लेखनविषय (Tags)
तो एक बिचारा.......
"तुम्ही मुलखाचे वेंधळेआहात,
काहीच कसं जमत नाही हो तुम्हाला",
इत्यादी विशेषणे त्याच्या पाचवीला पुजलेली. अर्थात हे त्याच्या पत्नीचे मत.
हे काही नवीन नव्हते.लहानपणा पासूनच याची सवय होती त्याला.
आई वडिलांच्या लेखी तो एक सामान्य मुलगा.
शिक्षक सुद्धा, "तु राहू दे ,तुला जमणार नाही", एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचे उदाहरण देत "काहीतरी शिका",आसा टोमणा मारायचे.
पुढे कशीबशी एक नोकरी मीळाली. कार्यालयात काहीच वेगळे घडले नाही.नोकरी म्हणून छोकरी.
आयुष्यात तो एकच दिवस ,ज्या दिवशी लोकांच्या मते "सर्व अवगुणसंपन्न", असा तो "सर्व गुणसपंन्न" म्हणून ओळखला गेला. किंबहुना त्याला उगाचच भास झाला असावा.
सकाळ संध्याकाळच्या लोकलच्या भाऊ गर्दीत तो अपसुकच धक्के खात स्टेशनाच्या आत बाहेर येत जात होता.
निसर्ग चक्र, बाकी काय , मुले झाली,नातवंडेही झाली. आयुष्यात अघटित आसे काहीच घडले नाही.आता निवांत घरी.
"आराध्या" त्याची लाडकी नात, जीला तो प्रेमाने "बबन" आसा बिना काना मात्रेच्या नावाने हाक मारायचा.तीच्या लेखी तो "माय नानू स्ट्रांगेस्ट".
ऐके दिवशी त्याची नात शाळेतून उड्या मारत घरी आली, म्हणाली," आई हे बघ,मला गाण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मीळाले".
आश्चर्यचकित आई ने विचारले " गाणं कुणी शिकवले आणी कुठले म्हटंलेस"?
" आजोबांनी"!!!!
"नाही का ते संदिप खरे यांचे, आयुष्यावर बोलू काही मधले"!!!!!
" असतो जर का भाजी
तर भेंडी झालो असतो"
तो नेहमीप्रमाणेच शांत,त्याच्या बायकोला त्याच्या डोळ्यात उगाचच उद्गारवाचक चिन्ह दिसत होते.......
____________________________________________________
कथा शंभर शब्दात बसवता येत नव्हती, " आपल्याला जमणार नाही,कशाला उगाच नस्त्या फंदात पडा",म्हणत नाद सोडून दिला.
का कुणास ठाउक, उगाचच,आर के नारायणांच्या "काॅमन मॅन" ची आठवण आली.
प्रतिक्रिया
छान लघुकथा आहे, आवडली.
छान.
धन्यवाद
तो एक बिचारा.......
माऊली धन्यवाद
छान
+१
सर्व वाचक व प्रतीसादकांचे....
मस्तच !
छोट्याश्या कथेत मोठा आशय सामावलेला आहे.
धन्यवाद