Skip to main content

शिक्षण पद्धती

रॅट रेस

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 05/04/2022 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणेच सर्व नैमित्तिक आटोपून प्रभात फेरी करता खाली आलो,बघतो तर काय सोसायटीच्या आगंणाचे गोकुळात रूपांतर झालेले दिसले.शाळेत जाणारी लहान मोठी मुले व त्यांना सोडवायला आलेले पालक बसची वाट बघत होते.दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या.बरेचसे मित्र आता शाळेत भेटणार याचा आनंद सर्वाच्याच तोंडावर स्पष्ट दिसत होता.काही पालक चिंतातूर दिसत होते.सहाजिकच आहे तब्बल दोन वर्षानंतर शाळा उघडत होत्या. "हाय,नानू,गुडमॉर्निंग अकंल, नमस्कार काका" आशी संमिश्र अभिवादने कानावर पडली.आमची सोसायटी म्हणजे एक छोटेसे गाव.