Skip to main content

दुर का रे असतो

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 28/04/2009 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
दुर का रे असतो दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||
घालीत होती वेणी सकाळी
आरशासमोर होते उभी मी
न दिसे माझी मला मी
परी दिसलास तू || १ ||
दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||
सायंकाळी असते मी एकटी
वाट बघते हात असे कटी
नजर जाई दुरवर, धडधडे र्‍ह्रुदय
मनी असे किंतू || २ ||
दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||
मालव दिप सारे ह्या अशा राती
भरून काढ उणीव दिवसभराची
नको असा नको करू करू तू
पण परंतू || ३ ||
दुर कारे असतो सखया जवळी ये ना तु || ध्रु ||
२/०१/१९९८
Taxonomy upgrade extras

वाचने 2311
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हं. पाषाणभेद ... तुमचे हृदय पाषाणाचे नाही ह्याचा पुरावा देत आहात बाकी, ९८ साली मिपा नव्हते ती उणीव तुम्ही आता चांगली भरुन काढत आहात. येवु द्या अजुन सुंदर सुंदर कविता... वेगवेगळ्या विषयांवरच्या !! :) --अवलिया

छान कविता करतोस कि रे दगडफोड्या ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

मुंबईतिल रिक्षांचे मिटर. आता हा कोणता विषय आहे.काय करणार तुम्हि मिटरचे.