Skip to main content

ताज्या घडामोडी एप्रिल २०२२

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 01/04/2022 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.

वाचने 48934
प्रतिक्रिया 354

प्रतिक्रिया

कोर्टाकडे कर्मचारी गेले. परवा निर्णय आला आणि सरकारतर्फे मान्य झाला. कर्मचारी काय करणार आहेत? त्यांच्यापुढे आता दोनच पर्याय शिल्लक उरले आहेत. १) कोर्टाचा निर्णय मान्य करून संप मिटवणे, किंवा २) आणखी वरच्या कोर्टात फेरविचारासाठी अर्ज करणे आणि तो दावा दाखल करून घेतला वरच्या कोर्टाने तर तिकडच्या दाव्यासाठी वकील फी देत राहाणे. ३) तिथला निर्णय काय होतो पाहून आणखी काय पर्याय आहेत हे शोधणे. पण आजच्या पवारसाहेबांच्या घरासमोर निदर्शने करून नक्की काय साध्य होणार होते/आहे? एकूण एसटी कर्मचारी स्वत:च निर्णय घेत आहेत असे दिसते.

In reply to by कंजूस

अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आता सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करायचं आहे म्हणून फिल्डिंग लावणं चालू आहे अशी आतली बातमी आहे. आंदोलनाचा आणि शरद पवार यांचा काय संबंध? गृह खाते राष्ट्रवादी कडेच आहे पण पोलिसांना आंदोलकांच्या हालचालींची माहितीच नव्हती हे कसं शक्य आहे? सुसू ताई बद्दल सहानुभूती निर्माण करायची आहे त्यामुळे केवढे फुटेज दिले जात आहे ते पाहून घ्या.

In reply to by सुबोध खरे

हे मान्य. पण ते काय कोर्टाचा निर्णय फिरवणार असा विश्वास कामगारांना आहे. चांगली गोष्ट.

In reply to by सुबोध खरे

त्यामुळे राज्यात आलबेल होत असेल तर चांगलेच आहे. परवा ( थोडे दिवसांपूर्वी ) मा. मुख्यमंत्री तयार आहेत अशी हवा झालेली.

In reply to by सुबोध खरे

आता सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करायचं आहे म्हणून फिल्डिंग लावणं चालू आहे अशी आतली बातमी आहे.
आतली म्हणजे कुठली सांगू शकाल का डॉक्टर साहेब ? तुमच्या रीच (आवाका) अन ज्ञानाबद्दल कायमच आदर वाटतो सर, आता त्यात तुमच्या नेट्वर्किंग स्किल्सची पण भर पडली आहे ! मी हे सिरीयसली म्हणतोय, चेष्टा नाही सरजी.

अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर; 'करमुक्त' दाव्यांची होणार छाननी https://www.esakal.com/amp/maharashtra/farmers-on-radar-of-the-income-t… केंद्र स्तरावरील, सरकारी खाती, योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे.... आता, कोटीच्या कोटी, वांगी किंवा मिरच्या उत्पादन घेणारे, काय करणार?

In reply to by मुक्त विहारि

हे कोट्यावधी उत्पादन वांग्यातून किंवा मिर्चीतून नसते असे म्हणायचे आहे का ?

In reply to by वामन देशमुख

तक्रार रामनवमी वाल्यांनी केलीये कि, तुम्हाला तुमच्या वाईट सवयीप्रमाणे हिंदू मुस्लिम केल्यावाचून राहावंत नाही वाटतं.

In reply to by कॉमी


In reply to by कॉमी

तक्रार रामनवमी वाल्यांनी केलीये कि,
बाकी, भारतवासियांचे दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तांबद्धल असली शब्दरचना?
धन्य आहे.
रामभक्त हे खरंच (सकारात्मक अर्थाने) धन्य आहेत. त्यांच्या भावनांचा ठरवून अवमान करणाऱ्यांची त्यांनी केवळ तक्रार केलीय; हातपाय तोडले नाहीत.

In reply to by वामन देशमुख

अवमानकारक बोलण्याचा हेतू नव्हता आणि अवमानकारक आहे असे वाटले नव्हते. तेव्हा क्षमस्व. बाकी तुमच्या बोलण्यावर टीका करणे म्हणजे असहिष्णुता नसते.

In reply to by कॉमी

तेव्हा क्षमस्व
नाही नाही, कॉमी; आपले केवळ वैचारिक मतभेद आहेत. क्षमा वगैरेमुळे कसेसेच वाटते; कृपया गैरसमज नसावा. माझ्याकडूनही अवमानकारक शब्दप्रयोग झालेले असल्यास - भविष्यात झाल्यास क्षमस्व.

In reply to by कॉमी

हातपाय तोडणाऱ्यांची संस्कृती (खरंतर विकृती) किमान भारतवर्षात पसरू नये म्हणून केवळ तक्रार करणाऱ्यांची संस्कृती जतन करावी, तिचे संवर्धन करावे. तिसरा पर्याय दृष्टीक्षेपात नाही.

गुजरातमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमात तणाव ; दोन गटांत दगडफेक; दुकाने, गाडय़ांची मोडतोड, जाळपोळ https://www.loksatta.com/desh-videsh/ram-navami-2022-communal-clashes-r… काही लोकांना, स्वस्थ बसवत नाही....

In reply to by मुक्त विहारि

रमजान संपतांना हे फार वाढणार आहे का? कारण शेवटी अशी भाषणे होतात आणि जमाव बाहेर पडतात मग दगडफेक सुरू करतात.

संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज ; डॉ. अभय बंग यांची परखड टीका https://www.loksatta.com/nagpur/rss-spreading-religious-hatred-in-socie… हो क्का? .... मग, बांगलादेश येथे हिंदू लोकांची घरे जाळली, पाकिस्तान मध्ये, गैर मुस्लिम माणसाला जाळले, त्या बद्दल, हे का बोलले नाहीत? पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही ....

In reply to by मुक्त विहारि

डॉ.अभय बंग सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून एक पुरस्कार स्विकारताना. abhaybang डॉ. अभय बंग यांच्या सामाजिक कार्याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. रा.स्व.संघाने चांगले काम करणार्‍यांचा नेहमीच आदर केला आहे. सरदार पटेल आणि लालबहादूर शास्त्री यांची संघाबद्दलची मते वाईट होती तरीही संघाच्या वर्तुळातून त्यांच्याविषयी कायम आदरच व्यक्त होत आला आहे. त्यामुळे संघाविषयी वाईट मत असले तरी डॉ. अभय बंग यांनी समाजासाठी चांगले काम केले आहे त्याबद्दल त्यांचा गौरव करायला संघाला कधीच वैषम्य वाटले नसावे. आणि नरेंद्र मोदी या मुळच्या संघाच्या एका स्वयंसेवकाच्या सरकारने डॉ.अभय बंग यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पण दिली आहे. प्रश्न आहे डॉ. अभय बंग यांचा. जर संघ धार्मिक विद्वेष पसरवत असेल आणि ही गोष्ट त्यांना आवडत नसेल तर मग त्याच संघाकडून त्यांनी हा पुरस्कार का स्विकारला असावा? की संघ धार्मिक विद्वेष पसरवत असल्याचा दृष्टांत त्यांना हा पुरस्कार स्विकारल्यानंतर झाला? तसे असेल तर हल्ली आलेल्या पुरस्कार वापसीच्या फॅशनला अनुसरून ते संघाकडून मिळालेला आपला पुरस्कार कधी परत करणार? हा फोटो आणि संबंधित बातमी खालील लिंकवर बघायला मिळेल. https://timesofindia.indiatimes.com/.../arti.../67248381.cms

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संघाकडून त्यांनी हा पुरस्कार का स्विकारला असावा?
काहीही. हा पुरस्कार लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेतर्फे दिला गेलाय. नागपूर स्थित डॉ. उदय बोधनकर हे ह्या संस्थेचे विश्वस्त आहेत. संस्थेचे कामकाज नागपूरमधून चालते. एखाद्या संस्थेने एखाद्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी निवडले आणि त्यास पुरस्कार देण्यासाठी रा स्व संघाचे सरसंघचालक (जे योगायोगाने नागपूरमधून्च कामकाज करतात) ह्यांना पाचारण केले तर डॉ. अभय बंगांनी नकार द्यावा काय? पुरस्कार संस्थेने दिला आहे. रा स्व संघाने नव्हे. फक्त कार्यक्रमास मान्यवर म्हणून सरसंघचालकाअंना पाचारण केले गेलेय. आणि गंमत म्हणजे पुरस्कार डॉ. राणी बंगाना दिलाय. ते दंपती मिळून सामाजिक प्रसंगास उपस्थित असतात हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे एखाद्याने संघावर टीका केली की त्याची सगळी कुंडली (कधी कधी अर्धवट ज्ञानावर तर कधी चक्क खोटी) काढायची घाणेरडी प्रथा तुम्ही तरी चालवू नका. राहता राहिला पद्मश्री चा प्रश्न. पद्मश्री भारत सरकार देते. माननीय मोदी किंवा माननीय राष्ट्रपती भले स्वयंसेवक असतील किंवा अजून काही. पुरस्कार देताना ते भारत सरकारचे प्रतिनीधी असतात. त्यानंतरही डॉ. अभय बंगांनी संघावर टीका केलीय. भारत सरकारवर नाही तेंव्हा संघ म्हणजेच भारत सरकार आहे असे तुमचे म्हणणे आहे काय? शिवाय लोकांना कुठले दृष्टांत कधी व्हावे हे ठरवणारे तुम्ही कोण? शिवाय आता टीका केली म्हणून लगेच पुरस्कार वापस करा म्हणून पिल्लू सोडून द्यायची भाषा का?

In reply to by सुरिया

पुरस्कार परत केल्यावर ऍवोर्ड वापसी गॅंग म्हणून हिणवणार, नाही केला तर दुटप्पी म्हणणार. शेवट आपलीच टिमकी.
लोकांना कुठले दृष्टांत कधी व्हावे हे ठरवणारे तुम्ही कोण?
एकदम बरोबर.

In reply to by सुरिया

उगाच धावायची गरज नाही! हे लोक अजेंडा चालवतात हेच सत्य आहे. आता पहा -
  • गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी वरियावा अब्दुल वहाब महमूद नावाच्या इस्लामी धर्मोपदेशकाला अटकपूर्व जामीन नाकारला. याने किमान १०० हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा आरोप आहे.
  • या आधी उत्तर प्रदेश मध्ये गेल्या वर्षी मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर कासमी नावाच्या दोन व्यक्तींनी अवैध धर्मांतर रॅकेट चालवून किमान १००० हिंदूंचे धर्मांतर केले आहे.
मग या सर्व कार्याला मदत करणार्‍या संस्थांविषयी यांच्या तोंडून एक शब्द कसा येत नाही? येथे हिंदू भावना दुखावत नाहीत का?

In reply to by सुरिया

सुरिया, लोकमाता सुकळीकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्काराविषयी मला सापडलेली माहिती इथे आहे : https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/leave-the-tantrum-of-ne… या बातमीच्या शेवटी दिलेल्या किश्श्यावरनं कळतं की राणी बंग यांच्या मातोश्री आणि मोहन भागवतांच्या मातोश्री यांचे घरोब्याचे संबंध होते. एकंदरीत मोहन भागवत हे अभय बंग यांचे परिचित असावेत. अभय बंग हे गांधीवादी आहेत, जी विचारधारा मला रुचंत नाही. याउलट संघाची विचारधारा मला पटते. मात्र तरीही अभय बंग व मोहन भागवत दोहोंच्या कार्याबद्दल व व्यक्तिमत्वाबद्दल मला आदर आहे. अभय बंगांनी संघावर आरोप करण्यापूर्वी थोडी माहिती घेतली असती तर बरं पडलं असतं, असं राहून राहून वाटतं. संघात नक्की कश्या प्रकारे द्वेषाचं बीज रुजवलं जातं याविषयी अधिक माहिती बंगांनी द्यावयास हवी होती. आ.न., -गा.पै.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ट्विन टाॅवर पाडले, तिथे संघ नाही... श्रीलंकेत, चर्चवर हल्ला झाला, तिथे संघ नाही ... न्यूझीलंड मध्ये, चर्चवर हल्ला झाला, तिथे पण संघ नाही ... आमच्या सारख्या, सामान्य अशिक्षित जनतेला जे समजते, ते शिकलेल्या माणसांना समजत नाही .... ज्याची त्याची विचारसरणी ....

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जर संघाची मते मान्य नाहीत आणि इतका त्याचा त्रास होत आहे तर त्यांच्या प्रमुखाहस्ते पुरस्कार कशाला घ्यायचा? हे सगळे असेच भामटे आहेत हो!

In reply to by निनाद

जर संघाची मते मान्य नाहीत आणि इतका त्याचा त्रास होत आहे तर त्यांच्या प्रमुखाहस्ते पुरस्कार कशाला घ्यायचा?
इतकी साधी गोष्ट पण काही लोकांना समजत नाही. काय करणार. असल्या लोकांच्या तोंडी न लागणे उत्तम.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सहमत आहे काही लोकांचे आणि आपले विचार जुळत नसतील तर, अशा लोकांचे प्रतिसाद वाचून, सोडून देणेच उत्तम.... शिवाय, काही लोकांना एक ना धड, भाराभर आयडी घेण्यातच रस जास्त असू शकतो....

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पुरस्कारासाठी संघाने निवडलेले नाहिये डॉ़क्टर बंगांना. ते संस्थेने निवडलेय. सरसंघचालकांना फक्त पुरस्कार देण्यासाठी त्याच संस्थेने निवडलेय, इतकी साधी गोष्ट न समजता "काय करणार" वगैरे टेपा लावू नका. असल्या लोकांच्या तोंडी म्हणजे, ना तुम्हाला कुणी शिवीगाळ केलीय, ना कुणी अपशब्द वापरलेत तेंव्हा मुद्द्याला प्रतिवाद करता येत नसेल तर गप्प राहावे. विचारवंती भुमिका घेतलीय तर असे त्रागे करु नयेत.

In reply to by निनाद

हे सगळे असेच भामटे आहेत हो!
संघावर केलेली टीका हे सोडून डॉ. अभय बंग ह्यांन्च्या भामटेगिरीचा एखादा किस्सा सांगू शकाल? पुराव्यासहीत? नसेल सांगता येत तर माफी मागताल सार्वजनिक माध्यमांवर असे लिहिल्याबद्दल? भामटे असतील तर त्यांना पुरस्कार द्यायला सरसंघचालक, भारत सरकार कसे पुढे सरसावतात? अन्यथा ते तेंव्हा भामटे नव्हते, संघावर टीका केली की भामटे झाले असे तुमचे मत आहे का?

In reply to by सुरिया

इतरत्र का बोलत नाहीत? -- गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी वरियावा अब्दुल वहाब महमूद नावाच्या इस्लामी धर्मोपदेशकाला अटकपूर्व जामीन नाकारला. याने किमान १०० हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा आरोप आहे. या आधी उत्तर प्रदेश मध्ये गेल्या वर्षी मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर कासमी नावाच्या दोन व्यक्तींनी अवैध धर्मांतर रॅकेट चालवून किमान १००० हिंदूंचे धर्मांतर केले आहे. मग या सर्व कार्याला मदत करणार्‍या संस्थांविषयी यांच्या तोंडून एक शब्द कसा येत नाही? येथे हिंदू भावना दुखावत नाहीत का? -- यावर साळसूद पणे प्रतिसाद टाळला - हे लक्षात आले आहे. हीच ती भामटेगीरी!

In reply to by सुरिया

डॉ अभय बंग यांचे हे समाजवादी/ गांधीवादी विचारांचे आहेत. त्यामुळे रा स्व संघाचा द्वेष करणे हे वारसा हक्काने येणारच. मग त्याचा आपल्या कामाशी संबंध असो व नसो. कोव्हीड काळात त्यांनी ज्या तर्हेने अकलेचे तारे तोडले आहेत ते पाहून त्यांच्याबद्दल माझा आदर नक्कीच कमी झाला. https://indianexpress.com/article/india/faced-with-the-covid-crisis-gan… कुठल्याही काळात गांधीजींचे विचारच केवळ देशाला तारू शकतील हा भाबडा आशावाद वाचून हेच का डॉ बंग असा विचार आला. https://idronline.org/podcasts/on-the-contrary-podcast-social-impact/he… त्यांचे माझा साक्षात्कारी हृदयविकार हे पुस्तक सुद्धा मी फार आदराने वाचले होते पण मध्यानंतर ते पुस्तक जसे वाहवत गेले ते पाहून मला आश्चर्य वाटले होते. पण नंतर जसे जसे त्यांचे विचार वाचत गेलो तसे त्यांचे विचार कालबाह्य झालेले आहेत असेच माझे मत होत गेले. शेवटी आमच्या गुरूंनी सांगितलेली एक गोष्ट आठवत आहे. एखादा माणूस आपल्या कर्माने एखादे दैदिप्यमान काम करून जातो म्हणजे तो आयुष्यभर उत्तम कामच करत राहील हे मानणे हि फार मोठी चूक आहे. हे फार वेळेस दिसून येत आहे.

In reply to by सुबोध खरे

सहमत. हल्लीच्या काळातील गांधीवादी एक नंबरचे ढोंगी आहेत याचा पुरावा २६ जानेवारी २०२१ च्या दिल्लीतल्या घटनेनंतर मिळाला. तथाकथित शेतकरी आंदोलनात दिल्लीत धुडगूस घालून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून २००+ पोलिसांना त्या लोकांनी जखमी केले होते. अन्यथा गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणार्‍या किती गांधीवाद्यांनी या घटनेचा निषेध केला? आपल्या आंदोलनात हिंसाचार झाल्यानंतर साधनशुचितेला बाधा येते म्हणून पूर्ण आंदोलन गांधीजींनी मागे घेतले होते हे त्यापैकी सगळे लोक विसरले का? समजा सध्याच्या काळात त्या कारणाने आंदोलन मागे घेतले नाही तरी या प्रकारात झालेल्या हिंसाचाराचा गांधीवाद्यांनी निषेध केला का? की मोदींच्या निर्णयाविरोधात आंदोलन होते आणि असे आंदोलन केल्याने मोदी अडचणीत येतील अशी शक्यता असल्याने हिंसाचार झाला तरी तो या स्वयंघोषित गांधीवाद्यांना चालणार्‍यातला होता? हा मुद्दा इन जनरल सगळ्या गांधीवादी म्हणविणार्‍यांना लागू होतो.

In reply to by मुक्त विहारि

संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज ; डॉ. अभय बंग यांची परखड टीका
आव्हाडांनी कसमुसे यांना आपली बाजू ज्याप्रकारे समजावून सांगितली त्याप्रकारे संघ बंगांना आपली बाजू समजावून सांगणार नाही अशी खात्री असल्याने अशी टीका होत असावी का? --- संघावर यापूर्वी अशी टीका झाली होती का? त्यांनंतर अयोग्य टीका होऊ नये म्हणून संघाने काही पाऊले उचलली होती का? आत्मसन्मान (अयोग्य अशा टीकेपासून बचाव) जपण्यासाठी संघ (खरंतर एकूणच हिंदू नेते) काही करतो का? --- एके काळी एका हिंदू राजाने एका परकीय आक्रमकाला सोळा वेळा पराभूत करून जीवदान दिले होते; सतराव्यांदा मात्र त्याला तशी संधी मिळाली नाही. यातून हिंदू नेते काही शिकलेत का? स्व-अस्तित्वालाच हानी पोहोचवणारा सहिष्णूपणा हिंदू नेते कधी सोडणार का? --

In reply to by मुक्त विहारि

इकोसिस्टिमचा भाग आहेत, तेच बोलणार ज्यासाठी फंड येतो! चतूर फंड गोळा करणारा माणूस आहे. एखाद्या कॉर्पोरेट सारखे चालवात त्यांची संस्था. पैसा किंवा फायदा नसेल तर तेथे कार्य होत नाही. त्यामुळे पैसा आला तितके हे बोलणार आणि पैसा आटला की हे बंद पडणार. दुसरा मुद्दा म्हणजे मोठ्या धोरणाचा हा एक भाग असणार ज्यात यांच्या कडून एक वाक्य बोलवून घ्यायचे. मग त्याचा आधार घेऊन इतर आंदोलने/चळवळी/कार्यक्रम वगैरे निर्माण करायचे.

महसूलमंत्र्यांच्या भावासाठी चक्क बायपास वळवला; ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/turned-the-bypass-r… आजकाल, माझा योगायोगावरती, विश्र्वास बसायला लागला आहे...

In reply to by मुक्त विहारि

औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे वारे आले… नि भर उन्हाळ्यात फळबागा फुलल्या, गुपित काय? https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/… निव्वळ योगायोग असावा ....

मित्राच्या बर्थडे पार्टीहून रक्तबंबाळ होऊन परतलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू, गँग रेपच्या आरोपाखाली TMC नेत्याच्या मुलाला अटक https://www.lokmat.com/crime/west-begal-minor-girl-dies-after-suspected… हाथरसच्या वेळी जसे, परमपूज्य राहुल गांधी मदतीसाठी धावून गेले, तसे इथे नक्कीच जाणार नाहीत, हा माझा अंदाज आहे ...

आता घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही: गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची घोषणा https://www.tv9marathi.com/latest-news/homeowners-have-the-right-to-own… म्हणजे आता, सोसायटीची देणी बुडवून, एखाद्याने घर विकले तर? आमच्याच सोसायटीत ही भानगड झाली होती. सुदैवाने, घर विकत घेणार्याने, आधीच्या माणसाची, सोसाययटीची देणी फेडली. हाच व्यवहार परस्पर झाला असता, तर सोसायटीचे पैसे एकतर बुडीत खात्यात गेले असते किंवा कोर्ट कचेरीत वेळ वाया गेला असता...

In reply to by मुक्त विहारि

याला दोन्ही बाजू आहेत. सोसायटी विनाकारण NOC अडवू शकते ही पण एक बाजू आहे.

https://www.esakal.com/amp/maharashtra/sharad-pawars-comment-on-raj-tha… कायदा काय म्हणत? त्याप्रमाणे, निर्णय घेणे उत्तम... ह्यात उगाच धर्माला आणण्याची गरज नाही... कारण हाच कायदा, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, ह्या काळांत होणार्या ध्वनी प्रदूषणा बाबतीत देखील राबवता येईल...

13 वर्षीय नाबालिग हिन्दू लड़की से सादिक ने रजत त्यागी बन किया रेप https://hindi.opindia.com/national/haridwar-minor-hindu-girl-rape-accus… अशा वेळी, परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचा परिवार, जाणार नाहीत, असा अंदाज आहे ....

तिरंगे से साइकिल साफ कर रहा था रफीक, वीडियो वायरल होने के बाद लोगों ने दर्ज कराई शिकायत: उत्तराखंड पुलिस ने किया गिरफ्तार https://globaltimesbharat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A… अशा माणसांना, काय बोलणार?

रामनवमी की शोभायात्रा पर पथराव में घायल वृद्ध की मौत, हजारों की तादाद में लोग अंतिम यात्रा में हुए शामिल https://www.google.com/amp/s/www.bhaskar.com/amp/local/gujarat/news/the… काय बोलावं ते सुचेना ....

In reply to by श्रीगुरुजी

माहिती मिळाल्याशी कारण... आता खालचीच बातमी बघा... मला तरी ही बातमी, मराठी वृत्तपत्रांत मिळाली नाही... ‘हिंदुओं को चुन-चुनकर मार डालना चाहिए, मैं उनकी बहनों का बलात्कार करूँगा’: सबनम और दोस्त नदीम का ऑडियो क्लिप (https://hindi.opindia.com/national/hindus-girls-should-be-raped-and-kil…)

In reply to by श्रीगुरुजी

मी शक्यतो, इथे, मराठीतच लिहीतो, पण ज्ञानाला भाषेचे बंधन नकोच

In reply to by श्रीगुरुजी

लेखांच्या बाबतीत, मी देखील सहमत आहे पण, ज्ञानाच्या बाबतीत नाही ...

In reply to by मुक्त विहारि

मुक्तविहारी, ज्ञानास बंधन नको हे तत्त्वत: बरोबर आहे. नेमक्या याच कारणासाठी मराठीत ज्ञान आणायला हवं. कारण की मराठी अशी ज्ञानाभिमुख बनवल्याने तिचं संवर्धन होईल. ज्ञानावर बंधनं नसल्याने ज्ञानासोबत मराठी भाषेवरची बंधनंही आपसूकंच दूर होतील. आ.न., -गा.पै.

In reply to by मुक्त विहारि

आपण ज्या हिंदी बातम्या येथे चिकटविता त्यातून कोणते ज्ञान मिळते?

In reply to by श्रीगुरुजी

वरील बातम्यातून मला तरी इतकेच समजले की, रामनवमी शोभायात्रा काढली तर, आज दगडफेक झाली, उद्या कदाचित, शस्त्रांच्या सहाय्याने हल्ले देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.... इतरांच्या मनांत काही वेगळे मनन आणि चिंतन होत असेल .... घटना त्याच असल्या तरी, प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने, वेगवेगळी अनुमाने काढत असतातच... साधे एक बॅरोमीटर देखील, इमारतीची उंची मोजायची असेल तर, 5-6 प्रकारे वापरता येते .... मुळ लेख इंग्रजी मध्ये आहे .... जमल्यास जरूर वाचा .... http://wearcam.org/barometer.html

In reply to by मुक्त विहारि

देशात हिंदूत्ववादी पक्षाचे सरकार नसल्याने हिंदूंसोबत हे होतच राहनार

In reply to by श्रीगुरुजी

मराठी संकेतस्थळावर फक्त मराठी हवे. +१ हिंदीवादी हळूहळू आपली भाषआ लादत चाललेत.

In reply to by कॉमी

दिल्लीसारख्या योजना पंजाब किंवा इतर राज्यांमध्ये मध्ये शक्य नाहीत अशी चर्चा इथे झाली होती, कारण दिल्लीमध्ये केंद्र सरकार जास्त खर्च करते. पण हिमाचल प्रदेश आणि पंजाब दोन्ही राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात सेम योजना राबविल्या जात आहेत.

रशिया-युक्रेन यांच्या संघर्षा मधली सगळ्यात महत्वाची घटना घडली ती म्हणजे युक्रेन ने नेप्च्युन मिसाईल्सचा वापर करुन रशियाची मोस्कोवा काळ्या समुद्रात बुडवली. या घटनेवर अधिकची माहिती :- जाता जाता :- रशियन डिफॉल्टच्या बातम्या परत जालावर दिसत आहेत. [ Russia may be in default, Moody's says ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hanuman Chalisa

In reply to by मदनबाण

मदनबाण, इथे वेगळी माहिती आहे ( इंग्रजी दुवा ) : https://news.usni.org/2022/04/13/russian-navy-confirms-severe-damage-to… या बातमीनुसार मोस्क्वा वर आग लागली होती आणि ती ओढून नेत असतांना आग अनावर होऊन दारुगोळा पेटला व स्फोट होऊन ती बुडाली. मात्र ही आग नेमकी कशाने लागली हे कळू शकलेलं नाही. ते कदाचित क्षेपणास्त्रही असू शकतं. माझ्या मते वरील लेखातलं हे वाक्य महत्त्वाचं आहे :
Moskva the flagship of the Black Sea Fleet was severely damaged and the crew abandoned ship, the Russian Defense Ministry told TASS on Wednesday.
हे जर खरं असेल तर खलाशांना नौका सोडून जायला पुरेसा वेळ मिळालेला दिसतोय. क्षेपणास्त्राने आघात केल्यास इतका वेळ मिळणं असंभव वाटतं. अर्थात, जाणकार याबाबत अधिक प्रकाश टाकू शकतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी दिलेला पहिला व्हिडियो आता प्रायव्हेट केला गेला आहे. त्या व्हिडियोत क्षेपणास्त्र जहाजाच्या उजव्या बाजुने येऊन आदळते ते स्पस्ट दिसते. मॉस्को ने हे मान्य केले आहे. इलॉन मस्कच्या स्ट्रारलिंक सॅटलाईट्स चा वापर करुन हा हल्ला पूर्णत्वास नेला गेला. हे फ्लॅगशिप शिप बुडवल्या गेल्याने रशिया चवताळला गेला असुन आता आपण घमासान युद्धाकडे रशियाला वळताना पाहु असे मला असे वाटते... ते इंग्रजीत काय म्हणतात... वी आर स्लीप वॉकिंग इनटू अ न्यूक्लिअर वॉर. जाता जाता :- लंका बुडाली ! [ श्रीलंका डिफॉल्ट झाली. ]