Skip to main content

चालू घडामोडी ऑक्टोबर २०२१ - भाग ३

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 22/10/2021 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक एन.सी.बी प्रमुख समीर वानखेडेंवर भलतेच संतापलेले दिसत आहेत. समीर वानखेडेंनी खोट्या केस टाकून आर्यनला अडकवले आहे तसेच आपल्या जावयाला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली आहे त्याच्याकडे अंमली पदार्थ नव्हते तर हर्बल वनस्पती होत्या वगैरे वगैरे तारे तोडले आहेत. काल तर समीर वानखेडे वर्षभरात नोकरी गमावून तुरूंगात गेलेले असतील हे भाकितही नवाब मलिकांनी केले आहे. इतकेच नाही तर देशातील लोक वानखेडेंना गजाआड गेलेले बघितल्याशिवाय शांत बसणार नाहीत असेही मलिक म्हणाले आहेत. काल तर मलिकांची जीभ पूर्णच घसरली. समीर वानखेडेंचा बाप बोगस होता, घरचे बोगस होते वगैरे तारेही त्यांनी तोडले आहेत. एक गोष्ट कळत नाही- एखाद्याचा बाप आणि घरचे बोगस होते हे त्याला तुरूंगात टाकायचे कारण कसे होऊ शकेल? 1 आता यात एक अडचण झाली आहे. महाविकास आघाडी समर्थक नेहमीप्रमाणे समीर वानखेडेंना 'महाराष्ट्रद्रोही' म्हणत असतीलच. पण समीर वानखेडे हे कोकणी मुस्लिम आहेत असे पुढे आले आहे. आता त्यांना विरोध केला म्हणून विरोध करणारे अल्पसंख्यांकांचे विरोधी असे का म्हणू नये? हे मी म्हणत नाहीये पण कोणत्याही प्रकरणात अल्पसंख्यांक व्यक्तीला विरोध केला तर मग तो अल्पसंख्यांक समुदायालाच विरोध असे तारे तोडणारे लोक पुरोगामी कळपातलेच असतात. अर्थातच असे दोन्ही म्हणणे हे चुकीचे आहे. समीर वानखेडे हे कायद्याला प्रमाण मानून आपले काम निर्भिडपणे करणारे अधिकारी आहेत. त्यांना दाद दिलीच पाहिजे.

वाचने 23844
प्रतिक्रिया 192

प्रतिक्रिया

Z सेक्युरिटी च खर्च कोण करणार.एक देश चालवा म्हणून लिटर मागे ६० रुपये लोक जास्त देत आहेत.परत हा z सेक्युरिरिटी च खर्च कोण उचलणार.

In reply to by Rajesh188

देशाला आर्मी व पोलीसची गरजच नाही, राफेलवरपण उगाच पैसे उडवले 3 दिवसात संघ भांगवत आर्मी तयार होऊन वाटेल तो पराक्रम करू शकते

भाऊ पारोसेकरांचा खून ? अशक्य! त्यांच्या एक किलोमिटर परिघात कोणी घुसूच शकत नाही. हां, चुकून कधी त्यांनी स्वच्छ आंघोळ केली तरच शक्य आहे आणि ते कधी असा विचार करतील असे वाटत नाही.

हा समीर वानखेडे ह्यांनी मारलेला फिल्मी डायलॉग मीडिया वाल्यांना कसा माहीत पडला? एनसीबी त्यांच्या प्रतेक कृती चा प्रचार करत आहे .कारवाई करण्यात त्यांना स्वारस्य नाही फक्त प्रसिध्दी साठी सर्व तमाशा चालू आहे

Letter

भाऊंनी काय किवा ईतर राजकारण्यानी काय अंघोळ करत नाहीत ही आतली बातमी कशी काय तुम्हाला मिळते ? रा चिं याला पवारांचं काय उत्तर येईल / आलं ते पण इथं द्या जरा.

पत्रकार हा समतोल विचाराचा असावा.कोणत्याही घडलेल्या घटनेची जितकी सत्याच्या जवळ जाईल अशीच माहिती लोकांपर्यंत पोचवणे ही त्यांची जबाबदारी आहे. आता अशी अवस्था आहे अगदी प्रसिद्ध न्यूज चॅनेल,paper ह्यांच्या कडे परिपक्व वार्ताहर नाहीत .कमी पगारात बैल वार्ताहर म्हणून काम करत असतात. त्यांना ना देशाचा इतिहास माहीत असतो,ना भूगोल माहीत असतो. बॉस जसे सांगेल तशीच न्यूज story देणे हेच त्यांचे काम.मग सत्य स्थिती पडून खूपच वेगळी बातमी बनली तरी त्यांस त्या मधले काही कळत नाही भाऊ हे पत्रकार नाहीत bjp चे paid कामगार आहेत . त्यांच्या बातमीची सत्यता पडताळून पाहणे सजक नागरिकाचे कर्तव्य च आहे.

In reply to by Rajesh188

भाऊ हे पत्रकार नाहीत bjp चे paid कामगार आहेत .
ह्या तुमच्या विधानाला पुष्टी देणारे काही तुमच्यापाशी आहे, का नेहमीप्रमाणेच उंदीरबिळांतून बाहेर डोकावून पाहिल्यावर झालेले तुमचे मत?

In reply to by प्रदीप

मिपावर खरोखर हि सोय व्हायला पाहिजे. पुष्टी देउनच मत मांडायला पाहिजे. जोपरयन्त अशी सक्ती होत नाही तोपर्यंत माझे मत अंतिम मत. ;) भाऊबाबतीत अ‍ॅक्चुली व्हाया गुगल पे होते त्यांना. पण गुगल का देते तर बीजेपीवाले त्यांचे च्यानेल हिरिरीने बघतात, त्याच्या लिंका जिथे तिथे टाकतात म्हणून. हे माझे मत पुष्टी देणारे आहे. त्याची परत पुष्टी पाहिजे असेल तर भाऊंना डायरेक्ट विचारा. ते त्या पुष्टीवर सुध्दा कमवतील. मग तुम्हाला पटेल. . अ‍ॅक्चुली राजकीय पक्षांची सॅलरी स्लीप कशी असते पहायचीय मला.

In reply to by सुरिया

पण गुगल का देते तर बीजेपीवाले त्यांचे च्यानेल हिरिरीने बघतात, त्याच्या लिंका जिथे तिथे टाकतात म्हणून.
व ह्यांतून भाऊ त्या पक्षाचे पेड पत्रकार आहेत, असे तर्कशास्त्र आसेल तर कठीण आहे. मग आता पुढे जाऊन माझ्यासारखे अनेकजण, जे त्यांचे व्हिडीयोज नियमितरीत्या पहातात, तेही त्या पक्षाचे पेड व्हूयर्स आहेत असे म्हणणे आले, नाही?

In reply to by सुरिया

गुगल का देते तर बीजेपीवाले त्यांचे च्यानेल हिरिरीने बघतात, त्याच्या लिंका जिथे तिथे टाकतात म्हणून.
गुगलला व्हिडिओ कोणाचे आहेत याची काही पर्वा असायचे कारण नाही. कोणीही भरपूर व्ह्यू मिळवेल असे व्हिडिओ टाकले तर त्या दरम्यान जाहिराती देऊन गुगल पैसे मिळवते त्यापैकी थोडी रक्कम व्हिडिओ टाकणार्‍याबरोबर शेअर केली जाते.
गुगल का देते तर बीजेपीवाले त्यांचे च्यानेल हिरिरीने बघतात, त्याच्या लिंका जिथे तिथे टाकतात म्हणून.
गुगल का देते तर ट्रॅव्हल व्ही लॉग आवडणारे सॅव्ही फर्नवेचे च्यानेल हिरिरीने बघतात, त्याच्या लिंका जिथे तिथे टाकतात म्हणून. गुगल का देते तर स्पिरिट्युअ‍ॅलिटीमध्ये रस असलेले एकहार्ट टोल्लीचे च्यानेल हिरिरीने बघतात, त्याच्या लिंका जिथे तिथे टाकतात म्हणून. गुगल का देते तर रेल्वेच्या कार्यपध्दतीत रस असलेले नॉलेज नोर च्यानेल हिरिरीने बघतात, त्याच्या लिंका जिथे तिथे टाकतात म्हणून. वगैरे वगैरे....

https://www.freepressjournal.in/mumbai/who-is-sam-dsouza-the-man-who-wa… आर्यन प्रकरणात अजून एक व्यक्ती प्रकाशात सॅम डिसुझा हा मुंबईतील एक मोठा मनी लौंडरर आहे म्हणे , त्याच्यावरही अनेक गुन्हे आहेत. एन सी बी चे पंच प्रकरण चित्रविचित्र होत आहे.

कालच्या क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानने पराभव केल्यानंतर कराचीमध्ये जल्लोष झाला. पाकिस्तान-अफगाणिस्तानात हवेत गोळीबार करणे हा एखाद्या गोष्टीचा आनंद साजरा करायचा भाग असतो. तशी प्रथाच अनेक ठिकाणी आहे. अशाप्रकारे कराचीत केल्या गेलेल्या हवेतल्या गोळीबारात १२ जण जखमी झाले अशा बातम्या आहेत. https://nation.com.pk/25-Oct-2021/victory-against-india-12-injured-in-c…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महामूर्ख आहेत हे. काल सामना जिंकल्यावर पाकिस्तानचा एक मंत्री म्हटला की जगभरातल्या मुस्लिमांच्या आणि हिंदुस्थानातील मुस्लिमांच्या पाठिंब्यामुळे आम्ही जिंकलो. असं असेल तर विश्वचषक स्पर्धेत १९९२ पासून २०१९ पर्यंत सलग १२ सामन्यात भारताने पाकड्यांना हरविले तेव्हा जगभरातील व हिंदुस्थानातील मुस्लिमांचा पाठिंबा पाकड्यांना नव्हता का भारताला हरविण्यासाठी तो पुरेसा नव्हता? २००७ मध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हरल्यानंतर पाकड्यांचा कर्णधार शोएब मलिक म्हटला होता की आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी जगभरातील मुस्लिमांचे आभार मानतो. २०१४ मध्ये एक एकदिवसीय सामना संपल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये पररताना अहमद शेहझाद हा पाकडा श्रीलंकेच्या दिलशानला म्हटला होता की तू मुस्लिम का होत नाहीस? मुस्लिम झालास तर आयुष्यात काहीही केलंस तरी मेल्यानंतर थेट स्वर्गात जाशील. हा मूर्खपणा हे वारंवार का करतात? हा मूर्खपणा आहे हे समजण्याची अक्कल यांना कधी येणार?

In reply to by श्रीगुरुजी

कालच्याच match मध्ये काही मुस्लिम महिला भारताचा तिरंगा घेऊन भारताला पाठिंबा देत होत्या. अर्थातच त्या भारतीयच असणार. शमी भारतीय मुस्लिम आहे. पण पाकडे सुधारणार नाहीत.

मलिकचा खोटारडेपणा उघड झाला. न्यायालयात जाण्याऐवजी किंवा पोलिसात तक्रार दाखल करण्याऐवजी हा रोज पत्रकार परीषद घेऊन वानखेडेंवर अत्यंत खालच्या दर्जाचे धडधडीत खोटे आरोप करतोय व पवारांसहीत राष्ट्रवादीचे सर्व नेते याचं समर्थन करताहेत. अंमली पदार्थांचे इतके उघड समर्थन एका राजकीय पक्ष करीत असल्याचे पहिल्यांदाच दिसतंय. जावई जामिनावर सुटल्यापासून हा अत्यंत बिथरलाय. -संपादित- https://www.lokmat.com/mumbai/aryan-khan-drugs-answering-evidence-dnyan…

In reply to by श्रीगुरुजी

एक गोष्ट कळत नाही. समजा समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव समजा दाऊद असते तरी त्या आधारावर वानखेडे जे कारवाई करत आहेत ती चुकीची आहे कसे म्हणता येईल?

In reply to by श्रीगुरुजी

नवाब मलिक ज्या प्रकारच्या धमक्या देत आहेत ते संतापजनक आहे. वानखेडेंची व्यक्तिगत महीती आणि कागदपत्रे पब्लिक फोरमवर टाकणे खूप चूकिचे आहे.

भारताचे माजी संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे ३ वेळेस मुख्यमंत्री असलेले, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, आंतरराष्ट्रिय क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष, माजी पुलोद आणि आजी मविआचे शिल्पकार हे मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणुक जिंकले. ते कसे जिंकले हा सध्या चर्चेचा विषय आहे. ६००० सभासदांना मतदानाचा अधिकारच नव्हता, विरोधी उमेदवारांना मतदानाचा अधिकार नाही. जे उमेदवार जिंकुन आले. निवडणुकीची बातमी थोडी अजुन माहिती आता मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या दादर स्टेशन शेजारी असलेल्या इमारतीच्या जागी काँप्लेक्स उभे राहिले की झाले. मोक्याच्या जागेवर भूखंड असेल तर आम्ही गणपती मंडळाची निवडणुक लढवू. लोकशाही वगैरे तोंडी लावायच्या बाता.

In reply to by mangya69

त्याच्यापण आधी शरद पवार, त्याआधी शरद पवार, त्यापूर्वीची कारकिर्द पण शरद पवारांचीच,त्याहून थोडे मागे गेलात तर तेव्हाचे अध्यक्ष होते शरद पवार. तुम्ही जरा जास्तच मागे गेलात, शरद पवारांच्या दोन कारकिर्दिंदरम्यान अध्यक्ष होते शरद पवार. असे गेले ४० वर्षे ते तिथले अध्यक्ष आहेत.

In reply to by अनन्त अवधुत

वयाची ८१ वर्षे पूर्ण होत आली तरी अगदी फालतू पदांची सुद्धा हाव सुटत नाही. ४० वर्षे एका पदावर राहूनही पदाचा मोह कायम आहे. सुदैवाने न्यायालयाच्या निर्णयामुळे क्रिकेट क्षेत्रातून बाहेर जावंच लागलं. अन्यथा आजतगायत तेथेही लुडबुड सुरू राहिली असती.

In reply to by श्रीगुरुजी

असल्या पदांची अध्यक्षपदे भूषवली तर आपल्याला सुशिक्षित समाजाचा भाग समजलं जाईल अशी काही तरी कल्पना असणार. बाकी हे महाशय ज्या क्षेत्रात जातात तिथे तिथे त्या क्षेत्राची वाट लावतात. बोट लावीन तिथे बरबादी.

क्रूझवरील अंमली पदार्थांच्या प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे असा घणाघात श्री.रा.रा.संजय राऊत यांनी घातला आहे. एक गोष्ट कळत नाही. समजा पूर्ण केसच खोटी आहे असे गृहित धरू. तरी त्यातून फार तर एन.सी.बी ला तोंड लपवायची वेळ येईल. त्यातून महाराष्ट्राचा अपमान/ महाराष्ट्राची बदनामी कशी काय? मागे एकदा श्री.रा.रा.संजय राऊत असेही म्हणाले होते की महाराष्ट्रात चरस-गांजा सोडून काही पिकतच नाही अशाप्रकारे एन.सी.बी चे लोक हात धुऊन मागे लागले आहेत. एन.सी.बी वाल्यांचे कामच अंमली पदार्थांच्या प्रकरणात कारवाई करणे असेल तर ते महाराष्ट्रातच नाही तर देशात कुठेही अशी कारवाई करतच असतात. तरीही अगदी असे गृहित धरून चालू की महाराष्ट्र सोडून इतर कुठेही ते कसलीही कारवाई करत नाहीत आणि केवळ महाराष्ट्रातच कारवाई करत आहेत. अगदी तसे असले तरीही महाराष्ट्रात जर अंमली पदार्थांचा वावर असेल तर ते महाराष्ट्राला भूषणावह समजून त्यावर काही करवाई करायची नाही का? मग त्याच न्यायाने देशाच्या इतर भागात खून, बलात्कार यांच्यावर काहीही कारवाई केली जात नसेल तर महाराष्ट्रातही त्याविरोधात काहीही करायला नको. त्याहूनही महत्वाचे- आर्यन आणि आरोप असलेले इतर लोक हे या महाविकास आघाडी सरकारचे नक्की कोण लागतात? महाराष्ट्रात सध्या दुसरी कसलीही समस्या नाही अशाप्रकारे सरकार केवळ त्याच्यावरच लक्ष केंद्रीत करत आहे. त्याचे नक्की कारण काय? https://www.deccanherald.com/national/west/cruise-ship-drugs-case-sanja…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आपण कोणत्या ही व्यक्ती विषयी जेव्हा मत बनवतो ते फक्त एका प्रसंगा वरून बनवत नाही. अनेक प्रसंग,अनेक घटना घडून गेल्या नंतर हा व्यक्ती ह्या वृत्ती चा हा व्यक्ती त्या वृत्ती चा आहे असे आपण मत बनवतो आणि नंतर त्याच्या कोणत्याही वर्तन वर संशय घेतो. विश्वास ठेवत नाही. महाराष्ट्र विषयी असे अनेक प्रसंग आहे त्या मध्ये केंद्रीय सरकार नी नेहमीच महाराष्ट्र वर अन्याय केलेला आहे. दिल्ली ला महाराष्ट्र विषयी आकस वाटतो असे महाराष्ट्र चे ठाम मत आहे. मग केंद्रात कोणत्या ही पक्षाचे सरकार असू ध्या. आता पण केंद्रीय झाडून सर्व एजन्सी,झाडून सर्व हिंदी चॅनेल महाराष्ट्रात कशा वाईट घटना घडत आहेत ह्याचाच प्रचार करत आहेत. तुम्ही विचार करा तुम्हाला पण जाणवेल. सुशांत सिंग प्रकरण असेल किंवा ड्रग विषयी प्रकरण असतील त्या संबंधित यंत्रणेने मीडिया मध्ये update देवून फक्त चुकीचा प्रचार केला आहे. तुमचे काम गपचुप करा. आशिष मिश्रा चे प्रकरण कडे चुपचाप आहे. तिथे का एजन्सी मीडिया कडे जावून update देत नाहीत. अजुन आठवते कसाब जेव्हा मुंबई मध्ये आला . हत्याकांड केले. मुंबई पोलीस दलातील लोकांनी प्राणाची आहुती दिली. पण दिल्ली वरून कमांडो आले आणि त्यांनी ऑपरेशन चालू केले तेव्हा. टाइम्स ऑफ इंडिया सारख्या मीडिया मधून आणि सर्व च हिंदी मीडिया मधून मुंबई पोलिस च्या शहीद पोलिस ह्यांचा अपमान केला गेला. बातम्या होत्या शेवटी परप्रांतीय ब्लॅक cat camondo नीच मुंबई ला वाचवले. हा महाराष्ट्र चा अपमान तुम्ही सहन करा सामान्य मराठी माणूस नाही करत. शेवटी कसाब ला जिवंत मराठी व्यक्ती नीच पकडले . केंद्रीय एजन्सी नी नाही. अशा अनेक घटना आहेत त्या मुळे केंद्रीय सरकार विषयी महाराष्ट्र नेहमीच संशक असतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्राची बदनामी तेव्हाच होते जेव्हा शिवसेनेची आणि रा कॉ पार्टीची बदनामी होते. बाकी एक मंत्री एका सामान्य माणसाला पकडून घरी आणून त्याची धुलाई करतो तेव्हा, एखादा मंत्री आत्महत्येच्या आणि लफडयाच्या गोष्टीत अडकतो तेव्हा, मुख्यमंत्री विधानसभेत वाझे ला डिफेन्ड करतात तेव्हा, 100 कोटी चे टार्गेट गृहमंत्री पोलिसांना देण्याबद्दलच्या केस मध्ये अडकतो तेव्हा महाराष्ट्रचि बदनामी थोडीच होते? महाराष्ट्र ही फक्त सोयीने वापरण्याची गोष्ट असल्याने त्याची 3 राज्ये: पश्चिम महाराष्ट्र + कोकण, मराठवाडा आणि विदर्भ, करून ही अस्मिता नावाची विषवल्ली गाडून टाकावी असे अस्मादिकांचे मत आहे.

https://www.loksatta.com/trending/rajasthan-teacher-expresses-joy-over-… भारत पाक सामन्यानंतर राजस्थान मधील एका शिक्षिकेने we wonn असा status ठेवल्यामुळे शाळेने शिक्षिकेला काढून टाकले. भारतात राहून एवढा उघड उघड पाकिस्तान ला समर्थन देणाऱ्यांवरती कठोर कारवाई करायला पाहिजे.

खेळाडू च्या निष्ठा फक्त पैसे कोण देईल त्याच्या शी असतात. क्रिकेट संघटना त्याच वृत्तीच्या आहे. मॅच फिक्सिंग सर्वांस माहीत आहे. सामान्य लोकांनी भावनिक होवू नये त्यांना कोणी पैसे देणार नाही.

बिभीषण चे वारस महाराष्ट्रात कमी नाहीत. बिभीषण हा घरभेदी ल राज्याची लालच नसती तर सर्वगुण संपन्न महाराज रावण चा पराभव केवळ अशक्य होता. महाराष्ट्र चे तुकडे करण्याची इच्छा असणारे घर भेदी,राज्य द्रोही ही बिभीषण चीच aulad आहेत.

In reply to by Rajesh188

हल्ली अफजलखान, शाहिस्तेखान वगैरेंना वर्षानुवर्षे भरपूर काम करवून घेतले म्हणून रजेवर पाठवले आहे का? नाही बिभीषणाचा उल्लेख केलात म्हणून विचारले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

यातील उपहास आणि विनोद संबंधितांच्या डोक्यावरून गेला असणार.

३७० कलम हटवल गेले त्याचा परिणाम म्हणून काश्मिरी लोक भारताच्या जवळ येतील की भारता पासून खूप लांब जातील. हे माहीत पडेलच. महाराष्ट्र चे तुकडे केले की स्वाभिमानी मराठी लोक भारता विषयी प्रेम ठेवतील की भारता पासून लांब जातील. हे अल्प बुद्धी लोकांनी पाहिले समजून घेतले पाहिजे.

In reply to by धनावडे

विदर्भाचे वेगळे राज्य करण्याची शिफारस १९५६ मध्ये चाचांच्या काळात राज्य पुनरर्चना आयोगाने केली होती व त्या मागणीला कॉंग्रेसच्या विदर्भ अनेक नेत्यांचा पाठिंबा होता. कॉंग्रेसचे वसंत साठे कायमच वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करायचे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी वसंत साठे, एन के पी साळवे इ. कॉंग्रेसींनी उपोषण केले होते.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला फक्त एकाच पक्षाचा विरोध असावा. तेव्हा भाजप ने सत्ता आल्यावर पहिल्यांदा त्यांच्या नेत्याला एक कोडॅक चा कॅमेरा आणि त्याच्या मुलाला एक लॉलीपॉप भेट देऊन त्यांच्या अनधिकृत रित्या उभारलेल्या दोन्ही निवासस्थानांची चौकशी करायला हवी. विशेषतः फक्त एक मासिक आणि एक दैनिक एवढाच बिझनेस असताना150 कोटी रुपये उत्पन्न जे declare केले आहे ते कसे जमवले याबद्दल वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या टिम्स नी त्यांना भेट द्यायला हरकत नाही. अजिबात गडबड नसणार. आरामात दररोज 8 तास असे 2 वर्षे बोलावून प्रश्नोत्तरे केली तरी चालतील. तसंही काही काम करतच नाहीत दोघे. अर्थात विदर्भ आणि मराठवाडा वेगळे झाल्यावर फोटो काढायला कुठल्या जंगलात जावे हा प्रश्न यांना असणारच. तेव्हा आरेच्या जंगलातच "वाघाचे" फोटो काढायला जावे अशी मधून मधून परवानगी पण द्यावी.

राज ठाकरे नी मुंबई मध्ये आंदोलन केले होते देशप्रेमी मराठी मुलांना रेल्वे भरती होण्यास सरळ आडकाठी होईल असले प्रकार चालू होते म्हणून. लोकसभेत ह्या विषयावर चर्चा चालू होती तमाम हिंदी भाषिक एक झाले होते. जया बच्चन ह्या समाजवादी पक्षाच्या खासदार मत मांडत होत्या. त्यांच्या तेजस्वी बुध्दी मत्तेचे दर्शन शब्दगानिक होत होते. मुंबई ही केंद्र शासित करा अशी मागणी त्यांनी मोठ्या जोशात केली. अल्प बुध्दी अल्प ज्ञानी नेत्याचे गुण त्यांनी दाखवले. त्यांच्या शेजारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग जी बसले होते. जया नी ही मागणी केल्या बरोबर ते ताडकन उभे राहिले मुंबई ही केंद्र शासित करावी ही समाजवादी पक्षाची मागणी नाही. जया जे काही बोलत आहेत ये त्यांचे मत आहे त्याचा पक्षा शी काहीच संबंध नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले . जया खाली नसल्या. मुलायम सिंग ह्यांनी जे वर्तन होते ते ज्ञानी ,परिपक्व नेत्याचे वर्तन होते. विदर्भ वेगळे करा ही मागणी जरी काँग्रेस च्या काही स्वार्थी नेत्यांनी केली असली तरी काँग्रेस नी ती मागणी कधीच मान्य केली नाही. हिंदी भाषिक राज्यांचे तुकडे करणे आणि गैर हिंदी भाषिक राज्याचे तुकडे करणे ह्या मध्ये जमीन आसमनचा फरक आहे. आंध्र चे झाले ये अपवाद समजा. पण गैर हिंदी भाषिक राज्याचे तुकडे करणे देशाला महागात पडेल ह्याची पूर्ण जाणीव परिपक्व नेत्यांना आहे. काही झाले की पाकिस्तान वर अणू बॉम्ब टाका अशी मागणी उपट सुंभ करत असतात. त्यांना इतकी अक्कल नसते की पाकिस्तान वर अणू बॉम्ब टाकला तर त्याच्या रेडिएशन,वाढणारी उष्णता ह्याचा परिणाम भारतावर पण होईल ,भारताला पण त्याचे भोग भोगायला लागतील.

In reply to by Rajesh188

मग ते फक्त एकदिवस पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानचा निकाल लावणार होता तो कसा काय.

In reply to by धनावडे

सेना नेते (मग ते कोणीही असोत) फक्त फुशारक्या मारणे, बढाया मारणे, वाटेल ते फेकणे एवढेच करीत आलेत. संरक्षण, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा कोणत्याही क्षेत्रातील ना त्यांना काही समजतं, ना त्यांचा काही अभ्यास. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा हास्यास्पद प्रकार आहे.

In reply to by Rajesh188

त्याच्या रेडिएशन,वाढणारी उष्णता ह्याचा परिणाम भारतावर पण होईल ,भारताला पण त्याचे भोग भोगायला लागतील.
अच्छा असं आहे होय ? मला वाटले ते अणुबाँब आपलं फक्त घाबरवायसाठी असते . . मग आम्रविकेला ते अफगाणीस्तानात वापरायला काय हरकत होती ... उगाच १० वर्षे वाया गेली ... थांकु हा ... आमच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल . . .

खरं तर ना आर्यन चा धर्म / वाननखडेंचा धर्म या प्रकरणामध्ये येण्याचे काही कारण नाही पण जर वानखेडे कोकणी मुसलमान असतील तर " नवाब साहेबांना " चांगली पाचर बसेल आणि सगळ्या वहाबी जमातीला नक्को कोणाची बाजू घाय्य्याची हे कळेनासे होईल आणि मुंडक कल्पेलय कोंबडी सारखी त्यांची परिस्थिती होईल... ह ह पुरेवाट

अगदी पोलिस पासून झाडून सर्व यंत्रणेमध्ये एक वाईट खोड आहे.सर्वच officer लोकांना हिरो बनायचे आहे,मीडिया मध्ये चमकायचे आहे. आणि आपली बावळट मीडिया ऐकते एक आणि सांगते वेगळेच . ह्याच कारणाने ncb वर संशय घेण्याची वेळ आली आहे. मल्लिक फक्त निमित्त आहेत. रोज च्य रोज मीडिया ल अत्यंत गुप्त असलेली माहिती पण देणे मग बावळट मीडिया त्या मध्ये मसाला टाकून भलतेच लोकांना दाखवत असतात. तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत साक्षीदार,प्रत्याश दक्षी,ज्यांनी टीप दिली ते ह्या सर्वांची माहिती गुप्त च राहिली पाहिजे ही उघड कशी होतात? २६/११ ला पण मीडिया नी काय तमाशा केला होता हे सर्वांस आठवत असेलच.

https://www.loksatta.com/maharashtra/mva-government-gave-clean-cheat-to… देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रॉजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु या चौकशीत जलयुक्त शिवार अभियानाला क्लिन चिट दिली जात आहे. या अभियानामुळे पिक पेरणी क्षेत्र आणि उत्पन्नात वाढ झाली. तसेच शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाली, असा निष्कर्ष राज्य सरकारच्या जल संधारण विभागाच्या अहवालात काढला आहे.