श्रीगणेश लेखमाला २०२१ - खुसखुशित पाकातल्या पुर्‍या

पियुशा's picture
पियुशा in लेखमाला
10 Sep 2021 - 12:56 pm

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

खुसखुशित पाकातल्या पुर्‍या

कृती : एक वाटी मैदा आणि अर्धीवाटी बारीक रवा घ्यावा.
दोन्ही छान एकत्र करून त्यात मधोमध गोल करून चिमूट भर मीठ आणि तीन चमचे गरम तुपाचे मोहन घ्यावे.
मोहन पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यावे .
आता पीठ मळण्याकरिता ताज्या दह्याचा वापर करावा .
जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पीठ न मळता मध्यम consistency च पीठ भिजवून घ्यावे आणि साधारण अर्धा तास झाकून ठेवावे.

तोपर्यंत आपण पाक करून घ्यायचा , पाका साठी एका कढईत एक वाटी साखर घेऊन त्यात एक वाटी पाणी घावे आणि गॅस वर उकळत ठेवावे ( भांड जाड बुडाच असेल तर उत्तम) त्यात दोन - तीन हिरव्या वेलच्या घालव्या, चिमुटभर केशर(ऑप्शनल) घालावे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक करायचा नाही फक्त पाक हा मधा सारखा चिकट लागला पाहिजे बोटांना. साधारण एक उकळी आली की दोन ते तीन मिनिटांनी बोटाच्या चिमटीत थोड मिश्रण घेऊन चेक करायचं पाक बोटांना चिकट वाटला की गॅस बंद करायचा.

आता पुर्‍यांचे पीठ छान भिजलेलं आहे ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि थोडासा मैदा लावून चपाती लाटून घ्यावी आणि वाटी किंवा ग्लास च्यां मदतीने एकसारख्या पुऱ्या कापून घ्याव्यात.

कढईत तेल तापवून घ्यावे आणि पुऱ्या छान तळून घ्याव्यात मस्त ट्टम फुगतात ह्या पुऱ्या, आता कोमट पाकात गरम पुऱ्या आलटून पालटून बुडवून घ्याव्यात (१५-२० सेकंद) ह्या झाल्या आपल्या पाकातल्या खुसखुशीत पुऱ्या.

टिप्स:
१) दही शक्यतो ताज घ्यावं खूप आंबट असेल तर टेस्ट बिघडू शकते
२) पुरी गरम असतानाच पाक सुधा थोडा गरम असावा तरच पाक छान मुरला जातो.

1

2

-पियुषा.

श्रीगणेश लेखमाला २०२१

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

10 Sep 2021 - 1:33 pm | तुषार काळभोर

अतिशय सुंदर फोटो!
नैवेद्य एकदम मोददायक आहे :)

फोटो बघुनच तोंडाला पाणी सुटले...
मस्त रेसीपी 👍

मदनबाण's picture

10 Sep 2021 - 1:53 pm | मदनबाण

आहाहा... जिल्बुशा छान पाकृ केली आहेत तू.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

कंजूस's picture

10 Sep 2021 - 2:11 pm | कंजूस

गोड.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2021 - 5:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

तोंपासु रेसीपी, हा माझा अत्यन्त आवडता पदार्थ, कितीही खाऊ शकतो

फोटोही कातिल आहेत

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2021 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच आवडल्या पाकातल्या पु-या. फोटो जीवघेणे आले आहेत.

-दिलीप बिरुटे

गॉडजिला's picture

10 Sep 2021 - 6:48 pm | गॉडजिला

तोपासू

Bhakti's picture

10 Sep 2021 - 7:13 pm | Bhakti

वाह वाह
यम्मी!

गणेशा's picture

10 Sep 2021 - 9:09 pm | गणेशा

वा पियुशा वा!

अश्या पाकातल्या पुऱ्या पाहुनच, प्रत्येक recipe ला पाककृती म्हणाले असतील कोणी असे वाटले..:-)

दहि लावावे लागते हे मात्र आज कळाले.. मला माहित नव्हते...

शानबा५१२'s picture

10 Sep 2021 - 9:30 pm | शानबा५१२

पाककृती वाचुनच कळतयं की खुप स्वादीष्ठ लागत असेल. ह्यावेळी पाच दीवसात एकदा हा नैवेद्य म्हणुन मी बनवेन. मी कधीही हा पदार्थ खाल्ला नाहीये, म्हणुन खुप धन्यवाद.

प्रचेतस's picture

11 Sep 2021 - 9:26 am | प्रचेतस

जीवघेणे फोटो.
पिवशी सुगरण झालीय एकदम.

सस्नेह's picture

11 Sep 2021 - 5:17 pm | सस्नेह

पापु जबरीच !

दह्यापेक्षा रवामैदा आंबवल्याने काम होते. आंबट गोड मधुरपणा येतो. हलक्या होतात.

रंगीला रतन's picture

11 Sep 2021 - 10:51 am | रंगीला रतन

लै भारी.

चांदणे संदीप's picture

11 Sep 2021 - 2:12 pm | चांदणे संदीप

ह्या पुर्‍या! फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटतेय.

एकदा ट्राय नक्की करणार.

सं - दी - प

तोंपासु! भारी दिसताहेत एकदम!

गुल्लू दादा's picture

18 Sep 2021 - 7:53 pm | गुल्लू दादा

आईच्या मागे लागणार आता हे करून दे म्हणून.

अथांग आकाश's picture

21 Sep 2021 - 4:33 pm | अथांग आकाश

जाम भारी!!!
0

सौंदाळा's picture

22 Sep 2021 - 5:44 pm | सौंदाळा

नेहमी कोणीतरी दिलेल्याच खाल्या आहेत. घरी कधी केल्या नाहीत.
गरम गरम खूपच मस्त लागतील.

जुइ's picture

29 Sep 2021 - 12:15 am | जुइ

फोटो खूप छान आला आहे. तोंपासू.