Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by VRINDA MOGHE on Mon, 05/23/2022 - 13:55
*कातरवेळा* सांजरंग केशराचे पसरले आकाशात पाखरांची लगबग परतण्या घरट्यात ! चिवचिवाट त्यांचा मधुर, सुखवि कानाला, संधिकाल चा धुंद गारवा, मोहवि मनाला !! मावळतीला रविबिंब, क्षितीजावरती झुकले, लाल केशरी रंग नभाचे, लाटांवरी उमटले! सागरा पल्याड बुडता, सुर्याचा तांबूस तो गोळा, नीशा हळूच दाटताना, हुरहुर लावती कातरवेळा !! हळुहळू अंधारताना, लाटाही मग होती धूसर, निरवता तीरावरली, मनात झिरपे खोलवर ! तुझे भास दाटून येता, दिशा भोवती अंधारल्या, कातरवेळी झाडांच्याही सावल्या बघ थरथरल्या !! - वृंदा मोघे

Submitted by श्रीगणेशा on Fri, 05/27/2022 - 08:34

Permalink

हळुहळू अंधारताना, लाटाही मग

हळुहळू अंधारताना, लाटाही मग होती धूसर, निरवता तीरावरली, मनात झिरपे खोलवर !
किनाऱ्यावरील कातरवेळ! छान लिहिलं आहे!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता२४ on Fri, 05/27/2022 - 13:56

Permalink

छान आहे कविता

आवडली
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1369 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com