सखी मी ...पावसाची
घनदाट काळ्या मेघाची
लख्ख कडकडणाय्रा दामीनीची
आतुरतेने वाट पाहणाय्रा चकोराची
सखी मी ... उनाड वाय्राची
दणकट रांगड्या डोंगराची
वेलीवरल्या फुलांची पानांची
अंगणात नाचणाय्रा चिमण्यांची
सखी मी...टिपुर चांदण्याची
शीतल साजय्रा चंद्राची
काळोखात भिजलेल्या रजनीची
सखी मी ...माझ्या सजणाची
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1622
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सखीत्व फारच
खरयं
आपल्याला जाणवणे हे नंतर आले.