Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अनुस्वार on गुरुवार, 12/09/2021 - 19:12
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
मुक्तक
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
अनुभव
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके. थोडक्यात काय अमुक पुस्तक किंवा व्यक्ती मला पूर्ण कळाली, असा दावा आपण करू शकत नाही. एखादा प्रचंड विनोदी प्रसंग रेखाटतांना लेखकाचे हृदय त्या क्षणी कदाचित आकंठ दुःखात बुडालेले असू शकते. आणि वरवर त्रासलेली दिसणारी व्यक्ती मनातून मात्र शांततेच्या सागरात पहुडलेली असू शकते. माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा.
  • Log in or register to post comments
  • 2701 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रीगणेशा on गुरुवार, 12/09/2021 - 22:42

Permalink

विचार आवडला!

विचार आवडला! मना-मनांचा संवाद होणं महत्वाचं.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुस्वार on Sat, 12/11/2021 - 03:35

In reply to विचार आवडला! by श्रीगणेशा

Permalink

धन्यवाद.

मनातलं बोललात. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Fri, 12/10/2021 - 19:57

Permalink

माणूस आणि पुस्तक

आताशा असंच होतंय, जुन्या पुस्तकांची पेटी उघडली की माझी चिमणी हट्ट धरते,चित्रांचे आवडणार एखादं चित्र बोलकं कर म्हणते.अशीच काही पानं दुधाच्या सायीसारखी मऊसर रूसलेली, संध्याकाळी कातर थकलेली,फुग्यासारखी फुगलेली , केशर ल्यायलीली अबोली मन पाने प्रत्यक्षात वाचायली लावते. थोडा काळ तरी माणसं उलगडतात..पण माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा. +१११
  • Log in or register to post comments

Submitted by अनुस्वार on Sat, 12/11/2021 - 03:35

In reply to माणूस आणि पुस्तक by Bhakti

Permalink

सुंदर प्रतिसाद.

आभारी आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com