Skip to main content

शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती

लेखक जानु यांनी बुधवार, 09/12/2020 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे. शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत. १. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी. सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे. खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल? हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही. २. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही. शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे. सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो. भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा. ३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा. मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्‍यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत? ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्‍याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्‍याकडुन कर अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्‍यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का? सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे. ४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा. सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे. जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार? ५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी. यास सरकारने मान्यता दिली आहे. हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्‍यांच्या बाजुने लागला. ६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही. सरकार यास तयार आहे. दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका सोपा नाही. ७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी. सरकार यावर सकारात्मक आहे. वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते. शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्‍या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.

वाचने 174883
प्रतिक्रिया 559

प्रतिक्रिया

In reply to by आग्या१९९०

कृषीमाल gst मुक्त असल्याने मर्यादा येतील इनपुट क्रेडिटवर.
नुसते इनपुट क्रेडीट घ्यायचे म्हणून शेतमालाच्या विक्रिवर जीएसटी लावला तर शेतमालाचे भाव अजुन वाढतील. म्हणूनच जीएसटीचा संबंध शेतकर्‍यांशी जोडल्यास तो आतबटटयाचा व्यवहार ठरेल असे पहिल्या प्रतिसादात म्हटले होते. शिवाय एकदा कागदी घोडे नाचवायला घेतले की ते शेवटपर्यंत नाचवावे लागतात. त्यापेक्षा शेतकर्‍यांना आयकराच्या कक्षेत आणले तर जे जास्त योग्य ठरेल आणि सरकार आणि शेतकरी दोघांनाही सोयीस्कर (फायद्याचे असेलच असे नाही) ठरेल.

In reply to by धर्मराजमुटके

नुसते इनपुट क्रेडीट घ्यायचे म्हणून शेतमालाच्या विक्रिवर जीएसटी लावला तर शेतमालाचे भाव अजुन वाढतील. You said it! त्यापेक्षा शेतकर्‍यांना आयकराच्या कक्षेत आणले तर जे जास्त योग्य ठरेल आणि सरकार आणि शेतकरी दोघांनाही सोयीस्कर (फायद्याचे असेलच असे नाही) ठरेल. किती परस्परविरोधी आणि सोयीचे बोलता. आयकर लावण्यासाठी नफा कसा मोजणार? शेतमालाचे भाव वाढू नये म्हणून GST लावायचा नाही.मग आयकर कृषी विम्याप्रमाणे " आणेवारी " काढून ठरवणार का? एक ट्रॅक्टर खरेदी केला तर कमीतकमी ९० हजार GST भरतो शेतकरी,तो सगळा सरकारच्या तिजोरीत.बाकीचे उद्योजक आयकर भरतात त्यांना GST input credit द्यायचे. कृषीमाल महाग होणार म्हणून शेतकऱ्याला GST इनपुट क्रेडिट पडून दूर ठेवायचे? हा कुठला न्याय? शेतकऱ्यांकडून आयकर घ्या आणि GST इनपुट क्रेडिटही द्या.

In reply to by आग्या१९९०

किती परस्परविरोधी आणि सोयीचे बोलता.
तुम्हाला वाटले तरी परिस्थिती तशी आहे. आयकर मोजण्यासाठी जीएसटी कशाला हवा ? वकील लोक आयकर कसा भरतात ? डॉक्टर लोक (मी हॉस्पीटलबद्दल बोलत नाही.) आयकर कसा भरतात ? किंवा कोणताही प्रोफेशनल सर्विस मधे गणला जाणारा व्यक्ती आयकर कसा भरतो याचे उत्तर तुम्हाला माहित असेल तर त्याचप्रमाणे शेतकरी देखील आयकर भरु शकतो.
एक ट्रॅक्टर खरेदी केला तर कमीतकमी ९० हजार GST भरतो शेतकरी.
तुमच्या या विधानातून बहुधा शेतकर्‍यालाच इनपुट क्रेडीट न मिळाल्यामुळे त्याचे नुकसान होते असा अर्थ निघतो. पण कोणत्याही क्षेत्रातील अंतिम ग्राहक असेल तर त्याला इनपुट क्रेडीट मिळतच नाही. त्याला फक्त शेतकरी अपवाद नाही. मी किंवा शेतकर्‍याने घरात वापरायला टिव्ही घेतला तर त्याला इनपुट क्रेडीट मिळत नाही म्हणून वाईट वाटावे काय ?
GST इनपुट क्रेडिटही द्या.
तुम्हाला GST इनपुट क्रेडिट इतके आकर्षक का वाटते ते समजत नाही. तुम्ही व्यावसायिक आहात की नोकरदार माहित नाही. पण तुम्ही समजता तेवढा फायदा यात मिळत नाही. किंबहूना तो फायदा मिळविण्यासाठीचे पेपरवर्क करण्यात लहान व्यावसायिकांची (आणि शेतकर्‍यांना हवे असेल तर) त्यांचीसुद्धा बरीचशी उर्जा आणि पैसा खर्च होतो.
शेतमालाचे भाव वाढू नये म्हणून GST लावायचा नाही
वाढिव किंमतीचा फायदा शेतकर्‍याला मिळत असता तर माझे काहीच म्हणणे नाही. मात्र ह्या वाढीव किंमतीमुळे शेतकर्‍याला काही फायदा होईल असे वाटत नाही. असो.

In reply to by आग्या१९९०

सरकारने शेतीला उद्योग दर्जा द्यावा. अनि फक्त संकटकाळी थोडी मदत करावी किंवा निर्यातीसाठी मदत जगातील एका शेती निर्यात मोठी करणाऱ्या देशातील परिस्थिती पाहून लिहितोय

In reply to by श्रीगुरुजी

GST returns शेतकऱ्यांनी नियमित भरले तर input credit मिळेल.
यात शेतकर्‍यांना कसा काय फायदा होईल कळाले नाही. हा तर आतबट्याचा व्यवहार होईल ना ?

In reply to by श्रीगुरुजी

बरोबर पण कोणत्याही क्षेत्रातील अंतिम ग्राहक असेल तर त्याला इनपुट क्रेडीट मिळतच नाही. हे पन

In reply to by आग्या१९९०

शेतीकरता घेतलेल्या वस्तूवर शेतकरी GST भरतो,परंतु त्याचे उत्पादन विकताना त्याला GST setoff मिळतो का? शेतकरी कोणाला विकतोय अंतिम ग्रहकाला? कि होलसेल विक्रेत्याला? त्यावर हे अवलंबून नाही का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे पण हे terrorist होते ना? मोदी terrorist समोर झुकले काय निवडणुका पाहून? अवघड आहे.. मोदी जी ने किया होगा तो कुछ सोच समज के हि किया होगा.. थोडा time जादा लगा.. But चलता है.. Masterstoke.. आता सगळ्यां शेतकऱ्यांचे आणि ग्राहकांचे पण कंबरडे मोडून पडेल आणि त्यांना गप्प बसावे लागेल..

In reply to by गणेशा

"आंदोलनजीवी" अशी हेटाळणी केली होती ना पंतप्रधानांनी ? ते प्रिय कसे झाले अचानक? एक चांगले केले आंदोलनजीवींशी चर्चा न करता कृषी कायदे मागे घेऊन थोडीफार लाज राखली. असेही त्या कायद्यात दम नव्हताच.

In reply to by कॉमी

कॉ भय्या तुम्ही आय ती सेल म्हणून अवहेलना करा हवे तर पण जे दिसले त्यावर बोलतोय , भारतातही विडिओ द्वारे आणि परदेशात जे प्रत्यक्ष जाणवले ते आणि एवढे करून कायदा कसा चुकीचा होता ते सांगितलेच नाही ! असो हे आंदोलन अगदी खरे असले असे गृहीत धरले आणि पंजाबात खूप शेती आहे हे हि खरे असले तरी खालील मुद्दे विसरता येत नाहीत १) भारताबाहेर आंदोलनाचं पाट्या गुरुमुखीतून का? देशभर काही पंजाबी बोलली जात नाही २) धार्मिक शिकांची चिन्हे का? निशांग का काय म्हणतात ते ३) मेलबर्न क्रिकेट ग्रॉऊंडनं वॉर सुरवातीला जेव्हा निदर्शन झाली तेव्हा १९८४ चा उल्लेख का? काय संबंध ४) सिडने ला हर्षी पार्क ला तिरंगा रॅली ( भारतोयांनी काढलेली) त्याला विरोध शिकांकडूनच का? ५) ब्रिस्बेन गुरुवंदरातून शिकांच्यातच झालेलया मारामारीचे खरे कारण ( भारताशी निगडित असलेली शीख आणि नवीन पिढी यातील वाद) ६) ऑस्ट्रेलयातील दिवाळी कार्यक्रमात फक्त पंजाब चाय समूहाने फार्मर वैगरे घोषणा दिलाय स्सतेज वॉर, केरळ, मराठी , बंगाली नि नाही? का तिथे फार्मर नाहीत ? त्यांचे नातेविकं इथे नाहीत ६) ऑस्ट्रेलियन फार्मर या नावाखाली सहानुभूती मिळवतात येथे पण त्यात एकही खरा ऑस्ट्रेलियन फार्मर दिसत नाही ( हेतू हा असतो कि अडानि ला येथे जो विरोध आहे त्यात आपली पण पोळी भाजून घ्यायची अडाणी = मोदी इत्यादी नेहमीचे धिंगरी रडगाणे जगभर शिख समुदायाला भारतीय हिंदूंचाय विरुद्ध भडकवत जातंय हे तुम्हाला भारतात कदाचित दिसत नसले किंवा फरक पडत नसेल कारण तिथे जेमतेम २ टक्के शीख आहेत पण येथे त्यामानाने खूप % आहे आणि ते त्यांचं संख्येचं मानाने जास्त आवाज उठवतात तेवहा उगा आय ती सेल म्हणून ओरडून काही होणार नाही

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण सर कायद्यामध्ये काय चुकीचं होत हे तुम्ही शेवट पर्यंत सांगितलंच नाही.

In reply to by धनावडे

दलाल लोकांची वाट लागली असती ... शेतकर्‍याला योग्य मोबदला मिळाला असता . . . यापेक्षा अजुन काय वाईट असु शकते . .

In reply to by सुक्या

मला ही तेच म्हणायच आहे, हे आपल्या कळतय पण सरांना का नाही कळत, की नोटबंदी ची जखम अजून बरी नाही झाली..

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे आंदोलन देशद्रोह्याचं आहे, अतिरेक्यांचं आंदोलन म्हटल्या गेले जे की चूक होते. तुमचं जिल्ह्यात नसेल तसे हो पण जगात इतरातर तेच चालू आहे पण तुम्ही ते बघणार नाही कारण आता उन्माद असेल ना मोदी ला हरवले याचा... बार कायदा नक्की चुकायचा का? हे कोण सांगणार

शेठ घाबरला, आता पंजाब हरयाणा यूपी चे इलेक्शन आहेत. त्यामुळे सेंटी मारतोय.

(खाटकांनी दिशाभूल केल्यामुळे) बोकडांनी खाटकांची बाजू घेऊन सत्याग्रह केला होता. तेंव्हा सरकारने नमते घेऊन बोकडांचा हलाल होण्याचा हक्क पुनः प्रस्थापित केला आहे. कोणाला त्याचे काय वाईट वाटते आहे आणि का? हेच समजत नाही.

साम - दाम- दंड - भेद यापैकी सामोपचाराचा मार्ग खुंटला. आता 'दाम करी काम राणी करी सलाम' हा मंत्र अजमावून बघत टिकैत यांनी भाजपत येऊन मुख्यमंत्रीपद उपभोगावे अशी योजना असावी, असे 'ह्यांचे' मत. - चित्राताईसाहेब गुप्तगंगातीरकर.

दलाल लोकांच्या मागण्या तर मान्य झाल्याच आहेत .. आत हे लोक बघा कसे मागण्या वाढवतात ते! एम एस पी हवी / फुकट वीज हवी / आम्ही काहीही करु आमच्यावरचे खटले रद्द करा / मेलेल्या दलालांच्या मुलांना सरकारी नोकरी किंवा पैशे द्या / स्मारक बांधायला जागा द्या / आमचे पाय दाबुन द्या / दारु पाजा ... वगेरे वगेरे ... खरे दात आता दिसतील बैठकी नंतर !! मजा अशी की जे अगोदर या आंदोलनाचे समर्थन करत होते ... आत बघु काय बोलतात ते . ..

In reply to by सुक्या

दारु पाजा ... वगेरे वगेरे ... अन्न परवडत नसेल तर, स्काॅच प्या....

In reply to by कपिलमुनी

आई जेऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही .... दलाल भाव देत नाही आणि सरकार खुल्या बाजारात विकू देत नाही ... ------ शाकाहारी कोंबडी खा, चकणा म्हणून, शाकाहारी अंडी खा आणि स्काॅच व्हिस्की प्या -------

https://www.bhaskar.com/local/mp/indore/news/the-entire-goods-belong-to… ------- विशेष काही नाही ..... शेतकरी, अडत्यांची मदत न घेता, स्वतः माल विकू शकला असता आणि लोकांना पण फायदा झाला असता.... पण, ते कायदे काही अस्तित्वात आलेच नाहीत .... -------

In reply to by मुक्त विहारि

सध्या महाराष्ट्रात शेतकरी डायरेक्ट माल विकू शकत नाही असे तुम्हाला वाटते का?

In reply to by मुक्त विहारि

काल बघितलेल्या विडीयो प्रमाणे यात सरदार बहुसंख्येने असून ते सगळे पंजाबातून आलेले आहेत असे सांगितले. इतर प्रांतात शेतकरी नाहीतच की काय असा प्रश्न पडला. 'आप' ने बुलाया इसलिये ??

In reply to by चित्रगुप्त

इंदी अलायंस पण ह्या पाठीमागे आहेच.. तिकडे, न्याय यात्रा, इकडे शेतकरी आंदोलन आणि महाराष्ट्र राज्यात, आरक्षण आंदोलन... येन केन प्रकारेण, मोदी हटाव... कारण, मोदी आला की, CAA, NRC आणि UCC हमखास...

पुन्हा रस्त्यावर अडथळे, खिळे ठोकणे असले मागास उपाय सरकारने केले. अश्रूधुर नळकांड्या,ड्रोन मधून अश्रूधुर जमावावर टाकणे असले प्रकार करून झाले. आंदोलक शेतकरी हुशार निघाले, त्यांनी मोठे पंखे लावून धूर लोटून दिला, पाण्याचे फवारे मारून अश्रूधुराचा प्रभाव कमी केला, पतंगी उडवून ड्रोन निकामी केले. हमीभाव देऊन मोकळे का होत नाही सरकार?

In reply to by चित्रगुप्त

मागण्या त्याच आहेत, सरकारने त्या मान्य करू असे आश्वासन दिल्याने मागील आंदोलन मागे घेतले होते, अद्याप सरकारने त्यावर निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले.

In reply to by मुक्त विहारि

सध्या चालु असलेली 'नौटंकी' पाहुन 'बंटी और बबली' ह्या सुमारे १९ वर्षांपुर्वीच्या चित्रपटातला हा प्रसंग आठवला 😂 हमारी मांगे पुरी करो... मांगे क्या हैं? इन्कलाब झिंदाबाद... हां हां वोह तो ठीक हैं, पर मांगे क्या हैं? तानाशाही नही चलेगी... किसकी? किसीकी... 😂 😂 😂

फ्रान्स, जर्मनी, बेल्जीयम, ग्रीस, इटली, रोमानिया येथील शेतकरीही त्यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहेत. तिथेही ट्रॅक्टर मोर्चा काढून रस्ते अडवून ठेवले गेले. सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या जवळजवळ सारख्याच आहेत, सरकारी धोरणांमुळे शेती परवडत नाही.

In reply to by आग्या१९९०

भाव भर्पूर आहे जमीनीला तेव्हा शेती विकून टाका आणि शहरात येऊन सांजच्याला बार मधे गंंमत करा कशाला बसता कसत?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमत आहे. ज्यांचा भारत सरकारला विरोध आहे त्यांनी सरकारी पाठबळाच्या नोटा वापरु नये

In reply to by अहिरावण

सरकारी पाठबळाच्या नोटा?? हा काय प्रकार असतो?? नी तसॅही सहा महीणे झाले कुठलीही नोट मला शिवली नाहीये. सारं काही ओनलाईन :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या अगाध ज्ञानापुढे नतमस्तक आहोत आपल्यासारख्या प्रकांड अर्थशास्त्री आम्ही ओळखू शकलो नाही याचा खेद आहे.

In reply to by अहिरावण

मिपावर महान अर्थशास्त्रींची मंदियाळी आहे! पुर्वी ११८ का १८८ अर्थग्रंथ कोळुन प्यालेले एक अर्थशास्त्री होते आजकाल ते दिसत नाहीत!!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असे का मग घ्या काढा ! प्रत्येक देशातील चलन/नोटा या सरकारच्या पाठबळावर असतात. मग व्यवहार नोटांच्या स्वरुपात होवो की ऑनलाईन पद्धतीने. सरकारवरचा विश्वास संपला की नोटांचा कागद होतो. आठ्वा - झिम्बाब्वे !! खुष?

In reply to by अहिरावण

सरकार म्हणजे पक्ष नाही हो. सरकारात परिक्षा देऊन गेलेले असतात लोक, दंगली घडवनारे न्हणजे सरकार नव्हे.

In reply to by अहिरावण

नोटा प्रशासनाच्याच असतात, सरकारच्या नसतात, नाहीतर सरकार बदलल्या बरोबरच महात्मा गांधींच्या जागी अनके आलतू फालतू लोक नोटेवर आले असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आणि प्रशासनावर तुमचा राग नाही. सरकारवर आहे. मग नोटा वापरणार नाही असले तर्कट का लावले... ? ऑऑऑऑ घ्या तुमच्याच तंगडया तुमच्या गळ्ञात.. बसा ओढत स्वतःचेच पाय

In reply to by अहिरावण

मी कुठे बोललो? सरकारच्या नोटा वापरू नका असं तुम्हीच लिहीलंय. वाचा वर प्रतिसाद तुमचा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भुजबळ बुवा ज्यांचा शेतकरी आंदोलनाला विरोध आहे त्यांनी शेतर्यांनी पिकवलेले अन्न खाऊ नये. :) शेतकरी आंदोलन फक्त पंजाब आणि काही भाग पश्चिम उत्तर प्रदेशाचा आहे. तेंव्हा आपला मुद्दा मुळातच गैरलागू आहे. तुमच्या वरच्या विधानाला उत्तर म्हणून मी ज्यांचा भाजप ला विरोध आहे त्यांनी भाजप शासित राज्यात राहू नये असे लिहिलेले आहे. हे तुमच्या उरफाट्या विचारसरणीचा परिपाक येतो आहे. जर समजत असेल तर समजून घ्या नाही तर आहेच वाचाळता तुमच्या मतिमंद नेत्यासारखी मविआ काळात तुम्ही युपीत होतात हे माहीत नव्हते. याचा कुठे संबंध येतो

In reply to by चित्रगुप्त

मस्त व्हिडिओ आहे, विक्रम सिंह रॉक्स... ह्या तथाकथीत (इंजीनीअर / गडगंज खलिस्तानी) शेतकऱ्यांमुळे देशातल्या खरोखरच्या गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांबद्दलची सहानुभुती नष्ट व्हायला नको एवढीच अपेक्षा! (स्वगत : विक्रम सिंहांनी सुचवलेले उपाय पोलीस प्रशासनाने अंमलात आणावेत.)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वामिनाथनची मुलगी MSP चे समर्थन करते.स्वामिनाथन आयोगाचीही तीच मागणी आहे. भारतरत्न देऊन ह्या मागणीला सरकार बगल देत आहे हे विक्रमसिंग सारख्या लोकांच्या लक्षात येत नाही. भारत सोडा, युरोपचे शेतकरी तेथील सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरून (ट्रॅक्टर घेऊन )आंदोलन का करत आहे ह्याचा अभ्यास करावा विक्रमसिंग सारख्या लोकांनी.