Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२१ - खुसखुशित पाकातल्या पुर्‍या

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 10/09/2021 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीगणेश लेखमाला २०२१
खुसखुशित पाकातल्या पुर्‍या कृती : एक वाटी मैदा आणि अर्धीवाटी बारीक रवा घ्यावा. दोन्ही छान एकत्र करून त्यात मधोमध गोल करून चिमूट भर मीठ आणि तीन चमचे गरम तुपाचे मोहन घ्यावे. मोहन पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यावे . आता पीठ मळण्याकरिता ताज्या दह्याचा वापर करावा . जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पीठ न मळता मध्यम consistency च पीठ भिजवून घ्यावे आणि साधारण अर्धा तास झाकून ठेवावे. तोपर्यंत आपण पाक करून घ्यायचा , पाका साठी एका कढईत एक वाटी साखर घेऊन त्यात एक वाटी पाणी घावे आणि गॅस वर उकळत ठेवावे ( भांड जाड बुडाच असेल तर उत्तम) त्यात दोन - तीन हिरव्या वेलच्या घालव्या, चिमुटभर केशर(ऑप्शनल) घालावे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक करायचा नाही फक्त पाक हा मधा सारखा चिकट लागला पाहिजे बोटांना. साधारण एक उकळी आली की दोन ते तीन मिनिटांनी बोटाच्या चिमटीत थोड मिश्रण घेऊन चेक करायचं पाक बोटांना चिकट वाटला की गॅस बंद करायचा. आता पुर्‍यांचे पीठ छान भिजलेलं आहे ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि थोडासा मैदा लावून चपाती लाटून घ्यावी आणि वाटी किंवा ग्लास च्यां मदतीने एकसारख्या पुऱ्या कापून घ्याव्यात. कढईत तेल तापवून घ्यावे आणि पुऱ्या छान तळून घ्याव्यात मस्त ट्टम फुगतात ह्या पुऱ्या, आता कोमट पाकात गरम पुऱ्या आलटून पालटून बुडवून घ्याव्यात (१५-२० सेकंद) ह्या झाल्या आपल्या पाकातल्या खुसखुशीत पुऱ्या. टिप्स: १) दही शक्यतो ताज घ्यावं खूप आंबट असेल तर टेस्ट बिघडू शकते २) पुरी गरम असतानाच पाक सुधा थोडा गरम असावा तरच पाक छान मुरला जातो.
1

2
-पियुषा.

वाचने 22504
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

आहाहा... जिल्बुशा छान पाकृ केली आहेत तू.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

तोंपासु रेसीपी, हा माझा अत्यन्त आवडता पदार्थ, कितीही खाऊ शकतो फोटोही कातिल आहेत पैजारबुवा,

लैच आवडल्या पाकातल्या पु-या. फोटो जीवघेणे आले आहेत. -दिलीप बिरुटे

वा पियुशा वा! अश्या पाकातल्या पुऱ्या पाहुनच, प्रत्येक recipe ला पाककृती म्हणाले असतील कोणी असे वाटले..:-) दहि लावावे लागते हे मात्र आज कळाले.. मला माहित नव्हते...

पाककृती वाचुनच कळतयं की खुप स्वादीष्ठ लागत असेल. ह्यावेळी पाच दीवसात एकदा हा नैवेद्य म्हणुन मी बनवेन. मी कधीही हा पदार्थ खाल्ला नाहीये, म्हणुन खुप धन्यवाद.

नेहमी कोणीतरी दिलेल्याच खाल्या आहेत. घरी कधी केल्या नाहीत. गरम गरम खूपच मस्त लागतील.