ती २५ तारीख

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
21 Apr 2022 - 11:11 pm

आज २१ तारीख, एप्रील २०२२....अगदी अपक्षाच्याही बरोबर नसताना मला २५ तारीख आठवली. त्या व्यक्तीची आठवण आली त्या २५ तारखेवरुन. २५ जानेवरी आहे ती तारीख हे नंतर लक्षात आल. बाळासाहेब ठाकरे, ह्या व्यक्तीत ती जादु, तो प्रभाव होता की, मला कुठल्यही राजकीय पक्षाशी अगदी अपक्ष म्हणुन निवडणनुकीत रस घेणा-या व्यक्तीशीही दुरचे नाते नसताना ह्या एकाच व्यक्तीबद्दल एवढा जिव्हाळा वाटावा, ह्याचे आश्चर्य वाटले. टीव्हीवरती लहान असताना बघितलेले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर युट्युबच्या सौजन्याने बघितलेले गॉगल व सफेद दाढीत अजुन रुबाबदार, भक्कम दीसणारे बाळासाहेब ठाकरे अजुनही तितकेच माझ्या मनाला भावतात. पुन्हा ती भाषणे व मुलाखाती बघताना त्यांचे सडेतोड बोलणे मला जाणीव करुन देते की आपल्याला जे पटते ते दुस-यांना सरळ, सडेतोड सांगणे महत्वाचे असते. मला वाटत, मी स्वःताच कुठेतरी कमी पडलो, पण ह्या व्यक्तीचे मार्गदर्शन आता पुन्हा मिळणे..........शक्य नाही,

ते एकाच व्यक्तीचे लाखोंना प्रभावित करणे व कायमचे सोडुन गेल्यानंतर माझ्यासारख्या खुपजणांना भावुक बनवणे हे आता पुन्हा अनुभवायाला येणार नाही. फक्त आपल्याच योग्य, बरोबर विचारांवर ठाम रहावे हे मला बाळासाहेबांकडुन शिकायला मिळाले, अजुनही शिकतोय. एकटा तोच लढतो, जो एकटाच पुरेसा असतो, हे मी त्यांच्याकडुनचन शिकलो. आणि आपली माणसे कधीच फक्त आपली नसतात, खुपजणांची असतात हे सुध्दा कळले.

पक्ष, अपक्ष खुप असतात व बनतील....पण तो एकच व्यक्ती सर्व असणे ह्यात फरक आहे. बाळासाहेब, सर, तुम्ही तुम्ही होतात, ते पावित्र्य, ती पवित्र नीती आता राहीली नाही.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Apr 2022 - 8:10 am | माईसाहेब कुरसूंदीकर

व्यक्ती हयात नसली तरी तिचे विचार मात्र निरंतर असतात. जुन्या सामनाच्या अंकांमधुन किंवा अगदी जुन्या मार्मिकच्या अंकांमधून हे विचार वाचू शकाल.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2022 - 1:03 pm | अमरेंद्र बाहुबली

खरं आहे. बाळासाहेबांनी ऊभी केलेली शिवसेना आणी तिचे विचार हिंदूंना एक ताकद देऊन गेली. बाबरी आम्ही पाडली म्हणून दावा करनारे आणी कोर्टात आमचा बाबरीशी काहीही संबंधं नाही सांगनारे भाजपचे नेते पाहीले की हिंदूंना जाणवतं बाळासाहेब काय होते ते.

मुक्त विहारि's picture

4 May 2022 - 7:08 pm | मुक्त विहारि

ह्याचे एक उदाहरण म्हणजे, बाळासाहेब ठाकरे....

संजय दत्तला माफी देणे, Enron च्या बाबतीतली बदलेली भुमिका आणि सर्वात कळस म्हणजे, घराणेशाही राबवली.

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2022 - 7:16 pm | अमरेंद्र बाहुबली

त्यांना मुख्यमंत्री ठाकरे घराण्यात नसलेल्या लोकांना केले, आणी म्हणे घराणेशाही. आजकाल लोक केंद्रात मंत्रीपदं पटकावून स्वतच्या मुलांना बीसीसीआय मध्ये घुसवतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2022 - 7:16 pm | अमरेंद्र बाहुबली

त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे घराण्यात नसलेल्या लोकांना केले, आणी म्हणे घराणेशाही. आजकाल लोक केंद्रात मंत्रीपदं पटकावून स्वतच्या मुलांना बीसीसीआय मध्ये घुसवतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2022 - 7:17 pm | अमरेंद्र बाहुबली

वडील आमदाक, काकू मंत्री, स्वत: मामू, पुतण्याला वृध्दांसाठी राखीव कोट्यातून डबलडोस. ही घराणेशाही असते मुवीकाका.

समोर बसलेल्या लाखो लोकांना आपल्या वक्तृत्व शैली ने मंत्रमुग्ध करणारे नेते होते.त्यांच्या एका आवाहन वर हजारो लोक सर्वस्व त्याग करायला तयार होती.
महाराष्ट्रात असे अनेक हिरे आहेत.त्या मध्ये बाळासाहेब म्हणजे कोहिनूर.
प्रमोद महाजन ह्यांची पण तीव्र बुद्धिमत्ता त्यांची भाषणे ,मुलाखती बघताना दिसते.
महाजन,मुंडे गेले आणि bjp Maharashtra मध्ये तरी नेतृत्व हिन झाली.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2022 - 8:38 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ महाजन,मुंडे ह्यांना मातोश्रीवर मान होता. आजकालच्या भाजपनेत्याना मातोश्राच्या गेट समोरही ऊभे केले जात नाही. भाजपचे किती पतन झालेय हे यावरून लक्षात येते.