Skip to main content

श्रद्धा

लेखक जागु यांनी सोमवार, 20/04/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
जिकडे तिकडे अंधश्रद्धेचे थैमान, कुणा अशुभ कुणा शुभाचे वरदान ! जळी स्थळी भिन्न त्याचे माप, श्रद्धेवर अश्रद्धेने केलेला घात, दुबळ्या मनावर घडलेला अपघात ! मांजर आडवे जाता कर्म बिघाड, वाट पाहतात पिल्ले तिची रस्त्या पार ! घुबडाचे तोंड का असे अपशकून ? पाहून नये का जग तिने जन्म घेऊन ? टिटवीचे ओरडणे मारते कुणा, तिलाही होतच असतील मरण यातना ! पापणीची फडफड धरी स्वतःवरच रोष, देहाच्या त्रीदोषांपैकीच हा एक दोष ! आहे ना थोडी श्रद्धा विधात्यानेच सृष्टी निर्मिल्याची ? जे घडते ते त्याच्याच इशार्‍यांनी सारेच असे शुभ नसे कुणी अपशकूनी श्रद्धेला नेऊन ठेवा उच्च स्थानी .
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2711
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातलं अंतर कळायला हव. नेहमीसारखीच छान कविता, सहज, सोपी. :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

सुहास आज मम्मीची खुप आठवण येत आहे...

श्रद्धा आणि आंधश्रद्धा यामध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. ती समजायला हवीच. नक्कीच!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रांती, सुहास, प्राजू, तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

एकदम मस्त ! जोर्का झटका धीरे से लगे.....सारखं , एकदम मस्तच , वादच नाही !

छान कविता... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.