शरीर स्त्रीचे भासे शाप
डोळे विखारी जगी अमाप
नजर फिरते अंगी जैसी
बुभुक्षित ते कामुक साप!
परस्त्री ती समोर दिसता
दु:शासन तो जागे क्षणात
खेळ मनीचा विकृत चाले
भोग तिचा तो घेई मनात
गर्दी असो! असो एकांत
पदर खेचण्या अधीर हात
हात सराईत जागी लागे
वखवखलेली श्वापद जात!
असो बालिका असो तरूणी
नाते गोते लज्जा नाही
नरमादीचे नाते एकच!
असहाय्य मादी मुकाट साही
असेल कोठे कृष्ण सखा तो?
कवच तुझे दे! शरीरी रक्षक
दग्ध होईल शरीर अमुचे
कामुक नजरा! दाहक मारक
हरएक मनी उदराखाली
दु:शासन हा सुप्त वसतो
पदर खेचण्या अधीर पापी
संधी सावज रोज शोधितो!
दु:शासनास बाहेर खेचून
ठेचून ठेचून ठार करावे
परस्त्री ही बहीण, माता!
रूप थोर हे पूज्य असावे!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4280
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे!!!
काय लिहीतोस रे
गंभीर, अस्वस्थ करणारी कविता
+१ हेच म्हणतो.
In reply to गंभीर, अस्वस्थ करणारी कविता by बेसनलाडू
भीषण वास्तव
काय
होळीचा ....
मानलं.
(विषय दिलेला नाही)
भा.पो.
सगळ्यांचे
सुंदर
कविता!
In reply to सुंदर by उदय सप्रे
अप्रतिम!
काय बोलू!
कविता