फार पूर्वी म्हणजे ज्या काळात इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता त्या काळात आपले पोलिसमामा सिग्नल तोडणाऱ्या चालकांना बाजूला घेऊन दंड वसूली (तोड-पाणी) करत असत. आता काळ बदलला त्याप्रमाणे आपले पोलीस-दल एकदम जागरूक झाले आहे, एक अनुभव:
झाल अस कि नवीन चुनाभट्टी – बी. के. सी. उड्डाणपुलावरून बी. के. सी. ला जात असताना आमच्या गाडीला पोलीस-मामाने बाजूला घेतले. आणि दारावर टकटक केली, काच खाली करण्यापूर्वी मी माझा मास्क लावला, आणि विचारले काय झालायं? तर म्हणे तुम्ही मास्क लावला नव्हता. इथे एक गोष्ट मान्य आहे कि त्या वेळेस गाडीत एकटाच असल्याने मी मास्क लावला नव्हता. मी म्हटले साहेब मी तर गाडीत एकटाच आहे, आणि तसही तुमच्याशी बोलण्यापूर्वी मी मास्क लावलाच आहे. साहेब म्हणाले ठीक आहे पण आता थांबलाच आहात तर तुमचे गाडीचे कागदपत्र दाखवाच. (जणू मला अंदाज अपना अपना मधला Crime Master GOGO च भेटला) नंतर माझे लायसन, गाडीची PUC, Insurance इत्यादी तपासून देखील काहीच मिळेना तेव्हा साहेब म्हणाले दोनच मिनिटे थांबा........
मग साहेबांनी त्यांच्याकडच्या यंत्रात गाडीचा क्रमांक टाकला, आणि साहेब एकदम उत्साहात म्हणाले कि तुमच्या गाडीवर दोन हजाराचा दंड आहे. हे माझ्यासाठी धक्कादायक होते, कारण अगदी मध्यरात्री देखील लाल सिग्नलवर गाडी थांबवणाऱ्या तसेच अगदी जवळपास जाताना देखील सीट बेल्ट लावणाऱ्या बंडू श्रेणीतला मी असताना, माझ्या गाडीवर दंड, तो पण दोन हजाराचा हे माझ्यासाठी पचायला खूप कठीण होते. माझ्या चेहर्यावरील भाव ओळखून साहेब म्हणाले, दादा तुम्ही Over Speeding केले आहे. मुंबईत द्रुत-गती मार्गावर कमाल वेग मर्यादा ७० आहे आणि तुम्ही ७२ ने गाडी चालवत होतात. द्रुत-गती मार्गावर मध्येच जे कॅमेरा दिसतात तिथेच त्याच्या शेजारी Speed – Gun देखील बसवल्या आहेत. प्रत्येक रस्त्याच्या कोपर्यात त्या – त्या रस्त्याची कमाल वेग मर्यादा लिहलेली असते आणि त्यापेक्षा तुमचा वेग जास्त असेल तर लगेच तुमचा फोटो घेतला जातो आणि तुमच्या गाडी क्रमांकावर “चलान” निघते.
तिथे दोन पर्याय होते, दंड भरा किंवा ........... मी पहिला पर्याय निवडून तिथून निघून गेलो.
आता अगदी परवाचीच गोष्ट आम्ही सह-कुटुंब रात्री एका आप्ताकडे प्रभा-देवीला गेलो होतो. परत येताना वरळी समुद्र-सेतुने परत यायचे ठरले. पण समुद्र-सेतुवर मला एक वेगळीच समस्या जाणवली, तिथे वेग मर्यादा काही ठिकाणी अगदी ३० ते ४० देखील होती. मला सारख्या माझ्या हजार मुद्रा दिसत असल्यामुळे मी ती वेग मर्यादा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. त्यात आमच्या बाजूने बाकीच्या गाड्या एकदम Night – Ride mode मध्ये सपासप जात होत्या. त्यामुळे आपल्या बाबाला वेगाचं भय वाटत अस माझ्या लेकीला वाटल्यामुळे तिच्या नजरेत एकदम सहानुभूतीने दाटू लागली. आणि त्याच वेळेला पोरगा आता जबाबदार वगैरे झाला अस वाटून माझ्या पालकांच्या आणि सौ च्या नजरेत एकदम कौतुकाचे भाव होते. अर्थात त्या वेळेला माझे लक्ष मात्र मी वाचवलेल्या हजार मुद्रांवर केंद्रित होत. पण जेव्हा सगळं पार करून आम्ही वांद्र्याला पोहोचलो तेव्हा मात्र माझे डोके एकदम भंजाळून गेल, कारण तिकडे एक सरकता फलक होता ज्यावर लिहले होते कमाल वेग मर्यादा ८०. पुढे तेच मध्येच आकडे २० पर्यंत खाली होते आणि मध्येच ८०.
आता तमाम जाणकारांनी एवढंच सांगावं कि मुंबईत साधारण किती वेगाने गाडी “चलान” फाड्ल्याशिवाय चालवणे योग्य होईल???
वर्गीकरण
वाचने
13074
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहे हे असे आहे
सक्काळी चाय मिळाली नाय का?
In reply to आहे हे असे आहे by प्रसाद गोडबोले
वेग ?
In reply to सक्काळी चाय मिळाली नाय का? by शेर भाई
मी तर पायी चाललो होतो तरी मला
In reply to आहे हे असे आहे by प्रसाद गोडबोले
मनमानी चालली आहे जे सत्य आहे
दादा तुम्ही Over Speeding
ते वसूल करूच शकतात
In reply to दादा तुम्ही Over Speeding by चौकस२१२
या बाबतीतला माझा अनुभाव असा
लेख आवडला. दिल्लीत तर एकाच
रिंग रोड असेल तर ठीक
In reply to लेख आवडला. दिल्लीत तर एकाच by विवेकपटाईत
अन्याव
वेग मर्यादा
ट्रॅफिक पोलीस / अधिकारी हे
कोणी मला अत्यंत अमानवीय,
माझ्या जावयाने माझी गाडी
In reply to कोणी मला अत्यंत अमानवीय, by उगा काहितरीच
खरं आहे डॉक्टर साहेब. असे
In reply to माझ्या जावयाने माझी गाडी by सुबोध खरे
आताशा असे फोन आले कि मी
In reply to खरं आहे डॉक्टर साहेब. असे by उगा काहितरीच
असे थोडेसे पैसे मी साडे सात
In reply to माझ्या जावयाने माझी गाडी by सुबोध खरे
कधी तरी सहा आठ महिन्यांपूर्वी
In reply to असे थोडेसे पैसे मी साडे सात by चौथा कोनाडा
मी स्वच्छ शब्दात त्याला
In reply to कधी तरी सहा आठ महिन्यांपूर्वी by सुबोध खरे
मला ३ वर्षांपूर्वी Activa
In reply to असे थोडेसे पैसे मी साडे सात by चौथा कोनाडा
तक्रार २५ सप्टेंबरला केली.
In reply to मला ३ वर्षांपूर्वी Activa by श्रीगुरुजी
सहमत .. ज्या गोष्टी बदलू शकत
मला दोन महिन्यापूर्वी
काहीही
In reply to मला दोन महिन्यापूर्वी by विलासराव
पुण्यात वहातुक पोलिसांचा अनुभव .
ही फक्त एक बाजू झाली
भ्रष्टाचार
वेगे वेगे धावू.... अन वेगे वेगे भ्रष्ट करू
जुनाट
Centre's clean-up act: Modi
In reply to जुनाट by Rajesh188