✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पंचमी

क — कर्नलतपस्वी, Mon, 01/03/2022 - 19:46
पंचमी पंचमी पंचमी पंचमी पंचमी पंचमी बाल्कनीतली फुले रंग सारे फूलले। धुंद झाली बाल्कनी। रंग सोहळा फुलांचा नेत्र सुखावू लागली सखी शेजारची माझ्या वेळावून भ्रूभंग टाकते बहरलेले झाड माझे का ग डोळा खुपते दृष्ट लावू नका कोणी झाड वयात आलेले ओढुनी मद यौवनाचा नवचैतन्य येथे बहरले बहरली रातराणी पारिजात ही बहरला शुभ्र पांढर्‍या मोगऱ्याचा गंध आसमंती पसरला उधळले रंग सारे जणू रागदारी मांडली पंचमीची मुठ माझ्या दारी की हो सांडली शिंपले काटे जरी मी तरी फुल ही उमलले सुर कळी पाकळीतून त्यांच्या जीवनाचे उमटले

प्रतिक्रिया द्या
2683 वाचन

💬 प्रतिसाद (4)

सुरेख लिहिलंय कर्नलसाहेब.

प्रचेतस
Tue, 01/04/2022 - 09:11 नवीन
सुरेख लिहिलंय कर्नलसाहेब. भ्रूभंग-भ्रूकूटी उडवून कटाक्ष टाकणे?
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कर्नलतपस्वी
Tue, 01/04/2022 - 10:07 नवीन
प्रचेतस जी धन्यवाद, भ्रुभंग म्हणजे "भौऐ चढना, त्योरीयाँ चढाना" , यात "मेरी कमीज से उसकी कमीज ज्यादा सफेद क्यूँ है" असा भाव.
  • Log in or register to post comments

माझ्या बाल्कनीतली फुले,

कर्नलतपस्वी
Tue, 01/04/2022 - 10:10 नवीन
बागवानीची चटक लागली, सेवानिवृती नंतर बाल्कनीत फुलझाडे जोपासत दुधाची तहान ताकावर भागवतोय.
  • Log in or register to post comments

मस्त

चांदणे संदीप
Tue, 01/04/2022 - 17:30 नवीन
छान, कविता आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा