✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Absurdle (शतशब्दकथा)

अ
अनन्त्_यात्री यांनी
Fri, 01/28/2022 - 10:18  ·  लेख
लेख
इंग्लिशचा गंध नाही त्यात आजारी. त्यामुळे सतत चिडचीड करत असते आजी माझ्या शब्दकोड्यात डोकं खुपसून बसण्यावरून. मीही थोडा जास्तच नादावलोय म्हणा हल्ली. दोन मोबाईल वर एकदम कोडं सोडवतो आपण. पण आॅफिसला जाताना आईनं आजीकडे लक्ष ठेव सांगितलंय म्हणजे आज no escape! हे काय? आजी सोफ्यावर धाड्कन बसली वाटतं? COUCH किती असह्य खोकते ही? COUGH पाडलाच ग्लास हिनं थरथरत्या हातानं! ही डायरेक्ट बाटलीतून का पीत नै पाणी? WATER आता पंखा फुल फास्ट करायचा तर मला हाक मारायची नं? ही इतकी घामेजलीय की काय? SWEAT दहा मिनिटं झाली, काहीच आवाज नाही हिचा? आजी, u ok? DEATH? वाटलंच! हा attempt बरोबर असणारच!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
5168 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

वा !!

हेमंतकुमार
Fri, 01/28/2022 - 10:29 नवीन
मस्तच !
  • Log in or register to post comments

आवडली.

अनन्त अवधुत
Fri, 01/28/2022 - 14:16 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments

'पंचाक्षरी'चे व्यसन लागल्याचा भक्कम पुरावा दिलात

टर्मीनेटर
Fri, 01/28/2022 - 14:27 नवीन
'पंचाक्षरी'चे व्यसन लागल्याचा भक्कम पुरावा दिलात 😀 शशक आवडली 👍
  • Log in or register to post comments

पंचा चे व्यसन आणि पंचाक्षरी

विजुभाऊ
Fri, 01/28/2022 - 17:54 नवीन
पंचा चे व्यसन आणि पंचाक्षरी चे व्यसन यात फरक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

छान

Bhakti
Fri, 01/28/2022 - 17:08 नवीन
😁
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 01/28/2022 - 17:37 नवीन
हा लैच बेक्कार नाद आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

जबरी शशक.

सनईचौघडा
Fri, 01/28/2022 - 20:39 नवीन
जबरी शशक. अरे वा तुमच्या कवितेसारख्याच कथा ही मस्त असतात.
  • Log in or register to post comments

मस्त

सुखीमाणूस
Fri, 01/28/2022 - 23:12 नवीन
खरच व्यसन लागल या खेळाचे. सकाळी चहाचा कप आणि हे एक कोड. दिवस मस्त सुरु होतो. कुमार सर धन्यवाद. आजच्या कोड्याने नवीन शब्द शिकायला मिळाला...
  • Log in or register to post comments

भारी !

कॉमी
Sat, 01/29/2022 - 08:48 नवीन
भारी !
  • Log in or register to post comments

छान.

ॲबसेंट माइंडेड…
Sat, 01/29/2022 - 10:08 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

मस्तच !

चिन्मना
Sat, 01/29/2022 - 11:38 नवीन
जबरीच आहे शतशब्दकथा !
  • Log in or register to post comments

जबरी! लेखकाचे नाव आणि शशक

रुपी
Sat, 01/29/2022 - 11:44 नवीन
जबरी! लेखकाचे नाव आणि शशक म्हणून कुतूहलाने वाचायला आले. शशक भारीच. मग Absurdle आणि नंतर wordle चे धागे पाहिले..असा उलटा क्रम झाला, पण आता व्यसन लागले!
  • Log in or register to post comments

खूप छान!

श्रीगणेशा
Sat, 01/29/2022 - 13:49 नवीन
खूप छान! पद्य/मुक्तकाची छटा उतरली आहे, गद्यातही :-)
  • Log in or register to post comments

छान

सरिता बांदेकर
Sat, 01/29/2022 - 13:59 नवीन
छान
  • Log in or register to post comments

बाबौ ! .... जबरी !

चौथा कोनाडा
Sat, 01/29/2022 - 21:58 नवीन
बाबौ ! .... जबरी !
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या

अनन्त्_यात्री
Mon, 01/31/2022 - 09:36 नवीन
सर्व वाचकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा