✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्मार्टफोन घ्यायचाय - सल्ला हवा

उ
उत्खनक यांनी
Fri, 03/04/2022 - 00:48  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, आजपावेतो १० हजाराच्या वरचा कधी फोन घेतला नाहीये. आता घ्यावा म्हणतो. आणि त्यासाठी सल्ला घेण्यासाठी मिपाशिवाय आणखी चांगली जागा कोणती? गरजः - गेमींग साठी नकोय. ऑफिसच्या कामासाठीच बहुतेक वेळ वापर होईल. [आऊटलूक/एक्सेल/स्लॅक/वेबेक्स] - साऊंड, डिस्प्ले, कॅमेरा आणि ऑपरेटींग परफॉर्मन्स चांगला हवा. - ब्लॉटवेअर्स शक्यतो कमी - प्रोसेसर आणि अँड्रॉईड वर्जन: पुढची निदान ५-६ वर्षे तरी फोन वापरता आला पाहीजे :-) बजेट: ३५-४० हजार पर्यंत. मी स्वतः शोधले तेव्हा सापडलेल्या काही मॉडेल्सचे तपशील चांगले वाटले [5G, 8gb/128gb वेरियंट्स - गूगल/सॅमसंग/मोटोरोला] अर्थात् अनेक चांगले ऑप्शन्स मी बघीतलेही नसतील. अन् मुळात एवढ्या रेंज मधले फोन कधी वापरलेलेच नसल्याने काही कळतही नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याची नितांत गरज आहे. :-)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42791 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

४-५ वर्ष खूपच होतात

गावठी फिलॉसॉफर
Tue, 03/08/2022 - 20:31 नवीन
सध्या फोन चे फिचर झटपट बदलत आहेत. वर्ष झालं की फोन चा कंटाळा येतो. आणि कंपनी कोणतीही आसूड
  • Log in or register to post comments

४-५ वर्ष खूपच होतात

गावठी फिलॉसॉफर
Tue, 03/08/2022 - 20:39 नवीन
2 वर्ष झालं की मोबाईल डबघाईला येतो.महागडा मोबाईल घेण्यापेक्षा स्वस्तातील ठराविक कालावधीने अपडेटेड मोबाईल घ्या. गमला, फुटला, भिजला... टेन्शन पण नाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गावठी फिलॉसॉफर

धर्मराज साहेबांच्या रूपाने

जेम्स वांड
Tue, 03/08/2022 - 20:55 नवीन
एक हाडाचा नोकियाकर मिळाल्याचा आनंद आहे, ती पाच अक्षरे भुरळ घालतात राव पण तर्कवादी ह्यांची फिलॉसॉफी थोडी शेयर करतो मी, पण एकंदरीत नोकिया प्रीमियम रेंज घ्यायला मन अजुन धजावत नाहीये.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे चार nokia आहेत.

कंजूस
Wed, 03/09/2022 - 03:05 नवीन
दोन बटणवाले. पण ओएस s40/60 नसलेले. एक माइक्रोसॉफ्ट ओएसवाला 630 एक माइक्रोसॉफ्टने बनवलेला लुमिया. ( चारही चालू आहेत पण 2G/3 G वर असल्याने outdated. आणि सपोर्ट गेला आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

@जेम्स वांडजी

तर्कवादी
Wed, 03/09/2022 - 16:14 नवीन
@जेम्स वांडजी
तर्कवादी ह्यांची फिलॉसॉफी थोडी शेयर करतो मी
म्हणजे ऑफलाईन /दुकानात मिळणारा मोबाईल याबद्दलच म्हणताय ना ?
नोकिया प्रीमियम रेंज घ्यायला मन अजुन धजावत नाहीये
१५ हजारापर्यंत चांगला येईल नोकियाचा - ६ जीबी रॅम असलेला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

येस

जेम्स वांड
गुरुवार, 03/10/2022 - 08:10 नवीन
फोन दुकानातूनच घ्यावा हे नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

फोनमधले प्रसेसर चिप आणि रेटिंग

कंजूस
Sun, 03/20/2022 - 06:00 नवीन
शोधताना nanoreview dot net/en/soc-list/rating ही यादी सापडली.
  • Log in or register to post comments

भारी आहे याददी !

चौथा कोनाडा
Mon, 03/21/2022 - 21:01 नवीन
भारी आहे याददी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कोणी लिनक्स फोन ट्राय केले काय

कासव
Mon, 03/28/2022 - 00:53 नवीन
उबंटू टच चांगलं वाटतं आहे पण अजून कधी वापरलं नाही. अर्थात application कमी असणार Ios ani Android सोडून काही ऑप्शन आहे का ?
  • Log in or register to post comments

Microsoft ने ओएस लाजंगलात सोडली.

कंजूस
Mon, 03/28/2022 - 05:31 नवीन
अन्यथा एक पर्याय राहिला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कासव

Kai OS

श्रीरंग_जोशी
Mon, 03/28/2022 - 08:30 नवीन
Kai OS - आय ओएस व अ‍ॅन्ड्रॉइडखेरीज बाजारात हीच एक ओस थोडं अस्तित्व राखून असावी. मी स्वतः २०२० सालापर्यंत ब्लॅकबेरी १० ओसचे फोन वापरत होतो. या ड्युओपॉलीला आव्हान देणारा तिसरा सशक्त पर्याय निर्माण व्हायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कासव

नोकिया एन९००

तुषार काळभोर
Mon, 03/28/2022 - 09:29 नवीन
लिनक्सचं Maemo वर्जन असलेला नोकिया एन९०० मी तीन चार वर्षे वापरलाय. अ‍ॅन्ड्रॉइडचं साम्राज्य प्रस्थापित होत असताना हा कदाचित सर्वात शक्तीशाली फोन होता. फिजीकल क्वेर्टी कीबोर्डने टाईप करणं म्हणजे सुख होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कासव

एका गोष्टीचे थोडे आश्चर्य

श्रीरंग_जोशी
Mon, 03/28/2022 - 08:25 नवीन
एका गोष्टीचे थोडे आश्चर्य वाटले की अ‍ॅन्ड्रॉइड फोन्सच्या विविध मॉडेल्सबाबत इतकी चर्चा होऊनही अजुन पिक्सल फोन्सचा उल्लेख झाला नाही.
  • Log in or register to post comments

किंमत जास्ती.

कंजूस
Mon, 03/28/2022 - 09:11 नवीन
साठ हजारच्या फोनात 4000mah battery, पण इतर फोनात 3000maAh. ही भारतीय युजरला पटणारी नाही. तो गेम खेळतो, विडिओ पाहतो, वाट,पचा धिंगाणा. मग कशी पुरणार एक दिवस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अनुमोदन

धर्मराजमुटके
Mon, 03/28/2022 - 09:39 नवीन
५०-६० हजार रुपडे मोबाईल च्या डबड्यात घालणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. १०-२० हजार च्या दरम्यान चे मोबाईल व्हॅल्यु फॉर मनी आहेत. शिवाय दोन तीन वर्षात नवीन घेता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

स्मार्ट फोन चे आता

सुबोध खरे
Mon, 03/28/2022 - 09:48 नवीन
स्मार्ट फोन चे आता मोटारीसारखे झाले आहे. थोडेसेच पैसे अधिक टाकले तर अधिक चांगले मॉडेल मिळते असं करत करत कितीही वरपर्यंत जाता येते. यामुळे सामान्य माणूस गोंधळात पडतो. माझ्या स्थापत्य अभियंता मित्राने फार वर्षांपूर्वी घराबद्दल सांगितलेली एक गोष्ट घरच नव्हे तर मोटार कार आणि भ्रमणध्वनी बद्दल लागू पडते. सामान्य मध्यम वर्गीय माणूस एक बेडरूमच्या घरासाठी बजेट तयार करून येतो तेंव्हा विकासक त्याला सांगतो साहेब बजेट थोडंसंच वाढवला तर तुम्हाला एक छानसा २ बेडरूमचा फ्लॅट मिळेल. माणूस त्या मोहात पडतो आणि आपले बजेट ताणून दोन बेडरूमचा फ्लॅट घेतो पण त्याची सजावट करण्यासाठी आता त्याच्याकडे पैसे उरत नाहीत. आणि मग पुढची पाच वर्षे त्या घराची सजावट लांबणीवर पडते आणि मग पाच वर्षात त्याला एकतर आहे तसे राहायची सवय होऊन जाते किंवा नवीन काहीतरी खर्च उपटतात आणि घराची सजावट राहून जाते. उच्च मध्यम वर्गाला हेच २ आणि तीन बेडरूम साठी लागू पडते. दोनच्या ऐवजी तिसरी बेडरूम "उद्या पाहूणे आले तर त्यांच्यासाठी होईल" या विचारानेच घेतली जाते आणि ती बहुतांश अडगळीची खोली होऊन राहते. अशीच स्थिती थोड्या फार प्रमाणात मोटारीला आणि आता स्मार्ट फोनसाठी लागू पडते. घरची माणसे तीन किंवा चार असताना ७ सीटर गाडी विकत घेतली जाते ज्याचा वाढीव इ एम आय महिन्याला आणि विम्याचा खर्च दर वर्षी आपल्याच बोडक्यावर बसतो. आपल्याला गरज नसताना भरपूर स्टोअरेज चा फोन विकत घेतला जातो आणि त्यात भरपूर कचरा आणि अडगळ (असे फोटो आणि व्हिडीओ) पडून राहते यामुळेच आपली खरी गरज किती हे जाणून आपण आपले जास्तीत जास्त बजेट किती हे ठरवायचे आणि त्याच किमतीच्या आतील कार किंवा फोन घ्यायचा
  • Log in or register to post comments

कुणाचा सल्ला न घेता फोन घ्यायला गेलेले गिऱ्हाईक

कंजूस
Mon, 03/28/2022 - 10:31 नवीन
दुकानदार लगेच ओळखतात आणि फोन गळ्यात मारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहमत.

कंजूस
Mon, 03/28/2022 - 10:35 नवीन
माझ्याकडे अमुक ब्रांडचा फोन आहे हे सांगण्याकरताच कधीकधी फोन घेथले जातात. तर गाडीचंही तसंच असणार. जिओ ड्राइव इन हे बहुतेक याचसाठी असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा