प्रेरणा ... विपश्यना आणि रॅन्डम मी ... https://www.misalpav.com/node/49591 ...
--------
मुळात, ध्यानधारणा ही आवश्यक आहे का?
माझ्या अनुभवा नुसार, ध्यानधारणा ही अत्यावश्यक आहे...
मला जाणवलेले काही मुद्दे म्हणजे, आपणच आपली उन्नती करत जातो. हळूहळू का होईना पण, निश्र्चितच आपण आपल्याला ओळखायला लागतो. मनाचा मनाशी मनापासून संवाद होणे, म्हणजेच ध्यानधारणा. (हे माझे वैयक्तिक मत आहे.)
-------
ध्यानधारणा करण्यासाठी गुरूची आवश्यकता असते का?
माझ्या अनुभवा नुसार, गुरूची आवश्यकता नाही, पण योग्य रस्ता दाखवणारे कुठलेही वाक्य, मग ते वाचलेले असो किंवा ऐकलेले असो किंवा चर्चा करतांना सहज मनात उमटलेले भाव असोत, हे देखील सकारात्मक परिणाम कारकच ठरतात.
काही उदाहरण देतो, वाल्या कोळ्याचे आत्मज्ञान ध्यानधारणा केल्याने वाढले आणि त्यांचे वाल्मिकी ॠषीत रूपांतर झाले. आपल्या पापात आणि पुण्यात, कुणीही सहभागी होणार नाही, हे त्यांना नारद ऋषींच्या मुळेच पटले
दुसरे उदाहरण म्हणजे, धृव... स्वतःसाठी अढळपद मिळवणे, इतकीच त्याची माफक अपेक्षा होती आणि ध्यान धारणा करून, त्याने ती साध्य केली.
दोन्ही वेळा, नारद हे निमित्यमात्र ....
तिसरे उदाहरण म्हणजे, गौतम बुद्ध, झाडाखाली बसून विचार मंथन करतांना, त्यांनाही समाजोपयोगी गुह्यज्ञान मिळाले.
-------
ध्यानधारणे साठी, गुरू मंत्राची आवश्यकता आहे का?
मला तरी लागली नाही, पण खूपच अस्थिर मन असेल तर, त्याला एका ठिकाणी आणण्यासाठी, एखाद्या वाक्याची गरज असते, तोच गुरूमंत्र समजलात तरी हरकत नसावी...
दारूचे व्यसन कमी करण्यासाठी, मी, आज दारू पिणार नाही,
हेच वाक्य मनांत म्हणत होतो.
आता, मी आज दारू पिणार नाही, हे वाक्य गुरूमंत्र नाही, पण हेच वाक्य सतत मनांत घोळवत असल्याने, सौदी, कुवैत आणि अबूधाबी इथे, दारू पासून दूर राहण्यासाठी, मदत झाली.
एक सामाजिक उदाहरण देतो, कुणी "गण गण गणात बोते" हा मंत्र म्हणतो, तर कुणी, "दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा मंत्र म्हणतो, तर कुणी, "श्री स्वामी समर्थ" हा मंत्र जपतो ... तुम्ही कुठलाही मंत्र म्हणा, त्याचे अंतिम फलित एकच असेल आणि ते म्हणजे, मन एका जागी केंद्रीत होईल.
मन केंद्रीत करण्यासाठी एखाद्या वाक्याचा सतत केलेले स्मरण, म्हणजेच गुरूमंत्र...
सध्या तरी आमचा एकच जप सुरू असतो, एखाद्या नाण्याला असंख्य बाजू असतात.
---------
ध्यानधारणा करण्यासाठी, एकांताची आवश्यकता असते का?
हो. ध्यान धारणा करण्यासाठी मला तरी एकांताची आवश्यकता भासते. सामुदायिकरित्या ध्यान धारणा, मला तरी करता येत नाही. धृव आणि वाल्या कोळी, यांनी देखील एकांतवासातच ध्यान धारणा केली.
मुळात, माणूस म्हणजे, दोन पायांचे अर्धवट आणि अति उपद्रव देणारे माकड. त्यामुळे माणसाचे मन एका जागी स्थिर होणे फारच अवघड गोष्ट आहे. जरा काही खूट्ट वाजले की मन अस्थिर होते, खमंग वास नाकात शिरला की जीभ खळवळते, त्यामुळे एकांतवास ही ध्यानधारणा करण्यासाठी मला तरी आवश्यक वाटते.
सामुदायिक प्रार्थना आणि मंत्रोच्चार, हे ध्वनी प्रदूषण करण्या शिवाय इतर कुठलेही काम करत नाहीत... अर्थात,हे माझे वैयक्तिक मत आहे.
घरचा गणपती सार्वजनिक करू नये
--------
ध्यानधारणा कशी करावी?
कुठल्याही गोष्टीला सुरूवात करायची असेल तर एक Starting Point लागतोच.
मी झोपण्यापुर्वी स्वतः साठी काही मिनिटे काढायचो आणि दिवसभरात मी काय चुकीच्या गोष्टी केल्या? ते आठवायचो.
साधारण पणे, 6-7 महिन्यांत, चुकांवरचे उपाय देखील मिळत गेले.
--------
थोडक्यात सांगायचे तर, प्रत्येकाची ध्यानधारणा करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
वाचने
9716
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार मोठ्या विषयाला हात घातलाय.
मुळांत गुरू अनेक असले तरी ...
In reply to फार मोठ्या विषयाला हात घातलाय. by कर्नलतपस्वी
कळत नाही कोण गुरूस्वरूपात भेटेल?
In reply to मुळांत गुरू अनेक असले तरी ... by मुक्त विहारि
शिक्षक / गुरु , दोन शब्दातील गोंधळ
In reply to मुळांत गुरू अनेक असले तरी ... by मुक्त विहारि
मुवि सर, आपल्या मांडलेल्या
खूपच छान..
In reply to मुवि सर, आपल्या मांडलेल्या by बोलघेवडा
खूपच छान लेख आणि प्रतिसाद,
वेळ मिळेल आणि मूड लागेल तसा ...
In reply to खूपच छान लेख आणि प्रतिसाद, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मुविसाहेब, ध्यानधारणेसारखा
वा मुविकाका चांगल्या विषयाला हात घातलात.
सहमत आहे...
In reply to वा मुविकाका चांगल्या विषयाला हात घातलात. by राजेंद्र मेहेंदळे
छान..
In reply to वा मुविकाका चांगल्या विषयाला हात घातलात. by राजेंद्र मेहेंदळे
१.अध्यात्मात गुरुची आवश्यकता
धृव आणि वाल्या कोळी,
In reply to १.अध्यात्मात गुरुची आवश्यकता by कानडाऊ योगेशु
माझ्या अल्पआकलनानुसार
In reply to धृव आणि वाल्या कोळी, by मुक्त विहारि
गणित अर्थशास्त्र तसच अध्यात्म ..
In reply to माझ्या अल्पआकलनानुसार by कानडाऊ योगेशु
गुरू हा राजू गाईड सारखा ....
In reply to गणित अर्थशास्त्र तसच अध्यात्म .. by चौकस२१२
+१
In reply to १.अध्यात्मात गुरुची आवश्यकता by कानडाऊ योगेशु
मला देखील गुरूची आवश्यकता भासली नाही ...
In reply to +१ by मूकवाचक
गुरू गोविंद दोन खडे......
छान लेख.
नमस्कार
हेच म्हणतो. - (साधक) सोकाजी
In reply to नमस्कार by मार्गी
ध्यान आणि धारणा,
In reply to नमस्कार by मार्गी
ध्यान आणि धारणा,
In reply to नमस्कार by मार्गी
मनात आलेला एक प्रश्न
विषय बराच मोठा आहे हा. पातंजल
In reply to मनात आलेला एक प्रश्न by स्वधर्म
त्याचे फायदे जाणवूनसुध्दा ते रोज केले जात नाही.
In reply to मनात आलेला एक प्रश्न by स्वधर्म
अतिशय सुंदर लेख
काही कालावधीनंतर स्वतःलाच फायदे जाणवू लागले....
In reply to अतिशय सुंदर लेख by Nitin Palkar
माझा ध्यानाचा
असुदे की अलग अनुभव. सांगा
In reply to माझा ध्यानाचा by जेम्स वांड
हेच म्हणतो
In reply to असुदे की अलग अनुभव. सांगा by सोत्रि