Skip to main content

मी वसंत मी वसंत..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 23/04/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिशिरी मळभ दूर झाले, उत्तरायणी रवी आले, बेहोषला आसमंत, मी वसंत मी वसंत... खुलते आज कळीकळी, पानोपानी ही झळाळी, भ्रमराला ना आज उसंत, मी वसंत मी वसंत... ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत... आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे, राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत... धरा होती ती ल्यायली, दाट धुक्याच्या त्या शाली, सुवर्णरेखा ही दिगंत, मी वसंत मी वसंत... तृणांकुराचे हे थवे, आज भासती नवे नवे, पानगळीची उगा खंत, मी वसंत मी वसंत... भरून गेली किल्बिल सारी, विहंगाची उंच भरारी, सृष्टीची ही नशा जिवंत, मी वसंत मी वसंत... ऋतूचक्राच्या या खुणा, फ़िरूनी येईन पुन्हा पुन्हा, खेळ चाले हा अनंत, मी वसंत मी वसंत... - प्राजु दिगंत - क्षितिजरेखा..
लेखनविषय:

वाचने 4034
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

>>ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...>> हे खास! >>भरून गेली किल्बिल सारी>>> आसमंती किलबिल खुलते असं केलं तर? चूकभूल क्षमस्व. :)

अप्रतिम काव्य !! अतिशय सहज उतरलीये गं....... :)

अप्रतिम वसंतोत्सव! सुरेख लिहिलीस प्राजु. =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

कसं जमतं तुम्हाला असं लिहायला..तुमची कविता वाचली की माझी कविता मला पुचाट वाटते !

कसं जमतं तुम्हाला असं लिहायला..तुमची कविता वाचली की माझी कविता मला पुचाट वाटते !

आवडली. बैरागी पिंपळ आणि भ्रमराला ना आज उसंत ही ओळ सर्वाधिक आवडली. (निवांत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बैरागी पिंपळ आणि भ्रमराला ना आज उसंत ही ओळ सर्वाधिक आवडली. बेलाशी सहमत. फार सुंदर कविता. आवडली :) -- लिखाळ.

ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत +१ बाकी मस्त आहेच --अवलिया

मस्त काव्य रचना . :) हदयी वसंत फुलला.:)

In reply to by शितल

होना ... आणि प्रेमास रंग आले =)) प्राजू ताई.. कविता झकास !!

आहे कवितेचा :) >> ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत... आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे, राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत... >> या ओळी विशेष आवडल्या. सुवर्णाचे नाजूक तुरे ही कल्पना तर खासच आहे. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

वसंतोत्सवाची सुरेख कविता..! प्राजू आजकाल लै फार्मात आहे, तिची लेखणी अशीच प्रसन्नपणे चालत राहो हीच शुभेच्छा! :) आपला, (वसंतप्रेमी) तात्या.

In reply to by नंदन

प्राजु तै कडून आणखी एक सुंदर कविता!! -अनामिक

In reply to by अनामिक

प्राजूताईन्ची गाडी सुपरफास्ट चालू आहे ! लेख काय, कविता काय, चौफेर फटकेबाजी सुरु आहे. मस्तच!

खुप सुरेख सादर केला आहेस कवितेतुन वसंतोत्सव समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

खुप च छान आहे कविता. दिपाली :)

अ प्र ति म च ! मस्त लिहिले आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

सुंदर अति सुंदर काव्य.आवडलं. कसं जमतं तुम्हाला असं लिहायला..तुमची कविता वाचली की माझी कविता मला पुचाट वाटते ! इति... ह्या कुतूहलाचं उत्तर मला असं वाटतं,ते कसं ते, (सांगत्ये) सांगतो ऐका! उघडून गोदाम शब्दांचे ती मांडणी सुरेख करीते शब्दां मागून शब्द येती बळे ते तिला कसे ते नकळे प्रतिभा उरी धरूनी ती गीत लिहित जाते हे भाव स्वप्न अपुले साकार ती करीते म्हणून म्हणतो, नकां विचारू.... कारण तिच्या....प्रेरणेचे www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

एक अतिशय सहज आणि अप्रतिम कविता.
ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...
अगदी जळात पाय टाकून बसलेला औदुंबर आठवला. ही उपमा अतिशयच छान आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत... अगदी जळात पाय टाकून बसलेला औदुंबर आठवला. अगदी अगदी.. स्वाती

कविता छान आहे..वसंत वसंत..क्या बात है...

ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत... मलाही याच ओळी आवडल्या ! -दिलीप बिरुटे

बैरागी पिंपळ मनात सळसळला आणि एक नवीन पद देऊन गेला :) नवनवोन्मेष चाले, प्रतिभेचे द्वार खुले कविगण प्रतिभावंत, मी वसंत वसंत! चतुरंग