आहे. सन्वाद बन्द होतील अशा comments नकोत. नविन वाचक लिहीत नाहीत अशा comments वाचुन.

काड्यासारू आगलावे's picture

5 Jun 2022 - 11:04 am | काड्यासारू आगलावे

असे बरेच धागे मिस होतात आपल्याडून. पण ईतर कुणीतरी वाचलेले असतात. अश्या धाग्यांचे दुवे एकमेकांपर्यंत पोहोचवणे हात ऊद्देश आहे ह्या धाग्याचा. तुमच्या आवडत्या धाग्यांबद्दल कृपया लिहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jun 2022 - 11:08 am | अमरेंद्र बाहुबली

+१.
आपण वाचनखूना साठवून ठेवल्या असल्यास शेअर कराव्यात.

श्रीगुरुजी's picture

5 Jun 2022 - 11:52 am | श्रीगुरुजी

या मुखवट्यामागील चेहरा समजला.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jun 2022 - 12:34 pm | अमरेंद्र बाहुबली

ही कोणती मालिका? कृपया लिंक द्या.

मुक्त विहारि's picture

6 Jun 2022 - 4:37 am | मुक्त विहारि

निळा कोल्हा, ही कथा आठवली ...

वामन देशमुख's picture

14 Jun 2022 - 7:40 am | वामन देशमुख

या धाग्यावरची या संदर्भातली मैत्रीपूर्ण चर्चा वाचून, एक मिपाकर म्हणून गहिवरून आलं हो.

;)

आतिवास यांचे लेख अफगाणिस्तानातील त्यांच्या वास्तव्यावर आधारित आहेत. ते आवडले.
पण बाकीच्यांनी स्रोत द्यावेत आणि स्वैर भाषांतर,अनुवाद आहे का याबद्दलही लिहावे. किंवा मूळ पुस्तकाची संक्षिप्त माहिती सांगावी.

चौथा कोनाडा's picture

5 Jun 2022 - 11:52 am | चौथा कोनाडा

यादीपट्टीवरील (म्येनूस्ट्रीपवरील) मिपापुस्तकं मधील जवळजवळ सर्वच धागे !
मिपा पुस्तकं:

https://www.misalpav.com/books

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jun 2022 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद.

सिरुसेरि's picture

12 Jun 2022 - 5:36 pm | सिरुसेरि

लक्षात राहिलेली कथामाला , लेखन धागे - http://www.misalpav.com/node/32509
http://www.misalpav.com/node/34681

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Jun 2022 - 7:45 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद.

स्पार्टाकस ह्यांनी लिहिलेल्या शिकारकथा

ह्या सगळ्या कथा केनेथ अँडरसनच्या साहसांवर आहेत, केनेथ अँडरसन हा दक्षिण भारताचा जिम कॉर्बेट म्हणता येईल किंवा जिम कॉर्बेट उत्तरेचा केनेथ म्हणवला जाईल, निसर्गावर , शिकारी श्वापदांवर निरतिशय प्रेम, वाघ, बिबटे, ह्यांचा विशेष अभ्यास, जंगलबोली निसर्गबोली उत्तम जाणणारा केनेथ म्हणून वाचावा वाटतो.

चौथा कोनाडा's picture

13 Jun 2022 - 12:30 pm | चौथा कोनाडा

+१

भारी आहेत या कथा !

क्रिकेटमधील स्लेजिंगचे किस्से

गली क्रिकेट खेळलो आहे अन पाहायला पण आवडते, स्लेजिंगचे आता गेममधील अविभाज्य असणे इथपर्यंतचा प्रवास काही अंशी स्वतः बघितला आहे, त्यामुळे आवडता धागा, काही काही किस्से तर हहपुवा आहेत टोटल.

:)

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Jun 2022 - 12:00 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. येऊद्या अजून.

धन्यवाद ऐसा धागा सुरु करण्या करिता

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Jun 2022 - 9:49 pm | अमरेंद्र बाहुबली

क्रांतिकारी जगपालट घडवून आणणार्‍या व्यापारी कंपन्या
http://misalpav.com/node/28773

सस्नेह's picture

14 Jun 2022 - 9:00 pm | सस्नेह
diggi12's picture

16 Jun 2022 - 1:07 am | diggi12

मस्तच

Bhakti's picture

17 Jun 2022 - 10:18 am | Bhakti

पालकत्व
पालकत्वसंबंधी हा एक धागा वाखूमध्ये आहे,https://www.misalpav.com/node/43825 गरज वाटली की वाचत असते.आणखिन पालकत्वशी निगडित धागे असतील तर द्या.