✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवीन वर्ष आणि स्वयंसुधारणायोजना - तुमचा काय बेत??

T
Trump यांनी
Sun, 01/02/2022 - 12:19  ·  लेख
लेख
प्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. नवीन वर्ष आणि स्वयंसुधारणायोजना आखणे, काही नवीन नाही. सध्या माझा भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) वापर बराच वाढला आहे. त्यामुळे इतर शारीरिक आणि मानसिक त्रास सुरु झाले आहेत आणि होत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काही सुधारणा करणे आवश्यक आहे. मी नवीन वर्षामध्ये भ्रमणध्वनीचा वापर कमी, म्हणजे ज्या कामांसाठी भ्रमणध्वनी लागतो अशीच कामांसाठी फक्त, करण्याचे ठरवले आहे. ---------------------------------- तुमची काय योजना आहे?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3393 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

योग्य निर्णय ....

मुक्त विहारि
Sun, 01/02/2022 - 19:46 नवीन
मी पण मोबाईलचा वापर खूपच कमी केला आहे ...
  • Log in or register to post comments

चीनचा माल अजिबात विकत घेणार नाही

मुक्त विहारि
Sun, 01/02/2022 - 20:02 नवीन
जितके होईल तितके स्वदेशी वस्तूच खरेदी करणार
  • Log in or register to post comments

वाढलेला पोटाचा घेर पूर्ववत करण्याचा निश्चय

वामन देशमुख
Sun, 01/02/2022 - 20:25 नवीन
लॉकडाउनपासून घरून काम सुरु असल्याने वाढलेला पोटाचा घेर (३६ इंच), ३० जून २०२२ पर्यंत पूर्ववत (३२ इंच) करण्याचा निश्चय केला आहे आणि त्यावर २ जानेवारी २०२२ (आज) पासून काम सुरु केले आहे.
  • Log in or register to post comments

छान आहे संकल्प... मी ही थोडं काहीतरी करतोय

बाजीगर
Sun, 01/02/2022 - 23:42 नवीन
मोबाईल चा वापर प्रचंड आहे, बोलण्यासाठी कमी, नेट साठी जास्त होतोय.. ना खेद ना खंत. काही आठवड्यापासून रोज 16-17 तास intermittant fasting करतोय, कंबख्त वजनाच्या platua तोडला आणि उतार सुरु केलाय,2 किलो कमी झालंय. साठी पार करून 2 महिने झाले, आव्हान म्हणून WA गीता परिवार गटावर,गीता अध्याय 12 आणि 15 वाचायचा सराव करून मोबाईल वर गीता गुंजन प्रमाणपत्र मिळवले. त्या आधी 60km सायकल चालवून 61वा वाढदिवस साजरा केला. आठवड्यातून 3 वेळा 5 किमी धावतो. (आता जिम मध्ये थोडे वजनं उचलायला सुरवात केलीय..) पायथॉन प्रोग्रॅमिन्ग शिकायला 2 वर्षांपासून सुरवात केली आहे, पुन्हा zoom क्लास वर शिकतोय, माझ्या youtube वर काही बाही video टाकत असतो, पायथॉन स्वतःला शिकवण्याचे पण video टाकलेत. ब्लॉग लेखन सुरूच आहे. Smule app वर duets गाणे सुरु करून वर्षात 387 duets गायलीत. शेवगा कंत्राटी शेती दिड वर्षे केली,पण मित्रा चे करोना ने निधन झाल्याने, शेती बघणारे कोणी नसल्याने दोडून दिले... हजारो ख्वाहिशें ऐसी, की एकेक पर दम निकले असे सुरु आहे.
  • Log in or register to post comments

शेवगा कंत्राटी शेती दिड वर्षे केली

मुक्त विहारि
Mon, 01/03/2022 - 12:33 नवीन
ह्याचे अनुभव लिहाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

Smule

नगरी
Tue, 01/04/2022 - 05:45 नवीन
तुमची गाणी ऐकायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

पायथॉन स्वतःला शिकवण्याचे पण

नागनिका
Mon, 01/03/2022 - 11:15 नवीन
पायथॉन स्वतःला शिकवण्याचे पण video टाकलेत.
तुमच्या यु ट्यूब व्हिदिओ ची लिंक मिळेल का?
  • Log in or register to post comments

दारू पिणे कमी करणार..रविवार

योगेश कोलेश्वर
Mon, 01/03/2022 - 14:53 नवीन
दारू पिणे कमी करणार..रविवार to रविवार
  • Log in or register to post comments

नाही जमले तर, खालील व्यक्तीला फोन करा...

मुक्त विहारि
Mon, 01/03/2022 - 15:05 नवीन
तुषार नातू... 9850345785 दारू पिणे नक्कीच कमी होऊ शकते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोलेश्वर

धन्यवाद सर..लागलीच तुषार नातू

योगेश कोलेश्वर
Mon, 01/03/2022 - 16:32 नवीन
धन्यवाद सर..लागलीच तुषार नातू नशी संपर्क करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ज्या गोष्टी सतत करतो

कंजूस
Tue, 01/04/2022 - 05:55 नवीन
त्या सोडण्याचा बेत अजिबात करू नये. त्या वेळ आली की आपोआप सुटतील.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा