ताज्या घडामोडी मार्च - भाग २ येथून पुढे...
ऑड्रे ट्रुशके, अमन वडूद, डॉ वारिस हुसेन हे हिंदुत्वाविरुद्ध होळी साजरी करणार आहेत.
यासाठी'स्टुडंट्स अगेन्स्ट हिंदुत्व आयडॉलॉजी' किंवा SAHI अशी संस्था स्थापन केली गेली आहे. येल, कोलंबिया, कॉर्नेल, प्रिन्स्टन, वेलस्ली, मिशिगन स्टेट, ड्यूक आणि रटगर्ससह अमेरिकन युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये SAHI, HfHR आणि साधना या संस्थांनी एकत्रितपणे CAA आणि NRC विरुद्ध निदर्शने केली होती. संघटनेने भारतीय सरकारी अधिकार्यांवर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकन काँग्रेसला खुले पत्र लिहिले होते.
या वर्षी आता वेबिनार घेतला जाणार आहे.
लिबरल कट्टरवाद असा वाढवला जातो असे दिसते आहे.
प्रतिक्रिया
30 Mar 2022 - 12:40 pm | अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रात भाजपला मत का देऊ नये?सहमत श्रिगुरूजी, पिढ्यानपिढ्या खपून ज्यानी भाजप पक्ष वाढवला अशा विखेपाटील, राणे, दरेकर ह्या नेत्यांना पक्षात किंमत राहीलेली नाही नी खडसेंसारखे ऊपरे येऊन पक्षात मंत्रीपदे पटकावताहेत हे पाहून सामान्य भाजप कार्यकर्त्यांचा तिळपापड होतो.
तुमच्या सारखा भाजप कट्टर भाजप समर्थक जर भाजपला मत देनार नसेल तर ईतर कुंपनावरील लोक काय देनार?? पुढील निवडणूकीत भाजपचे पानिपत होनार आहे हे सांगायला ज्योतीषाची गरज नाही.
30 Mar 2022 - 3:19 pm | शाम भागवत
"फडणवीस" हा मुद्दा कसा काय आला नाही?
कृ.ह.घ्या.
😉
😎
30 Mar 2022 - 12:36 pm | अमरेंद्र बाहुबली
आप ला मत का देऊ नये?
आप ने दिल्ली मध्ये दंगलीत केलेली कामगिरी - आमदारांनी उघडपणे हिंदू विरोधी भुमिका घेणे.>>
हे कोणी ठरवले?? ह्याआधी कोर्ट पुरावे वगैरे पाहून ठरवायचे. तुम्ही स्वतला न्यायाधीश समजून स्वतच निकाल दिला का?? की आय टी सेलच्या फोरवर्ड्स वाचून ठोकून दिले??
सीएए विरोधाला सर्वतोपरी मदत देणे>>>
ह्याचा काय पुरावा?? की मी न्यायाधीश नी आयटी सेल संसंद ह्याखाली ठोकून दिले??
किसान आंदोलनाला सर्वतोपरी मदत देणे>>>
असं असेल तर मग आपलाच नतदान करायला हवे. ५०० अधिक शेतकर्यांनी जीव देऊन जो काळा कायदा मागे घ्यायला लावला त्याला आपचे समर्थन असेल तर आपला प्रत्येक देशप्रेमा व्यक्तिने मत द्यायलाच हवे.
अपेक्षा ही अजून खूप काही आहे...
31 Mar 2022 - 3:49 am | निनाद
लॉग इन करावे लागेल.
पण काय झाले ते यात दिसेलच!
30 Mar 2022 - 12:37 pm | अमरेंद्र बाहुबली
आप ला मत का देऊ नये?
आप ने दिल्ली मध्ये दंगलीत केलेली कामगिरी - आमदारांनी उघडपणे हिंदू विरोधी भुमिका घेणे.>>
हे कोणी ठरवले?? ह्याआधी कोर्ट पुरावे वगैरे पाहून ठरवायचे. तुम्ही स्वतला न्यायाधीश समजून स्वतच निकाल दिला का?? की आय टी सेलच्या फोरवर्ड्स वाचून ठोकून दिले??
सीएए विरोधाला सर्वतोपरी मदत देणे>>>
ह्याचा काय पुरावा?? की मी न्यायाधीश नी आयटी सेल संसंद ह्याखाली ठोकून दिले??
किसान आंदोलनाला सर्वतोपरी मदत देणे>>>
असं असेल तर मग आपलाच नतदान करायला हवे. ५०० अधिक शेतकर्यांनी जीव देऊन जो काळा कायदा मागे घ्यायला लावला त्याला आपचे समर्थन असेल तर आपला प्रत्येक देशप्रेमा व्यक्तिने मत द्यायलाच हवे.
अपेक्षा ही अजून खूप काही आहे...
25 Mar 2022 - 7:41 pm | गामा पैलवान
सुक्या,
तिथल्या लोकांनी त्याचा जाब तिथे विचारावा. भारतात येउन मग्रुरी करु नये.
श्रीलंकेत नागरी युद्ध सुरु झाल्यापासून असंख्य तामिळी लोक मृत वा निर्वासित झाले आहेत. काश्मीर फाईल्सच्या धर्तीवर जाफना फाईल्स असा चित्रपट यावर निघू शकतो. भारताने या प्रकरणी बोटचेपी भूमिका घेतल्याने श्रीलंकेतल्या तामिळी हिंदूंमध्ये श्रीलंका सरकारकडे जाब विचारायची ताकद उरलेली नाही. भारतात येऊन मग्रुरी दाखवायचीही शक्ती नाही.
अशीच परिस्थिती उद्या पाकिस्तान व/वा बांगलादेशातल्या हिंदूंची होऊ शकते. तसं झाल्यास काय करता येईल यावर चर्चा व्हावी म्हणून हा प्रतिसाद दिला आहे.
आ.न.,
-गा.पै.
25 Mar 2022 - 11:28 pm | सुक्या
गापै जी,
मुदलात घोळ आहे. पाकिस्तान व/वा बांगलादेशातले हिंदूं हे एके काळी भारताचा भाग होते. श्रीलंकेतल्या तामिळी हिंदूं चे तसे नाही. केवळ हिंदु आहेत म्हणुन जगातल्या कुठल्याही हिंदु ला भारतात खुले आमंत्रण आहे असे नाही. निर्वासित म्हणुन येण्याची एक प्रक्रिया असते. मुस्लिम म्हणून रोहिंग्याना पण भारतात घ्या असे पण खुप लोक म्हणत आहेत. तमिळ बघितले तर ते मलेशियात पण आहेत. ते का अधिकार्वाणीने मलेशिया ला सांगत नाही की आम्हाला नागरिकत्व द्या म्हणुन?
श्रीलंकेतले तामिळी हिंदूं भारत सरकारला विनंती करु शकतात. आमच्या जिवाला धोका आहे, काही दिवस निरवासित म्हणुन राहु द्या वगेरे विनंती करणे यात गैर काहीही नाही. पण आम्हाला येउ द्या , नोकरी द्या , घरे द्या, नागरीकत्व द्या वगेरे वगेरे मागण्या ते करु शकत नाही.
तमीळ लोकांची "आम्ही तमिळ आहोत, आमची भाषा / संस्क्रुती वगेरे महान आहेत, तुम्हाला काहीही माहीती नाही" असल्या फुकाचा बाता डोक्यात जातात ... हे निरिक्षण नाही तर स्वानुभव आहे. (धाग्याचे काश्मिर होउ नये म्हणुन इथेच थांबतो)
26 Mar 2022 - 8:24 am | उपयोजक
आम्ही तमिळ आहोत, आमची भाषा / संस्क्रुती वगेरे महान आहेत, तुम्हाला काहीही माहीती नाही" असल्या फुकाचा बाता डोक्यात जातातअसे लोक तुम्हाला महाराष्ट्रातही आढळतील. मराठा साम्राज्य ३०० वर्षांपूर्वी सगळ्या भारतावर होतं, जय शिवाजी जय भवानी, बाजीराव पेशवे ,पानिपत वगैरे. मग काही(सगळे नव्हे) मराठी लोकांचं हे इतिहासात रमणं आणि काही वल्गना करणं हे तुमच्या डोक्यात कधी जात नाही का? आणि काही मराठी लोकांच्या वल्गनांवरुन तुम्ही समस्त मराठी समाज तशाच विचारांचा आहे असा निष्कर्ष काढता का? सगळा मराठी समाज इतिहासातच रमणारा,वल्गना करणारा आहे? उद्या काही कारणाने मराठी लोकांना निर्वासित व्हावं लागलं तर त्याहीवेळी तुमची हीच भुमिका असेल का?
27 Mar 2022 - 12:19 am | सुक्या
प्रश्न आकसाचा नाही. मानसिकतेचा आहे. ३०० वर्षापुर्वी मराठा सामाज्य अटकेपार होते हे सत्य आहे परंतु त्यामुळे "आम्हीच भारी आहोत" असा फुकाचा अभिमान बाळगनारा मराठा अजुन भेटला नाही. तमीळ लोक हे कुठेही असोत ते प्रथम तमिळ असतात मग बाकी. म्हणजे प्रथम तमिळ मग भारतिय, प्रथम तमिळ मग श्रीलंकन, प्रथम तमिळ मग इतर असे.
वरुन मग्रुरी नसा नसात भरलेली. आजही हे लोक दक्षिणेत हिंदी ला विरोध करतात यात त्यांची वर्चस्ववादी भुमीका जास्त आहे. त्यांन ईंग्रजी चालते पण हिंदी चालत नाही. मायदेशात अ त्याचार होत असतील तर मानवतेच्या भुमीकेतुन निरवासित म्हणुन येउ देणे / त्याची विणंती करणे यात गैर काही नाही. भारतानेही त्यावर योग्य पावले उचलावीत. मला त्यात काहीही वावगे वाटत नाही. परंतु इथे निरवासित म्हणुन येउन इथे दम्बाजी करणे मला योग्य वाटत नाही. माझा आक्षेप त्यावर आहे.
27 Mar 2022 - 12:56 am | अमरेंद्र बाहुबली
आजही हे लोक दक्षिणेत हिंदी ला विरोध करतात यात त्यांची वर्चस्ववादी भुमीका जास्त आहे.हिंदी ला विरोध करून ते लोक काय चुकीचं करतात? युपी ची भाषा त्यानी का म्हणून स्विकारावी? आणी प्रादेशीक अस्मिता असन्यात वाईट काय? मला तरी कुणी तमीळवाईट भेटला नाही. आणी श्रिलंकेतील तमीळ हिंदूंना भारत सरकारने तात्काळ नागरीकत्व द्यावे अट फक्त हिंदू असावा ईतकीच ठेवावी.27 Mar 2022 - 5:28 pm | मुक्त विहारि
कारण, केंद्रीय संस्था मध्ये नौकरी करायची असेल तर, हिंदी भाषा यायला हवी.
शिवाय, आपल्या राज्य भाषे व्यतिरिक्त, इतर राज्यांपैकी एक भाषा यायला हवी, वैयक्तिक पातळीवर खूप फायदा होतो...
मला आणि माझ्या बायकोला, गुजराथी बर्या पैकी येते.
मोठा मुलगा सध्या कोलकत्ता येथे आहे आणि त्याला देखील, काम चलाऊ बंगाली येते....
25 Mar 2022 - 8:23 pm | कॉमी
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा चांगला निर्णय.
महाराष्ट्रात नेत्यांना घरं देण्याच्या पार्श्र्वभूमीवर पंजाब मधला हा निर्णय आणखी उठून दिसतो आहे.
26 Mar 2022 - 5:38 am | कंजूस
तिथे जन्मलेले प्रत्येक मूल श्रीलंकेचे नागरिक होत नाही का? का ते 'श्रीलंकेचे तमिळच' राहतात?
26 Mar 2022 - 5:54 am | निनाद
नई मंडी कोतवाली भागातील एका गावातील एक महिला संध्याकाळी तिच्या पतीसोबत सासरच्या घरी जात होती. सायंकाळी ७ च्या सुमारास ते भोपा बायपासजवळ आले असता मागून मोटारसायकलवर आलेल्या दहा गुन्हेगारांनी त्यांना घेराव घातला. बदमाशांनी महिला आणि तिच्या पतीचे अपहरण केले आणि त्यांना जवळच्या जंगलात नेले. पतीला झाडाला बांधले आणि महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नराधमांनी पतीला मारहाण केली आणि पोलिसांना कळवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि ते पळून गेले.
उस्मान नावाचा एक आरोपी सामूहिक बलात्काराचा मुख्य सूत्रधार आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आशु, इर्शाद, जावेद, मखियाली गावातील शाहरुख आणि मदिना कॉलनीतील उस्मान, आबिद, शाहवेज, शादाब यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी दोन आरोपी किशोरवयीन आहेत.
27 Mar 2022 - 5:14 pm | मुक्त विहारि
हे वाचणे रोचक ठरेल
26 Mar 2022 - 4:33 pm | गामा पैलवान
सुक्या,
थोड्या वेगळ्या शब्दांत प्रकरण मांडतो.
ज्या प्रकारे काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला अगदी तसंच धोरण श्रीलंका सरकार १९५५ सालापासनं राबवतंय. हे हिंदू तामिळ भाषिक असून ते श्रीलंकेत गेल्या २००० वर्षांपासून राहताहेत. या विच्छेदाच्या विरोधात भारताने ठोस भूमिका घेतलेली नाहीये. ती घ्यायला हवी व श्रीलंकी तामिळींना श्रीलंकेत शांतपणे जगू देण्यास श्रीलंका शासनास भारताने भाग पाडावं इतकी किमान अपेक्षा आहे.
आता ते ही जर शक्य नसेल तर श्रीलंकी तामिळींना निर्वासित वा अन्य छत्राखाली आश्रय तरी द्यावा अशी त्यांची विनंती आहे. आज श्रीलंकेत खाण्याचे वांधे झाले तर तामिळींनी ते केवळ हिंदू आहेत म्हणून मरून जावं का, असा प्रश्न आहे.
श्रीलंकेस मानव्यकारणार्थ भारताने मदत करायला हरकत नाही. पण मग त्यावर आधी तामिळी हिंदूंना मदत व्हावी, इतकाच आग्रह आहे.
आ.न.,
-गा.पै.
26 Mar 2022 - 4:56 pm | चौकस२१२
गामाजी तुमच ,म्हणणं थोड थोड पटतंय
जसे वैश्विक मुस्लिम बंधुत्व ( उम्मा कि काय ते ) तसे हिंदूंसाठी एकाच देश सर्वात मोठा आहे तो म्हणजे भारत त्यामुळे करावी असे पीडित हिंदूंना वाटणे स्वाभाविक आहे
पण पण मनात काय येतंय ते ( सध्याचं संधर्भात ) ते जरा सांगतो
का कोण जाणे पण काश्मिरी हिंदूंचंबद्दल आत्मीयता वाटतीय तेवढी श्रीलंकेतील तामिळ हिंदू बद्दल वाटत नाहीये
हा आकस असण्याचाच कारण कदाचित हे कि येवडः सोसून सुद्धा काश्मिरी हिंदू " काश्मिरीयत" पेक्सह भारतीय हिंदू म्हणू न बोलतातआणि त्यांचं बद्दल काह आदार वाढतो तेच जेवहा तामिळ एल्म चालू होता तेवहा " तामिळ असणं हे भारतीय असण्यापेक्षा जास्त दिसत होत आणि ते कुठे तरी खटकले
भारत आधी मग महाराष्ट्र्र नंतर हे म्हणायला मी तयार आहे, भारत आधी , तामिळ नंतर असं हे म्हण्याला किती तामिळ तयार होतील अशी शंकेची पाल मनात चुकचुकते
26 Mar 2022 - 7:55 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
१.
तामिळ असणं हे भारतीय असण्यापेक्षा जरा जास्त दिसंत असेल तर ते भारतीय तामिळींच्या बाबतीत. पण श्रीलंकेतल्या तामिळांना फक्त ईलम हा एकमेव आधार आहे. ते स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ शकंत नाहीत. हा ईलम चंद्रिका कुमारतुंगा बाईंनी २००४ साली संपवला.
श्रीलंकी तामिळींनी १९५५ ते १९७० पर्यंत सनदशीर मार्गाने आपल्यावरील दडपशाहीची तड लावायचा प्रयत्न कसोशीने केला. तो असफल ठरू लागल्यावर शेवटी नाईलाजाने १९७२ साली हत्यार उचललं. आज भारत सोडल्यास त्यांना दुसरा कोणताही आधार नाही.
२.
काश्मिरी हिंदूंची काहीतरी माहिती होती उर्वरित भारतीयांना. पण यांची अवस्था अधिकंच बिकट आहे. त्यांची तामिळ भाषाही भारतीय मुख्य धारेपासून वेगळी पडलेली असल्याने त्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडण्यावर मर्यादा येतात. त्यासाठी कोणीतरी बिगरतामिळ हवा.
जाफना फाईल्स नामे चित्रपट हा कदाचित एक मार्ग असू शकतो.
आ.न.,
-गा.पै.
27 Mar 2022 - 8:36 am | चौकस२१२
श्रीलंकेतल्या तामिळांना फक्त ईलम हा एकमेव आधार आहे.
मान्य कि भारतीय तामिळ आणि श्रीलंकेतील तामिळ यान्चायत फरक आहे पण श्रीलंकेतील तामिळ हिंदू जर एल्म म्हणजे भारतातून तामिळनाडू तोडून जर असेल तर मात्र मान्य नाही .. भारतात निर्वासित या किंवा श्रीलंकेतील सिह लींवर दबाव आणावा आणि थेतील तामिळांना चांगली वागणूक मिळेल असे बघावे
पण एल्म नको
28 Mar 2022 - 9:56 am | धर्मराजमुटके
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. यशवंत जाधव यांच्यासारखा मातृभक्त आजपर्यंत माझ्या पहाण्यात आला नव्हता. मातोश्री ला वाढदिवसाची भेट म्हणून चक्क पन्नास लाखाचे घड्याळ आणि मातोश्रींच्या स्मरणार्थ गरजूंना २ कोटी रुपयाच्या भेटवस्तू दिल्या.
मी माझ्या आईला आयुष्यभरात काही देऊ शकलो नाही. वडीलांना कोणतेही वचन देऊ शकलो नाही याची खंत मला आयुष्यभर छळत राहिल.
28 Mar 2022 - 2:11 pm | इरसाल
असु द्या नका खट्टु होउ. आपणा सर्वांकडे एकच "मातोश्री" आहे "मातोश्री २ " नाही.
29 Mar 2022 - 3:59 pm | शाम भागवत
अहो पण मूळ मुद्दा, किती खर्च केला, व कोणावर केला, हा नाही आहे.
ते पैसे आणले कुठून असा प्रश्न आयकर वाले विचारत आहेत.
तेवढे सोडून बाकी सगळ्यावर चर्चा चालू आहे.
:))
28 Mar 2022 - 10:03 am | धर्मराजमुटके
देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी म्हणाले की,
१. लव जिहाद हा एक प्रोपगंडा आहे. यात मुस्लीम मुलींना अधिक धोका आहे. कारण त्यांच्या नजरेतून पाहिलं तर शिकलेल्या हिंदू मुली मुस्लीम मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात.
२. हिजाब आवश्यक आहे की नाही हे मौलवी ठरवतील, न्यायाधीश नाही.
भारतच्या ह्या सुपिक जमिनीत विचारवंतांचे अफाट पीक येते असे मी केवळ इतिहासात ऐकले होते. मात्र माझ्या जीवनकाळादरम्यान देखील विचारवंतांची निर्मिती थांबलेली नाही हे पाहून डोळे पाणावले. आता एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस बोलतो म्हणजे त्यात तथ्य असणारच.
30 Mar 2022 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) आज पोट धरुन धरुन असलो. पण बाकी, काहीही असो. आपण पदावरुन पायउतार झाल्यानंतर मी मिपाची शप्पथ घेऊन सांगतो. मी पंतप्रधान पदाचा कायम आदर करीन राहीन. शब्द म्हणजे शब्द. आपलं भांडण हलवायाशी त्याच्याशी जिल्बीशी नाही, हे आपलं कायम धोरण आहे. =))
-दिलीप बिरुटे
30 Mar 2022 - 5:59 pm | चंद्रसूर्यकुमार
पंजाबमध्ये पक्षाचा पराभव झाल्यानंतर भाजप अरविंद केजरीवालांची हत्या करू इच्छित आहे आणि आपण त्याविषयी रीतसर तक्रार दाखल करणार आहोत असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/bjp-wants-to-kill-arvind-...
एकूणच हे लोक कधी जन्मात सुधारणार नाहीत असे दिसते. असला खुळेपणा आणि अपरिपक्वता या बाबतीत आपची स्पर्धा केवळ शिवसेनेशी आणि केजरीवाल-सिसोदिया जोडगोळीची तुलना केवळ उध्दव ठाकरे- संजय राऊत या जोडगोळीशीच होईल.
30 Mar 2022 - 10:11 pm | अमरेंद्र बाहुबली
सत्तेसाठी मेहबूबा मुफ्ती शी युती करनारे, ईतरत्र गायीला आई माणून हिंदूत्वाचा आव आणणारे पण गोव्यात सत्तेसाठी बिफ कमी पडू देनार नाही असं सांगनारे, पहाटे ऊठून राष्ट्रवादीबरोबर शपथा घेनारे, सत्तेसाठी अनेक हिंदूविरोधी नी भ्रष्टांना पक्षात घेनारे भाजपेयी सत्तेसाठी केजरीवालांची हत्या करायला ही मागे पुढे पाहनार नाहीत हे सिसोदीयांनी ओळखले असावे.
31 Mar 2022 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजपा गुंड-मवाल्यांचा पक्ष नाही असे कोणी म्हणनार नाही. तडीपार लोक केंद्रात मोठ्या पदावर आहेत असा आरोप अनेकदा केला जातो. पण पंजाबवरील पराभवामुळे भाजपा या थराला पोहचेल असे वाटत नव्हते, सिसोदिया बोललेच होते आणि भाजपा ते करुन दाखवले. आता फक्त घराची तोडफोड केली हत्या कुठे केली असे म्हणू नका म्हणजे झालं. ही घटना कालची आहे, आज सर्वच दैनिकांमधे छापून आली आहे. फोटो मटाच्या सौजन्याने.
-दिलीप बिरुटे
31 Mar 2022 - 2:31 pm | प्रदीप
" ही घटना कालची आहे, आज सर्वच दैनिकांमधे छापून आली आहे. फोटो मटाच्या सौजन्याने."
ह्यावरून हे जे लोक तिथे तोडफोड करतांना दिसत आहेत ते भाजपचे गुंड आहेत, हे तुम्हाला नक्की कशावरून समजले? मटाच्या फोटोच्या मथळ्यावरून? तसे असेल तर, पुढे जाऊयांत. मटा, लोकसत्ता इत्यादी मराठी मुख्यप्रवाही मीडियाची विश्वासार्हता आता फारशी उरलेली नाही.
31 Mar 2022 - 7:55 pm | कॉमी
Delhi Police has initiated an internal enquiry to find how 15-20 members of the Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM), along with its national president and Lok Sabha MP Tejaswi Surya, got past the third barricade of the North district police and reached the main gate of Chief Minister Arvind Kejriwal’s residence in Civil Lines, where they broke the boom barrier and kicked and banged the main gate before painting it red.
31 Mar 2022 - 8:51 pm | प्रदीप
हे पाहिले नव्हते. तसे असेल तर ते गंभीर आहे. मात्र हेही खरे की
१. केजरीवलांच्या म्हणण्यानुसार, ह्या लोकांना खरेच काही गंभीर करायचे असते, तर ते इतक्या बाळूपणे तेथे गेले नसते. मात्र ह्याबद्दल काही लिहीणे अयोग्य आहे, कारण ही केस दाखल झालेली आहे. (अवांतरः तेजस्वी सूर्या हा अतिशय वाह्यात व वाचाळ मूर्ख आहे).
२. पूर्वीही केजरीवालांच्या संदर्भांत असल्या घटना सातत्याने होत राहिल्या आहेत. दर वेळी त्यांनी व त्यांच्या पक्षाने, तात्काळ भाजपवर आरोप केले आहेत. त्यांतील एक पूर्वीची घटना वगळता, इतर सर्व त्यांच्याच पक्षांतील लोकांनी घडवून आणलेल्या होत्या. येथे पहा.
30 Mar 2022 - 8:41 pm | कंजूस
तिकडे कुणी नकारात्मक प्रचार केला नव्हता. अमुक तमुकला मते देऊ नका वगैरे. आपने जे दिल्लीत केले ते पंजाबात करण्याची संधी जनतेने दिली.
31 Mar 2022 - 9:51 am | रात्रीचे चांदणे
कायदा हातात घेऊन भाजपानेच आपच्या हातात कोलीत दिले आहे, आतां आपवाले ह्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणारच. आपच्या जागी भाजपा असली असती तरी त्यांनी पण हेच केले असते.
31 Mar 2022 - 10:53 am | चंद्रसूर्यकुमार
आपवाले फायदा घ्यायचा प्रयत्न करतील हे राजकारण होईलच. जरी काही झाले नसते तरी भोकाड पसरण्यात केजरीवाल आणि त्याच्या पक्षाचा कोणीही हात धरू शकणार नाही तेव्हा थोडेफार काहीतरी झाल्यावर तो प्रयत्न होणारच. केजरीवालच्या घरावर हल्ला व्हायला नको होता असे मला वाटत असले तरी या प्रकाराचा मी निषेध वगैरे काही करणार नाही.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्ली विधानसभेत काश्मीर फाईल्स चित्रपटाविरोधात जे निर्लज्ज वक्तव्य केले त्याची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. जर हा मनुष्य सांड की आख वगैरे चित्रपटांना दिल्लीत करमाफी देऊ शकत असेल (https://www.hindustantimes.com/bollywood/saand-ki-aankh-made-tax-free-in...) तर काश्मीर फाईल्स या वस्तुस्थिती दर्शविणार्या चित्रपटालाही तशी द्यावी अशी अपेक्षा केली तर त्यात काय चुकले? त्या सांडकी आख मध्ये एक नायिका तापसी पन्नू होती आणि तिचा आआपविषयीचा दृष्टीकोन जगजाहीर आहे. म्हणजे आपल्या पक्षाच्या समर्थकाच्या चित्रपटाला केजरीवालांनी दिल्लीच्या करदात्यांच्या पैशाने मदत केली की नाही? मग काश्मीरी हिंदूंचे दु:ख दर्शविणार्या चित्रपटाला पण तशीच करमाफी केजरीवालांनी दिली असती तर काय आभाळ कोसळणार होते का? ठीक आहे. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती तंग असताना अशी करमाफी देऊ शकत नसाल तर निदान खिल्ली तरी उडवू नका. ते पण त्यांनी केले. हा प्रकार काश्मीरी हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला. मग त्याची प्रतिक्रिया कुठेतरी उमटणारच.
दुसरे म्हणजे दिल्लीहून काही किलोमीटर्सवर उत्तर प्रदेशात दादरी येथे अखलाखला जमावाने मारल्याची घटना ७ वर्षांपूर्वी झाली होती तेव्हा हेच केजरीवाल तिथे अगदी धाऊन गेले होते. आणि काश्मीरी हिंदूंच्या दु:खावर मात्र मीठ चोळायला पुढे. असले काही बघितल्यावर निदर्शकांचा राग अधिक अनावर झाला असेल तर ते पण समजू शकतो. अर्थात असा हल्ला व्हायला नको होता हे तितकेच खरे पण हल्ला झाला म्हणून लगेच त्याचा निषेध वगैरे करायला जावे असे मला व्यक्तिशः अजिबात वाटत नाही.
तिसरे म्हणजे ७ वर्षांपूर्वीच झालेल्या दोन घटनांकडे लक्ष वेधून घेतो. २०१५ मध्ये दिल्लीत मोठा विजय मिळविल्यानंतर लगेच महिना दीड महिन्यात योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषणना पक्षातून हाकलण्यासाठी घेतलेल्या पक्षाच्या बैठकीत बॉक्सर्सना आणले गेले होते ही घटना फार जुनी नाही. योया आणि प्रभू या दोघांविषयी मला अजिबात म्हणजे अजिबात सहानुभूती नाही. ते दोघे पण केजरीवालांसारखेच आहेत. पण सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्या विरोधी आवाजाला दडपायला बॉक्सर्स आणणे म्हणजे गरज लागल्यास हिंसेचा वापर करायला केजरीवाल या गृहस्थाची ना नव्हती. तसे असेल तर मग विरोधी गटही कधीतरी हिंसाचार करायला लागला तर त्याविषयी अवाक्षर बोलायचा अधिकार त्यांना नाही. दुसरी घटना होती जंतरमंतरला झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात एका शेतकर्याने गळफास लाऊन आत्महत्या करायची. योया आणि प्रभूंना पक्षातून हाकलल्यानंतर काही दिवसात घडलेला तो प्रकार होता. तो प्रकार अश्लाघ्य नव्हता का? आता बाजू आपल्यावर उलटायला लागल्यावर लगेच या गृहस्थाला मोठी मोठी तत्वे आठवत असतील तर त्याचा उपयोग नाही. रथाचे चाक जमिनीत रूतल्यावरच जर कर्णाला धर्म आठवायला लागला तर ते कसे चालेल?
चौथे म्हणजे अजून एका घटनेविषयी लिहित आहे आणि ती घटना ७ वर्षे जुनी नाही तर त्या घटनेला अजून तीन महिनेही पूर्ण झालेले नाहीत. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाबमध्ये फिरोजपूरला पंजाब पोलिसांकडून ढिसाळपणा झाला आणि ते फ्लायओव्हरवर काही मिनिटे अडकून पडले होते ही घटना जानेवारी २०२२ मधील. तेव्हा सगळे विरोधक (आपवाल्यांसह) टाळ्या पिटत नव्हते का? तेव्हा या लोकांची प्रतिक्रिया काय होती? तर तथाकथित शेतकरीविरोधी कायद्यांमुळे जनतेतून उमटलेली ती प्रतिक्रिया होती असे हे लोक म्हणाले नव्हते का? तसे असेल तर कालच्या घटनेनंतर आपविरोधकांनी सौजन्याची भूमिका घ्यावी ही अपेक्षा करता येणार नाही. सौजन्याचा आणि सोवळेपणाचा मक्ता आम्हीच घेतलेला नाही. मी तर म्हणतो की केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत काश्मीरी पंडितांच्या जखमेवर मीठ चोळले होते त्याविरूध्द आलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. फिरोजपूरच्या घटनेत मोदींची गाडी फ्लायओव्हरवर अडकून पडली होती आणि ते ठिकाण पाकिस्तानच्या सीमेपासून काही किलोमीटरवर होते हे लक्षात घेता ती घटना कितीतरी जास्त गंभीर होती. मोदी तिथून जायच्या आधीच अमरिंदरसिंग १५-२० मिनिटे त्याच ठिकाणाहून पुढे गेले होते तेव्हा रस्ता मोकळा होता. याचाच अर्थ मोदी तिथून जाणार आहेत ही माहिती जमावाकडे आधीच होती आणि योग्य वेळेस ते लोक तिथे एकत्र आले. अशा घटनेवर जर टाळ्या पिटणारे लोक असतील तर मग अशा लोकांच्या म्होरक्याच्या घराच्या गेटवर ५०-१०० लोक जमून फार तर गेट तोडायचा प्रयत्न केला असेल तर त्याचा निषेध वगैरे मी तरी अजिबात करणार नाही.
असो.
31 Mar 2022 - 8:57 pm | अर्धवटराव
मला आठवतय त्यानुसार हे हि गरज भासली होती आणि केजरीवाल विरोधी गटाला प्रसाद देखील मिळाला होता :ड
31 Mar 2022 - 10:30 am | कंजूस
निवडणुका लढवू शकते का?