Skip to main content

न्याय दे !

लेखक जागु यांनी बुधवार, 22/04/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय दे, देवा न्याय दे, स्वर्गाचं उघडून तू दार ये ! गरीब मरतो उपाशी पोटी, धनिक राबतो प्रतिष्ठेसाठी ! तुझी प्रतिष्टा कायम राहू दे, गरीबाच्या पोटाचाही मान राहू दे ! न्याय दे ,देवा न्याय दे, कणा कणात जन्मून तू धाव घे ! अत्याचार मुरलाय जागोजागी, प्रामाणिक मुखवटा चेहर्‍यावरती ! तू आहेस प्रामाणिक दाखवून दे, सज्जनपणाला आता वाव दे ! न्याय दे, देवा न्याय दे, देव्हार्‍याचे माप ओलांडून ये ! लुटारुंच्या घरात सोन्याचा देव, लुटलेला मांडतो नवसाचा खेळ ! नवसाच्या खेळाला न्याय दे, न्यायदेवतेच्या डोळ्यांना दृष्टी दे ! न्याय दे, देवा न्याय दे, नव्या शक्तीत जन्म घेऊन ये ! तुझा पण इथे बाजार मांडलाय, दर्शनाच्या रांगेचा भाव चढलाय ! दर्शानाचे तुझ्या मांगल्य राहू दे, प्रत्येक ह्रुदयात तुझे दर्शन होऊ दे !
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1892
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

दर्शानाचे तुझ्या मांगल्य राहू दे, प्रत्येक ह्रुदयात तुझे दर्शन होऊ दे ! सुंदर कविता... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

दर्शानाचे तुझ्या मांगल्य राहू दे, प्रत्येक ह्रुदयात तुझे दर्शन होऊ दे ! ह्या ओळी विशेष आवडल्या... सुहास आज "मै॑ या तो वो"

सहमत. छान कविता. =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

सहमत. छान कविता. =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com