हा माझा मिसळपाव वरचा पहिलाच लेख तरी जुन्याजाणत्या मिपाकरांनी संभाळून घ्यावे. नुकताच २३/२४ ला नागाव, कोरलई ला जायचा योग आला. २३ ल पहाटे ५ वाजता पिंपरी वरुन निघालो ते ८.१५ ला नागाव ल पोहोचलो. कर्पेवाडी येथे अगोदरच बुकिंग करुन ठेवले होते.
९.३० ला न्याहारी करुन चौल, रेवदंडा मार्गे कोरलई किल्ल्यावर गेलो. कोरलई हा पोर्तुगिजकालीन किल्ला हा लांबच लांब असुन रुंदीला अगदिच थोटका. पायथ्यालाच दीपगृह आहे.
किल्ल्यावर बरेच अवशेष आहेत. काही तोफा आहेत. पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आहेत.
किल्ल्यावरुन चौफेर दृश्य दिसते. अलीबाग, नागाव, रेवदंडा किनारा, रेवदंडा खाडी पूल, विक्रम पोलाद कारखाना ई.
नंतर काशिद किनार्यावर गेलो. एवढा स्वछ रुपेरी पांढराशुभ्र किनारा प्रथमच पाहिला. काशिद्चे वैशिट्य म्हणजे तिथे लाटा फरच मोठ्या येतात तरीही सुरक्षित असा किनारा आहे. तिथे मस्त डुंबण्याचा आनंद घेतला. पाठिमागेच फणसाडचे वन्यजीव अभयारण्य आहे. रात्री परत कर्पेवाडीला मुक्काम. दुसर्या दिवशी सकाळ, दुपार नागावच्या किनार्यावर समुद्रस्नान स्वछ, सुन्दर लांब किनारा पण तिथे काशिदची मजा नाहिच.
सुर्यास्तानंतर नागाव सोडले ते रात्री ८ वाजता महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतले.
११ वाजत घरी पोहोचलो ते परत इथे येण्याचा संकल्प करुनच. अधिक प्रकाशचित्रांसाठी येथे पहा http://picasaweb.google.com/borkarsagar/Nagao23Jan10?feat=directlink&nb…;
नागाव, कोरलई: एक भटकंती
वाचने
7769
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो
धन्यवाद
In reply to फोटो by सहज
धन्यवाद
In reply to फोटो by सहज
खूप सुंदर छायाचित्रं
सुंदर फोटो
मार्ग
In reply to सुंदर फोटो by मानस्
अजुन एका
+१
In reply to अजुन एका by गणपा
फोटो
मस्तच
सुंदर प्रचि आणि सुरेख वर्णन !
छान आहे भटकंती.
[ नागाव - रेवदंडा - काशिद -
In reply to छान आहे भटकंती. by कंजूस
दोन वर्षांपुर्वी फणसाडला गेलो
In reply to छान आहे भटकंती. by कंजूस
छान
असेच म्हणतो!
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोरलईत पोर्तुगीज बोलणारे लोक आहेत.
खुपच सुरेख...कोकण,कोकणचा…
खुपच सुरेख...कोकण,कोकणचा निसर्ग,ते सागर किनारे....अहाहा... :)