Skip to main content
लेखक Richard Nunes यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

स्वप्न

मी पाहिलं त्याला तेव्हा
ते गुडघ्यात डोकं घालून
मुसमुसत बसलं होतं
निद्रेच्या किनार्‍यावर

हळूवार उचलून
गोंजारलं मी त्याला
खुलवलं, खेळवलं
पहाटफुलांच्या रंगानी सजवलं...

ओहोटीच्या अमाप ओढीनं
वाहून जाताना केविलवाणं
माझ्या दुबळ्या हाताकडे
पाहात राहिलं

आता मीच बसलो आहे
गुडघ्यात डोकं घालून
जीवनाच्या किनार्‍यावर
तुझी वाट पाहात...

-रिचर्ड न्युनिस

(रिचर्ड न्युनिस हे मूळचे मुंबईजवळील वसई येथील, पण गेली तेहतीस वर्षे ते कामधंद्यानिमित्ताने परदेशी आहेत. सध्या वास्तव्य ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे. मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून कॉमर्स पदवीधर झाल्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवली आणि पुढे इंग्लंडमधील ब्रॅडफर्ड युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स (एम.बी.ए.) केले. नोकरीनिमित्त त्यांचा जगभर प्रवास झाला आहे. त्यांना वाचनाची आणि लिखाणाची आवड आहे. त्यांनी अनेक कथा, कविता आणि एकांकिका लिहिल्या आहेत.)

दिवाळी अंक वर्ष

वाचने 6534
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सदस्यकाळ
16 hours 14 min
शेवटच्या क्षणामध्ये गाडी पकडली की काय?

बाकी, कविता आवडली.


ओहोटीच्या अमाप ओढीनं
वाहून जाताना केविलवाणं
माझ्या दुबळ्या हाताकडे
पाहात राहिलं

सुरेख !

स्वप्नांबद्दल भाव व्यक्त करणारी साधीसोपी कविता आवडली !