कझाख सरकार सरकारने 1 जानेवारी 2022 पासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान रद्द केल्यावर त्याचे दर जवळजवळ दुपटीने वाढले. त्याविरोधात जनतेने सुरू केलेल्या शांततापूर्ण निदर्शनांना अचानक हिंस्र स्वरुप आले आणि त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरण्याची भिती निर्माण झाली. अलमातीच्या विमानतळावरही त्या हिंसक निदर्शकांनी अल्प काळासाठी ताबा मिळवला होता. या हिंसाचारात 18 पोलिस आणि 164 सामान्य नागरिकांचे प्राण गेले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कझाख राष्ट्रपती कासिम-जोमार्त तकायेव (Kassym-Jomart Tokayev) यांनी पंतप्रधानांना पदावरून हटवले आणि सरकार तातडीने बरखास्त केले. पाठोपाठ देशात 19 जानेवारीपर्यंत आणीबाणी जाहीर केली. त्याचवेळी हिंसाचार करणारे दहशतवादी असून त्यांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश सुरक्षादलांना दिले. त्यापाठोपाठ सामूहिक सुरक्षा करार संघटनेच्या (Collective Security Treaty Organisation/CSTO) शांतिरक्षक दलाला तातडीने मदतीला बोलावून घेतले.
कोविड-19 संकटाचा कझाख अर्थव्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, पोलिसांची दमननीती आणि देशातील स्रोतांच्या वितरणातील प्रचंड असमतोल या कारणांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढलेला होताच, त्यातच इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे नागरिकांमधील सरकारविरोधी भावना आणखी भडकल्या.
देशातील सध्याची अशांतता पाहून कझाख नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रयासाठी जाण्यास सुरुवात केली होती. या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या आडोशाने दंगलखोरांनीही पलायन करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कझाख पोलिसांनी सर्व सीमा बंद करत तपासणी सुरू केली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या काही दंगलखोरांच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले की, त्यांना अन्य देशांमधून पैसे देऊन तिथे दंगे घडवण्यासाठी आणले गेले होते. देशामध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी बाहेरून मदत मिळत असल्याच्या कझाख राष्ट्रपतींच्या आरोपाला पकडलेल्या दंगलखोरांच्या चौकशीतून पुष्टी मिळू लागली. कझाखस्तानमधील काही सरकारविरोधी गटांनीही सरकार बदलण्यासाठीच आपण या आंदोलकांमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले.
कझाखस्तानने स्वातंत्र्यापासून रशिया आणि अमेरिका यांच्याबरोबरच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी कझाखस्तानसाठी परराष्ट्र धोरणात रशियाबरोबरच्या पारंपारिक, राजकीय, लष्करी आणि आर्थिक संबंधांचे महत्व अनन्यासाधारण राहिले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कझाखस्तानने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढत गेली. आज त्याची अमेरिकेबरोबर व्यूहात्मक भागीदारी आहे. कझाखस्तानात ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे कझाखस्तानात अस्थिरता वाढणे अमेरिकेला नको आहे. मात्र त्याचवेळी मध्य आशियात रशिया असलेला आणि सध्या चीनचा वाढत असलेला प्रभाव याकडे वॉशिंग्टनकडून गांभीर्याने पाहिले जात आहे.
मध्य आशियाचे रशियासाठी सामरिकदृष्ट्या महत्व आहे. त्यामुळे तेथे आपली पकड कायम ठेवण्यासाठी मॉस्को जागरूक आहे. रशियाचा मध्य आशियावर असलेला प्रभाव कमी करण्यासाठी या क्षेत्रातील देश स्वतंत्र झाल्यापासून वॉशिंग्टनहून सातत्याने प्रयत्न होत राहिले आहेत. पुढे अमेरिकेने सैन्य काढून घेण्याची मागणी या देशांकडून होऊ लागली होती. 2014 मध्ये या क्षेत्रात अमेरिकन सैन्याचे अस्तित्व संपुष्टात आले; मात्र उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किरगिझस्तानात मूलतत्ववादी कायम राहिले. त्यांचा प्रभाव मध्य आशियात वाढणे रशियालाही धोकादायक वाटत आहे. म्हणूनच कझाखस्तानच्या विनंतीनंतर मॉस्कोने तातडीने कझाखस्तानला CSTO चे शांततारक्षक सैन्य पाठवले. या मूलतत्ववाद्यांबरोबरच गुन्हेगारी गटही या हिंसाचारात सहभागी झाले असल्याचे सांगितले जात आहे.
एकूणच रशिया, अमेरिका, चीन आणि अन्य देशांसाठीही व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या क्षेत्रात प्रत्येकाकडून आपला प्रभाव वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मध्य आशिया भारतासाठीही सामरिकदृष्ट्या महत्वाचा असल्यामुळे कझाखस्तानमधील हिंसक परिस्थितीबाबत नवी दिल्लीहून चिंता व्यक्त केली गेली होती. तसेच तेथे लवकरात लवकर शांतता पुन:स्थापित होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचेही आवाहन करण्यात आले होते.
लिंक
कझाखस्तानमधील अशांतता (avateebhavatee.blogspot.com)
वाचने
30849
प्रतिक्रिया
97
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यापेक्षा वाईट परिस्थीती
भारताचाही काही दिवसानी
In reply to त्यापेक्षा वाईट परिस्थीती by अमरेंद्र बाहुबली
माहितीपूर्ण लेखन.
थोडे फार प्रमाणात भारतातही
In reply to माहितीपूर्ण लेखन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तान घेऊ नका...
In reply to थोडे फार प्रमाणात भारतातही by रावसाहेब चिंगभूतकर
शेठ सारखी फेकाफेकी समजा. तान
In reply to तान घेऊ नका... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छा.
In reply to शेठ सारखी फेकाफेकी समजा. तान by चौकस२१२
परदेश
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशीच परिस्थिती
कझागिस्तानची तुलना आफ्रिकी
In reply to अशीच परिस्थिती by कंजूस
काझीक लोकं तयार नाहीत.
In reply to कझागिस्तानची तुलना आफ्रिकी by शाम भागवत
.
In reply to कझागिस्तानची तुलना आफ्रिकी by शाम भागवत
कझाकस्तान ची इरीगेशन आणि
In reply to कझागिस्तानची तुलना आफ्रिकी by शाम भागवत
नमस्कार भाउ.
In reply to कझाकस्तान ची इरीगेशन आणि by विजुभाऊ
लिंक
हा एक आठ मिनिटांचा चांगला
इथे काही लोक सतत एक विशीष्ट
अहो, याच लोकांमुळे मला खूप
In reply to इथे काही लोक सतत एक विशीष्ट by बोलघेवडा
काकांशी सहमत.
In reply to अहो, याच लोकांमुळे मला खूप by शाम भागवत
सहमत
In reply to काकांशी सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकसत्ताचा लेख बहुधा मूळ
In reply to काकांशी सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या
In reply to लोकसत्ताचा लेख बहुधा मूळ by रावसाहेब चिंगभूतकर
नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या पगारात वाढ होतेयअसं कसं रावसाहेब . . पगारवाढ तर व्हायलाच हवी. तो हक्क आहे आमचा. बाकी डिझेल / पेट्रोल मात्र २० वर्षापुर्वीच्याच भावात मिळायला हवे. षेठ काय फक्त विमानात फिरायला निवडुन आलेत काय. एक ते अजुन शेठ ने करोडो रुपायचे विमान / गाडी घेतली विकत फिरायला. किती शेतकर्यांचे कर्ज माफ झाले असते त्या पैशात. म्हणुन आम्हाला पप्पु जास्त चांगला पंप्र होईल असे वाटते ...महागाईचा आलेख तपासताना
In reply to अहो, याच लोकांमुळे मला खूप by शाम भागवत
हा प्रतिसाद मी टाकलेल्या
In reply to महागाईचा आलेख तपासताना by सर टोबी
सर टोबी..
In reply to महागाईचा आलेख तपासताना by सर टोबी
याचे दोन अर्थ होतात.
In reply to सर टोबी.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुळांत, विरोधी पक्षाकडे तितकी विश्र्वासार्हता आहे का?
In reply to याचे दोन अर्थ होतात. by शाम भागवत
घराणेशाही लादली की काय होते?
In reply to मुळांत, विरोधी पक्षाकडे तितकी विश्र्वासार्हता आहे का? by मुक्त विहारि
घराणेशाही लादली की काय होते? याचे सध्याच्या काळांत, उत्तम उदाहरण म्हणजे, कॉंग्रेस.... ऐतिहासिक उदाहरणे म्हणजे, दुसरा बाजीराव, वाकाटक साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, नंद साम्राज्य...महाराष्ट्र भाजप?? फडणवीसांच्या काकू मंत्री नी वडील आमदार होते.हो क्का???
In reply to घराणेशाही लादली की काय होते? by अमरेंद्र बाहुबली
संरक्षणाची हेळसांड
In reply to मुळांत, विरोधी पक्षाकडे तितकी विश्र्वासार्हता आहे का? by मुक्त विहारि
अन्तर्गत हल्ले थोपवले आहेत
In reply to संरक्षणाची हेळसांड by सर टोबी
सहमत आहे .....
In reply to अन्तर्गत हल्ले थोपवले आहेत by सुखीमाणूस
अंतर्गत हल्ल्यांवरून
In reply to अन्तर्गत हल्ले थोपवले आहेत by सुखीमाणूस
द्वी स्तरीय सरकारी व्यवस्था
धाग्याचा विषय नक्की काय आहे?
अस्सल मिपाकर, या फंदात पडत नाही ...
In reply to धाग्याचा विषय नक्की काय आहे? by शाम भागवत
रथी महारथी
In reply to धाग्याचा विषय नक्की काय आहे? by शाम भागवत
विषयावरून आठवले
In reply to धाग्याचा विषय नक्की काय आहे? by शाम भागवत
घराण्या वरती अवलंबून आहे ...घोड्याची किंमत तब्बल 5 कोटी,
In reply to विषयावरून आठवले by रंगीला रतन
.धाग्याचे काश्मीर
१० वर्षांपूर्वी आपला पगार
In reply to .धाग्याचे काश्मीर by कर्नलतपस्वी
असे “गणीतं” काॅंग्रेस राजवटीत
In reply to १० वर्षांपूर्वी आपला पगार by सुबोध खरे
मांडलंय साहेब, त्या वेळच्या
In reply to असे “गणीतं” काॅंग्रेस राजवटीत by अमरेंद्र बाहुबली
काही जणांना रोज श्री मोदी
In reply to मांडलंय साहेब, त्या वेळच्या by धनावडे
कोणाचा पगार
मोगा खान
In reply to कोणाचा पगार by sunil kachure
मस्त चालले आहे
मस्त चालले आहे
मस्त चालले आहे
मस्त चालले आहे
वेगळे प्रवाह दिसतात का
कसं बोललात?
In reply to वेगळे प्रवाह दिसतात का by निनाद
धन्यवाद
In reply to वेगळे प्रवाह दिसतात का by निनाद
हे बंड
हा देश इतका अनोखा आहे
काही सदस्यांच्या कॉमेंट्स
सहमत आहे
In reply to काही सदस्यांच्या कॉमेंट्स by सुखी
@ sunil kachure
विषय काय आहे आणि आपण काय लिहितो आहोत
हं तर...
ओएनजीसी, इंडियन ऑईलमध्ये
In reply to हं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा
In reply to ओएनजीसी, इंडियन ऑईलमध्ये by प्रचेतस
काही सल्ला वगैरे द्या भो
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गम्मत जम्मत.
In reply to काही सल्ला वगैरे द्या भो by प्रचेतस
आज बाजार तर पुर्ण
In reply to गम्मत जम्मत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दमन!
In reply to हं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to दमन! by चौकस२१२
लोकशाही ने निवडून दिलेल्या
In reply to दमन! by चौकस२१२
लोकशाही ने निवडून दिलेल्या सरकार चा साधा मान ठेव्हाण्याची दानत नाही यांच्याकडे !७० वर्षे हुकूमशाही होती का? ते ही लोकशाहीनेच जिंकले ना? त्यांचा मान न ठेवनार्यांच्या दानत बद्दल काय?काय मान नाही ठेवला त्यानचा ?
In reply to लोकशाही ने निवडून दिलेल्या by अमरेंद्र बाहुबली
सुरवातीची देश उभारणीची कामे
In reply to काय मान नाही ठेवला त्यानचा ? by चौकस२१२