✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वैशाखाची ऊन्हं ..

प — प्राची अश्विनी, Fri, 04/29/2022 - 17:39
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली, वळीवाची आठवण उमलून आली. बहाव्याने केली रिती फुलांची पखाल, पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली.. सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे, वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे. चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी, धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे. सुकलेले पात्र, मधे खोल खोल डोह, सुटता सुटेना कसा जीवनाचा मोह. काठावर कुणी वेडा सूर तोलणारा, कंठी त्याच्या मल्हाराचा ओला अवरोह. ऐकुनिया बकुळी ती लाजली जराशी, चित्त तिचे उडुनिया गेले कुणापाशी? नादावले मन तिचे उतू उतू जाई पायापाशी म्हणूनच नव्हाळीची राशी. वैशाखाची उन्हं मग गंधमय झाली वळीवाची आठवण दूरदूर गेली...

प्रतिक्रिया द्या
5001 वाचन

💬 प्रतिसाद (17)

क्या बात है!

चांदणे संदीप
Fri, 04/29/2022 - 18:25 नवीन
खूपच आवडली रचना. वाखूसा. (पंगारा = पांगरा?) सं - दी - प
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्राची अश्विनी
Fri, 04/29/2022 - 18:30 नवीन
धन्यवाद. हो तोच लाल फुलं असणारा.
  • Log in or register to post comments

सुंदर! पुन्हा पुन्हा वाचावी

Bhakti
Fri, 04/29/2022 - 19:00 नवीन
सुंदर! पुन्हा पुन्हा वाचावी अशी!
  • Log in or register to post comments

वैशाखाच्या काहिलीत

अनन्त्_यात्री
Fri, 04/29/2022 - 21:18 नवीन
गारव्याचा शिडकावा!
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/29/2022 - 21:52 नवीन
आवडली रचना. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आमची पण पावती

माहितगार
Fri, 04/29/2022 - 22:42 नवीन
चित्रात तरंगावे तल्लीन काव्य बिंदू तैसी कवियत्री प्राची अश्विनींच्या अभिजात काव्याची प्रचिती खास
  • Log in or register to post comments

वैशाखाचे उन्ह देखील सुखावणारे

पाषाणभेद
Sat, 04/30/2022 - 00:00 नवीन
वैशाखाचे उन्ह देखील सुखावणारे आहे हे समजावून देणारी कवीता!
  • Log in or register to post comments

आहाहा....

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 04/30/2022 - 13:37 नवीन
नितांतसुंदर आणि चित्रदर्शी, फार आवडली कविता.... होरपळून टाकणर्‍या वैशाख वणव्यामधे अचानक वळीव आल्यावर जो अनुभव येतो तोच अनुभव ही कविता वाचताना आला. उन्हाळ्यावरची सुखद कविता बर्याच दिवसांनी वाचायला मिळाली. मिपावरच्या सर्वोत्तम कवितांची यादी बनवायची झाली तर त्या यादित ही कविता नक्की आली पाहिजे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सुरेल शब्दांचे रसमय कारंजे .

सस्नेह
Sat, 04/30/2022 - 17:41 नवीन
सुरेल शब्दांचे रसमय कारंजे . थंडगार तुषार अंगावर शिडकावा करणारे !
  • Log in or register to post comments

वैशाखातली उन्हं

कर्नलतपस्वी
Sat, 04/30/2022 - 21:53 नवीन
वैशाखातली उन्हं कैरीची पन्हं याच नातं लई जुनं बेलाच फळ वैशाखातली झळ लई जुना मेंळ कवीता आवडली.
  • Log in or register to post comments

पन्ह -हायलं खरं. बेलफळ कधी

प्राची अश्विनी
Sun, 05/01/2022 - 10:22 नवीन
पन्ह -हायलं खरं. बेलफळ कधी खाल्लं नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

बेलफळ...

कर्नलतपस्वी
Sun, 05/01/2022 - 12:19 नवीन
उत्तर भारतात उन्हाळ्यात उन बाधू नये म्हणून पिकलेल्या बेलफळाचे सरबत पितात.जागोजागी सरबताच्या हातगाड्या उभ्या दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

अति सुंदर!

सुरसंगम
Sun, 05/01/2022 - 08:40 नवीन
अति सुंदर!
  • Log in or register to post comments

सुंदर!

हेमंतकुमार
Sun, 05/01/2022 - 09:29 नवीन
आणि समयोचित .... पु ले शु
  • Log in or register to post comments

धन्यवाद सगळ्यांना.

प्राची अश्विनी
Sun, 05/01/2022 - 11:06 नवीन
धन्यवाद सगळ्यांना.
  • Log in or register to post comments

बहाव्याने केली रिती फुलांची

श्रीगणेशा
Fri, 05/13/2022 - 21:41 नवीन
बहाव्याने केली रिती फुलांची पखाल
खूप छान! कवयित्रीने केली रिती शब्दांची पखाल!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद श्रीगणेशा!

प्राची अश्विनी
Mon, 05/16/2022 - 05:44 नवीन
धन्यवाद श्रीगणेशा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगणेशा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा