सध्या ऑनलाईन इंग्लिश शब्दखेळांचे विश्वात Wordle हा पंचाक्षरी खेळ जबरदस्त लोकप्रिय झालाय. याचा उल्लेख मी शब्दखेळांच्या ‘चौकटीतील रत्ने’ या जुन्या धाग्यावर केला होता. त्याला एक प्रतिसाद आला. मग असा विचार केला की, जास्तीत जास्त शब्दप्रेमींना तो माहित होण्यासाठी नवा धागा काढलेला बरा.
तुमच्यातील काहीजण हा खेळ खेळून त्याचा आनंद घेत असतील हे नक्की. परंतु माहित नसलेल्यांसाठी हा परिचय धागा.
हा खेळ तीन स्वरूपात उपलब्ध आहे :
1. दैनंदिन एक शब्द : याचे आतापर्यंत 216 भाग झालेत.
2. वरील सर्व जुन्या भागांचा संग्रहित खेळ
3. अमर्यादित खेळ
नवागतांसाठी आपण प्रथम दैनंदिन खेळ पाहू.
1. खेळ निर्मात्याने एक ५ अक्षरी शब्द योजलेला असतो. तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठी या शब्दाचा अर्थ/ भावार्थ/ समानार्थ इत्यादी काहीही दिलेले नाही. मग ओळखायचा तरी कसा ?
खेळाच्या पटलावर पाच अक्षरी सहा ओळी दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या ओळीत तुम्ही कुठलाही आवडीचा पंचाक्षरी शब्द लिहायचा उदाहरणार्थ CHAIR. मग खेळातील enter दाबायचे.
ते दाबल्यावर प्रत्येक अक्षराची चौकट एका रंगाने भरेल. हे रंग तीन प्रकारचे आहेत.
त्यांचा अर्थ असा :
१. हिरवा : ते अक्षर अपेक्षित शब्दात त्याच स्थानी आहे; म्हणजे बरोबर.
२. पिवळट : ते अक्षर शब्दात आहे पण तुमचे स्थान चुकले आहे.
३. राखाडी : ते अक्षर त्या शब्दात अजिबात नाही.
आता पहिल्या ओळीतील हे रंगीत दृश्य हेच तुमचे पुढचे शोधसूत्र ठरते. त्यानुसार तुम्ही सुधारित शब्द पुढच्या ओळीसाठी तयार करायचा.
हा करताना एक लक्षात ठेवायचे :
• हिरव्या अक्षराचे स्थान कायम ठेवायचे
• वर ज्या अक्षरांची चौकट राखाडी झालेली आहे ती अक्षरे वापरायची नाहीत.
• जी अक्षरे पिवळी झाली होती त्यांचे स्थान बदलायचं.
आता याप्रकारे नवीन जुळवलेला शब्द दुसऱ्या रांगेत भरा. पुन्हा enter दाबा. पुन्हा चौकटी ३ रंगांनी भरतील.
असे करत करत जास्तीत जास्त सहा प्रयत्नात बरोबर उत्तर आले पाहिजे. ज्या क्षणी तुमचे उत्तर बरोबर येते तेव्हा सर्व चौकटी हिरव्या रंगाने भरतात व खेळ संपतो.
...
एव्हाना तुमच्या लक्षात येईल की हा खेळ आपल्यातील कोणीही खेळू शकतो- अगदी दहावी पास विद्यार्थी देखील ! त्यासाठी शब्दार्थ, समानार्थ अशा भाषाज्ञानाची गरज नाही. तुम्हाला लढवायचा आहे तो तुमचा तर्क.
या प्रकारे दैनंदिन खेळ तीन-चार दिवस खेळलात की त्याची गोडी लागते. लवकरच त्याचे व्यसन जडते ! मग 24 तासांसाठी फक्त एक शब्द पुरत नाही. 😀
मग काय करायचे ? घाबरू नका त्यासाठी पुढची पायरी तयार आहे :
2. संग्रहित खेळ : इथे हवा त्या प्रकारे खेळ निवडण्याचे विविध पर्याय आहेत. त्यातील choose बटणावर टिचकी मारल्यावर तुमच्यापुढे १ पासून कालपर्यंत झालेल्या दिवसांचे अंक आहेत. कुठल्याही शब्दाचे उत्तर अर्थातच कुठेही दिलेले नाही. तुम्ही कुठलाही अंक निवडा किंवा Random हे बटन निवडूनही खेळ सुरू करू शकता. या प्रकारे तुम्ही एकाहून अधिक शब्द लागोपाठ तुमच्या आवडीनुसार खेळू शकता. हे खेळता-खेळता तुमचे इथले सर्व शब्द संपले आणि तुम्ही जर अट्टल व्यसनी झालेला असाल तर मग पुढची पायरी तयार आहे : 😄
3. अमर्यादित खेळ : तुमच्या सवडीने कधीही इथे या आणि हवे तेवढे खेळत बसा ! पण याची शिफारस मी करत नाही. इथे त्यांनी शब्दखेळांचे काही मूलभूत नियम पाळलेले नाहीत.
नवोदितांनो,
या तर, सुरू करा या खेळाच्या दैनंदिन प्रकारापासून. तुमचे अनुभव जरूर लिहा. मात्र एखादा दिवस(24 तास) संपल्याशिवाय ओळखलेला शब्द इथे लिहू नका. कारण तोच शब्द त्या संस्थळावर सर्वांसाठी समान असणार आहे.
या पंचाक्षरीचे व्यसन लागण्याची खात्री आहे !
तेव्हा स्वतःच्या जबाबदारीवर त्यात पडा !!
पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!!
तर्कबुद्धी मात्र तल्लख होईल !!!! 😉
……………………………………………………………………………………………………………………………..
वाचने
39209
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद कुमार जी ! ह्या
वा !
छान ओळख
वा!
धन्यवाद !
हे जाम भारी आहे!
वा, मस्त !
In reply to हे जाम भारी आहे! by चांदणे संदीप
हुर्रे!
In reply to वा, मस्त ! by हेमंतकुमार
हुर्रे!
In reply to वा, मस्त ! by हेमंतकुमार
वा !
In reply to हुर्रे! by चांदणे संदीप
+१
In reply to हे जाम भारी आहे! by चांदणे संदीप
+११
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
अजून एक शोध लागला
वा !
In reply to अजून एक शोध लागला by ज्ञानोबाचे पैजार
य़ाड लागलं
हा शब्दखेळ खेळण्यात येणार आहे
हॅन्गमॅन
In reply to हा शब्दखेळ खेळण्यात येणार आहे by टर्मीनेटर
छान
In reply to हॅन्गमॅन by तुषार काळभोर
सुरेख विश्लेषण
In reply to हॅन्गमॅन by तुषार काळभोर
छान !
दोन्ही दिवस पाचव्या प्रयत्नात
कालचा शब्द
#MeToo !
ओरडलेwordle कडे धाव!वा !
जमलं!
जमलं!
वा, मस्त !
In reply to जमलं! by टर्मीनेटर
आजचा
लगेच सुटला.
In reply to आजचा by हेमंतकुमार
हो
In reply to आजचा by हेमंतकुमार
एकदम ग्वाड वाटलं सोडवून आजचा
In reply to आजचा by हेमंतकुमार
:)
In reply to एकदम ग्वाड वाटलं सोडवून आजचा by गवि
या खेळाचे खरोखरच व्यसन लागते.
छान !
Wordle चे व्यसन लागणे सहज
सोय आहे
In reply to Wordle चे व्यसन लागणे सहज by कॉमी
आजचा शब्द
छान !
In reply to आजचा शब्द by चांदणे संदीप
नवा खेळ
अरे वा!
रुपी
काम सोडून हेच करत बसले :D
In reply to रुपी by हेमंतकुमार
छान !
In reply to काम सोडून हेच करत बसले :D by रुपी
?
जुळे वर्डल
विक्री
मराठी wordle
..?
In reply to मराठी wordle by सुखीमाणूस
सोडवले. तीन अक्षरे आणि काना
In reply to मराठी wordle by सुखीमाणूस
सहमत.
भूगोलाचे Worldle
आज भूगोलाचे Worldle (#27)
छापील नकाशा
पण पण पण..
In reply to छापील नकाशा by हेमंतकुमार
ग वि
In reply to पण पण पण.. by गवि
रोज सोडवतोय (म्हणजे दोन वेळा
In reply to ग वि by हेमंतकुमार
होय !
In reply to रोज सोडवतोय (म्हणजे दोन वेळा by गवि
खरी मजा नकाशात न बघता
In reply to होय ! by हेमंतकुमार
ह्याच खेळाचा मराठीतील त्र्यक्षरी अवतार
आज पहिल्या प्रयत्नात यश आले.
आज पहिल्या प्रयत्नात यश आले.
माफ करा खूप प्रतिसाद झाले.
छान !
In reply to माफ करा खूप प्रतिसाद झाले. by राघवेंद्र
टोकेरी कंस वापरत असल्यास
In reply to माफ करा खूप प्रतिसाद झाले. by राघवेंद्र
265
६ अक्षरी
अपरिचित बेटे
सागरी शोधता
विशेष
अजून एक हिंट
In reply to विशेष by हेमंतकुमार
!
:-))
In reply to ! by हेमंतकुमार
हा हा !
In reply to :-)) by गवि
Wordle : आजपर्यंत
वा ! छान आढावा.
In reply to Wordle : आजपर्यंत by तुषार काळभोर
यातच मजा येतेय..
In reply to वा ! छान आढावा. by हेमंतकुमार
अरे स्पॉइलर्स नका टाकत जाऊ
In reply to यातच मजा येतेय.. by तुषार काळभोर
Oops..!
In reply to अरे स्पॉइलर्स नका टाकत जाऊ by गवि
+1
In reply to यातच मजा येतेय.. by तुषार काळभोर
माझेही असेच झाले
In reply to यातच मजा येतेय.. by तुषार काळभोर
सोपा...
पत्ता बदल
आता
In reply to पत्ता बदल by हेमंतकुमार
पंचाक्षरीचे शतक
छान !
सांख्यिकीय दृष्टीकोन !
ब्लॅक यंग डेप्थ आणि फर्म्स
हे चार शब्द पहिल्यांदा वापरायचे. ह्या चार शब्दात २० वेगवेगळे लेटर्स आहेत आणि सर्वच्या सर्व वॉवेल्स कव्हर केली जात आहेत , आणि समजा ह्यातही सर्व ५ भिन्न लेटर्स न मिळाल्यास उर्वरीत लेटर्स ही क्यु , डब्ल्यु , झेड, जे, एक्स , आणि व्ही ह्यामधीलच असणार हे निश्चित होते . सो बहुतांश केसेस मध्ये तुम्हाला पाचव्या ट्राय फायनल सोल्युशन मिळुन जाते ! हा सक्सेस रेट वापरुन आमचा स्कोर १००% आहे ! स्टॅटिस्टिक्स रॉक्स !!ही पद्धत रॉक्स
In reply to सांख्यिकीय दृष्टीकोन ! by प्रसाद गोडबोले
न ऐकलेला देश
नामांतरीत देश
१/६
Wordle 366 3/6
Wordle 366 3/6
Wordle 366 3/6
परंपरा
आजचा देश
आजचा देश
नवा खेळ
सुधारणा ..
In reply to नवा खेळ by हेमंतकुमार
मस्त!!
In reply to नवा खेळ by हेमंतकुमार
मस्त!!
In reply to नवा खेळ by हेमंतकुमार
झकास!
In reply to मस्त!! by तुषार काळभोर
नाविन्य
सुधारणा ..
In reply to नाविन्य by हेमंतकुमार
#९९९
वा ! उत्तम
In reply to #९९९ by तुषार काळभोर
हा धागा वर आल्याच्या
वा,
In reply to हा धागा वर आल्याच्या by गवि
पहाच !!
फ्रेन्च शब्द आहे आजच्या
In reply to पहाच !! by हेमंतकुमार
तिसऱ्या गेसमधेच आजचा शब्द
In reply to पहाच !! by हेमंतकुमार
>> तिसऱ्या गेसमधेच आजचा शब्द
In reply to तिसऱ्या गेसमधेच आजचा शब्द by गवि
भारी शब्द !
In reply to >> तिसऱ्या गेसमधेच आजचा शब्द by अमेरिकन त्रिशंकू
wordle आणि worldle चा कंटाळा
In reply to भारी शब्द ! by हेमंतकुमार
दोघेही छान !