Skip to main content

थंडगार फालुदा

लेखक दिपाली पाटिल यांनी बुधवार, 22/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे ही ssssssssssss गरमी वाढलीये म्हणून म्हटलं जरा थंड गार फालुदा बनवावा.. वाढणी: ४ साहित्यः १ कप फालुदा शेव १ मोठा चमचा (tbs)सब्जा -- ५-१० मि. पाण्यात भिजवून ठेवणे. २ मोठे चमचे रोज (Rose) सिरप २ कप थंड दुध आइस्क्रिम (कुठले हि चालेल पण वनिला किंवा अमेरिके त एक गुलकंद चे आइस्क्रिम मिळते ते बेस्ट आहे.) नहितर लाइट व्हिप्ड क्रिम पण छान लागते. कृति: थोड्या पाण्यात फालुदा शेव उकडून घ्यावी. अंदाजे ५-७ मि. लागतात. चाळणी त शेव गाळून घ्यावीत. चार ग्लासेस मध्ये अंदाजे सारख्या प्रमाणात टाकावी. सब्जा गाळुन घ्यावे व त्याचे ही ४ भाग करुन फालूदा शेव च्या वरून घालावे. आता रोझ सिरप घालावे. थंड दुध घालावे. मोठ्ठा स्कुप आइस्क्रिम/लाइट व्हिप्ड क्रिम घालावे. वरून गुलकंद वा रोझ सिरप घालुन सजवावे.

वाचने 9902
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

हा प्रकार मला फार फार आवडतो...पण फोटो का बरं दिसत नाही ??? मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

माझि आई जेलि पन घाल्ते, रेक्स जेलि चे प्याकेत मिल्ते बाझारात. चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

तुम्ही मराठीची एवढी का मारताय? तुम्हाला चुचु ह्या आयडीने मराठी आंतरजालावर येउन 23 आठवडे 4 दिवस झाले आहेत! आता तरी शुद्धलेखन सुधरवा! धन्यवाद, टिंगोपंत.

In reply to by पर्नल नेने मराठे

इकडे ही ssssssssssss गरमी वाढलीये म्हणून म्हटलं जरा थंड गार फालुदा बनवावा.. बनवाकी पण त्याचे असे साग्रसंगीत वर्णन करुन आणी फोटु टाकुन आमच्या जीवाची अशी काहिली का करता ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

:-) - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

फोटो आणि कृती अतिशय उत्तम.........तुमच्या कडे फालुदा खायला यायला हवे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सब्जा भिजवण्या ऐवजी पाण्यात उकळून घ्यावा... नुसता भिजवुन घेतला तर स्टोन चा त्रास होण्याची शक्यता असते ..

फोटो पाहुनच थंडावा मिळाला! चला अजुन एक आईस्क्रिम गडपुन येतो... -सँडी काय'द्याचं बोला?

दिपाली रेसिपी अगदी मस्त आणि सोप्पी, शिवाय अश्विनीची टिपही छान. मी सब्जा नेहमी भिजतच घालायचे. आता उकळुन घेईन.. साधना

दिपाली, फालुद्याचा फोटो झकासच,मस्त! मी जेलीही घालते. स्वाती

एकंदर कट्ट्याला धमाल येणार असे दिसते आहे. या कट्ट्यला नाही करता आला तर उन्हाळी (बार्बेक्यू) कट्ट्याला हे मस्त आणि मस्ट आहे.. - नाटक्या

थंडगार फालुदा पाहून अंमळ जळफळाट झाला. ;) मस्त फोटो. सोप्पी आहे पाकृ. जरा हा पोलन्स चा सिझन संपला की करतेच घरी. धन्यवाद दिपाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुंदर फोटू आणि पाकृ..! दिपालीदेवींचा विजय असो.. :) तात्या.

अमेरिकेतील देशी ग्रोसरकडे फालुदा शेव मिळते का? की अन्य कुठे? कोणता ब्रँड असतो? बाकी फोटो अगदी मस्त.

In reply to by हुप्प्या

अमेरिकेतील देशी ग्रोसरकडे फालुदा शेव मिळते का? की अन्य कुठे? इंडिया कॅश अन कॅरि मधे मिळते.. कोणता ब्रँड असतो? लोकल ब्रँड च असतो, त्याला नाव असं काहि नाहिये. दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

माझी वहिनी घरी बनवते.. तादुळाचे पीठाची उकड काढुन चकली यत्राने थड पाण्यामधे शेव पाडावी. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

झकास फोटो.करायची आठवण केलीस इथे येउन विसरलेच होते तुला जर उष्णतेचा त्रास कमी करायचा असेल तर तु सब्जा च्या एवजी तुळशीचे बी भिजत घालुन वापरु शकतेस चवीत फरक पडत नाही. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

In reply to by समिधा

धन्यवाद समिधा.. अगं पण मी कित्ती तुळशी लावली तरि जगत च नाही. तसा सब्जा ही थंड च असतो ना?? :/ दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

पण तुळशीची बी अधिक चांगली.ईथे भारतीय दुकानात मिळते. ती भिजत घालायची समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)