महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली सर्वांची लालपरी, एसटी याची सेवा देणा-या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे या एकमेव मुद्द्यावर आंदोलन सुरू असून गेली काही दिवसांपासून ऐन दिवाळीत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले काम बंद आंदोलन आजही सुरू आहे.
![]() |
बोधचिन्ह |
आघाडी सरकार असो की मागील सरकार असो दोन्हीही सरकारांनी विलीनीकरण शक्य नाही अशा भूमिका घेतलेल्या होत्या. आणि मा.न्यायालयानेही याबाबतीत समिती नेमून निर्णय घ्यावा असे म्हटलेले आहे. एसटी तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित आहे, म्हणून एसटी सर्वांसाठीच वेगळा विषय आहे, म्हणून हा काथ्याकूट.
एक नजर टाकूया एसटीच्या इतिहास भूगोलोकडे- देशातील सर्वसामान्य जनतेला दळणवळणासाठी किफायतशीर दरात' ना नफा ना तोटा' या तत्त्वावर राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्रसरकारने मार्ग परिवहन अधिनियम-१९५० तयार केला आणि त्या अन्वये राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ही संस्था एष्टीचा कारभार चालवते. ही एक स्वतंत्र संस्था असून त्यास सरकार काही प्रमाणात अनुदान देतं आणि बाकी पैसा एसटी उभी करते. सरकारचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात. एसटीची तिकिटं, गाड्या भाड्यावर देणे यातून एसटीला उत्पन्न मिळतं. एसटी कर्मचारी हा सरकारी कर्मचारी आहे, परंतु तो निमसरकारी आहे. एसटी कर्मचा-यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, नसता एकदा की तिची चाके रुतून बसली की पुन्हा मग त्यातून बाहेर पडणे अशक्य आहे असे वाटते. एसटीचा प्रवास आणि सुविधा आपल्या सर्वांचाच हळवा विषय आहे, आपण सर्वच एसटीने प्रवास करून मोठे झालेलो आहोत आणि काही तर, एसटीची वाट पाहणारे कायम प्रवासी आहेत. आपल्या सर्वांचाच तो जिव्हाळ्याचा विषय आहे.
![]() |
आपली एसटी |
एसटीचे शासनात विलीनीकरण झाले तर कर्मचा-यांचे प्रश्न सुटणार आहेत का ? वेतन वाढणार आहेत का ? सध्याचे त्या कर्मचा-यांचे वेतन फारच तुटपुंजे आहे असे व्यक्तीगत मत आहे. दहा वर्षाच्या सेवेनंतर चालक वाहक यांचे वेतन सतरा हजाराच्या जवळपास जाते. मला वाटते प्रदीर्घ सेवेनंतरही मिळणारे वेतन आजच्या काळात कमी आहे.
एसटी गेली अनेक वर्ष कायम तोट्यात असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. लॉकडाऊन काळात तर एसटी जवळजवळ बंद अवस्थेत होती त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटीच्या नुकसानीत अजूनच भर पडली. एसटीचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यावरही भर दिला पाहिजे असे वाटते, एसटीच्या खूप जागा आहेत त्यात गाळे काढून ते भाड्याने देणे, निगा राखणे, व्यवसायीकरण वगैरे करून त्यावर भर दिला तर एसटीचा आर्थिक स्त्रोत वाढेल असे वाटते. प्रवाशांना वेगवेगळ्या दिल्या जाणा-या सवलती कमी केल्या पाहिजेत. तरच एसटीची अवस्था सुधारेल असे वाटते. आर्थिक चणचणीवरचा उपाय म्हणून नुकतेच तिकीट दरामधेही सतरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. अपुरे आणि वेळेवर न होणारे पगार.आगारांमधील वाईट परिस्थिती, एसटीच्या अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात.
ऑक्टोबर अखेरीस कर्मचा-यांनी राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे, राज्य सरकारने महागाई भत्ता बारा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्के केला आहे, असे असले तरी एसटी कर्मचारी यावर नाखुष असून एसटी महामंडळाचं शासनात विलणीकरण करण्यात यावे हीच त्यांची मुख्य मागणी आहे. कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय हे आंदोलन सुरू आहे.
एसटी शासनाच्या ताब्यात गेल्यावर सर्व प्रश्न सुटतील असे या एसटी कर्मचाऱ्यानं वाटते. एसटी विलीनीकरण कसे होऊ शकते ? एसटी महामंडळाची निर्मिती ही Road Transport corpaoration Act 1950 नुसार झालेली आहे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे त्यामुळे या कायद्याखालचं महामंडळ बरखास्त करून ते राज्य शासनात विलीन करण्याची प्रक्रिया असेल. राज्य परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अस्तित्वात आलेले आहे, त्यावेळी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे भाग भांडवल यात गुंतविण्यात आलेले होते. कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वायत्त राज्यसरकारची कंपनी किंवा राज्यसरकारचा विभाग म्हणून राहू शकतो. विलणीकरणासाठी केंद्रसरकारची परवानगी घेणे आणि त्यांचे भागभांडवल परत करणे आवश्यक असेल त्यानंतर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन आपला स्वायत्त दर्जा संपुष्टात आणून राज्याचा विभाग म्हणून राज्य सरकारने मान्यता द्यावी असा ठराव मंजूर करून राज्य सरकारला विनंती करणे गरजेचे आहे, अशावेळी महामंडळाची आताची रचना संपुष्टात येईल.
विलीनीकरणानंतर, एसटी कर्मचा-यांचे सर्व वेतन भत्ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे शासनावर आर्थिक भार पडेल. ( पडला तर पडू द्या) एसटीचे ९२ हजार कर्मचारी आहेत, त्यांची एकदा मागणी मंजूर झाली की इतर महामंडळाच्या कर्मचाऱ्याचीही मागणी पुढे येईल. देशात एकूण ५० पेक्षा अधिक परिवहन महामंडळे आहेत, केवळ आंध्रप्रदेश परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलणीकरण झालेले आहे, बाकी मंडळे अशी तशी आधारावर चालू आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे, एसटी कर्मचा-यांचे वेतन सुधारले पाहिजे. नव्या बसेस खरेदी केल्या पाहिजेत. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. प्रवाशांच्या मार्गावर नियमित वेळेवर बसेस आल्या गेल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांची अरेरावी कमी होऊन नम्रपणा आला पाहिजे वगैरे मतं मांडण्यासाठी हा धागा.
काथ्याकूट विस्कळीत असला तरी, मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या विचारांचे स्वागत आहे. वीस बावीस वर्ष नियमित एसटीने प्रवास करीत राहीलो आहे. प्रवाशी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आंदोलनात प्रवाशांच्या बाजूने उभा राहीलो आहे. बाकी, काथ्याकूट माहिती संदर्भ आणि छायाचित्रे जालावरील चालूघडामोडी इतर संकलन यातून केलेले आहे, ते बरोबरच असू शकते असा दावा नाही. (चुभूदेघे)
| लेख वर्गीकरण |
|---|
मिसळपाव


प्रतिक्रिया
STचं विलिनीकरण डोक्यातून काढा
संघटना, लीडर, सल्लागार.
तुम्हीच ठरवा,
किरकोळ एसटी सुरु...
फेल.
परिस्थिती दारूण आहे.
In reply to फेल. by कंजूस
संप संपला !!
दोन्ही गोष्टींची तुलना अयोग्य
In reply to संप संपला !! by प्रसाद गोडबोले
संपकरी आणि सल्लागार
एस टी चा संप
एस टी कामगारांनी आडमुठेपणाचा
In reply to एस टी चा संप by धर्मराजमुटके
पगारवाढ मिळाल्यावर भाजपने आता संप करण्याचे कारण उरलेले नाही असे
In reply to एस टी कामगारांनी आडमुठेपणाचा by सुबोध खरे
महामंडळाच्या कर्मचार्यांना
In reply to एस टी कामगारांनी आडमुठेपणाचा by सुबोध खरे
नाही. महामंडळे ही स्थापन
In reply to महामंडळाच्या कर्मचार्यांना by चौकस२१२
ड्राइवर परीक्षा देणार ड्राइविंगची.
In reply to नाही. महामंडळे ही स्थापन by रावसाहेब चिंगभूतकर
फक्त तेवढाच फरक नसावा. सगळ्या
In reply to ड्राइवर परीक्षा देणार ड्राइविंगची. by कंजूस
१ हजार जागांसाठी ८० हजार अर्ज
In reply to ड्राइवर परीक्षा देणार ड्राइविंगची. by कंजूस
बाकीची राज्ये ह्या बाबी कशा
In reply to ड्राइवर परीक्षा देणार ड्राइविंगची. by कंजूस
सहमत चौकस.
In reply to महामंडळाच्या कर्मचार्यांना by चौकस२१२
सदर बाबीतील बारकावे अथवा
In reply to सहमत चौकस. by कंजूस
पगारवाढ ४१ % .....?
पगारवाढ ४१ % .... जाहीर झाली
एसटी
काय होणार संपाचे .... ?
अहवाल/रिपोर्ट हा सदनात प्रथम स्विकृत करावा लागतो.
In reply to काय होणार संपाचे .... ? by चौथा कोनाडा
बरोबर.
In reply to अहवाल/रिपोर्ट हा सदनात प्रथम स्विकृत करावा लागतो. by कंजूस
एकदाचा त्रीसदस्यीय अहवाल मा.
खरे आहे. एस टी कर्मचारी अति
In reply to एकदाचा त्रीसदस्यीय अहवाल मा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विलीनीकरण ?
In reply to एकदाचा त्रीसदस्यीय अहवाल मा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केन्द्रातले
दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ
In reply to केन्द्रातले by सुखीमाणूस
एसटी
अगदी !
In reply to एसटी by sunil kachure
हे असे का आहे?
In reply to अगदी ! by चौथा कोनाडा
साधारणतः २०-३० वर्षांपुर्वी
In reply to हे असे का आहे? by Trump
बेळगावला महाराष्ट्रात
In reply to हे असे का आहे? by Trump
श्रीखंड
बेस्ट विषयी
पुढील सुनावणी. ११ मार्च.
एसटी कायम स्वरुपी
बातमी:
बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.
In reply to बातमी: by चौथा कोनाडा
सहमत प्रा.
In reply to बाबा गेला आणि दशम्याही गेल्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.
In reply to बाबा गेला आणि दशम्याही गेल्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राज्य सरकारने पगरवाढीमध्ये
शहाणे असतील
पुन्हा गोपीचंद पडळकर...
नुकसान
गिरणी कामगार
तारीख पे तारीख
आता पुढील निर्णयासाठी २२
In reply to तारीख पे तारीख by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जसे केंद्र
In reply to आता पुढील निर्णयासाठी २२ by चौथा कोनाडा
म्हणजे
In reply to जसे केंद्र by कपिलमुनी
डावाकडचे लोक शहराकडे धावतात.
कदाचित
होय.
कामगार नी किती तानावे
Bjp शासित
तारीख पे तारीख.
वकिलांना फी किती दिली?
In reply to तारीख पे तारीख. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऐकीव माहिती.
In reply to वकिलांना फी किती दिली? by कंजूस
अगदी हेच.
In reply to ऐकीव माहिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुळात एस टी महामंडळाचे
एस टी च्या कर्मचाऱ्यांना फूस
In reply to मुळात एस टी महामंडळाचे by सुबोध खरे
त्यातून उद्या उच्च
In reply to मुळात एस टी महामंडळाचे by सुबोध खरे
दिवाळीत बसेस बंद केल्या तर
धडा
In reply to दिवाळीत बसेस बंद केल्या तर by कंजूस
आता कोर्टाने धडा शिकवावा.
In reply to धडा by उग्रसेन
सुसाइड नोट लिहून एसटी
दुर्दैवी.
In reply to सुसाइड नोट लिहून एसटी by प्रसाद_१९८२
सुसाइड नोट लिहून एसटी
In reply to सुसाइड नोट लिहून एसटी by प्रसाद_१९८२
हा .... हा .... हा .... !
In reply to सुसाइड नोट लिहून एसटी by प्रसाद गोडबोले
आज कोर
आता एसटी रस्त्यावर धावणार.
या संपादरम्यान, पेन्शन बद्दल
मग मात्र.
In reply to या संपादरम्यान, पेन्शन बद्दल by चौथा कोनाडा
सदावर्ते यांना कोर्टाने झापले . . .
In reply to या संपादरम्यान, पेन्शन बद्दल by चौथा कोनाडा
संप मिटला.
दिलासा देणारी मोठी बातमी ... !
नाही. प्रकरण भडकले.
In reply to दिलासा देणारी मोठी बातमी ... ! by चौथा कोनाडा
शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल
अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत.
In reply to शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल by सुरसंगम
चिघळत चालली परिस्थिती.
आता विवेकाची गरज
In reply to चिघळत चालली परिस्थिती. by गवि
पुर्ण सहमत !
In reply to आता विवेकाची गरज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गिरणी कामगारांच्या
एस टी आंदोलकांची मुंबईत फरफट !
कोर्टाचे कामकाज, निर्णय,खटला, वकील,
आधीच
रहस्यकथाही पुचाट ठराव्यात . . .
विलीनीकरण आणि सरकारी नोकरी
एसटी पूर्ववत.
एसटी आता बरीच पूर्ववत झाल्याचे दिसत आहे. मा.न्यायालयाच्या आदेशानुसार आज सर्व कर्मचा-यांना रुजू करुन घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज जवळ जवळ ८२ हजार कर्मचारी रुजू झाल्याच्या बातम्या आहेत. अजूनही बरेच कर्मचारी रुजू होणे बाकी आहे. सर्व कर्मचा-यांनी रुजू झाले तरच त्यांचं भलं आहे, नसता कायदेशीर अडचणी वाढतील असे दिसते. मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने लढा पुन्हा उभा करता येईल. बाकी, ब-याच दिवसानंतर एसटीने प्रवास करतांना छान वाटलं. एसटी स्टँड वर प्रवाशांची गर्दी-लगबग. गाड्यांची अनाउन्समेंट, धावपळ, दिसली. आता एसटीनेही नव्या जगाबरोबर जुळवून नवे बदल केले पाहिजेत. आता काल प्रवास करतांना एसटी डेपोतच डिझेल भरुन यायची. आता रस्त्यावरील पंपावर डिझेल भरतांना दिसली. कारण विचारले तर एसटीडेपोतले डिझेल बावीस रुपयांनी महाग आहे, जे भरावे लागते. अशी जर अवस्था असेल तर त्यात बदल करावेच लागतील. एसटीच्या कर्मचा-यांच्या अपु-या वेतनाचा प्रश्न आहेच त्यात सुधारणाही महागाई पाहता त्यात बदल होतील अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद लक्षात घेऊन एसटीने आता इतर वाहतुकीच्या तुलनेत चांगली सेवा देणे गरजेचे आहे. आमच्याकडे कालीपीली (खासगी वाहतूक छोट्या गाड्या) एसटीच्या पुढे धावत असते. प्रवाशी एसटीत बसण्याऐवजी दोन-पाच रुपये कमी लागतात म्हणून खासगी वाहतुक गाड्यांनी प्रवास करतांना दिसतात. बसस्थानकात तर खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटचा सुळसुळाट दिसतो. पुना है क्या पुना. नासिक नासिक, करुन एसटीचे प्रवासी पळवत असतात. एसटीने अशा लोकांना अडविण्यासाठी खासगी लोकांना नेमले आहे, पण ते या लोकांना अडवत नाही. मिलिभगत असते त्यामुळे एसटीचे प्रवासी कमी होतात या आणि असंख्य गोष्टीबद्दल एसटीला विचार केला पाहिजे. एसटीच्या प्रवाशांना मन;पूर्वक शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
तुमचेही आभार
In reply to एसटी पूर्ववत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संप मागे घेऊन एसटी सेवा आता
In reply to एसटी पूर्ववत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
In reply to संप मागे घेऊन एसटी सेवा आता by चौथा कोनाडा
अगदी.
In reply to सहमत. by कंजूस
अभिनंदन
कपिल सिब्बल, मुकुल रोहटगी अशा
In reply to अभिनंदन by प्रसाद गोडबोले
+१
In reply to कपिल सिब्बल, मुकुल रोहटगी अशा by श्रीगुरुजी
सदावर्ते
In reply to कपिल सिब्बल, मुकुल रोहटगी अशा by श्रीगुरुजी
जो माणूस maintance भरत नाही
In reply to सदावर्ते by sunil kachure
विवीनीकरण करवून देतोच
In reply to कपिल सिब्बल, मुकुल रोहटगी अशा by श्रीगुरुजी
हजामत
In reply to अभिनंदन by प्रसाद गोडबोले