Skip to main content

वासंतिक

लेखक मी-दिपाली यांनी शनिवार, 02/04/2022 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
सुरांबरोबरच कुंचल्यातून उतरलेली माझी कविता... व्हिडिओ पण नक्की पाहा आणि अभिप्राय जरूर कळवा. हिंडोल छेड भ्रमरा, सुमनांत आज, स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥धृ॥ ती शाल्मली बहरली, फुलला पलाश, आरक्त कुंकुम गमे, तबकात खास। ये औक्षणास अवनी, चढवून साज स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥१॥ मोहोर सोनपिवळा, परसात जाई, शिंपीत केशर सडा, मधुमास येई। पानांफुलांत भरला, नखरेल बाज, स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥२॥ तांबूस लाघव नवे, प्रसवेल कुक्षी, मंजूळ शीळ घुमवी, कुहु आम्रवृक्षी बेभान जीव प्रणयी, विसरून लाज, स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥३॥ या स्वागतास अवघे जग सिद्ध झाले, रस, रंग, गंध, रवही दिमतीस आले। सृष्टी अजून जपते नृपती रिवाज, स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥४॥ वृत्त - वसंततिलका (गागाल गाल ललगा ललगा लगागा)
लेखनविषय:

वाचने 2741
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सुंदर. निसर्ग कविता आवडली. व्हिडियो ही छान झालाय. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे