Skip to main content

तरीही…

लेखक मनिष यांनी शनिवार, 26/03/2022 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
Gulal शेंदूर दगडांचा उतरला तरीही, गुलाल भक्तीचा उधळत राही धुरळ्यात काही उमजत नाही, पावलांवर पाऊल पडत राही झापडे काढली डोळ्यांची तरिही उजेडाला डोळे हे सरावत नाही रक्त सांडले कळपात तरिही मेंढरे लांडग्याला ओळखत नाही पाणी डोळ्यातले रोखले तरिही लेखणीतून मग ते झरत राही ~ मनिष
लेखनविषय:

वाचने 1436
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

थोड्याच शब्दात एक मोठा संदेश हा कवीतेचा गुण मला फार आवडतो. कवीता आवडली.

आवडली रचना. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

धन्यवाद बिरुटे सर आणि कर्नल. एकाच कवितेत 'तरीही' च्या र्‍ह्स्व-दीर्घच्या चुका झाल्यात, त्याबद्द्ल क्षमस्व! _/\_