Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/24/2015 - 16:30
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
भात हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " . 'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्‍या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला

भात

... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु ! लगेच वेटर कडुन माहीती कळाली की हा "इंद्रायणी" आहे , गणेशा आधी म्हणालाच होता की इथे अप्रतिम भात मिळतो म्हणुन ! खरेतर मी अजिबात म्हणजे अजिबात भात न खाणारा माणुस पण चक्क मागुन मागुन भात खल्ला ! घरी येवुन विचारले की आपण कोणता भात खातो तर उत्तर आले "आपण ? तु तर हातही लावत नाहीस भाताला :-\ " मी : ":-\ बरं तुम्ही कोणता भात खाता ? " " बासमती आणि आंबेमोहोर " माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली !! हायला , आपण ह्या बासमतीच्या नादाने भाताच्या कित्येक व्हरायटीज ला मुकतोय ! इंद्रायणी सारख्याच अशा कित्येक व्हरायटीज असतील वेगवेगळ्या चवीच्या ! इथेच मावळातच कित्येक व्हरायटीज आसतील !! एकदा तेजस होटेल ला खल्ला होता तोही हातसडीचा भात अप्रतिम लागला होता ! तुम्हाला भाताच्या अशा अजुन व्हरायटीज माहीत आहेत का ? त्या चवीला अ‍ॅपीयरंसला स्वादाला कशा असतात ? विकत कूठे मिळतील ? इंटरनेटवर आणि आजुबाजुला चिंचवडात माहीती शोधत आहेच मी , पण मिपाकरांच्या माहीतीत असे काही खास असेल तर सांगा ! अवांतर : १)गणेशाने त्या हॉटेल मालकाला तो इंद्रायणी तांदुळ मागितला पण त्याने ह्याना त्या निमित्ताने टाळले ...ल्ल्ल्लूऊऊऊउ २) मुंबईत असताना , हेल्ठ कॉन्शस असल्याने ब्राऊन राईस खायचो पण त्याला भात म्हणवत नाही हो . ३) आणि ह्यावरुन आठवले , आमच्या सातार्‍यातील तांदुळाअळी मधील एका दुकानातील पाटी "एकदा घेतलेला माल कोणत्याही सबबीवर ताबडतोब बदलुन मिळेल ! "आता एकदा तांदुळ आळीत चक्कर टाकायलाच हवी !! ४)https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=9998&start=1
  • Log in or register to post comments
  • 46092 views

प्रतिक्रिया

Submitted by dadadarekar on Fri, 07/24/2015 - 19:19

Permalink

.

सोनपरी भात.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 07/24/2015 - 20:03

Permalink

पुलावासाठी वाखाणलेले बासमती

पुलावासाठी वाखाणलेले बासमती,दुबराज वगैरे फताडे भात इतर कामासाठी निरुपयोगी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/24/2015 - 20:11

Permalink

सोना मसुरी

सोना मसुरी
हे नाव मी पहिल्यांदाच ऐकले ! आता चेक करुन पहातो !
जिरेसाळ ( जिरग्या) अन घनसाळ नावाचा तांदूळ मिळातो , कोल्हापूर कडे.बिना पॉलिश चा घेतला तर अतीउत्तम.
कोठे मिळेल बिना पॉलिश ? कल्लापुरात जरा चवकशी करुन कळवाल का ? तसेही डिसेंबरात एक चक्कर होणार आहेच कल्लापुर मिरज भागात ;)
गरी-कोळपी
कोठे मिळेल ? कोणत्या आदिवास भागात ? नगर ला एक ओळखीचे आहेत तिकडे चौकशी करुन पहातो :)
कृष्णासाळ तांदुळ :- पण हा तांदुळ फक्त अकोला ( भंडारदरा) कोतूळ या ठिकाणीच मिळतो.
>>> ह्म्म . ओके . ट्राय केलाच पाहिजे एकदा . पहातो कसे जमते ते !
म्हाडी , रानटी देवभात
सोंड्या भाऊ , तुम्ही कुठले ? तुम्हाला ह्या विषयातील बरीच माहीती आहे असे दिसत आहे , व्यनि करतो :)
गुलाबी तांदूळ "पटणी" झीना कोळंबा, जिरेसाळ,काली मुच
ह्यातले एकही नाव ऐकले नव्हते आजपर्यंत मी ! ह्या धाग्या निमित्त कळाले :) हे हे सारे कधी ना कधी टेस्ट करायला मिळायला पाहिजेत राव !!
लाल तांदूळ
म्हणजे तामसाळ का ? की ब्राऊन राईस ?
काली मुछ ?
एस भात मे कुछ तो काला है दया =)) टेस्ट केलाच पाहिजे !! सोनपती भात काय प्रकार आहे ? सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/24/2015 - 20:34

In reply to सोना मसुरी by प्रसाद गोडबोले

Permalink

काली मुच आणि पटणी राइस गुगलून

काली मुच आणि पटणी राइस गुगलून पहा
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Fri, 07/24/2015 - 20:51

In reply to काली मुच आणि पटणी राइस गुगलून by सुबोध खरे

Permalink

हो ते kali much च आहे..स्वारी.. विदर्भात दुकानदार अपभ्रंश करतात

हो ते kali much च आहे..आय माय स्वारी.. विदर्भात दुकानदार अपभ्रंश करतात तर त्याचा काली मुछ म्हणुन :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 07/25/2015 - 19:43

In reply to हो ते kali much च आहे..स्वारी.. विदर्भात दुकानदार अपभ्रंश करतात by होबासराव

Permalink

अहो,

अहो, तो प्रतिसाद तुमच्या साठी नव्हता. मुच काय आणी मुछ् काय काय फरक पडतो? सॉरी कशासाठी म्हणताय? लोकांना भात या विषयावर थोडे कुतूहल जागृत करावं यासाठी होतं. लोभ असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by सचिन कुलकर्णी on गुरुवार, 07/30/2015 - 11:31

In reply to काली मुच आणि पटणी राइस गुगलून by सुबोध खरे

Permalink

काली मुच डोंबिवलीत..

काली मुच मला इथे डोंबिवलीत दिसला. मिपावर या धाग्यावर या भाताची महती कळल्यामुळे लगेच घेऊन टाकला. वर म्हंटल्या प्रमाणे बासमतीच्या तोंडात मारणारा वास आहे. चव आज घेऊन बघेन..
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 07/30/2015 - 11:55

In reply to काली मुच डोंबिवलीत.. by सचिन कुलकर्णी

Permalink

काली मुच डोंबिवलीत कुठे मिळतो

काली मुच डोंबिवलीत कुठे मिळतो सांगाल काय? जुन्या आठवणी खातर एकदा परत खाउन पहायचा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सचिन कुलकर्णी on गुरुवार, 07/30/2015 - 13:03

In reply to काली मुच डोंबिवलीत कुठे मिळतो by सुबोध खरे

Permalink

घराजवळ..

मला माझ्या घराजवळच्या दुकानातच (श्रीखंडेवाडीत) मिळाला. अधिक चर्चेसाठी माझा नंबर व्यनि करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Fri, 07/24/2015 - 20:39

Permalink

बापरे

कित्तीतरी प्रकार पहिल्यांदा ऐकले मला आवडतो इंद्रायणी. मस्त हल्ली कुठलाही तांदूळ घेतला तरी शिजवताना काही वासच येत नाही. तो निदान इंद्रायणीचा नक्की येतो. म्हणजे घरात वरणभाताचा कुकर लागला आहे हे कळतं तरी.घमघमाट. आणि अगदी नुसताच पातेल्यात शिजवला तर अल्टिमेट लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 07/24/2015 - 21:07

Permalink

झीना

गुजरातीत झीणा म्हणजे बारीक, तलम. झीणा कोलंबा म्हणजे बारीक कोलम. उत्तर ठाणे-आता पालघर- ते थेट सुरतेपर्यंत हा तांदूल पिकवला जातो. पूर्वी संपूर्ण ठाणे आणि उत्तर रायगडमध्ये हे भात होई. पण आता या भागात शेतजमिनी फारश्या उरलेल्या नाहीत. पण वरील काही प्रतिसादांवरून वाटते की इतरत्रही हे भात होते.
  • Log in or register to post comments

Submitted by सोंड्या on Fri, 07/24/2015 - 21:36

Permalink

बरोबर राहीजी

बरोबर राहीजी आणी आता फार थोड्या शेतकर्यांकडे याचे मुळ विनासंकरीत बियाणे शिल्लक आहे कालौघात ते ही नाहीसे होईल :(
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 07/24/2015 - 21:44

Permalink

मस्त माहिती मिळाली या

मस्त माहिती मिळाली या धाग्यामुळे.ते इंद्रायणी तांदूळ प्रगोंना मिळणार तर!!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरुप on Sat, 07/25/2015 - 13:55

Permalink

भात

आम्ही घरी इंद्रायणी भातच आणतो.अप्रतिम चव दूध्,तूप अगदी साध्या कालवणासोबत किंवा मटणा सोबत सुद्धा छान लागतो.सत्याचे प्रयोग साहेब,आम्हाला पण हवा आहे तांदूळ. लागेल तेव्हा नक्कि सांगेन.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Sat, 07/25/2015 - 17:12

Permalink

भात

घरातला बासमती ऐनवेळी संपल्याने घराजवळच्या एका दुकानातून सुटा तांदूळ आणला आहे. त्याचा सुगंध आणि चव इतकी मस्त आहे म्हणून सांगू! तो भात शिजायला पाणी तसे जास्तच लागते पण पाणी जरा जास्त झाले किंवा कूकरच्या २ शिट्या जास्त झाल्या तरी हा भात चिकट होत नाही हे आणखी एक वैशिष्ट्य! पुलाव/बिर्याणी अगदी उत्तम लागेल त्या भाताची. आता बासमतीला सुट्टी देवून हाच भात वापरायचे ठरवले आहे. एरवी मी कधी त्या तांदळाचे नाव विचारायच्या भानगडीत पडले नसते, पण या धाग्याच्या निमित्ताने १-२ दिवसात त्या तांदळाचे नाव दुकानदाराला विचारून इथे देते.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Sat, 07/25/2015 - 22:54

Permalink

सोना मसुरी

सोना मसुरी म्हणजे कर्नुल सोना मसुरी. हा तांदूळ आंध्रात पिकतो. मराठवाड्यात मिळणार्या BPT HMT सारखा असतो. रोज खायला चांगला.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Sat, 07/25/2015 - 23:48

Permalink

दफ्तरी आणि कृष्णकमोद

ठाण्यात तांदूळ महोत्सवात दफ्तरी घेतला २० किलो .... अप्रतिम चव ...जव्हारचे कुणी पारंपारिक शेती करणारे होते .. ठाण्यात ठक्कर कडे जुना कृष्णकमोद मिळतो (मधून मधून)...उघड्या पातेल्यात भात शिजायला लावला तर आजू बाजूने जाणारे हमखास थांबून विचारतात तसेच ठक्कर कडे 'जुना निलगिरी बासमती मिळतो ...तोही असाच अप्रतिम... तथापि भात हा कुकर मध्ये करण्यापेक्षा उकळत्या पाण्यात शिजवलेला ज्यास्त चांगला लागतो ...
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Mon, 07/27/2015 - 11:47

Permalink

सध्या .....

खडकवासल्याच्या पाणलोट क्षेत्रातला इंद्रायणी खातोय, (नवीन बँच वर्षाअखेरीस येईल) दोन घास त्याचे खाल्याशिवाय, जेवण-झालंय, असं वाटतंच नै.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधांशुनूलकर on Mon, 07/27/2015 - 11:58

Permalink

लहानपणी खाल्लेला एक तांदूळ.. गजवेल

'गजवेल' नावाचा तांदूळ लहानपणी खाल्ला आहे. बेळगावकडे मिळतो म्हणतात. अलीकडे खूप वर्षांत खाल्लेला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Mon, 07/27/2015 - 16:04

Permalink

भाताचे सोडा..

"समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कुठी आले हे हाटेल ? मटण चापायचय चांगले..
  • Log in or register to post comments

Submitted by सत्याचे प्रयोग on Wed, 07/29/2015 - 22:02

In reply to भाताचे सोडा.. by ब़जरबट्टू

Permalink

समाधान हाॅटेल

डांगे चौकातून रावेत कडे निघा बास्केट ब्रिज च्या अलीकडेच आहे. एकदम गावाकडचा फिल येईल. जमीन सारवलेली वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on गुरुवार, 07/30/2015 - 11:29

In reply to समाधान हाॅटेल by सत्याचे प्रयोग

Permalink

समाधान मध्ये असमाधान

दोन वेळा गेलो होतो तिथे पण सांगूनही मटणाची भाजी कमी तिखट नाही केली, मटकीची उसळ पण एवढी तिखट कि खावत नाही. राहिला प्रश्न इंद्रायणी भाताचा तर तो हॉटेल वाला नविन इंद्रायणी वापरतो, त्यामुळे भात खूपच चिकट होतो. हॉटेलचा दिखावा चांगला आहे पण चव मात्र खूप बेकार ….
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on गुरुवार, 07/30/2015 - 16:29

In reply to समाधान मध्ये असमाधान by नितिन५८८

Permalink

अरे देवा...

तिखट जमत नाही राव जास्त.. :( माहितीसाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 07/29/2015 - 20:28

Permalink

इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता,

इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता, पातेल्यात शिजायला ठेवायचा. शिजत असताना घरभर वास पसरतो, आणि मग तो मऊ भात वरून तुपाची धार सोडून दुध-साखरेबरोबर खायचा. भन्नाट चव लागते!!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on गुरुवार, 07/30/2015 - 11:31

In reply to इंद्रायणी कूकरमध्ये न टाकता, by किसन शिंदे

Permalink

एकदम बरोबर

एकदम बरोबर सांगितले किसनराव
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 07/29/2015 - 21:45

Permalink

भारतवारीत इंद्रायणी नक्की

भारतवारीत इंद्रायणी नक्की बघणार. जितका आणाता येईल तितका आणणार. आम्ही सोना मसूरी वापरतो. खरंतर हा भात साम्बाराबरोबर मस्त लागतो. सध्या एक नवीन तांदूळ दिसलाय. म्हणजे तो आधीपासून असेल, मला आत्ता दिसलाय. बासमती पण कमी पॉलिशचा, जरा काळपट! त्याचा पुलाव बरा होतो. आंबेमोहर आमच्यायेथे फार महाग मिळतो. एकाच दुकानात पहायला मिळाला. जास्मिन तांदूळ जरा चिकट व ढब्बू असतो. तो थाई फूडबरोबरच जमतो. कितीही चांगली आमटी केली तरी त्याची चव बरी लागत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on गुरुवार, 07/30/2015 - 13:09

Permalink

तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

अधिक माहिती इथे उपलब्ध आहे
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on गुरुवार, 07/30/2015 - 13:13

Permalink

तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

भात
  • Log in or register to post comments
Profile picture for user प्रसाद प्रसाद

Submitted by प्रसाद प्रसाद on गुरुवार, 07/30/2015 - 18:05

Permalink

कोल्हापुरात दरवर्षी

कोल्हापुरात दरवर्षी डिसेंबरमध्ये तांदूळ महोत्सव होतो (मेरी वेदर ग्राउंड, न्यू पॅलेस जवळ). डायरेक्ट शेतकरी तांदूळ आणून विकतात तेथे. तुलनेने स्वस्त तांदूळ मिळतो. आजरा भागातले बरेच शेतकरी घनसाळ, साधा जिरगा, काळा जिरगा (खरंच तांदूळ थोडा काळा असतो), जोंधळा जिरगा (किंचित जोंधळ्या सारखा गोल आकार), आंबेमोहोर, इंद्रायणी (इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा पुण्यात मिळणारा इंद्रायणी वासाला थोडा सरस आहे) आणि अनेक इतर वासाचे तांदूळ आणि बिनवासाचे पण चवीला उत्तम असे दफ्तरी, रत्नागिरी २४ आणि माहीत नसलेले अनेक प्रकार घेऊन येतात. हे तांदूळ साठवणुकीसाठीपण खूप चांगले, जिरगा तांदूळ तर जसा जुना होईल तसा जास्त चवीला लागतो. ह्यापूर्वी मला घमघमाट वास असणारा आंबेमोहोर क्वचित मिळाला होता, तो ह्या महोत्सवात मिळतोच. तसेच इडली, डोसा यासाठी लागणारा मोठा जाडा तांदूळही स्वस्त असतो. सारखा सारखा एक प्रकारचा तांदूळ खाऊन कंटाळा येतो तेंव्हा असे दोन चार प्रकारचे वेगळे तांदूळ बरे वाटतात.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/30/2015 - 18:33

In reply to कोल्हापुरात दरवर्षी by प्रसाद प्रसाद

Permalink

इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा

इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा पुण्यात मिळणारा इंद्रायणी वासाला थोडा सरस आहे माहितीबद्दल धन्यवाद. स्नेहा, ऐकतियेस ना! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 07/30/2015 - 18:45

In reply to इथे मिळणाऱ्या इंद्रायणीपेक्षा by रेवती

Permalink

=))

=)) भले, उसके राईस की महक मेरे राईस की महकसे जादा अच्छी कैसे हो सकती है ?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/30/2015 - 18:49

In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

येस्स!

येस्स!
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Sat, 08/08/2015 - 17:39

Permalink

आजच जाऊन आलो 'समाधान' ला

जबरा भात....सुंदर चव आणि वासही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 01/15/2019 - 13:16

Permalink

रिसेन्ट अपडेट्स

नुकतेच वल्ली सरांसोबत मावळात एक उनाड भटकंती झाली ! येता येता कामशेत मध्ये चांगला इंद्रायणी शोधत होतो . एका मिल मध्ये गेलो , ३८ रु किलो म्हणाला नवीन इंद्रायणी पण इंद्रायणी ला जसा अपेक्शित आहे तसा घमघमाट अजिबात नव्हता म्हणुन घेतला नाही . ( नंतर जाणवले की बेंचमार्क म्हणुन घ्यायला हरक्त नव्हती !) नंतर मामाभांचे नावाची अजुन एक राईस मिल दिसली बेबडहोळ रस्तावर . तिथुन ३ वेगवेगळे भात घेतले - नवीन इंद्रायणी , कोलम आणि हात्सडीचा इंद्रायणी ! पण हाही इंद्रायणी आमच्या अपेक्षांना पुर्ण करु शकला नाही , चव आणि टेक्ष्चर उत्तम आहे , टिपिकल आपल्या आवडतो तसा गिजगा भात होतो पण इंद्रायणीचा सुगंध अपेक्षे येवढा नाही ! बाकी कोलम ओके. हातसडीचा इंद्रायणी चक्क आवडला नाही , त्याचे तेक्ष्चर एकदमच ब्राऊन राईस सारखे वाटले . थोडक्यात सांगायचे तर वल्ली सर म्हणाले तसे - आपल्या कंपु मध्ये सगळ्यांचे खाण्याचे जिभेचे चोचले वाढले आहेत ! अजुन उत्तम भाताचा शोध सुरु आहे ! एखाद्या वीकेन्डला राजगड तोरणा ट्रेक करावा अन नरसापुर वेल्हा भागातुन मधुन काही चांगला आंबेमोहोर मिळतो का ते पहावा असा विचार आहे !~ तुमच्या माहीतीत असलेली ठिकाणे सुचवा ! ( लगेच आजरा घनसाळ सुचवु नका , तुर्तास तरी कोल्लापुरला जाण्याचा योग नाही , काही दिवसांनी लोलयेच्या वेताळाला भेटायला जायचा प्लॅन आहे तेव्हा जाता जाता तिकडे चक्कर टाकु :ड )
  • Log in or register to post comments

Submitted by rain6100 on Tue, 05/28/2019 - 15:49

Permalink

अस्सल इंद्रायणी आणि आंबे मोहोर तांदूळ पुण्य मध्ये कुठे भेटेल ?

अस्सल इंद्रायणी आणि आंबे मोहोर तांदूळ पुण्य मध्ये कुठे भेटेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by जालिम लोशन on Wed, 05/29/2019 - 00:38

In reply to अस्सल इंद्रायणी आणि आंबे मोहोर तांदूळ पुण्य मध्ये कुठे भेटेल ? by rain6100

Permalink

ग्राहक पेठ, टिळक रोड

आणी Agriculture department भोसलेनगर ground वर प्रदर्शन लावते तेंव्हा. तारखा बाबत न.ता. वाडी शि.नगर आॅफिस मध्ये चौकशी करा. ५० ते ६० रु किलो असतो. जुन्नर भागातील चांगला असतो
  • Log in or register to post comments

Submitted by हणमंतअण्णा शंक… on Tue, 05/28/2019 - 23:44

Permalink

भात

मी नुकताच जिरग्याची काळी साळ हस्तगत केली आहे. मागच्या वर्षी महत्प्रयासाने कोथमिरसाळ मिळाली होती. आंबेमोहोर आणि घनसाळ मित्राच्या शेतात पिकतो तेव्हा माझा शाळू आणि त्यांचा तांदूळ आम्ही बार्टर करतो. सध्या सुगंधी इंद्रायणी, तिबार बासमती, साधा जिरगा, सुरती कोलम आणि पिवळसर असा एचेमटी कोलम, दोन-तीन प्रकारच्या कण्या, आंबेमोहोर तुकडा, आणि जुना बासमती तुकडा इतके तांदूळ घरी आहेत. मी भातप्रेमी असल्याने आठवड्यात एक प्रकारचा भात रिपीट होता कामा नये असा स्पष्ट दंडक आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 12/05/2021 - 11:17

Permalink

सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद

सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद केले असुन हा देह सध्या फक्त भात प्रेमी झालेला आहे, तस्मात... चांगला तांदुळ शोधणे आले. वरती अनेकांनी त्यांचे अनुभव सांगितल्या प्रमाणे मी प्रथमच ऑनलाइन तांदळाची खरेदी केली.वाडा कोलम, सोना मसुरी आणि इंद्रायणी हे तांदुळ आणुन पाहिले. वाडा कोलम हा खाऊन खरं तर कंटाळाच आला होता,पण म्हंटल ऑनलाइन खरेदीत चांगला दर्जा मिळतो का ते पहावे...विशेष काही फरक जाणवला नाही उलट दर्जा तितका चांगला वाटला नाही. सोना मसुरी आणि इंद्रायणी हे दोन्ही पहिल्यांदाच खरेदी केले. इंद्रायणीचा सुगंध लयं भारी आहे,पण चिकट भात होतो आणि माझ्याच्याने तो तितका आवडीने खाववत नाही. यावेळी आता दोन वेगळ्या उत्पादकांकडुन केवळ सोना मसुरीच मागवले आहे. सोना मसुरी हा भात असा आहे जो अधिक खावा वाटतो आणि तो जातो सुद्धा. :) भात खाण्याचे / जेवण्याचे एक विलक्षण समाधान यामुळे मिळते हा माझा अनुभव सिद्ध झाला आहे.जालावर सोना मसुरीवर एक उत्तम माहितीपर व्हिडियो मिळाला आहे तो इथे देउन ठेवतो. [ या व्हिडियोमुळे यंदाच्या सोना मसुरी तांदुळ खरेदीत मला मदत झाली. ] जाता जाता :- तुम्हाला माहित असलेल्या उत्तम भात वाणाची इथे अधिक माहिती ध्या... कुठला वेगळा भात तुम्ही खाल्ला असेल तर त्याचे नाव आणि जमल्यास ऑनलाईन उपलब्ध असेल तर त्याची लिंक दिल्यास अजुन उत्तम ! मी आता काळा भात [ हो काळा भातच म्हणालोय ] उत्तम कुठला ते पाहतोय... मला हा देखील एकदा चाखुन पहायचा आहे. याची Forbidden Rice अशी देखील हटके आणि प्राचीन ओळख आहे. अती अवांतर :- मी पहिल्यांदाच भुत जोलोकिया / भूत झोलकिया या मिर्चीची चव [ मिर्ची पेस्ट स्वरुपात ] चाखली... गंध उग्र आहे या मिर्चीचा... ही पेस्ट मी घरी ठेचा करताना त्यात वापरली. चव आवडली. [ प्रमाण कमी वापरले आहे आणि अजुन अनुभव घेणे सुरुच आहे. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati... :- Sunny (1984)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 12/06/2021 - 17:16

In reply to सध्या पोळी खाणे पूर्णपणे बंद by मदनबाण

Permalink

उपाय

इंद्रायणीचा सुगंध लयं भारी आहे,पण चिकट भात होतो आणि माझ्याच्याने तो तितका आवडीने खाववत नाही.
ह्यावर दोन तीन उपाय आहेत , सर्वात सोप्पा उपाय म्हणजे आमचे परममित्र नाखु ह्यांनी सुचवलेला : संपुर्ण इंद्रायणी घ्यायचा नाही , ५०% इंद्रायणी अन ५०% फडफड्या असा कोणातातरी वेगळा भात घ्यायचा शिजवायला , म्हणजे अगदीच गिजगा होत नाही अन सुगंधही येतो. दुसरा उपाय म्हणजे संपुर्ण इंद्रायणी भात घ्यायचा पण जमेल तितक्या कमी पाण्यात , अन बहुतांश करुन वाफेवर शिजवायचा तीसरा उपाय म्हणजे नवीन ताजा इंद्रायणी घायचा नाही कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, जुना एक दीड वर्ष जुना इंद्रायणी गिजगा होत नाही . चौथा उपाय म्हणजे आमचे मित्र पन्नास ह्यांनी सुचवलेला (हा उपाय मी करुन पाहिलेला नाही बट इट्स वर्स्थ अ ट्राय ) , वैदिक पधतीने भात शिजवायचा , म्हणजे कसे तर भात धुवायच्या आधीच पण रट रट उकळवुन घ्यायचे , अन भात धुतला कि लगेच उकळत्या पाण्यात घालायचा , कुकर बिकर शिट्टी वगैरे भानगडीत पडायचेच नाही ! आणी पाचवा उपाय - जो की सगळ्यात बेस्ट - गिजगा इंद्रायणी भात ही एक अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे , तेव्हा आमच्या सारखे मित्र शोधुन , त्यांन्च्या सोबत मटण रस्सा असा गिजगा इंद्रायणी भातात कुस्करुन खाण्याची प्रॅक्टिस करणे ! =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 12/14/2021 - 20:46

In reply to उपाय by प्रसाद गोडबोले

Permalink

ओक्के, उपाय चांगले आहेत..

ओक्के, उपाय चांगले आहेत...करुन [ बायडीस सांगुन ] पहायला हवे ! आजच एक लेख वाचनात आला होता, तो इथे देऊन ठेवतो. पारंपरिक भात वाणांचे जतन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sun, 12/05/2021 - 13:07

Permalink

आबेंमोहर

नसरापुर, भोर येथील जुना आबेमोहोर खुप आवडतो कारण आजोबांच्या शेतातला. पुढे उत्तर भारतात काली मुंछ,शक्करचिनी सारख्या तांदूळाच्या जाती खायला मिळाल्या. आता पुन्हा एकदा आंबेमोहोर, केशरी भात याचा छान बनतो साखर कमी लागते. बाकी बिर्यानी, पुलाव करता बासमती.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sun, 12/05/2021 - 15:08

Permalink

अहो

श्रीमंत श्री रोमाधिपती, श्री मार्कस ऑरेलीयस महाराज एकदा पावशेर जिरेसाळी/ जिरासर तांदूळ आणून ट्राय करा बरं तुम्ही, महाराष्ट्र / गुजरात राज्यातील प्रॉडक्ट आहे, जिऱ्याच्या दाण्यासारखा बारीक अन नाजूक पण सुबक दाणा असतो, बेताचे पाणी घालून शिजवला तर एकदम गुरगुट्या नाही अन अगदी मोकळं शित नाही अश्या कंसिस्टंसीचा तयार होतो, तुफान लागतो एकदम, अंगभूत सुगंध आणि चव अतिशय लाईट असते, तूप मेतकूट भात, तूप मीठ भात लिंबाचे गोड/ तिखट लोणचे / रसलिंबू इत्यादी पेयरिंग मस्त होते, तांबड्या रश्यासोबत सुद्धा उत्तम पेयरिंग व्हावं (अनुभव नाही) शक्यतो अन-पॉलिश जिरेसाळी बघावा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 12/06/2021 - 17:07

In reply to अहो by जेम्स वांड

Permalink

जिरेसाळ ट्राय केलेला आहे पण

जिरेसाळ ट्राय केलेला आहे पण काही खास वाटला नाही. नुकताच आजरा घनसाळ देखील ट्राय केला आहे , तो छान वाटलं टेस्ट एकदम मस्त आहे ! पण आपले खरे प्रेम जडले आहे ते इंद्रायणीवरच ! आता लवकरच आमच्या पिंचिं मित्रमंडळासोबत मावळात चक्कर टाकु भात गिरण्यावर , गावांमध्ये जाऊन इंद्रायणीचे सॅम्पल्स आणणार आहे . पण तुर्तासतरी कोल्हापुरच्या काळभैरव ब्रॅन्ड चा इंद्रायणी अफलातुन आहे हे आवर्जुन सांगत आहे. . आय मीन इतका अफलातुन की मी मला भेटलेल्या प्रत्येक भातप्रेमी व्तक्तीला न विसरता सुचवत आहे तो ! Image removed. इंद्रायणी म्हणजे खरेतर मावळातील भात , पण त्याचा बेस्ट , मला आवडलेला बेस्ट ब्रँड कोल्हापुरचा आहे हे खरेच आश्चर्य आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Sun, 12/05/2021 - 21:21

Permalink

अगं बाई भातावर धागा ;)

भाताच्या बाबतीत अगदी ढ आहे,तरी घरी बदलून बदलून तांदूळ आणला जातो.सध्या काली मूंछ आहे, मस्त आहे.मला इंडिया गेटचा बासमती आवडला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 12/11/2021 - 19:28

Permalink

परवाच यु ट्यूब वर एक व्हिडीओ

परवाच यु ट्यूब वर एक व्हिडीओ पाहत होतो तेलंगणाच्या खाद्यसंस्कृती बद्दल. त्यात भात तूप आणि मलगापुडी चटणी घालून खाताना दाखवले होते. ते पाहून मला पण असेच करावे अशी जोरदार इच्छा झाली. सुदैवाने बायकोने त्याच दिवशी इंद्रायणी भात केला होता. मी फारसा भात खात नाही. पण दुपारचं लग्नाचं जेवण जास्त झालं होतं तेंव्हा फार काही खाण्याची इच्छा नव्हती त्या दिवशी गरम गरम भात, त्यात घरचं छान कढवलेलं साजूक तूप आणि मुलुंड मध्ये असलेलया एका मद्रासी दुकानातून ( सेल्वा विनायगर) आणलेली मलगापुडी चटणी असे घालून खाऊन पाहिला. अत्यंत अप्रतिम असे हे मिश्रण आहे. इंद्रायणी भाताची चव छानच होती पण लोकांनी वर्णन केला आहे तसा घट्ट गोळा झालेला नव्हता बऱ्यापैकी सुटा होता( बासमती सारखा नव्हे). आता परत कधी जेवण जास्तझाले तर हा बेत नक्की करणार.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Wed, 12/22/2021 - 11:27

Permalink

नगर जिल्हा अकोले तालुका

नगर जिल्हा अकोले तालुका येथे राहिबाई पोपरे या देखील देशी वाणांच्या जपणूकीचे मोठे काम करत आहेत. त्यांना लोक प्रेमाने "बीजमाता" म्हणतात. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. माझ्या मामेभावाने त्यांची काही दिवसापुर्वी भेट घेतली होती तेव्हा त्याला सगळा जुना खजिना बघायला मिळाला.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 12/22/2021 - 11:58

Permalink

नगर जिल्हा अकोले तालुका येथे

नगर जिल्हा अकोले तालुका येथे राहिबाई पोपरे या देखील देशी वाणांच्या जपणूकीचे मोठे काम करत आहेत. त्यांना लोक प्रेमाने "बीजमाता" म्हणतात. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. होय. असे पुरस्कार सोहळ्यांचे क्षण पाहताना देखील मन उचंबळुन येते. असेच काही वेगळे क्षण इथे पाहता येतील. जाता जाता :- अ‍ॅमेझॉनवर सोना मसुरी महाग मिळत असल्याने यावेळी प्रथमच बिग बास्केट वरुन सोना मसुरी मागवला आहे. आत्ता पर्यंत अ‍ॅमेझॉनवरुन ३ वेगळ्या उत्पादकां कडुन तांदुळ मागुन पाहिले होते त्यातल्या २ उत्पादकांनी दिलेला तांदुळ सोना मसुरी होता, एकाने जो दिला तो सोना मसुरीच्या नावाखाली विकला तो तसा नव्हता. आता बिग बास्केटचा अनुभव काय येतो ते पहायचे आहे.ऑनलाईन रास्त दरात मागवण्याचा इतर कोणता उपाय / पर्याय माहित असल्यास इथे जरुर कळवावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Jaisa Mukhda To Pehle Kahin Dekha Nahin... :- Pyar Ke Kabil
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com