रॅट रेस
नेहमी प्रमाणेच सर्व नैमित्तिक आटोपून प्रभात फेरी करता खाली आलो,बघतो तर काय सोसायटीच्या आगंणाचे गोकुळात रूपांतर झालेले दिसले.शाळेत जाणारी लहान मोठी मुले व त्यांना सोडवायला आलेले पालक बसची वाट बघत होते.दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या.बरेचसे मित्र आता शाळेत भेटणार याचा आनंद सर्वाच्याच तोंडावर स्पष्ट दिसत होता.काही पालक चिंतातूर दिसत होते.सहाजिकच आहे तब्बल दोन वर्षानंतर शाळा उघडत होत्या.
"हाय,नानू,गुडमॉर्निंग अकंल, नमस्कार काका" आशी संमिश्र अभिवादने कानावर पडली.आमची सोसायटी म्हणजे एक छोटेसे गाव. सुरूवाती पासून सांस्कृतिक,धार्मिक राष्ट्रीय उत्सव एकत्र साजरे करत आल्यामुळेच बर्यापैकी एकोपा व माणूसकी टिकून आहे. मोठ्यांबद्दल आदर आहे, लहानांबद्दल प्रेम आहे. एका चिमुकली च्या शस्त्रक्रिये साठी काही लाखाची रक्कम थोड्याच दिवसात जमा झाली.
मुलांचा उत्साह बघताना खरोखरच आनंद झाला.नवीन पोशाख (युनिफार्म,प्रत्येक शाळेचा वेगळा)पाण्याची बाटली,पाठीवरची बॅग आणी गळ्यात टांगलेले शाळेचे ओळखपत्र आसा सर्व तामझाम.
आता विसाव्याचे क्षण,तसे बघायला गेले तर एकदम साधी गोष्ट.या आगोदर पण मुले शाळेत जात होती,स्कूल बस येत होती पण माहामारीच्या पार्श्वभूमीवर हिच गोष्ट अनन्य साधारण,महत्वाची ठरली.
मन भूतकाळात गेले. बालपणचे,शाळेचे दिवस आठवू लागले.योगेश्वर अभ्यंकर यांचे एक गीत,"शाळा सुटली पाटी फुटली", आठवले.लहापणी आकाशवाणी वर कुंदा बोकील यांच्या स्वर्गीय आवाजात बरेच वेळा ऐकले होते.
https://youtu.be/X9eP5bzHNhs
"शाळा सुटली पाटी फुटली".या रचनेचे कोणत्या वात्रट मुलानी विडंबन केले माहीत नाही पण हे विडंबन पैतृक संपत्ती प्रमाणे पिढी दर पिढी हस्तांतरित होत गेले. कोणता छंद कोणते वृत्त माहीत नाही पण प्रत्येक मुलाच्या तोंडी आसायचे.
विडंबन
"शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भग्यानी मारलं
त्याच्या काय बापाच खाल्लं"
कुंदा बोकील आताच्या पिढीला माहीत असतील नसतील पण त्यांनी गायलेली ती सुमधूर गाणी आजुनही रसिकाच्या कानात व मनात रेगांळत आहेत.
निळा सावळा नाथ
अशी ही निळी सावळी रात..
अभिमानाने मीरा वदते,
हरिचरणांशी माझे नाते..
वैकुंठीचा राणा तूची नारायणा..
शाळा सुटली पाटी फुटली..
या चिमण्यानों परत फिरा रे
घरा कडे आपुल्या.....
सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागूती तुला कधी फिरायचे....
गीतकार योगेश्वर अभ्यंकर प्रतिभाशाली,प्रसिद्ध गीतकार.
"ज्योत दिव्याची मंद तेवते",
"विजय पताका श्रीरामाची",
"रुसला मजवरती ग कान्हा"
या सारखी अजरामर गाण्यांचे निर्माते. विषयांतर बाजुला ठेवू.
आमच्या लहानपणी मुलांची आणी मुलींची शाळा वेगळी, मराठी शाळा वेगळी,(इयत्ता पहिली ते सातवी) इंग्रजी शाळा वेगळी,(इयत्ता आठवी ते आकरावी). मराठी शाळेचे एखाद्या धनिकांच्या वाड्यातील खोल्यांत काही वर्ग भरायचे.दोन तीन वेगवेगळ्या वाड्यात वेगवेगळे वर्ग मीळून आमची शाळा.कुणाची माळावर,कुणाची तेली आळीत तर कुणाची कुंभार वाड्यात.शाळेतले वर्ग म्हणजे पिवळ्या मातीच्या रंगात रंगवलेल्या भिंती,निळ्या रंगात लिहीलेले सुविचार,सारवलेली जमीन आशी ऐसपैस खोली,एक फळा व एक गुरूजी.पुढे जिल्हापरिषदने एकत्रीत नवी इमारत शाळे करता बनवली. शाळेचे नाव जीवन शिक्षण मंदिर पण सर्वजण तीला नवी शाळाच म्हणायचे. प्ले ग्राऊंड म्हणजे संपुर्ण गाव.
चौथी टकळीने पेळू बनवणे ,पाचवी सूतकताई,सहावी चरखा,सूतकताई आणी सातवीत हातमागावर "कापड धंद्याचे " शिक्षण.
सात जूनला शाळा उघडायच्या. पाटी दप्तर,बसकर(खाली बसण्या साठी).सहा वर्षाचा घोडा झाला की शाळेत जायचं आसा दडंक. "मालगुडी डेज",मधे स्वामी व त्याच्या कुटुंबीयांचे मस्त वर्णन दाखवले आहे.
"वह्या पुस्तकांच ओझ नव्हतं
पायात बुटमोज नव्हतं
आकरा नंबरची गाडी होती
गुढग्यापोत्तूर चड्डीची नाडी होती
पुस्तका शिवाय धडा होता
पंतोजीचा आवाज चढा होता
हातात चिंचेचा आकडा
ओठावर एकोणतीसचा पाढा होता
शाळा म्हणजे टशन होतं
मित्रां सोबतच जशन होतं
गणित,इतिहस भूगोल शास्त्र
सगळ्याचं गुर्जी मात्र एकच होतं
डब्यात पिझ्झा बर्गर अन
बिसलेरीच ओझं नव्हतं
कांदा भाकरी अन नळाचं पाणी
पण शरीर दगडा वाणी होतं
परीक्षेचा धाक नव्हता
टक्केवारीच भ्या नव्हतं
पुढच्या वर्गात घातला
एवढच आईबापाला पुरे होतं"
आताच्या व त्यावेळच्या शिक्षण पद्धतीत फरक आहे का? आता पालक, शिक्षक आणी विद्यार्थ्यांवर जबरदस्त तणाव, "रॅट रेस",च्या युगात बालपण कोमेजून जातयं, आपेक्षांच ओझे मानसिक संतुलन बिघडवतयं, सारे काही अवघड होऊन बसलयं आसे वाटते.
अर्थात आमची चांगली तुमची वाईट आसा विचार नाही. पहिली मध्ये संगणका सारखे जटील विषय, शाळेनंतर हा क्लास तो क्लास यात बालपण भरडून तर निघत नाही ना? एका बाजूस गरीब तबक्यातला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत अव्वल येत आहेत तर सुखवस्तू मानसिक रोगाचे शिकार होताना दिसतात. कारण शोधणे आवश्यक वाटते.
प्रतिक्रिया
शोधा म्हणजे सापडेल.
+१ अगदी ..
मुद्दा वेगळाच आहे.
पहिलीच्या मुलाला शिकवणी,कराटे
धन्यवाद
लौटा
धन्यवाद
डिप्रेशन मधे कुणी जाऊ नये.
छान चिंतन
धन्यवाद सर
जुने दिवस आठवले.
,
आशाच वहिनीसाहेब.......
सानेगुरूजी नकच वाचायला.
प्रश्न काय आहे कि मुलाला
आज दुपारी अभिनेत्री-
+१
+१
ही २००२ सालची गोष्ट आहे.
सुबोध खरे+१११११११
डाॅ सुबोध खरे,भागो,भक्ती,चौको
हौ अबौट माणुस रेस ??
छान पोस्ट. पण अशी शिक्षण
पण अशी शिक्षण पद्धती कोण विकसित करणार?
एकदम सहमत.....
हाताची पाच बोटे सारखी नसतात....
अगदी बरोबर
शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल हवा.
धन्यवाद
मुलांची पाटी कोरीच असते ...
वैचारिक जडणघडण उत्तम झाली असेल तर..
रॅट रेस ?
एखाद्या मुलाला अमुक एका गोष्टीतच गती आहे हे कसे ओळखायचे ?
माझा अनुभव
अशी उदाहरणे पण आहेतच
सर्व प्रतीसादकांचे मनापासून
आणि आर्थिक देखील
हल्लीच्या युगात आर्थिक बाजू
धन्यवाद
जोपर्यंत शासन व्यावसायिक
उद्बोधक
आपल्या कडे एक उत्तम, श्लोक आहे...