✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अद्भुताचे निळे पाणी

अ — अनन्त्_यात्री, Fri, 12/31/2021 - 11:52
मराठीच्या अंगणात अठ्ठेचाळीस स्तंभांचा स्वर-व्यंजनी महाल माझ्या माय कवितेचा नभापार पोचतसे त्याची बेलाग ही उंची रेलचेल महालात जे न देखे रवि त्याची महालात जाण्यासाठी जिना जपल्या शब्दांचा आणि उतरण्या साठी सोपान हा गहनाचा चुनेगच्ची सौधावर नवरस पुष्करणी पितो मन:पूत तेथे अद्भुताचे निळे पाणी परवलीची एकच खूण इथे चालतसे एका हृदयीचे दुज्या सोपवावे लागे पिसे

प्रतिक्रिया द्या
2573 वाचन

💬 प्रतिसाद (6)

वाह! कवितेचे शीर्षक वाचूनच

प्राची अश्विनी
Fri, 12/31/2021 - 11:58 नवीन
वाह! कवितेचे शीर्षक वाचूनच ओळखले, तुमची असणार म्हणून.:)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

अनन्त्_यात्री
Fri, 12/31/2021 - 14:36 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

+१ शीर्षक वाचून अंदाज आला

श्रीगणेशा
Fri, 12/31/2021 - 20:27 नवीन
+१ शीर्षक वाचून अंदाज आला होता :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

काय राव !

प्रसाद गोडबोले
Fri, 12/31/2021 - 12:12 नवीन
काय राव ! ह्या कवितेचे < ओल्डमॉन्कचे लाल पाणी > हे नॅचरल विडंबन आहे ह्या कवितेचे अन तुम्ही म्हणता की दारु हा विषय वापरु नका विटंबनास ! श्या , काय राव , आता काय करायचं !
  • Log in or register to post comments

काय राव !

प्रसाद गोडबोले
Fri, 12/31/2021 - 12:13 नवीन
काय राव ! ह्या कवितेचे

(ओल्डमॉन्कचे लाल पाणी)

हे नॅचरल विडंबन आहे ह्या कवितेचे अन तुम्ही म्हणता की दारु हा विषय वापरु नका विटंबनास ! श्या , काय राव , आता काय करायचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

परवलीची एकच

श्रीगणेशा
Fri, 12/31/2021 - 20:28 नवीन
परवलीची एकच खूण इथे चालतसे एका हृदयीचे दुज्या सोपवावे लागे पिसे
खूप छान!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा